खालील काही प्रकार आपल्याला विचित्र वाटत असतील पण खूप प्रचलित आहेत. -गरम गुलाब जामुन व व्हेनिल्ला आईस क्रीम्- यू पी व पन्जाब -पुरण पोळी व आमरस्- उत्तर कर्नाटक्-विशेषत्: लिंगायत -तुपात बुडवून भजी- कर्नाटक -ज्यूस व हॉट कॉफ़ी एकत्र ऑर्डेर व पीणे सकाळच्या नाष्त्यात्- अमेरिकेत(निदान मी असताना तरी १९९७ मध्ये डेट्रॉईट मध्ये सकाळी बरेच वेळा पाहिले आहे-खरे खोटे-हल्ली- उसगांवकर व झक्कीजी जाणो) -दहिभातात साखर्-बंगाली-विशेषत्: उन्हाळ्यात -रबडी व जिलबी- यू पी व बिहार,एम.पी बाकी मित्र जे अनेक ठिकाणी फिरलेत ते add करतीलच
|
Ajjuka
| |
| Sunday, March 30, 2008 - 2:42 am: |
| 
|
ह्यातलं ज्यूस आणि कॉफी हे माहिती असलं तरी कधी न जमलेलं आहे. पण तुम्ही हे कॉम्बो चाखलंय का? आमटीभात आणि वर आमरस. मला कल्पनेनंही ढवळतं. माझा नवरा मिटक्या मरत खातो.
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 3:16 am: |
| 
|
नवनवीन कॉम्बो करून पहायला काय हरकत आहे? हल्लीची रूढ कॉम्बिनेशने अशाच प्रयोगातून जन्माला आली असतील. पूर्वी इथे माझे आवडते पदार्थ मला असे खायला आवडतात असा काहीतरी बी बी इथे होता त्यातही बरीच धमाल कॉम्बिनेशन्स होती. अवांतर्- मासे आणि दही हा विरुद्ध आहार आहे ना?>>>>> ही कल्पना आयुर्वेदात आहे. दोन्हीतले प्रोटीन्स काही शरीरात मिसमॅच झाले की त्याची reaction त्या त्या शरीरात येते. त्याला allergy असेही म्हणतात. पण हे पुन्हा व्यक्तीसापेक्षच. थम्ब रुल नाही. काही बंगाल्याना त्याचा निश्चित त्रास होत असणार.
|
आणखी एक गुलाब जामुन आणि आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही- ओरिस्सा
|
जरा सौम्य प्रकार म्हणजे शिरा व लिंबाचे लोणचे चहा पोळी वा पुरी चहा-बुडवून
|
Ajjuka
| |
| Sunday, March 30, 2008 - 4:14 am: |
| 
|
>>शिरा व लिंबाचे लोणचे चहा पोळी वा पुरी चहा-बुडवून << हे दोन्ही बेफाम मस्त लागतात. लिंबाच्या किंवा आंब्याच्या लोणच्याशिवाय शिर्याची मजाच नाही. आणि संध्याकाळच्या खाण्यात काही केलेलं नसेल तर चहा पोळी किंवा कुठलीही पुरी चहात बुडवून मस्त वाटते. विशेषतः ती पुरी तिखटामीठाची असेल तर अजूनच. अर्थात भोपळ्याची गोड पुरी पण चहात बुडवून मस्त लागते. बिस्किटं नाही बुडवत आपण चहात तसंच.
|
अज्जुका- क्या बात है!!! मी हे माझे अत्यन्त प्रिय प्रकार घाबरत घाबरतच लिहिले आपल्या या आवडी same to same आहेत म्हणायच्या. हल्ली मात्र मायबोली वर सगळच घाबरत लिहावं लागतं कोण मागून वार करेल सांगता येत नाही
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 5:23 am: |
| 
|
उपाध्येबुवा अहो चहा पोळी विशेशत्: ती जेवढी शिळी असेल तेवढी उत्तम,हा स्वर्ग आहे स्वर्ग... ज्याने चहा पोळी खाल्ली नाही तो महाराष्ट्रीयनच काय पण माणूसदेखील नाही असे माझे (अतिरेकी)मत्त हाये. शिरा आणि लोणचे? बघायला पाहिजे... पन दिनेश साहेबांना आवडेल का हे सारे? खाण्याच्या बाबतीत त्यांचे मत इथे अंतिम मानले जाते म्हणून विचारलं... बरं, बाय द वे चहा आधी की पोळी?
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 5:28 am: |
| 
|
आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही आणि आंबट दही यांच्या चवीत काय फरक असतो? ए. भा. प्र.
|
अहो अगदी गोड आणि कडक चहा वाफाळणारा त्यात बुडवा पोळी किंवा तिखटामिठाची पुरी मग काय राजा-स्वर्गच दुसरा प्रकार चकली बुडवून किंवा तिखटामिठाचे शन्करपाळे-त्याच्या फाडलेल्या प्वाटात चहा चमच्याने ओतून
|
आंSSSSSSSSSSSSSSSSSSSSSबट्ट म्हणजे मेन्दूला जावून भिडणारा आम्बट पणा
|
आणखी चर्बट पणा करू का? चहा घ्या त्यात शेव टाका जरा जाडसर्-अन प्या-
|
Karadkar
| |
| Sunday, March 30, 2008 - 5:41 am: |
| 
|
लोणी आणि चकली दही चकली दही जिलेबी आमरस आणि पु. पो. खाणे जमत नसेल तर तुम्ही लिंगायत नाही असे सरळ म्हणतात.
|
उपमा आणि तूप ऐकले आहे का? भाताच्या मूदीवर ओततात तसे
|
Ajjuka
| |
| Sunday, March 30, 2008 - 6:44 am: |
| 
|
>>उपमा आणि तूप ऐकले आहे का? भाताच्या मूदीवर ओततात तसे<< ऐकलं नाहीये पण ते उत्तमच लागणार. तूप आहे ते वाइट कशाला लागेल!
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 7:54 am: |
| 
|
चहा घ्या त्यात शेव टाका जरा जाडसर्-अन प्या>>>> ये बात कुछ हजम नही हुई
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 7:56 am: |
| 
|
मिटक्या मरत >>>> ??.. ??..?..???
|
Tonaga
| |
| Sunday, March 30, 2008 - 7:59 am: |
| 
|
आंSSSSSSSSSSSSSSSSSSSSSबट्ट म्हणजे मेन्दूला जावून भिडणारा आम्बट पणा >>>>आँ? आंबट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट दही खाल्ल्यावर पोटात न जाता मेन्दूकडे जाते? ऐ. ते. न.
|
दारू पोटात जाते पण चढते मेन्दूत्- कसेंSSSSSS तस्सेSSSSSSS
|
Jo_s
| |
| Sunday, March 30, 2008 - 8:09 am: |
| 
|
पुरण पोळी, आमरस बरा लागतो एकदा खाल्लाय, पण ती पुरण पोळी पुण्यातल्या सारखी नसते. शिरा आणि लोणचे? बघायला पाहिजे... चांगले लागते इडली चहा ट्राय करा...
|