Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 28, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » KarmBhumi » Archive through March 28, 2008 « Previous Next »

Deshi
Thursday, March 27, 2008 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नोकरी सोडताना का सोडतोय, आणि दुसरी नोकरी का धरतोय... याचा विचार आपण करतो का>>>>>

नोकरी सोडन्याचे अनेक कारण असतात. पण सर्वात महत्वाचे पैसा हेच कारण असते. निदान आपण डिलव्हरी वा प्र्याक्टीस म्यानेजर होई पर्यंत, नंतर डायरेक्टवर वैगरे झाल्यवर बाकीचा विचार जास्त असतो. ह्यात जास्त विचार तो काय करायचा? त्यासाठी काउंसीलींग काय करायचे? हे ही जर कळत नसेल तर त्याने नोकरी करने सोडने उचीत.
ईथे पोस्ट वाचनार्यांनी सल्लागाराकडे जाउन नोकरी बदललेली असेल असे वाटत नाही. ( मा.बु.दो.स वाटल्यास).

प्रिंट मिडीयाचे माहीती नाही पण आयटी व म्यानुफक्टरींग मध्ये नोकरी बदलताना लोकांना सहसा जास्त पैसे व एक लेवल वरची नोकरी मिळतेच. नाहीतर नोकरी कोणी बदलत नाही. ( फक्त भांडन वा नोकरी गेली एवढेच कारण त्याच टाईपचे काम वा तेवढेच पैसे घेउन नोकरी करन्यासाठी असु शकते).

वर माणसाने १० नोकर्या सोडल्याचे लिहीले. त्याचे करीअर समजा ७ ते ८ वर्षाचे पकडले तर इतक्या नोकर्या बदलन्या बद्द्ल कोतुकच कारण एका जागेवर आजकाल निदान २, ३ वर्ष राहान्याचा ट्रेंड आहे. ( कॉल सेंटर सोडुन).

उपास्चे पोस्ट आवडले. ( दोन्ही)


Chinnu
Friday, March 28, 2008 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका, समजतय तुमचं म्हणणं. I understand :-) माफ करा, माझा अनुभव विशेषत: बर्‍याच मराठी सहकार्‍यांविषयीचा, फार काही चांगला नाही. तुमच्या एवढा माझा अनुभव नक्कीच नाही. पण म्हणून मायबोलीसारख्या साईटवर, जाती धर्म, प्रांताचा उल्लेख करून लिहीणे उचित वाटत नाही. हा अनुभव मी फक्त त्या सहकार्‍यांसाठीच वाईट ठरविला, सर्व मराठी मित्र-मैत्रीणींसाठी नव्हे. हाही मा. बु. दो. समजलात तर दिवे घेतेच! :-)
बाकी, पोरायहो सहन करु नका, पण परतीचे दरवाजे स्वहस्ते बंद करू नका. If you don't respect, not necessarily other person would respect your feelings. Grow and let grow. पाय ओढण्यात आणि ओढून घेण्यात काहीच अर्थ नसतो. हे माझ्यासारख्या अल्पमतीचे प्रामणिक मत. कुणाच्या भावना दुखविण्याचा उद्देश्य नाहीच.


Shraddhak
Friday, March 28, 2008 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, सर्वसाधारणपणे कसे वागणे सयुक्तीक ठरेल ते म्हणायचं होतं मला.. <<<<<
पण नंदिनीने मांडलेली परिस्थिती ' असाधारण ' होती ना! थेट तिच्या चारित्र्याबद्दल खोटेनाटे सांगणे वगैरे मुद्दे वाचले नाहीस का तू? सर्वसाधारण परिस्थितीत कसे वागावे, हे तिलाही कळत असेलच.

आणि मीही आयटी फ़ील्डबद्दलच लिहितेय. आयटीमध्ये कंपनीदेखील फक्त स्वतःचा फायदा बघत असते कायम! रोज शेकड्यांनी लोक कंपनी बदलतात. प्रत्येकासाठी 'is good for Rehire?' चा फ़्लॅग सेट आहे की नाही हे बघत बसत नाहीत. तुम्ही जर त्यांना हवेच असाल, तर तुम्ही आधी कशासाठीही नोकरी का सोडलेली असेना, ते तुम्हाला घेतातच.
( आणि मी ज्या ज्या भारतीय / MNC कंपन्या बघितल्या आहेत; त्यात असला काही फ्लॅग आणि HR feedback असेल यावर माझा विश्वास नाही.)


प्रवासाचा वेळ वाचावा किंवा इतर तत्सम कारणांसाठी कंपनीत परत येऊ इच्छीणारी माणसे मी पाहिली आहेत अशावेळी तुम्ही जर भांडून बाहेर पडला असाल तर तुम्हाला परत येणे अडचणीचे ठरू शकते!<<<<
म्हणजे गरज त्या माणसाला आहे, कंपनीला नाही. आणि कंपनी स्वतःचा फायदा नसेल तर असल्या लोकांना अजिबात entertain करत नाही, याची मी प्रत्यक्ष उदाहरणे बघितली आहेत. ( मग त्या माणसाच्या exit interview मध्ये त्याने कंपनीची प्रेमाने आरती का केलेली असेना!) आणि कंपनीला निकड असेल, तर वर म्हटल्याप्रमाणे तुमचा आधीचा पुराणकालीन exit interview कसा झाला होता याच्याशी कंपनीला काही देणेघेणे नसते.

Nandini2911
Friday, March 28, 2008 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अजून एक गोष्ट कळलेली नाहिये ती म्हणजे मी त्या बाईला तोंडघशी पाडत होते त्यामधे माझ्या शेवटच्या दिवसाचा भांडायचा प्रश्न येतोच कसा काय??
HR आणि माझे डीपार्टमेंट दोघानीही exit interview मधे आम्ही तुला नक्की परत घेऊ, कधीही ये असं "लिहून" दिलेले आहे. experience certificate मला घरपोच आणोऊन दिलय. अजून काय पाहिजे???
मल फ़क्त ती खोटे बोलते हे सिद्ध करायचे होते जे मी by hook or by crook केले. त्यात मला काहीही चूक वाटत नाही. उगाच माझ्यावर अन्याय होतो म्हणून रडण्यापेक्षा अथवा घाबरण्यापेक्षा मी ज्याने अन्याय केलाय त्याला रडवणे जास्त पसंद करेन.

मनुस्विनीचा मुद्दा पटला. माझी कुवत शिक्षण अनुभव या सर्व गोष्टी असताना मी कुणाला घाबरून का राहू?? ह विचार जर प्रत्येकाने केला तर अन्यायाचा प्रश्न उद्भवणारच नाही.


Ajjuka
Friday, March 28, 2008 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक थोडासा वेगळा छोटा मुद्दा आहे पण मला महत्वाचा वाटतो म्हणून विचारतेय. मी नोकरी कधी केली नाही आणि करेन याची शक्यता नाही.
फ्रीलान्स काम करताना अनेकविध अनुभव येत असतात त्यात मला सगळ्यात इरिटेट करणारा प्रकार असतो तो म्हणजे तुमची ओळख नसताना तुम्हाला कॉन्टॅक्ट करून लोक डिरेक्टली 'ए नीरजा(ए - जा, अरे - तुरे याअर्थी)' म्हणून बोलायला सुरुवात करतात.
काही चॅनेलवरच्या कालच्या रिपोर्टर पोरी संदीपलासुद्धा डिरेक्टली ए संदीप म्हणून हाक मारतात.
मला हे फारसं पटत नाही. पण असं सांगणं पण योग्य दिसत नाही.
तसंच पुरूषांना/ मुलांना मिस्टर अमुक अमुक म्हणून बोलावतात पण मुलींना पहिल्या नावाने हे पण पाह्यला मिळतं.

एकुणात नोकरी किंवा कॉर्पोरेट जगतात नवीन व्यक्तीला address करताना काय प्रोटोकॉल असतो?


Nandini2911
Friday, March 28, 2008 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्पोरेटमधे साधारणपणे क्लायंटला Mr किंवा Ms असे संबोधतात. पण बर्‍याचदा तुमच्या बॉसला अथवा कल्लेग्जना प्रथम नावाने हाक मारली जाते.
as a reporter तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आदराने संबोधणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने चॅनलवाले सर्वच प्रोटोकॉल धुळीत मिळवताना हा तरी कशाला लक्षात ठेवतील??
नवीन व्यक्ती जोपर्यंत मला अमुक बोलावलेस तरी चालेल हे म्हणत नाही त्प्पर्यंत तरी डायरेक्ट नावाने हाक मारू नये.

इंग्रजी फ़ाडणार्या बर्‍याच जणाना "आदरार्थी बहुवचन" हा प्रकारच माहित नसतो


Yashwant
Friday, March 28, 2008 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय टी मध्ये सगळ्यान्नाच अरे तुरे केले जाते. जनरली पहील्या नावाने हाक मारतात. मी एकदा माझ्यापेक्शा वयाने मोठ्या बाइन्ना अहो जाहो (मॅडम) म्हनालो तर त्यान्नीच मला प्लीज मला पहिल्या नावाने हाक मार म्हनुन सान्गीतले.
बाकीच्या इन्डस्ट्री मध्ये मात्र वय आणि हुद्दा असेल त्याप्रमाणे अहो जाहो बोलावे लागते. काही अपवाद असु शकतात.

Upas
Friday, March 28, 2008 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र आणि नंदिनी माझं पोस्ट नंदिनी च्या पोस्टशी रीलेट करायची घाई आणि आवश्यकता काय कळलं नाही. नंदिनीने तिच्या शेवटच्या दिवसाच्या 'असाधारण' परिस्थिती बद्दल सांगितले असेलही पण सर्वसाधारणपणे शेवटचा दिवस कसा असावा हा मुद्दच मला मांडायचा होता इतकच.. मला नंदिनीला काही उपदेश करायचा होता असं वाटलं की काय तुम्हाला? गंमत आहे! :-)
>>सर्वसाधारण परिस्थितीत कसे वागावे, हे तिलाही कळत असेलच.
अर्थात असेलही पण म्हणून मी माझे अनुभव ह्या My Experience bb वर लिहू नये की काय? :-)

आणि श्र कंपनीला गरज असते तेव्हा ते घेतात आणि नसेल तर घेत नाहीत हे खरेच पण कंपनी मधले म्हणजे कोण तर तिथली माणसेच ना.. तुमचे PR चांगले असतील आणि तुमचा record चांगला असेल तर तुम्हला घेण्याची शक्यता वाढते, मी तर असही पाहीलय की एखाद्या व्यक्तीसाठी कंपनीत जागा बनवली जाते.. माझ म्हणणं इतकच आहे की केवळ गरज असेल तरच भांडा नाहीतर शक्यतो सलोख्याने बाहेर पडा.. पुन्हा कोण कधी कुठे भेटेल सांगता येत नाही.. असो!
माझ्या दोन्ही नोकर्यांमधे असे flags update होतात हे खात्रीने माहितेय.

>>तुम्ही जर त्यांना हवेच असाल, तर तुम्ही आधी कशासाठीही नोकरी का सोडलेली असेना, ते तुम्हाला घेतातच.
पण श्र, माझ्या तरी अनुभवात तसे नाहीये again talking general here! , विशेषतः established कंपन्यांमधे ज्यांच्याकडे hiring, rehiring processes आहेत.
तिथे background check तपासावा लगतोच त्यांना, त्यावेळी तुम्ही आधी कसे बाहेर पडलात हे बघितले जाते. माझ्या महितीमध्ये केवळ documents व्यवस्थित नाहीत म्हणजे relieving leeter/ experience letter/ educations documents म्हणून critical project मधून critical resources ना कढून कंपनीतून हाकलून दिलेले आहे. त्यामुळे कंपन्यांना गरज असेल तरी वाट्टेल तसे वागता येत नाही, HR is answerable to it..
शिवाय माझा HR मधला मित्र सांगायचा की सगळ्या top कंपन्यांचे HR बरेचदा ओळखत असतात एकमेकांना कारण चांगले resource top 10 कंपन्यांत फीरत असतात.. असो प्रत्येकाचे अनुभव वेगळे एकाच मापात तोलायची मुळीच गरज नाही.. जेवढे डोळसपणे बघता येईल तेवढे बघायचे.. पचवता येईल तेवढे पचवायचे, बाकीचे सोडून द्यायचे! :-)


Sandu
Friday, March 28, 2008 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फिल्म industry मधिल लोकांना आहो-जाहो करणे मी तरी ऐकलं नाहि बुवा. कल्पना करा, कोणी म्हणतय आमिर खान acting छान करतात, शाहरुख खान यांचा movie पाहुया. कित्ती हस्यासपद आहे. संदिपला काय अगर यश चोप्राला काय सगळ्या filmy लोकांना आरे तूरेच करतात. उगाच ह्या लोकांनी आहो-जाहो ची आपेक्षा ठेवू नये.

Uday123
Friday, March 28, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं अहो/ अग/ अरे हे शाब्दीक आदराचे बोल आहेत. मराठी मधे अनोळखी व्यक्ती समोर आली तर अहो संबोधणे अपेक्षीत आहे. (माझ्या मते) काय संबोधता याला खुप काही महत्व नाही आहे, पण समोरच्याचा एक माणुस म्हणुन मनात आदर करा, आणि तो कृतीत दिसु द्या.

घरी आपण आईला अग म्हणतो, वडिलांना अहो म्हणतो, पण म्हणुन काही त्याचा असलेल्या आदराशी संबध आहे का?

कामाच्या ठिकाणी आमच्या कडे सर्वच लोक एकमेकांना (डायरेक्टर पासुन मेकानिक पर्यंत) प्रथम नावानेच संबोधतात.

अमच्या ईथे घरी एक (नविनच ओळख) ६०+ व्यक्ती आली, आता त्यांना काय संबोधावे (आई, मावशी, काकु, आजी ई.) ह्या विचारात होतो. बायकोने माझ्या मुलीला (तेव्हा १ वर्ष) 'बघ तुझी आज्जी आली आहे' म्हणुन ओळख करुन दिली. पाच मिनटाच्या आत 'आम्हाला काम आहे' म्हणुन निघुन गेल्या. आम्हाला धक्काच बसला (फ़राळ, चहा, पाणि काहीच नाही). एक चुकाल्यासारखंच झालं, दोघांनी बराच विचार केला आपलं काय चुकलं असेल, आणि मग आमच्या चुक लक्षात आली. नंतर ईतर लोकांकडुन अम्हाला कळाले की त्यांना फ़क्त 'ताईच' म्हणातात. दुसर्‍या नावाने केलेला उल्लेख (काकु, मावशी) आवडत नाही. आता नवीन व्यक्तिस "तुम्हाला आम्ही काय म्हणुन संबोधावे असे तुम्हाला वाटते?" असे आधीच विचारुन घेतो.


Tonaga
Friday, March 28, 2008 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका आणि नन्दिनी यांच्या पोस्टशी मी सहमत आहे. हिन्दि चित्रपट सृष्टीत तर सिनिअर व्यक्तीना आवर्जून साहब शब्द लावण्यात येतो. अजूनही ही परम्परा टिकून आहे. आय ए एस केडर मध्ये तीन बॅच सीनिअर व्यक्तीस सर म्हणतात.पण unless other party permits अरे तुरे करूच नये. informality दाखवण्यासाठी उगीच लाडे लाडे एकेरीवर येऊ नयेच. त्याने रिस्पेक्ट नक्कीच कमी होतो...

हल्लीचे फिल्मातले लोक इन्ग्रजीच बोलत असल्याने त्याना आदरार्थी बहुवचनेच माहीत नाहीत. इन्ग्रजीत एकदम मग युअर ऑनर, युअर होलिनेस,युअर एक्सलन्सी असेच चालू होते.:-)
आर्मीत तर ज्युनिअर मानसाचाही उल्लेख आदरपूर्वकच केला जतो. उदा. आपके नायब सूबेदार साहबको बताईये की... शिपायाची बायको आली तरी आर्मी ऑफिसर उभे राहतात...

सन्दूने अज्जुकाचा मुद्दा पर्सेप्ट केला नाही असे वाटते. त्या त्या क्षेत्रातल्या लोकाना आपसात बोलताना पाळावयाचा प्रोटोकॉल तिला अभिप्रेत होता. अथवा मेडियावाल्यानी पाळावयाच्या. प्रेक्षाकाना अथवा रसिकाना थोडं माफ केलं पाहिजे नाहीतर खरेच ते सन्दु म्हटल्याप्रमाणे हास्यास्पद होइल. गावस्कर अगदी तऋणपणी खेळत असतानाच एका जिल्ह्यात स्टेडियमच्या उद्घाटनाला गेला होता.मोठा कार्यक्रम होता. भाषण करताना त्या गावचे नगराध्यक्ष शेवटी म्हणाले आता यानन्तर गावसकर साहेब बोलतील.. त्यावर प्रचन्ड हशा प्रेक्ष्कातून आला. आता वास्तविक खेळाडू म्हणून प्रेमाने एकेरीवर येणे योग्य असले तरी प्रमुख पाहुणा म्हणून प्रोटोकॉल नुसार अध्यक्षानाही तसे बोलणे आवश्यकच होते... :-)


Tonaga
Friday, March 28, 2008 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी आपण आईला अग म्हणतो, वडिलांना अहो म्हणतो, पण म्हणुन काही त्याचा असलेल्या आदराशी संबध आहे का>>>
हे बहुधा आई तिच्या नवर्‍याला म्हणजे मुलाच्या वडलाना अहो जाहो म्हणते त्यामुळे मुलेही तसेच शिकतात. वडील आई ला एकेरी सम्बोधतात त्यामुले मुलेही ते शिकतात. हल्ली आया नवर्‍याला अरे तुरे म्हणतात त्यामुळे मुलेही वडलाना एकेरी सम्बोधतात.

राजघराण्यात लहान मुलानाही आदरार्थी सम्बोधतात. काप गेले अन भोके राहिलेल्या सरदार घराण्यात बळेच हीपरम्परा टिकवून ठेवलीय.
त्यामुळी सहामहिन्याचे ' बाळासाहेब मुतले वाटतं दुपट्यात!' असले विनोदही घडतात....


Tanyabedekar
Friday, March 28, 2008 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणगा, अगदी बरोबर.. मीही हेच लिहिणार होतो.. सामान्य प्रेक्षक खेळाडु, चित्रपट कलावंत ह्यांना अरे-तुरे असे संबोधतो.. परंतु त्या क्षेत्राशी संबंधीत व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने अथवा मानाने मोठ्या व्यक्तिला सधारणत्: आदरार्थी संबोधनेच वापरतात.

Tonaga
Friday, March 28, 2008 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या मिडियाच्या उठवळ जमातीसारखी विचित्र जमात म्हणजे कार्यक्रमातील निवेदकांची. यांच्या प्रतापावर तर एक स्वतंत्र बीबी पोट भरू शकेल:-)

Arch
Friday, March 28, 2008 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय, तुझ्या post वरून एक सांगावस वाटल. ताई, काकी, आजी, मवशीपेक्षा मलज़ north indians नावापुढे जी लावतात ते आवडत. म्हणजे काय म्हणाव हा प्रश्णच येत नाही. जस नीरजाजी, संदीपजी वगैरे. म्हणजे खूप formal ही वाटत नाही आणि आदरपण दिला जातो.

अर्थात हे workplace मध्ये योग्य आहे ते गावानुसार किंवा देशानुसार ठरवाव.


Manuswini
Friday, March 28, 2008 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हां पण नुसते नावापुढे 'जी' लावले तरी बोलताना
रेखाजी तु क्या बोलती है? असे म्हणू शकत नाही.

बोलताना असेच म्हणावे लागते, रेखाजी आप कैसे हो?

रेखाजी, कश्या आहात? ते काय म्हणतेस असे चालु शकत नाही ना. (हे आपले माझे अल्पमत) :-)


Asami
Friday, March 28, 2008 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी ने जीव कासावीस केलाय हल्ली अगदी. शरदरावजी पवार इत्यादी वाचले की काय बोलावे ते कळत नाही

Sashal
Friday, March 28, 2008 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मी म्हणते, 'जी' च्या वापरात समानता हवी, जसं की, 'शरदरावजी पवारजी', 'ऐश्वर्याबाईजी रायजी बच्चनजी' ..

असं आपल्या माझ्या अल्पमतिला वाटतं हे माझं अल्पमत ..


Ajjuka
Friday, March 28, 2008 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे क्षेत्र कुठलंही असो आणि देश कुठलाही असो. जेव्हा ओळख किंवा interaction अत्यंत formal पद्धतीची असते तोवर एका पातळीवरचे लोकही एकमेकांना Mr अमुकतमुक म्हणून संबोधतात. जोवर तुमच्या पहिल्या नावाने एकेरी हाक मारण्याएवढी ओळख होत नाही तोवर. आणि वरीष्ठ माणसाला तर नक्कीच पहिल्या नावाने एकेरी संबोधले जात नाही.
दोन वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसे समोर येतात तेव्हा ज्येष्ठ वा कनिष्ठ हा मुद्दा बाजूला ठेवून सगळेच एकमेकांना ओळख/ मैत्री होईपर्यंत formal संबोधनेच वापरतात.
जे मला योग्य वाटते. पण हल्ली बर्‍याचदा असं घडून आलं म्हणून इथे विचारलं की बाकीच्या जगात काय घडतेय ते बघावं.

अर्थातच नंदिनी म्हणाली तश्या रिपोर्टर्स शी बोलताना आपोआप वागणं बदलून जातं. Production बघणारा माणूस किंवा AD एकेरी हाक मारायला लागला तर कधी कधी युनिटमधे producer किंवा स्टारच मधे पडून त्याला शिकवतो. पण मला हेच आश्चर्य वाटतं की आपल्यापेक्षा senior माणसाला एकेरी हाक मारायची नाही हे सुद्धा यांना घरी आइवडील शिकवत नाहीत का?

बाकी संडु सारख्या लोकांची म्हणजे ज्यांना चित्रपटक्षेत्रातल्या व्यक्तींना काडिमात्र आदर दाखवायची गरज वाटत नाही असल्या लोकांची कशी किंमत करायची हे आम्हालाही कळतेच.


Sashal
Friday, March 28, 2008 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाणे किंवा अंदाजाप्रमाणे क्षेत्र कुठलंही असो आणि देश कुठलाही असो. जेव्हा ओळख किंवा interaction अत्यंत formal पद्धतीची असते तोवर एका पातळीवरचे लोकही एकमेकांना Mr अमुकतमुक म्हणून संबोधतात. जोवर तुमच्या पहिल्या नावाने एकेरी हाक मारण्याएवढी ओळख होत नाही तोवर. आणि वरीष्ठ माणसाला तर नक्कीच पहिल्या नावाने एकेरी संबोधले जात नाही.
>>> अज्जुका, किमान US मध्ये तरी हे लागू होत नाही .. मुख्य म्हणजे English भाषेत 'आदरार्थी बहुवचन' हा प्रकार नसतोच ना .. आणि Mr./Ms. पण कोणी म्हणत नाहीत .. नावानेच हाक मारायची पध्दत जास्त आहे ..

अर्थात ह्याला थोडे अपवाद आहेत जसं,

१. मला जर एखादा माणूस MD/PhD etc. वगैरे आहे हे माहित असेल आणि फारशी ओळख नसेल तर मी कायम Dr. अमुक तमुक अशीच हाक मारेन पण रोजचा संपर्क असेल तर मग first name नेच address करतात ..

२. इकडचे cops, supermarkets मधल्या check-out counter वरची लोकं वगैरे generally कोणाशीही बोलताना Mr./Ms. वगैरे ने संबोधतात


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators