|
Zakasrao
| |
| Thursday, April 03, 2008 - 3:24 am: |
| 
|
जब्बरदस्त उखाणे सुरु आहेत की चला तर सुरु करा उ खाणे >>>>> सम्या आपल्या पुर्वजांसारख वागलच पाहिजे का??????
|
Manjud
| |
| Thursday, April 03, 2008 - 6:11 am: |
| 
|
हा पण चाफीसाठि: चाफ्फा निघाला बाजारात म्हटले घेऊन ये माझ्या केसांसाठी चाप असा कसा हा खुळा आणि छंदिष्ट घरी घेऊन आला जंगलातला साप
|
Akhi
| |
| Thursday, April 03, 2008 - 8:09 am: |
| 
|
ह. ह. पु. वा. सहीच................
|
Ladtushar
| |
| Thursday, April 03, 2008 - 10:57 am: |
| 
|
फुल टू धमाल चालली आहे...आणखी येवूदेत ... http://www.ukhane.co.in/
|
Arun
| |
| Thursday, April 03, 2008 - 11:45 am: |
| 
|
सगळेच : भन्नाट सुटला आहात की ........... कोणाची भाईगिरी तर कोणाची दादागिरी आमच्या सम्याची मात्र आहे फक्त स्वयंसेवकगिरी ........ योण्णा : तुमची इथे गरज आहे .......
|
Urfa
| |
| Thursday, April 03, 2008 - 12:10 pm: |
| 
|
हा BB उघडणारे हुश्शारऽऽऽ.ऽ.ऽऽ लोक्स तुमच्यासाठी. च्यायला आणि चाफ़्फ़्याने चालवलाय भलताच छंद, ADMIN चे नाव घ्या आधी नाहीतर BB करतील बंद.
|
Urfa
| |
| Thursday, April 03, 2008 - 12:31 pm: |
| 
|
स्वाती, मंजु एकदम...........मार डाला
|
Chyayla
| |
| Thursday, April 03, 2008 - 9:34 pm: |
| 
|
अरे वा झकास, उर्फ़ा अरुण, मंजुडी तुम्हीही आलेत.. मज्जा लाडतुशार ती लिंक मस्त आहे ईतर उखाणे वाचुनही ईथे एखाद्या मायबोलिकरला चपखल बसवता येतिल. अखि, गोबु, मेग्गी, दिनेश, केदार, चिन्या, रुनी, मनिषा, प्रिन्सेस सगळ्याना धन्स, अरे ईथे धुळवड सुरु झालीय तुम्हालाही रंग लागले नसतील तर लागतील, तेव्हा उखाण्याचे रंग उधळण्यासाठी तुम्हीही तयार असा. असो हा उखाणा अमृतरावांचा . . . नाही समजले?... वर ती अमृता येउन गेली ना तीच्यासाठी. संसाराला आमच्या अमृताची गोडी. अमृतराव अन अमृताची ही जोडी जशी शोभुन दिसते पैजामाला नाडी. माफ कर हं केली मी तुझी खोडी. हॅलो 'झक्कास बंब सेवा' लवकर या.. तोपर्यंत अमृताने दिवा घेणे
|
Rajya
| |
| Friday, April 04, 2008 - 4:16 am: |
| 
|
सुर्यकांत साठी, कांताच्या जाळ्यात कशी अलगद सापडली २१ नं चुकली, म्हणुन २६ नं पकडली सौ. संदीपगुरु साठी पाज मजला आम्रत घोट अत्रुप्त तुझ्या ओठांनी रावांचे नाव घेते आसवांच्या वाटांनी (कुणाला काही कळाले तर मला पण सांगा हा उखाणा ऐकुन म्हणे वर्हाडी मंडळी बेशुद्ध पडली होती, त्यांना कांद्याची वासना दिल्यावर मग कुठे त्यांना शुद्ध आली म्हणे, एक ऐकीव बातमी ) आयटीबॉय, अर्थात मिष्टर आयटी गर्ल साठी वेड म्हणावं की व्यसन आता हीच्यापुढे हात टेकला मायबोली मायबोली म्हणत भटजीच्या गळ्यात हीने हार घातला मी लग्नात घेतलेला उखाणा (जुनाच आहे म्हणा) नदिच्या काठी पोह्याची बशी राणीला सोडुन बाकी सार्या म्हशी सौ. यश साठी शॉपिंग करुन दमले बाई केव्हढा पसारा हा जमला राव आमचे धिप्पाड म्हणुन हमालाचा खर्च तेव्हढा वाचला
|
Rajya
| |
| Friday, April 04, 2008 - 5:01 am: |
| 
|
एक उखाणा मोना साठी नाव माझे मोनाक्षी म्हणतात मला शिव्हिंण आयता बकरा सापडला आता पुरवुन पुरवुन खाईन
|
Aaftaab
| |
| Friday, April 04, 2008 - 5:50 am: |
| 
|
हा खास 'दाद' साठी तिच्या 'ह्या'नी घेतलेला.. माझे सगळे मित्र म्हणतात "सारखं का रे तुझ्या डोळ्यात पाणी?" मी म्हणतो, "विनोदी आणि करुण, दोन्ही प्रकारच्या कथांची 'दाद' आहे राणी!!
|
Manjud
| |
| Friday, April 04, 2008 - 5:56 am: |
| 
|
राज्या सौ. संदिपगुरू आणि सौ. यशचा उखाणा एकदम बेश्ट.
|
चाफ़ा, च्यायला, झकास, राज्या, मंन्जू, उर्फ़ा धमाल उखाणे...
|
Itgirl
| |
| Friday, April 04, 2008 - 8:23 am: |
| 
|
राज्या, भटजी काय??? शी!! याईक्स!!! मी नाय!!
|
Chaffa
| |
| Friday, April 04, 2008 - 2:00 pm: |
| 
|
राज्या धुडगुस रेऽऽऽऽ मस्तच! आणखी कुणीतरी आहे तिथे केदार १२३ तुझ्या केदारी साठी रे! कसं बाई सांगु भिती मला वाटे केदाररावांनी मोडलेत आज चार वजनाचे काटे आयटी बॉय सही रे राज्या शंकराच्या देवळात जाताना नंदीसमोर वाकायला लागतं आयटी चें नाव घेताना आधी'विचारपुस' मधे पोष्ट टाकायला लागतं चिन्यास सप्रेम, १ लग्नानंतर नाव बदलायची घाई केली तिनी म्हणते विचार कसला करता आहो चिन्याची बायको 'चिनी' २ काल केले मेडीकल चेक अप त्यात जीव मेटाकुटीस आलाय दिवसभर चिन्याचे नाव घेउन म्हणे, मला डायबेटीस झालाय! ३ लग्ना नंतर सासरी जाताना मला सांगत होती आई तुझ्या नवर्यावर लक्ष ठेव 'यांना' म्हणाले हींदी चीनी भाई भाई आज केलीये बस ईतनाही!
|
Kedar123
| |
| Saturday, April 05, 2008 - 3:56 am: |
| 
|
लै धमाल रे चाफ्या, राज्या आणि सम्या हा श्रीमती झकोबांसाठी सुखी संसारात माझ्या मला पांडूरंग भेटो झकोबांच नाव घेते काढून झकूल्याचा फोटो योण्णांनी हिकड लवकर यायला हवय
|
चाफ़ा भारी रे!!!!!!!!!!!!धन्स. येउ दे अजुन
|
Sonchafa
| |
| Saturday, April 05, 2008 - 4:25 pm: |
| 
|
मजा आली उखाणे वाचून.. पुधे चालुद्यात
|
Panna
| |
| Sunday, April 06, 2008 - 3:44 am: |
| 
|
आईईईईईई गSSSS... कसले धमाल उखाणे आहेत!! तुफान सुटलायत सगळेजणं!!! और आने दो!!
|
Chaffa
| |
| Sunday, April 06, 2008 - 2:42 pm: |
| 
|
सौ. समिर यांज कडून! मलाही घ्यायचाय उखाणा पण कसतरीच वाटतय घ्यायला चांगला चुंगला काही घ्यायचा सोडुन आय. डी. घेतलाय 'च्यायला'! अमृताच्या नावाने उखाणा लिहून तु भलत्याच खोड्या काढल्या आता झकास बंबा सोबत मागव 'गिरीराज' बादल्या! समस्त मायबोलीकर! बुध्दी तुमची चौकस तीचा कस लागेल खरा 'पन्ना'चं नाव घ्यायचं तर शोधा तिचा हीरा!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|