|
Dakshina
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:01 am: |
| 
|
सार्वांची मतं वाचली, आणि तुम्ही म्हणता ते ही खरंय राजकुमारी. कुणावरही कसलीही वेळ येउ शकते. कुणी ती सफ़ाईदार पणे परतवून लावेल, कोणी त्या परिस्थितीशी २ हात करेल तर कोणी मोडून पडेल. तुमचे दुःख मला कळतेय.... पण त्याच्याशी अनुभूती कशी करावी ते नाही कळत. मी तुम्हाला कोणताही उपाय सुचवू इच्छित नाही. कारण तो कितपत उपयोगी पडेल कोण जाणे. फ़क्त इतकी सदिच्छा व्यक्त करते की, तुम्ही लवकरात लवकर आनंदी आयुष्य जगण्यास सुरवात करावी. तुमच्या सर्वं मनोकामना पूर्ण होवोत, आणि तुम्हाला मनजोगत्या सर्व गोष्टी मिळाव्यात. शुभेच्छा!!
|
Dhanu66
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:09 am: |
| 
|
तुमच्या फ़ावला वेळात एखाद्या समाजसेवी संस्थेत वॉलेंटीयर म्हणुन काम करा. एखादा अनाथाश्रम, वृध्धाश्रम, ब्लाइंड स्कूल वगैरे. (मनाची तयारी असल्यास एखादे मुलही दत्तक घेता येईल.)
|
Rajkumari
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:29 am: |
| 
|
श्रद्धा, माझे वय फ़ार नाही असे कसे म्हणता? मला स्थळं येतात ती सगळी ३४च्या पुढची, कही तर ४० च्या पुढची ही असतात. धनु, मी मुल दत्तक घेतलं तर त्याच्याकडे कोण पहील? मी अशी १२/१४ तास नोकरीसाठी बाहेर जाणार. शिवाय, माझा काही एकटं रहायचा निर्णय पक्का नाही. उद्या माझं लग्नं चुकून ठरलं तर मधल्या मधे बिचार्या त्या मुलाचे हाल होतील. दक्षिणा .. धन्यवाद....
|
Aaftaab
| |
| Wednesday, April 09, 2008 - 12:10 pm: |
| 
|
राजकुमारी आधी तुम्ही स्वत:ला विचारा की तुम्हाला खरंच आनंदी, सुखी व्हायचय की नाही, जर त्याचं उत्तर होकारार्थी असेल तर तुम्हाला मार्ग आपोआप सापडेल. जर दु:खी राहून आणि आपल्या व्यथांचं गार्हाणं मांडून तुम्हाला काही साध्य होणार असेल तर ते फ़क्त थोडंफ़ार हलकं वाटणं एवढंच. माझे शब्द तुम्हाला पटत नसतील तर माफ़ करा. पण तुमची कीव किंव दया करणार्या लोकांपासून दूर रहा. " Give life another chance.. You will be surprised at what all it has to offer still..." अपना ग़म लेके कहीं और ना जाया जाये घर मे बिखरी हुई चीजोंको सजाया जाये.. जिन चराग़ोको हवाओका कोई खौफ़ नही उन चरागोंको हवाओंसे बचाया जाये घरसे मसजिद बहोत दूर है, चलो युं कर ले किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाये..
|
Zelam
| |
| Wednesday, April 09, 2008 - 12:49 pm: |
| 
|
राजकुमारी, तुम्हाला सुखी व्हावसं वाटतय ना? मग हे दुःखाचं, negative विचारांचं ओझं फेकून देणं फार गरजेचं आहे. तुम्हाला लग्न समारंभात लोकं दिसतात, सुट्टीच्या दिवशी बाहेर जोडपी दिसतात आणि वाटतं हे सुख मलाच का नाही? अहो पण problems कुणाला नसतात? त्या फिरणार्या जोडप्यांना, समारंभातल्या माणसांना problems असणारच, भले ते तुमच्या पेक्षा वेगळे असतील. त्यामुळे आधी मनातली ही बिचारेपणाची भावना काढून टाका. तुमच्या मनात सकारात्मक विचारांची ज्योत तेवत रहाणं, ती विझू न देता हे फार महत्त्वाचं आहे. मला दुःखी रहायचं नाही, आनंदात रहायचय हे मनाला पुन्हा पुन्हा बजावा. तुमचे plus points विसरू नका. प्रत्येक काम करताना ते समरसून करा. स्वतःसाठी जगा. तुमचं वयही एवढं जास्त नाही. लग्नाची इच्छा असेल आणि योग्य दिशेने प्रयत्न केलेत तर यश नक्की मिळेल. पण आधी स्वतःला काय हवय हे समजून घ्या. हे सांगणं खूप सोपं आहे आणि आचरणात आणणं तितकंच कठीण. म्हणतात ना कळतं पण वळत नाही. पण आपल्या मनाला आपल्यालाच वळवावं लागतं. मला वाटतं मूल वगैरे दत्तक घ्यायचा विचार तुम्ही सध्या करू नका. अजून एका जिवाची गुंतवणूक आणि जास्त complications . आधी स्वतः प्रयत्न करून negative मानसिकतेतून बाहेर या. तुम्हाला खूप शुभेच्छा. There is light at the end of the tunnel. फक्त त्या बोगद्यातून प्रकाशाकडे प्रवास करण्याचं काम तुमचं.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:27 am: |
| 
|
राजकुमारी, मी तूमची व्यथा आणि इथले सल्लेही वाचले. अगदी पहिल्यांदा, जे काहि झाले त्यात आपला काहि दोष होता, असा विचार करणे सोडून द्या. हि सकारात्मक भावना जाणीवपुर्वक जोपासा. आर्थिक पाया कायम मजबूत ठेवा. भविष्यासाठी तरतूदही करा. जोडीदार हवाच, त्याशिवाय जगणे व्यर्थ आहे, असे काहि नसते. एकट्यानेही आयुष्य सुंदररित्या जगता येते. जोडीदार हवा असेल तर तो पुर्णपणे स्वतःच्या मताने निवडा. घरच्यांच्या किंवा इतर कुठल्याहि दबावाला बळि पडू नका. इतरांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना करु नका. प्रत्येक जण दाखवतो तेवढा सुखी असतोच असे नाही. आपले काय होणार, याचे उत्तर आपण जे करु ते होणार असे आहे. आला क्षण जगायला शिका, भले तो ऑफ़िसमधला असो कि घरातला. प्रत्येक क्षण सुंदर असतो, नसला तर तो करता येतो.
|
Rajkumari
| |
| Thursday, April 10, 2008 - 4:30 am: |
| 
|
आफ़ताब, झेलम, आणि दिनेश, तुमच्या तिघांच्याही पोस्ट्स वाचल्या; खूप आवडल्या... आणि खरोखरी मनात पॉझिटिव्ह विचार आले. घटस्फोट झाल्या झाल्या मी लग्नाचा विचार केला नव्हता, मग हळू हळू जेव्हा पहायला सुरूवात केली. तेव्हा पहील्याच मुलाने क्लिक झाले नाही म्हणून नकार कळवला... त्याचे मला काही वाटले नाही. पण आत्तापर्यंत जी काही मुलं पाहीली ती सगळी या ना त्या कारणाने एक तर मी नाकारली किंवा त्यांनी तरी मला नाकारलं. लोक मला विचारतात असं कसं? इतकी मुलं पाहीलीस, एकही आवडला नाही? तूझ्या अपेक्षा खूप असतील. पण मुलिंच्या अपेक्षांपेक्षा मुलांच्या अपेक्षा या विचित्र आणि घुसमट करणार्या असतात. आफ़ताब - तुम्ही म्हणता ते खरंय, माझ्या मनात बिचारेपणाची भावनाच तीव्र होऊ लागली आहे आजकाल. आणि मी मुळात तशी नाहीए. माझं सगळं युद्ध हे आतल्या आत स्वतःशी सुरू आहे. मला यातून बाहेर नक्कीच पडायचं आहे, पण मार्ग सापडत नाही. योगा, संगित, फ़िरणे, सिनेमे, ध्यान-धारणा... सर्वं काही करून पाहीलं, त्याच्या फ़क्त तत्पुरता फ़ायदा होतो. पण तुम्ही सांगितलेले कोट्स खूपच इन्स्पायरिंग आहेत. मी त्यावर अंमल करण्याचा प्रयत्न जरूर करीन. झेलम, तुमचे म्हणणे तर तंतोतंत पटले, तुम्ही अगदी कमी शब्दात योग्य ते सांगितलं आहे. प्रॉब्लेम्स सर्वांना असतात हे ही मला माहीती आहे, माझ्या काही मैत्रिणी मला सांगतात आहेस तशी बरी आहेस, नोकरी चांगली आहे, घर आहे, छन एकटी रहा... हवाय कशाला नवरा.... कधी कधी तो ही विचार डोक्यात येतो. पण एकटं रहाण्याचं धाडस माझ्यात नाही. मी परत समुपदेशनाला जाण्याचा विचार करतेय. असो...लग्नासाठी योग्य दिशेने प्रयत्न करायचे म्हणजे नक्की काय करायचं? वधू-वर सुचकात नावं घालायची... साईट वर रजिस्ट्रेशन करायचं. गेली २ ते ३ वर्षं हे सगळं सुरू आहे. पण यश नाही येत.
|
Rajkumari
| |
| Thursday, April 10, 2008 - 4:46 am: |
| 
|
दिनेश, तुमची पोस्ट विशेष आवडली, कारण त्यात empowerment आहे. स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा मला असली तरिही, त्यातही मला विचित्रं अनुभव आला. थोड्या दिवसांपुर्वी मी एका मुलाला भेटले, आम्ही बोललो वगैरे, आणि बोलता बोलता live in relationship चा विषय निघाला. त्याच्या मते दुसर्यांदा लग्न करणार्यांसाठी हा एक उत्तम उपाय आहे, थोडे दिवस एकत्र राहून पहा, जमले तर ठिक नाहीतर नाही. मी त्याल फ़क्त म्हटले की तु म्हणतोस ते बरोबर आहे. (means only facilitation of his thought) पण तितकंच अवघड... आणि माझ्यासाठी तर अशक्यंच आहे. तेव्हापासून रोज हा माणूस मला विचारायचा, मग केलास का विचार? केलास का विचार? तो माणूस डिसेन्ट होता पण कुठेतरी तो त्याची आयडिया मला सेल करण्याचा प्रयत्न करत होता... हे झालं एक उदा. मी एक नोटीस केलं आहे की, मुलांना ज्या अपेक्षा असतात त्यात ते जराही कॉम्प्रमाईज करत नाहीत. त्यातली एक जरी गोष्टं कमी असेल तर ते नकार देतात. मुलगी दिसायला उत्तम, गृहकृत्यदक्ष, पतीप्रमाद, उच्चशिक्षित, नोकरीवाली.... म्हणजे थोड्क्यात आखूडशिंगी बहुदूधी हवी असते. पण हीच मुलगी जरा स्वतंत्र विचारांची असेल तर त्यांना नाही चालत. बाकी उंची, नाक, रंग याबद्दलचे बायसेस तर आहेतच. असे एकेक अनुभव येतात आणि प्रत्येक वेळी मन खचून जातं. आता योग्य जोडीदार शोधावा तर कुठे शोधावा असाही प्रश्नं पडतो. पण उत्तर मात्रं मिळत नाही.
|
Trish
| |
| Thursday, April 10, 2008 - 5:35 am: |
| 
|
राजकुमारी, तु अशीच लिहित रहा तुझे मन मोकळे होईल बघ....आणि हलके ही वाटेल. मला सांग चिंता करून काही होणार आहे का उगाच मन स्वास्थ बिघडेल तेव्हा थोड़े चिंतन कर तुझ्या बहुतेक प्रशंनाची उत्तरे तुलाच सापडतील... नेहमी आपण स्वतः च स्वतः ला चांगले प्रोत्साहन देऊ शकतो. आधी तू तुझा स्वतःचा शोध घे आणि जेव्हा तुला स्वतः मधे एक हसरी आनंदी राजकुमारी सापडेल तेव्हा तुला तुझा मार्ग सापडलेला असेल...तो पर्यंत तू लिहित रहा आम्ही आहोत ऐकायाला.
|
Rajkumari
| |
| Thursday, April 10, 2008 - 6:41 am: |
| 
|
त्रिश, मनातलं बोललास. माझ्या अवती-भवती असं कोणीही नाहीए ज्यांना मी हे सगळं सांगू शकेन. आणि मित्र-मैत्रिणिंना प्रत्येकच गोष्टं नाही सांगू शकत. सुदैवाने माझं जे काही फ़्रेंड सर्कल आहे ते खूप जवळचं आहे. खूप जवळचे नातेवाईक पण विचित्रं वागतात त्यामूळे मी कोणाकडेच जात नाही. काही नातेवाईक(म्हणजे आत्याच्या सासरचे वगैरे) तर इतके ऑर्थोडॉक्स आहेत की माझ्यासमोर माझ्या इतर बहीणिंना वगैरे घरी येण्याचे आमंत्रण देतात पण मला नाही बोलवत. मलाही जावसं वाटत नाही, पण मनावर आघात होतात. असे वाटते की या एका घटनेने आपल्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून नेलाय.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 10, 2008 - 9:18 am: |
| 
|
राजकुमारी, आपल्यावर समाजाचे फ़ार बंधन असते. समाजाचा आक्षेपच असतो जणु, एकट्या राहणार्या माणसांवर. त्यामुळे जोडीसार असावा हि खरेच आपली गरज आहे, असे वाटल्याशिवाय पुढे जाऊ नका. मनासारखा जोडीदार मिळवणे जवळजवळ अशक्य असते, पण मनासारखा जोडीदार घडवणे सहज शक्य असते. असे घडवता घडवता आपणही घडत जातो. त्याच्या खुपणार्या बाबी डोळ्या आड करता येतात. आपल्याही वाईट सवयी, दुराग्रह नव्याने दिसु लागतात. ते सगळे सोडावे लागते. मग अवघा रंग एक होतो. तो मी, ती मी हा दुजाभावच सरतो. हा अनुभव घ्या. असे काहि क्षण जगले कि संपुर्ण आयुष्य जगल्याचे समाधान मिळते. नव्हे हेच क्षण आपले आयुष्य असते, आणि बाकि आयुष्याचे लादलेपण, सहज पेलता येते. माझी मी समर्थ आहे माझं आयुष्य जगायला, असा विचार कायम करत रहा म्हणजे ते तूमच्या वागण्यातून इतराना दिसेल, आणि त्यांची काळजी मिटेल. ज्या वर्तुळात आपण राहतो, तिथे सामाजिक रुढींचा खुपच पगडा असतो. खुपदा त्यांच्या मनातही नसते तसे, पण नकळत काहि दुखावणारे शब्द त्यांच्या तोंडातून निघुन जातात. त्यांचा राग करण्यापेक्षा, कीव करणे कमी त्रासाचे होते. दत्तक मुल एक हाती वाढवणे खरेच खुप कष्टाचे असते, पण त्याचबरोबर लहान मुलांबद्दल ओढ वाटणे तितकेच नैसर्गिक आहे. आणि मुले तर खरेच निष्पाप असतात. आपण करतो त्यापेक्षा लाखपटीने ती प्रेम करतात. पण त्यासाठी ते मुल आपलेच असणे गरजेचे नाही. आजुबाजुला तर अनेक अशी मुले असतात, ज्याना एक लाड करणारी ताई वा मावशी हवी असते.
|
Yashwant
| |
| Thursday, April 10, 2008 - 10:05 am: |
| 
|
माझ्या जवळच्या नात्यातल्या मुलिचा असा प्रॉब्लेम झालाय. तिला पन सगळे असेच टाळतात. तिच्या देखत इतरान्न निमन्त्रन देतात आणि तिला सान्गत नाहीत. मी आणि माझी बायको कुठे फ़िरायल जानार असलो तर तिला बरोबर घेवुन जातो. पन तिचे आइवडीलच तिला जास्त कुणात मिसळु देत नाहीत. एकदा तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. आम्ही तिला वरचेवर घरी बोलवुन बोलते करतो. माझ्या बायकोचे आणि तिचे ट्युनिन्ग जमले आहे. आता ती स्वतचा व्यवसाय करते. दुसर्या लग्नाला घरच्यान्चा विरोध आहे, तो डावलुन ति स्वताच मुलगा शोधतेय. एकन्दर ती आता बरीच सावरली आहे. तिचे ते traumatic दिवस आठवले कि आम्हालाच अस्वस्थ वाटते.
|
Mimajhi
| |
| Thursday, April 10, 2008 - 10:57 am: |
| 
|
राजकुमारी तुझी व्यथा वाचली. सल्ला देणे खूप सोपे आहे पण स्वत : वर वेळ आली की निभावणे अवघड असते. तू या सगळ्यातून सुखरूप बाःएर पडशील आणि तुझे जीवन आनंदाचे जाईल यासाठी आमच्या शुभेच्छा. इथेही तुला हितचिंतक भेटतील. पण समजात सल्ला देण्याच्या निमित्ताने सलगी करू पहाणारेही असतात, त्यापासून सावध रहा. एखादीच्या अशा मन : स्थितीचा फायदा घेऊन तिला कसे जाळ्यात अडकवायचे हे असल्या लोकांना बरोबर माहिती असते. इथे काहितरी विशेष आवडेल असे लिहून स्वत : चे चांगले चित्र उभे करणे सोपे असते, पण त्याआड दडलेली व्यक्ती कशी असेल ते सांगता येत नाही. तुला शुभेच्छा.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 10, 2008 - 12:43 pm: |
| 
|
राजकुमारी, तुमच्या बीबी वर थोडेसे विषयांतर करतोय, म्हणुन क्षमा मागतो. पण अश्या रंगबदलु ढोंगी माणसांपासून आपणही सावध रहावे. मिमाझी, सध्या तंत्रज्ञान एवढे पुढे गेलेय कि तुमचे ढोंग आता उघड झालेय. यापुढे काहिही बरळलात, तरी मी दखल घेणार नाही. आणखी कुणी घेतलीच तर नशीब समजा. तशीही नाव घेऊन लिहायची तूमच्यात हिम्मत नाही. तूमच्यासारखे अनेक जण इथे आले आणि बरळले. आणि मग त्यांचे काय झाले ते सगळे जाणतातच. म्हणतात ना, हाथि चला जाता है और - - - - - तेव्हा चालु द्या.
|
Zelam
| |
| Thursday, April 10, 2008 - 4:02 pm: |
| 
|
राजकुमारी, मायबोली मेल चेक करा.
|
माझ्या सुदैवाने म्हणा किंवा अणखिन कशामुळे म्हणा.. माझा माझ्या कामाच्या ठिकाणी मोजक्या लोकांशी संपर्क येतो, पर्सनल सर्कल मधले मित्र हे ही बर्याच वर्षांपासूनचे आहेत, नविन मी बनवलेले नाहीत. फ़ार कोणी मैत्री करण्यात इंटरेस्ट दाखवला तर मी रस दाखवत नाही. फ़ार उदासिन आहे असे दाखवते. मैत्रिणी तर आहेतच, त्यातूनही कोणी ढोंगी वाटले त्यांना ही मी तोडून टाकलेय. पण माझी कौन्सिलर म्हणते की लोकांत मिसळलं नाही तर तुझा शोध हा रिस्ट्रिक्टेड राहील. पण मला मनोमन भिती वाटते की आपण पार्टीज अटेंड केल्या, लोकात मिसळलो तर आपली इमेज कशी होईल? इमेजचा फ़ार काही इश्यू नाहीए, पण आपण असुरक्षित आहोत हे लोकांना फ़ावते आणि ते काही (मनघडन) गोष्टी सांगून माझे मनःस्वास्थ्य बिघडवतात. माझी एक ऑफ़िसातली मैत्रिण मला कायम सांगायची एक दोन आठवडे झाले की... "तू हे नको करू, लोक असं म्हणतात, तसं म्हणतात.... इकडे गेली होतीस का? तिकडे गेली होतीस का? एक ना एक, लाखो गोष्टी.... मी कितीही लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं तरिही मी नकळतपणे त्याचा विचार करायची. तिला माझ्याबद्दल सगळं माहीती होतं, त्यामूळे मी त्यानंतर मैत्रिणी बनवल्या जरी तरी त्यांना डिस्टन्स वरच ठेवलं. जेव्हा त्यांच्याबद्दल खूप विश्वास वाटला, तेव्हाच मनातल्या गोष्टी सांगितल्या सध्या एक प्रकारच्या असुरक्षिततेच्या भावनेने मी पछाडली गेलेय. कोणिही माझ्याशी सहज बोलायला आलं तरिही मला संशयच येतो. कोणि जास्ती चांगलं वागायला लागलं की तो आणखिन बळावतो.
|
Yashwant
| |
| Friday, April 11, 2008 - 5:59 am: |
| 
|
थोडासा आत्मविश्वास वाढव. कुणाला किती जवळ करायच आणि कुणाला लाम्ब ठेवायचे हे जमले कि तुला सोशल अक्टिव्हीटी मध्ये भाग घ्यायला सोप जाइल. एका ठराविक वयानन्तर जीवाभावची मैत्री होन अवघड असत. आणि सगळ्यान्शीच आपल ट्युनिन्ग कुठे जमत? साधारण पहिल्या भेटीतच आपल्या लक्शात येत कि आपल या व्यक्तिबरोबर जमेल कि नाही. डायरी लिही. एकदा मनातल्या भावना रित्या झाल्या कि छान वाटेल. आनखीन एक, तुला कदाचीत माहित असेल, कुणाबद्दल निगेटीव्ह विचार यायला लागले कि दिर्घ श्वसन कर. instant relief आणि आपन लगेच फ़्रेश होतो.
|
थॅंक्स यशवंत, छान वाटलं तुमची पोस्ट वाचून. झेलम, मी ऑफ़िसातून मेल्स चेक नाही हो करू शकत. 
|
Itgirl
| |
| Friday, April 11, 2008 - 7:37 am: |
| 
|
राजकुमारी, तुम्ही ज्या प्रसंगातून, अनुभवातून गेला आहात, जात आहात ते नक्कीच कठीण तर खरेच. पण तुमचे कौतुकही वाटले, अशासाठी की, एकतर भावूक, हळवा स्वभाव असूनही तुम्ही या प्रसंगांमधून निभावून गेल्या आहात, मनात गोंधळ आहे म्हणतानाच, तुम्ही अत्यंत सुसंबद्धपणे लॉजिकली इथे विचार मांडता आहात आणि एकूणच तुमच्या पोस्ट्स वाचल्या की की तुम्ही विचारपूर्वक सगळे निर्णय घेत आहात हेही कळत आहे. मग तुम्हांला असे निराश का वाटावे? मला तर तुम्ही स्वत:ला उगाचच कमी लेखत आहात, कमजोर समजत आहात असे वाटत आहे. इथे एका पब्लिक फ़ोरमवर खुलेपणे तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेली, अत्यंत वैयक्तिक अशी गोष्ट मांडलेली आहे, यासाठी धैर्यही हवे अन एकूणच माणसांच्या चांगूलपणावर विश्वासही. म्हणजे तुम्ही फारश्या संशयी मनोवृत्तीच्याही असाल असे दिसत नाही. आणि अश्या मनातल दु:ख मांडू शकताय, म्हणजे, तुम्हांला जे वाटत की तुम्ही कोणाशी काही बोलू शकत नाही, कोणी चांगले वागले की संशय येतो वगैरे, हे काही खरे नाही. हे तुम्हीच स्वत: उभे केलेले अडसर आहेत का?? आणि इथे पूर्णपणे अनोळखी व्यक्तींना तुम्ही आपल्या मनातलं दु:ख सांगता आहात, म्हणजे, आणि तुम्ही व्यवस्थित मिसळूही शकत आहात लोकांमधे. हो की नाही? बेस्ट लक तुम्हांला
|
आयटी गर्ल, तुमची पोस्ट खूप सुंदर आहे. वाचल्यावर माझ्या चेहर्यावर हास्य पसरलं. आणि खरं सांगू का? इथे अनोळखी लोकांमध्ये मनातलं बोलायला लागल्यापासून गेले २ दिवस मला हलकं वाटायला लागलंय. अगदी काही का विरंगुळा नसेना, पण तुम्हा लोकांच्या पोस्ट्स वाचल्यावर मनाला बरं वाटायला लागलंय. पुढे; तुम्ही म्हणता ते खरंय आयटी गर्ल, मी संशयी नाही, मी धाडसी आहे, माझ्यात आत्मविश्वासही आहे. माझ्या चेहर्याकडे पाहून कुणीही guess करू शकणार नाही की मी मनातल्या मनात इतकी मोठी लढाई खेळते आहे ते. पण शेवटी, धाडस, बोल्डनेस ही सगळी पांघरूणंच झाली ना? किती दिवस अंगावर घेणार? मी मनातून खूप कमकुवत झालेय. खूप टक्केटोणपे खाल्ल्यावर मी सुसंबद्ध आणि सुबक पावलं टाकायला शिकलेय. पण ह्या फ़ूंकून फ़ूंकून वागाण्यामुळे असं वाटतं की आपण जगणं विसरून गेलोय. लग्नाच्या बाबतीत अजून एक अनुभव मला आला, तो म्हणजे अजूनी एक unmarried मुलगा आला माझ्या संपर्कात, त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं की नाही माहीती नाही. पण आमची बर्यापैकी ओळख झाल्यावर तो तसं म्हटला होता की मी आईशी बोलेन म्हणून, बोलला सुद्धा, त्याची आई नेहमीप्रमाणे नाही म्हटली. मग तो हळू हळू बोलायचा बंद झाला, मी ही सोडून दिले. त्याने लग्नाबद्दल बोलल्यावर माझी हळू हळू involvement सुरू झाली होती. आणि आईशी बोलेपर्यन्त थोडी फ़ार झाली होती. मग आईने नाही म्हटल्यावर तो गायब झाला होता. मला खूप त्रास झाला. मी स्वतः होऊन. कधीच नविन ओळख करून घेण्याचा घाट घातला नव्हता. तरिही लोक येऊन माझं मनःस्वास्थ्य बिघडवतात म्हणजे काय? असं ही नव्हतं की मी आंधळेपणाने त्याच्या प्रेमात धाडकन पडले होते. दरम्यान मी खूप प्रयत्न केला आणि सावरले. (हे सगळं माझ्या घरच्यांना माहीती आहे.) नुकते मला कळले की तो त्याच्या लग्नाचे प्रयत्न करतोय, ते ही लव मॅरेज. अशा खोटेपणाला काय म्हणावे? त्याचं जर आधीपासून एका मुलीवर प्रेम होतं तर त्याने मला लग्नाबद्दल कशाला बोलायचं? फ़क्त इम्प्रेस करायला? एकिकडे जे झालं ते बरंच झालं असं वाटतय. पण विनाकारण त्रास भोगला तो कुठच्या कुठेच गेला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|