Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » हे करून पहा... » Archive through April 04, 2008 « Previous Next »

Bee
Wednesday, April 02, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज फ़ावल्या वेळात जवळ होते तेवढे कालनिर्णय वाचून काढले. किती उपयुक्त माहिती मिळाली त्यातून! 'हे करून पहा' ह्या शीर्षकाखाली रोजच्या जीवनात उपयोगी पडू शकेल अशी माहिती वाचायला मिळाली आणि त्यातील काही गोष्टी ताबडतोब अमलात देखील आणून पाहिल्यात. तेंव्हा विचार केला इथे मायबोलिवर शेकडो मित्रमैत्रीणींना 'हे करून पहा' असे काही सांगता येईल. पण कृपया ह्या बीबीच्या विषयाला धरुन तुमचे पोष्ट लिहा अशी नम्र विनंती.

Swaatee_ambole
Wednesday, April 02, 2008 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> पण कृपया ह्या बीबीच्या विषयाला धरुन तुमचे पोष्ट लिहा
हे नक्की करून पहा.

Dakshina
Thursday, April 03, 2008 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, खरंच चांगला फ़ळा उघडलास....
मी पण काही सुचवण्याचा प्रयत्न करते.
*स्वयंपाक घरात जुन्या कागदाचा एक गठ्ठा आणि एक पेन स्टेपल करून लटकवून ठेवावा, कधी कधी मध्येच एखादी गोष्ट संपल्याची जाणिव होते, किंवा कधी कधी रोजच्या वापरात नसलेली गोष्टं ही आपल्याला आणावी असे वाटते, पण ती निव्वळ विसरल्यामुळे आणली जात नाही, तर पटकन अशा गोष्टींची नोंद होऊ शकेल. महिन्याचा सुरवातीला हीच यादी पडताळून पाहता येइल म्हणजे काही आणावयाचे विसरणार नाही.



Bee
Thursday, April 03, 2008 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे करून पहा --

१) शतपावली करायला वेळ नसेल तर घरच्या घरी वज्रासनात पाच दहा मिनिटे बसा, अन्न लवकर पचत आणि पोट हलत राहतं.

२) जिभेला अल्सर झाला असेल तर मोगार्‍याची फ़ुलं पाण्यात भिजवून ते पाणी घ्या.

३) दातांची झिज होत असेल तर द्राक्षाचे सेवन करा. दात पुन्हा एकदा मजबुत होतात.



Tanyabedekar
Thursday, April 03, 2008 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थंडीच्या दिवसात बिड्या सादळु नयेत म्हणुन बिडी बंडल रात्री चुलीमागे सारुन ठेवा.. :ड

Shraddhak
Thursday, April 03, 2008 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टण्या, थंडीच्या दिवसांत की पावसाळ्यात रे? बिड्या पावसाळ्यात सादळतील ना दमट हवेमुळे? :-)

Bee
Thursday, April 03, 2008 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पापडाचे पाकिटं फ़्रिजमधे ठेवले तर पापड कडक होतात. वर ठेवले तर पापडाला बुरशी लागते किंवा ते कशाकशानी तरी खराब होतात. ह्यावर काही करता येईल का? (लगेच संपवून टाकायचे नाहीयेत :-))

Manjud
Thursday, April 03, 2008 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे टण्या, शहरात कुठली आलीये चूल? आणि गॅसचा तसा काही उपयोग नाही कारण रात्री तो बंदच असतो त्यामुळे दुसरा काहीतरी उपाय सांग.

Shraddhak
Thursday, April 03, 2008 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू, मायक्रोवेव्ह दहा मिनिटे चालू ठेवून नंतर बंद करून टाक. आणि त्या कोरड्या आणि किंचित गरम मायक्रोवेव्हमध्ये बिड्यांचं बंडल ठेव. :-)

बी, ज्या डब्यात पापड ठेवशील, त्याच डब्यात कापसाचा मोठा बोळा घालून ठेव. आर्द्रता शोषली जाऊन पापड नीट राहतील.

Manjud
Thursday, April 03, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म्, म्हणजे वीज जाळायची.

काडेपेटीची काडी जाळा, बिडी जाळा, वीज जाळा जलाओ जलाओ, और जलाओ छे!! छे!! किती हा चंगळवाद....


Ajjuka
Thursday, April 03, 2008 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
श्रद्धाने सांगितलंय ते करंच पण ओला हात लागलेला असणे किंवा ओल्या हवेचा संपर्क आल्याशिवाय बुरशी येणार नाही.
तेव्हा ते टाळायचा प्रयत्न कर. तसं करूनही बुरशी आली तर पापड चांगले वाळवलेले नाहीत कंपनीने हे लक्षात घेऊन कंपनी बदल.


Tonaga
Thursday, April 03, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सर्व करण्यापेक्षा पापड खायचं बन्द कर....

Bee
Thursday, April 03, 2008 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र आणि नि करून पाहतो नक्की. पापड माझा आवडीचा मेनू आहे. ह्या जन्मात तरी खाणे बंद करणार नाही.

मंजु, स्वैपाक करताना बिडीचे बंडल गॅसच्याच जवळ कुठेतरी ठेव म्हणजे थोडा शेक बसेल बिडीला आणि सादळ होणार नाही. (बायका बिड्या ओढतात. धन्य बुवा!)


Uday123
Thursday, April 03, 2008 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायका बिड्या ओढतात. धन्य बुवा!
--- म्हणजे तुम्ही या (म्हणजे बिड्या) बाबतीत समानता मानत नाही असा घ्यायचा कां?


Tonaga
Thursday, April 03, 2008 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिडीच्या बाबतीत समानता मानल्याने आपल्या वाट्याच्या बिड्या कमी होतात एवढे साधे कळत नाही का?

एक विनोद आहे या संदर्भात,

' आजोबा तुम्हाला पेरू खाता येतो का?'
"नाही बाळ मला दात नसल्याने पेरू नाही चावता येत, पण का रे ?"

'मला जरा खेळायला जायचेय तोपर्यन्त पेरू तुमच्या जवळ ठेवायचे होते '


तस्सं..


Maanus
Thursday, April 03, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भांडी घासायचा Scotch-Brite साधारण २-३ आठवड्यातुन एकदा microwave मधे एक मिनीट ठेवावा. तो नीट साफ होतो.

Prajaktad
Thursday, April 03, 2008 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पापड माझा आवडीचा मेनू आहे>>पदार्थ म्हणायचय का तुला??
१) पोळ्या करताना कणिक(लावायची) सांडून ओटा किंवा किचन टॉप फ़ार चिकट होतो तेव्हा पोळपाटाखाली एक पेपर पसरावा..
२) हरबरा डाळिला मुंग्या,किड लागु नये किंवा खवट होवु नये म्हणुन त्यात लंवगा घालुन ठेवाव्या.


Uday123
Thursday, April 03, 2008 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिडीच्या बाबतीत समानता मानल्याने आपल्या वाट्याच्या बिड्या कमी होतात एवढे साधे कळत नाही का?
--- हो पण मग कधी अडचणीच्या काळात (तुमच्या कडचा साठा संपला!) मदतही घेता येते. एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ. नंतरचा विनोद छान होता.

बी यांनी फ़लक चांगला उघडला आहे...माझ्या मुळे थोडे विषयांतर झाले, पण पुढे काळजी घेईल.


Manjud
Friday, April 04, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे बाबा गंमत केली मी.... तो स्मायली नाही का पाहिला? म्हटलं कोणी पुरुष असा प्रश्न विचारतीलच, त्याआधी आपणच विचारून त्यांचे काम सोपे करावे.

आता टण्याने ही टिप दिली त्याचा अर्थ असा नव्हे ना की तो बिडी ओढतो. काय रे टण्या, बिडी काय ओढ्तोस? त्यापेक्षा सिगरेट बरी


Dakshina
Friday, April 04, 2008 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* कूकर चे काम झाल्यावर त्यात उरलेले गरम पाणी न फ़ेकता, तेलकट भांडी धूवायला वापरा...
आमच्या मामी तर तेच पाणी आमटीत घालायच्या... आमटी पटकन उकळायची....

* तसंच कूकर लावताना याच पाण्यात जर वापरून संपलेला लिंबू घातला तर कूकर आतून स्वच्छं निघतो, अगदी चकचकीत.

* बहुतेक वेळा फ़्रिज मध्ये ठेवलेली कणिक काळी पडते. हिच कणिक मळली की आपल्या नेहमीच्या प्लस्टिकच्या कॅरी बॅगेत घालून भाज्यांच्या ट्रे मध्ये ठेवा. बाहेर काढली की लवकर नॉर्मलला येते
आणि काळी ही पडत नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators