|
Prajaktad
| |
| Thursday, March 20, 2008 - 10:54 am: |
| 
|
एका लग्नाच्या(हम आपके है कौन) प्रचंड यशस्वी अनुभवावर अजुन ३ लग्न (साखरपुडे,जेवणावळी, संगित) करू शकू अस सुरज बडजात्या ला वाटणारा विश्वास म्हणज़े हम साथ साथ है! ( between: याच्या नावावरुन हा माणुस जात्यावार (एकच)दळण दळतोय अस वाटत संदर्भ्: नाव आणी प्रतिमा ) जगाच्या पाठिवर स्वत:ची , दुसर्याची , शेजार्यांची लग्न करणे हाच एक उद्योग असलेली पात्रे म्हणजे सुरजचा पिक्चर. भारतिय क्रिकेट टिम मधे जस (पुर्वी) सचिन,राहुल,सौरभ ठरलेले आणी बाकि बदली कामगार तस आलोक नाथ,अनुपम खेर,रिमा लागु आणी प्रेमबाबु उर्फ़ सल्लुमिया ठरलेले.. बाकी मग ब.का. " बरखुरदार " असला जड हिंदी शब्द बोलत असलेला दुसर लग्न रिमा लागु शी करुन सुखी असलेला आलोक नाथ म्हणजे मुळ रामपुर का वासि बर का !. हा काय व्यवसाय करुन एकदम शेहर का एकदम शिर्मन्त आणी इज्जतदार आदमी होतो ते न कळे... असो! याच घर म्हणजे बघा कुठे ते शेहर मधे असत..इतक मोठ इतक मोठ कि तिन मुल त्यांच्या भावी बायका, सासरे (सासु आणी पर्यायाने साड्या दागिने असा फ़ुटकळ खर्च कशाला? म्हणुन त्या नाही),मामा,मामि, शेजारी पाजारी,गाववाले सगळे सगळे मावतात बर का! अगदी म्हणजे स्वत:च थिएटर मावेल एवढ मोठ हो!. एकातुन दुसरे कार्यक्रम ठरत जावे तस आलोक आणि रिमा च्या लग्नाच्या वाढदिवसात मोठा मुलाच लग्न मग , त्यांच्या लग्नात सल्लुचा सा.पु " मोहनीश आणी परिवार हनिमुन कंपनी " वारित करिश्मा आणी सैफ़्चा सा.पु... असे कार्यक्रम आणी निमीत्ताने येणारी गाणी अस दळण चालुच राहत... मग , अचानक पाच एक मिनिट सासरी गेलेली निलिम(हि लग्नाच्या वाढदिवसाला म्हणुन येते तशी तिथेच असते) आणी मंडळी धावत घरि येते. आणी मग रामायण (शब्द्श) घडत ..फ़क्टरी चा मालक सक्खा मुलगा की सावत्र, बेडरुम खालि कि वरती, असल्या (जागतिक )समस्या निर्माण होतात...आणि प्रेमाच्या बळावर सुटतात. सिनेमातल्या पात्राचि मुळ नाव लिहलेलि नाहित हे ओळखल असेलच.... तर, प्रेम,आदर्श,साधना,प्रिति,ममता,राजेश,डॉ.साब ही नाव कुणालाही अदलुन बदलुन ठेवु शकता.(मुळ इशटोरित काही फ़रक पडणार नाहि). त.टि : भरत उर्फ़ सल्लु मिया परदेशातुन घरि येतो तो सिन बघता यांचा स्वत्:चा विमानतळ ही असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 20, 2008 - 11:37 am: |
| 
|
( between: याच्या नावावरुन हा माणुस जात्यावार (एकच)दळण दळतोय अस वाटत संदर्भ्: नाव आणी प्रतिमा>>>> फ़क्टरी चा मालक सक्खा मुलगा की सावत्र, बेडरुम खालि कि वरती, असल्या (जागतिक )समस्या निर्माण होतात>>>>>> अचानक पाच एक मिनिट सासरी गेलेली निलिम>>>>>> जब्बरदस्त हाणले आहेत.
|
हे दोन्ही चित्रपट म्हणजे एकाद्या अनोळखी व्यक्तीच्या लग्नाची कॅसेट बघून आपल्याला जितका आनंद होईल तितकाच.. तुळशीच्या लग्नाच्या मुहुर्ताला कोकणात जशी खळ्या खळ्यात लग्न लागत असतात तसलाच प्रकार..
|
Maitreyee
| |
| Thursday, March 20, 2008 - 1:17 pm: |
| 
|
आणि या बडजात्याच्या नायिका(पक्षी: सोनाली बेन्द्रे या सिनेमात, अन विवाह मधे अमृता मैने प्यार मधे भाग्यश्री वगैरे) काही कारण नसताना इतक्या कमालीच्या लाजतात की बघून इरिटेट होते अगदी! आणि लाजण्याचा फ़ॉर्म्युला पण एकच, पापण्यांना मोठ्ठ्या false eyelashes , अन त्याही लोखंडी किंवा शिशाच्या वाटाव्या इतपत खाली बघत राहणे म्हणजे झाली यांची सलज्ज का काय ती पोझ! इतकं सारखं खाली बघत राहणं पण un natural वाटते! 
|
>> स्वत्:चा विमानतळ ही असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
जबरदस्त लिहीलेय. पण इतकं गुंडाळलंय का? अजून याच्या दुप्पट तरी लिहायला हवं होतं.
|
Ajjuka
| |
| Thursday, March 20, 2008 - 4:28 pm: |
| 
|
वा वा मस्त लिहिलंय! पण खेड्यातल्या सामुदायिक हनीमून बद्दल उत्सुकता होती राव वाचल्यापासून.. ऑमाला सांगा नॉ त्यॉबद्दल! ऑ! असं काय ते! मैत्रेयी, अगदी अगदी! त्यांचं ते किती किती लाजू पाहून दोन हाणाव्याश्या वाटतात जोड्याने!
|
Ajjuka
| |
| Thursday, March 20, 2008 - 4:30 pm: |
| 
|
त.टी.: (ती राह्यलीच नाही का!) जोड्याने याचा अर्थ दोघांना हाणणे, दोघांनी हाणणे, दोन हाणणे, पायताणाने हाणणे यापैकी काहीही असू शकतो किंवा नसू शकतो. आपापल्या जबाबदारीवर अर्थ समजावा. अस्मिता, मन यातलं काही दुखावलं गेल्यास आम्ही जबाबदार रहाणार नाही!
|
Farend
| |
| Thursday, March 20, 2008 - 10:15 pm: |
| 
|
मोहनीश आणी परिवार हनिमुन कंपनी पाच एक मिनिट सासरी गेलेली निलिम सही आहे हे अजून पाहिलाच नाही हा आणि स्वत:चा विमानतळ वगैरे वाचून एकदा नीट बघायला पाहिजे असे वाटते. आणि ते गाण्यांबद्दल लिहिले नाही? सुनोरी दुल्हन अब इनसे मिलोजी, ये है तुम्हारी सासूमाजी असे त्या पूर्वीच्या पारले "जी" बिस्किटांच्या जाहिराती सारखे सगळीकडे एखाद्या पोवाड्याच्या वरताण जी जी जी करतात ते? तसेच ते हिवडा मे का कोठेतरी नाचे मोर वगैरे ही मजेदार वाटतात. जात्यावर एकच दळण दळतोय हे मात्र एकदम खरे
|
Manuswini
| |
| Thursday, March 20, 2008 - 11:34 pm: |
| 
|
आणि मग मुली परदेशात वाढून पण कश्या भारतीय संसुकृती(कसा लिहितात हा श्ब्द देवा रे) विसरत नाहीत हे दाखवायचा प्रयत्न काय नी काय. आणि मुली तर अगदी दात पिळले तर दूध अश्या वागतात. छ्या सणकच जाते. एखाड्याला डायबीटीस होइल असा चित्रपट.
|
प्राजक्ता, छान लिहिलंय. अजून थोडं जास्त लिहायचंस की गं. पण खेड्यातल्या सामुदायिक हनीमून बद्दल उत्सुकता होती राव वाचल्यापासून.. ऑमाला सांगा नॉ त्यॉबद्दल! ऑ! असं काय ते!<<<< अज्जुका, असा भारतीय मानमर्यादेचा भंग नाही करायचा बरं. ' बेटी, ऐसी बातें पब्लिक मे पूछना तो क्या सोचना भी गुनाह है... ये हमारी संस्कृती नही है. ' ( मर्यादशील मां रीमा मोड ऑन...) :-P त्यांचं ते किती किती लाजू पाहून दोन हाणाव्याश्या वाटतात जोड्याने!<<<< यावरही त्यांचं उत्तर हेच असेल, ' चाहे तुम मुझे हाथ से मारो, या जूतेसे... मै नजरें उपर उठाके अपने कुल की मर्यादा का भंग नही कर सकूंगी. ' तिकडून ज्याच्या चेहर्यावर प्रेमळ भाव थबथबले आहेत असा आलोकनाथ येईल आणि म्हणेल... ' वा बेटी, आज तूने मेरा सर गर्व से उंचा कर दिया. ( तुझ्याकडे वळून) देखा... ये है हमारी संस्कृती, हमारी सभ्यता... हमारे यहां बेटियां आज भी नजरें उठा के नही देखती चाहे कितनी भी पढी लिखी क्यूं न हो?... ' ( यापुढे ते डायलॉग ऐकायची ताकद कुणातच नसते म्हणून मग अशावेळी थेट गाणेच सुरू होते..... ' ये तो सच है की भगवान है.... ' पुन्हा ' देव म्हणजे काय? ' वर भांडणार्यांनी भांडणे थांबवून हे गाणे ऐकावे. एकदा त्यांनी गाऊन निर्वाळा दिला की, देव आहे यात शंका उरत नाही.) बडजात्याच्या याही सिनेमात ज्याला ह्यांच्या घरी पडीक असणे एवढेच काम येते, असा शक्ती कपूर आहे. ( तो नियमाप्रमाणे मुसलमान!) इतर सिनेमांत आचरट चाळे करून वात आणणार्या शक्ती कपूरला इतक्या सोज्वळ रुपात बघवत नाही. बहुधा, इतर सिनेमांत अमर्याद अंगप्रदर्शन, आयटम सॉंग्ज वगैरे साकारलेल्या नायिका, सतत कृष्णकृत्ये करणारे खलनायक बडजात्याच्या सिनेमात ' पापक्षालनार्थ ' भूमिका मागत असावेत. आणि बहुधा फ़ुकटात काम करत असावेत. सलमान खानला मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है असल्या तीन तीन बडजात्यापटांत काम करून सोज्वळपणाचा, चांगुलपणाचा ओव्हरडोस झाला नि त्याच्या कोंडलेल्या तामसी भावनांना वाट करून द्यायला त्याने राजस्थानात हरणे मारली अशी नोंद आजही त्या राजस्थानातल्या पोलिस स्टेशनमध्ये आढळते. त्यातून या सिनेमात त्याला शर्टही काढू दिला नव्हता. याच सिनेमानंतर सोनाली बेन्द्रेला नैराश्य आले ( पूर्ण लांबीचे फ़क्त पंजाबी ड्रेस घालण्याइतकी भीषण फ़िगर झाली की काय? असा विचार तिच्या मनात डोकावला असणार.) नि तिने चित्रपटसंन्यास घेतला. तब्बूही या सिनेमानंतर फारशी दिसली नाही. असे बरेच भीषण साईड इफ़ेक्ट्स या सिनेमातल्या कलाकारांनी अनुभवले असावेत. जे मुरले आहेत, उदा. आलोक नाथ, रीमा लागू, हिमानी शिवपुरी... त्यांना काही प्रॉब्लेम नाही पण बाकीचे पुन्हा बडजात्या कॅंपकडे फ़िरकलेले दिसत नाहीत. :-P ( प्लीज नोट, नंतरच्या बडजात्यापटात सलमानही दिसलेला नाही. मै प्रेम की दीवानी हूं, विवाह, वगैरे....) नववधू घरात आल्यावर तिला रीतीप्रमाणे ' सुहाग रात ' साठी न पाठवता सर्वांच्या ओळखी करून देत बसणे म्हणजे आधुनिक सासुरवासाचा प्रकार म्हटला पाहिजे. बरं, घरात लोक तरी किती?! ( भो आ क फ असे त्या बिचारीने मनात नक्कीच म्हटले असावे.) हनीमूनला फ़क्त नवपरिणीत जोडीने जायचे म्हणजे भारतीय मानमर्यादेचे पुन्हा उल्लंघन होणार. आधीच ती नववधू ' विदेश मे पली बढी ' असल्याने तिला स्वतःचे भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडलेले असणे सिद्ध करायची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे आले. म्हणून ती ' रामपुर चलें? ' असा प्रश्न विचारते. अवांतर: त्या रामपुरला जातानाच्या गाण्यात (abcdefghi...) भलत्याच ठिकाणी गाणे तोडल्याने भीषण विनोद ( म्हणजे जोक.. सिनेमातला विनोद बाबू नव्हे. भीषण म्हटल्याने ' तोच विनोद ' असं वाटू शकेल, म्हणून हा खुलासा.) झालाय. अति अति सोज्वळ बडजात्यापटाला हे एक गालबोटच. :-P च्च.. च्च.. नीलमला आणि तिच्या नवर्याला घरातून बाहेर काढले जाण्याचे इतके दुःख का व्हावे समजत नाही. दुःख होण्याइतकी ती तिथे राहिलेली तरी असते का? सिनेमातली गाणी हा अजून एक असह्य भाग. मागे एवढे थोरले घोडे झालेले प्रेम आणि विनोद बाबू नाचत असताना ' छोटे छोटे भाईयोंके बडे भैया??????? ' आणि त्या गाण्यात; भाभी ( एकदाची!) घरी आली की तिच्यासोबत कशी होळी खेळायची नि काय काय करायचे ह्याचेच प्लॅन्स... मी कळवळून म्हटलेले, ' भैयाचाही काही विचार मनात ठेवा बाबांनो या सगळ्यात... ' हम आपके है कौन मध्ये तरी एका का होईना पण गाण्यात प्रेम आणि निशाला नातेवाईकांची, नोकरांची गर्दी टाळून जरा एकांत मिळालेला. हम साथ साथ है मध्ये गाणीदेखील कुठल्याही जोडीला एकटे म्हणून सोडत नाहीत. प्रेमळ सीन्स म्हणून नाहीत. ( त्यानेही या जोड्यांना नैराश्याने ग्रासले असावे.) असो. लिहावे तेवढे थोडे. आता आगामी आकर्षण: मै प्रेम की दीवानी हूं! कोण लिहितंय?
|
प्राजक्ता छान लिहलयस पण खरच याच्या दुप्पट हव होत. श्रध्दा, सलमान और shirt ना निकाले? ये कैसे हो सकता है? काढला होता कि शर्ट त्याने बस धुताना, सोनालिला हलवा परत बनव अस सांगतो तेंव्हा. मग सोनालि बाइंच (प्र)दीर्घ लाजण. लाजण्याचि साथ इतकि जोरात आहे ह्या शिणुमात कि " आप हमारि सेक्रेटरि है या बच्चोकि? ह्या निरुपद्रवि प्रश्नावर हुमा खान देखिल लाजते पहिल्याच सीन मध्ये आणि नंतर लगेचच हिमानि शिवपुरि (लग्नानंतर इतक्या वर्षांनि) लाजते. आणि जिने लाजायला हव ति नववधु दगडासारखा मख्ख चेहरा करुन वावरत असते. बाकि बरजात्या परिवारामध्ये मामा हे 'घरसाळे' असतात कि काय न कळे. पण कायम उरावर बसणारा साळा आणि सेमि घरजावाइ ह्या दोघांमुळे आलोकनाथ स्वत:च्या मुलाच्या लग्नात देखिल रडवा चेहरा करुन हिंडत असतो. तशि जावाइ बापुना देखिल आपल्या भवितव्याचि कल्पना आलेलि असते म्हणुन ते सोन्याचि चेन फ़िरवुन भविष्य सांग, घरातल्या बायकांना नाश्टा बनवायला मदत कर असले उद्योग करुन सासुरवाडितिल मण्डळिंना येणकेण प्रकारेण खुश ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतात. थोरला भाउ मेव्हण्यासाठि नोकरि शोधण्यात, उरलेले दोघे आपाअपल्या प्रेमप्रकरणात आणि आलोकनाथ रामायण वाचण्यात मग्न असल्यामुळे ज्याचि वाटणि करायचि त्या 'घरका बिझिनेस' कडे लक्ष द्यायला कुणालाच सवड नसते!
|
Rajya
| |
| Friday, March 21, 2008 - 8:24 am: |
| 
|
श्रद्धा   त्या रामपुरला जातानाच्या गाण्यात (abcdefghi...) भलत्याच ठिकाणी गाणे तोडल्याने भीषण विनोद आधी लक्षातच आले नाही प्रत्येक वाक्य अन वाक्य सही है
|
Ramani
| |
| Friday, March 21, 2008 - 12:17 pm: |
| 
|
>>>>>यावरही त्यांचं उत्तर हेच असेल, ' चाहे तुम मुझे हाथ से मारो, या जूतेसे... मै नजरें उपर उठाके अपने कुल की मर्यादा का भंग नही कर सकूंगी. ' तिकडून ज्याच्या चेहर्यावर प्रेमळ भाव थबथबले आहेत असा आलोकनाथ येईल आणि म्हणेल... ' वा बेटी, आज तूने मेरा सर गर्व से उंचा कर दिया. ( तुझ्याकडे वळून) देखा... ये है हमारी संस्कृती, हमारी सभ्यता... हमारे यहां बेटियां आज भी नजरें उठा के नही देखती चाहे कितनी भी पढी लिखी क्यूं न हो?... ' >>>>>> श्र!!     प्राजक्ता
|
Ajjuka
| |
| Friday, March 21, 2008 - 1:01 pm: |
| 
|
>>अज्जुका, असा भारतीय मानमर्यादेचा भंग नाही करायचा बरं. ' बेटी, ऐसी बातें पब्लिक मे पूछना तो क्या सोचना भी गुनाह है... ये हमारी संस्कृती नही है. ' ( मर्यादशील मां रीमा मोड ऑन...) :-P >अज्जुका, असा भारतीय मानमर्यादेचा भंग नाही करायचा बरं. ' बेटी, ऐसी बातें पब्लिक मे पूछना तो क्या सोचना भी गुनाह है... ये हमारी संस्कृती नही है. ' ( मर्यादशील मां रीमा मोड ऑन...) :-P <<< खी खी खी खी खी खी!!! दात विचकून हास्य.. बाकी सगळ्यावर ह ह गब लो!
|
Farend
| |
| Friday, March 21, 2008 - 1:30 pm: |
| 
|
श्रद्धा, एखाद्या scandal मधे अडकलेल्या लोकांच्या करीयर ची नंतर कशी वाट लागली ते एक एक करून लिहितात तसे या चित्रपटातील कलाकारांबद्दल सही लिहिले आहे
|
पण इतकं गुंडाळलंय का?अजून याच्या दुप्पट तरी लिहायला हवं होतं>>> प्राजक्ता छान लिहलयस पण खरच याच्या दुप्पट हव होत. >>> पहिलाच प्रयत्न होता(अचाट वर लिहायचा)म्हणुन थोडक्यात आटोपले तिकडून ज्याच्या चेहर्यावर प्रेमळ भाव थबथबले आहेत असा आलोकनाथ येईल आणि म्हणेल... ' वा बेटी, आज तूने मेरा सर गर्व से उंचा कर दिया. ( तुझ्याकडे वळून) देखा... ये है हमारी संस्कृती, हमारी सभ्यता... हमारे यहां बेटियां आज भी नजरें उठा के नही देखती चाहे कितनी भी पढी लिखी क्यूं न हो?... ' >>>अगदी अगदी! आणी हा आजोबा चारचौघात रिमाला " ममता हम आपसे बहुत प्यार करते है " म्हणतो( आता काय म्हणाव या म्हातारचळाला...??) बापा एवढे म्हातारे झाल्याशिवाय असल काही म्हणायची सोय आपल्याला नाही, हे ओळखुन राजेश बाबु उर्फ़ मोहनिश जो हताश होतो तो पुर्ण चित्रपटात त्याच मोड मधे असतो.. करिश्मा: आगावु मोड , तब्बु : हताश मोड मधे असल्याने सोनालीवर एकटिवर लाजायची जबाबदारी आलिये..
|
त्या रामपुरला जातानाच्या गाण्यात (abcdefghi...) भलत्याच ठिकाणी गाणे तोडल्याने भीषण विनोद >> भीषण साईड इफ़ेक्ट्स >>> भीषण फ़िगर >> भीषण विनोद >> सुरज बड्जात्या(वर)चे (समाज)मनावर (भीषण) परिणाम..ऽसा बा.फ़ काढावा का? 
|
हे असले चित्रपट पहाणे म्हणजे वाटीभर साखरेचा पाक पिण्यासारखा अनुभव असतो.
|
Sashal
| |
| Friday, March 21, 2008 - 5:32 pm: |
| 
|
प्राजक्ता, श्र आणि मराठमोळी, सही लिहीलंय ..
|
ह्या गोड गोड साखरेच्या पाकाला सलमान खान पार विटला असावा म्हणून त्याने राजस्थानच्या जंगलात हरणाची शिकार केली. इतकेच नाही तर जातीने जिवंत हरणाची मान सुरीने धडावेगळी केली म्हणे. नंतर त्याचे म्हणजे हरणाचे बरबाट सगळ्यांनी चापून खाल्ले म्हणे. चालायचेच. आठवडाभर ह्या सिनेमाच्या शूटिंग असेल तर माणसातला जानवर जाग उठेगा!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|