|
Chinnu
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:40 pm: |
| 
|
उचापती, केदार, अमोल, नी.. ह. ह. पु. वा!
|
Farend
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:53 pm: |
| 
|
पण मला ती मेडिकल ची भानगड समजली नाही. मला मेडिकल वगैरे दिल्याचे आठवत नाही. ...आता सांगू नका आय एन एस ला...
|
ती INS ची रिक्वाअरमेंट नाही तर त्या कंपन्यांची आहे कारण इथे आल्यावर दिला जानारा भिकार इंश्युरंस. ईकडे एका मित्राला मिटींगला बसल्या बसल्या चक्कर आली होती तर TCS ने त्याला वापस भारतात पाठविले होते. कारण इंश्युरंस कं ने असे सांगीतले की त्याला नेहमी ब्लक आऊट होन्याची शक्यता आहे. त्या ट्रिटमेंट ला ती कं. पैसे देनार नाही.
|
Runi
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:42 pm: |
| 
|
उचापती,केदार, अमोल.. ह. ह. पु. वा!
|
Mukund
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:51 am: |
| 
|
उचापती... अशक्य आहेस तु.. या महीन्यात २ वेळा तु जबरी हसवलेस.. एक या पोस्टमधे व दुसरे तुझी नागीण चित्रपटाची स्टोरी वाचली तेव्हा..
|
Maanus
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:48 am: |
| 
|
आज सकाळी चहा घ्यायला pantry t गेलो तर एक महाशय, दुसर्या महाशयाला योगा बद्दाल ज्ञान देत होते. Yoga can help you to open your veins, it will freshen up your thoughts. blah blah blah... तेवढ्यात एक तिसरा महाशय तेथे आला. Oh!, and I have been drinking caffeine so far to open up my veins and freshen up my thoughts
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:56 am: |
| 
|
ऑं हे असे sample मागतात US ला येण्यासाठी कंपन्या? मी नाही असे एकले का करावे लागले. specific company असे प्रकार करवतात? बापरे! विषय निघालाच आहे तर माझ्या इथे school मध्ये yogurt चा डब्बा माझी batchmate वापरायची अर्थात कुठे कळले असेलच. एकदा मी तिच्या रूमवर गेले तर तीने इडली ऑफ़र केली चटणी एकदम तश्याच print च्या yogurt डब्यात. मला अचानक तो 'तिकडचा' डब्बा आठवला तिच्या सौचालयातला नी नको उपवास आहे सांगीतले कारण हीच मैत्रीण अंघोळीच्या साबणाने भांडी धुवायची. who knows आणखी काय काय कंजुषी चालेल. student होती मान्य आहे पण well paid partime नोकरी होती,पण नोकरी लागल्यावर इतकी कंजुषी? पण $2 मध्ये भारतातले lux साबण इथे मिळतात compare to dishwashing liquid म्हणून ही कंजुषी तर डब्याच्या बाबतीत काय सांगावे.
|
Storvi
| |
| Thursday, March 27, 2008 - 9:26 pm: |
| 
|
तुझ्या pantry त माणसं काय करत असातात? यालाच म्हणतात काय skeletons in the closet
|
Simm
| |
| Thursday, March 27, 2008 - 10:24 pm: |
| 
|
:-) good one Storvi.
|
Maanus
| |
| Friday, March 28, 2008 - 1:10 am: |
| 
|
नविन वक्यप्रकार शिकायला मिळाला , धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Friday, March 28, 2008 - 3:00 am: |
| 
|
परवा संध्याकाळी एका मुंबईतील उपहारगृहात गेलो होतो. समोर एक वयस्कर माणुस बसला होता. त्याने आधी एक व्हेज सॅंडविच मागवले. माझा पदार्थ यायचा होता, म्हणुन नाईलाजाने समोर नजर जातच होती. त्याने सॅंडविचमधला प्रत्येक स्लाईस वेगळा केलाच, शिवाय आतले काकडी कांदा, टोमॅटो सगळेच वेगळे केले आणि एकेक पीस सॉसमधे, आपण तळण्यापुर्वी माश्याची तुकडी कशी पिठात घोळवुन खातो, तसा घोळवुन खाअल्ला. मग त्याने छोटे व्हॅनिला आईसक्रीम मागवले. ते येतेय तोवर लगेच चहा मागवला, वेटरने लगेच हवाय का असे विचारले, तर तो हो म्हणाला, आणि विश्वास ठेवा, त्या माणसाने व्हॅनिला आईसक्रीम चहात मिसळले. मी माझी कॉफ़ी अर्धवट टाकुन उठलो. पण त्या व्हॅनिला आईसक्रीम चहाची चव कशी लागत असेल, त्याचे मात्र खुप कुतुहल आहे.
|
दिनेशदा आपण कोल्ड कॉफी विथ आईस्क्रिम घेतो ना तसेच हॉट टी विथ व्हनीला आईस्क्रिम त्यात काय एव्हढे? प्रयोग करुन बघायला हरकत नाही.
|
Shonoo
| |
| Friday, March 28, 2008 - 1:13 pm: |
| 
|
इथे गरम चॉकलेट मिल्क च्या वर आइसक्रीम घालून खायची पद्धत आहे.
|
Sandu
| |
| Friday, March 28, 2008 - 2:45 pm: |
| 
|
बापरे cold coffee with ice-cream कल्पनाही करवत नाहि. लोक कश्याबरोबर काय काय खातिल काही नेम नाही.
|
Uday123
| |
| Friday, March 28, 2008 - 3:04 pm: |
| 
|
माझा बॉस जेवण झाल्यावर, गरम कॉफ़ी आणि सोबतच आईस्क्रिम अगदी मिटक्या मारत खातो. पहिल्याच दिवशी त्याने घेतो का विचारल्यावर मला प्रथम आश्चर्य वाटले, आता असही असु शकतं हे पटते.
|
माझ्या एका बंगाली मैत्रीणीला एक सवय होती, मासे भात, दहि एकाच ताटात घेवून खायची. त्यात बंगाल्यांची ती दोइ मछली पद्ध्तीची करी,पुन्हा भातावर दही, पुन्हा वेगळे दही, कुस्करून तळलेली माश्याची तुकडी बघूनच मला विचित्र वाटायचे सुरवातीला. ... त. टी. : इथे कुठलाही हेतुपुरस्पर जातीवाचक उल्लेख नाहीये. किंवा जे 'असे' खातात त्यांचा अपमान करण्याचा हेतु नाहीये. फक्त हेच सांगायचे होते की माश्यात पण दही घालून बनवणे ही बंगाली पद्धत आहे आणि त्यात पुन्हा असे दही नी कुस्करून तळलेली तुकडी खाणे मला नवीन वाटले.
|
Tonaga
| |
| Friday, March 28, 2008 - 4:25 pm: |
| 
|
मी माझी कॉफ़ी अर्धवट टाकुन उठलो. >>>> दिनेशसाहेब हे मात्र टू मच हं. यात काय उठण्यासारखे होते. यात किळसवाणेही काही वाटत नाही. यापेक्षा मद्राशांचे भात खाणे खरेच उठून जाण्याच्या योग्यतेचे असते...
|
Dineshvs
| |
| Saturday, March 29, 2008 - 3:05 am: |
| 
|
कदाचित मी खाण्याच्या सवयीबाबत जास्तच संवेदनशील असेन. मला फ़्रेंच आणि अरब लोकांबरोबरही जेवणे अवघड जाते.
|
Psg
| |
| Saturday, March 29, 2008 - 6:52 am: |
| 
|
अवांतर्- मासे आणि दही हा विरुद्ध आहार आहे ना? तरीही बांगला पद्धती मधे माश्यात दही घालून खातात? बाधत नाही?
|
Dineshvs
| |
| Saturday, March 29, 2008 - 7:36 am: |
| 
|
माश्याना बाधते बहुतेक, बंगाल्याना नाही बाधत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|