Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 25, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » KarmBhumi » Archive through March 25, 2008 « Previous Next »

Zakki
Thursday, March 20, 2008 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाणेरडे शब्द वापरणे हे तर इथे अत्यंत कॉमन आहे. अगदी बायकासुद्धा असे बोलतात. असे बोलले की तुम्ही कुणि मोठे आहात, असा त्यांचा समज असतो की काय कुणास ठाऊक.

माझी एक मॅनेजर बाई होती. तिला काही म्हंटले की आपल्याला काही माहिती किंवा काही सहकार्य हवे आहे की ती विचारायची की 'मग याच्यासाठी मला कुणा कुणाबरोबर झोपावे लागेल?'


Dineshvs
Thursday, March 20, 2008 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, तु एकाकीपणे सहन करण्यापेक्षा इथे अनुभव लिहायला हवा होतास.
आमच्यापैकी बरेचजण अश्या परिस्थितीमधून गेलो असू. त्यामुळे तूला अनेक उपाय सूचवण्यात आले असते.


Maanus
Thursday, March 20, 2008 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message





Dakshina
Monday, March 24, 2008 - 9:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, आज ह्या गोष्टीला, ४ वर्षं पूर्ण झाली तरिही इथे लिहीताना मी खूपदा
विचार केला आणि मग लिहीली. तेव्हा तर मी भित्रीच होते.


Dineshvs
Monday, March 24, 2008 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हाचे तेव्हा, आता नाहीस ना ? मग झाले तर.

Nandini2911
Monday, March 24, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे अनेक प्रसंग घडले, पण त्यावेळी मी काही केलं नाही..
>>>
दक्षिणा, हे तू लिहिलेले आहेस.. का काही केलं नाहीस??

माझ्या साडेचार वर्षाच्या अनुभवातल्या मी शिकलेल्या गोष्टी.

कुठल्याही कंपनीत जॉइन व्हायच्या आधी त्या कंपनीच्या सर्व पॉलिसीज समजून घेतल्याच पाहिजेत. बहुतेक कंपनीजमधून जॉइंनिंग लेटरसोबत एक पॉलिसी लेटर पण मिळते. जर तसे काही मिळाले नाहीतर ते विचारलंच पाहिजे.
मुळात आपण कुठेही नोकरीला लागतो म्हणजे आपण त्याचे गुलाम नसतो. जितका पगार ते आपल्याला देतात तितकाच आपल्याकडून ते फ़ायदा मिळवतात.

काही साध्या बाबी कायम लक्षात ठेवाव्यात... छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मेलवर लिहून टाकावी. तोंडी संभाषणाला अजिबात महत्व देऊ नये.
HR कडून त्याच्या सर्व Employee benefit policies विचरून घ्याव्यात.

ऑफ़िसमधे कायम "मी इथे मर मर काम करतेय" असा अविर्भाव कधीच आणू नका. जे काही काम आहे ते हसत खेळत झालं तर तुम्हालाही बरं वाटतं. आणि तुमच्या बॉसलाही.

तुमच्या बॉसला कधीच मूर्ख समजू नका. तो तिथे आहे याचा अर्थ त्याला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. अक्कल आहे. तो स्वत्:देखील काम करत असतो. त्याला कंपनी रिकामे बसण्याचा पगार देत नाही.
बॉसबरोबर कायम फ़्रेंडली रीलेशनशिप ठेवा. त्याच्याशी कलीगप्रमाणे बोला. साहेबगिरी करायचे दिवस गेले. ऑफ़िसमधे तुमचा वावर हा सर्वाना हवाहवासा वाटला पाहिजे. यासाठी प्युनपासून ते प्रेसिडेंटपर्यंत सर्वाशी एकाच पद्धातीने बोला. :-)

या सर्वासाठी तुमची soft skills फ़ार महत्वाची ठरतात. तुमचे कपडे, शूज पर्स सर्व व्यवस्थित असायला हवं. तुमचे केस चेहरा नीट असायला हवा. याचा अर्थ असा नाही की भडक मेकप करून ऑफ़िसला यावे :-)

चेहर्‍यावर सतत स्मित असले पाहिजे आणि तेही नकली नव्हे. सगळ्यात उबग आणणारी गोष्ट म्हणजे एखाद्याच्या चेहर्‍यावरचे नकली हसू.

तुमचे सर्व documents नीट फ़ाईल करून ठेवा. कधीही कुठेलीही फ़ाईल मागितली की ती तुमच्याकडे मिळालीच पाहिजे. (तुमच्या कामा संदर्भात)
बॉसबरोबर कलीग्जबरोबर cordial relation ठेवा. एखाद दिवशी कुणालातरी compliments द्याव्यात. (खोट्या compliments कधीच देऊ नयेत)
आणि कुणाबद्दलपण ऑफ़िसमधे वाईट बोलु नका. कुणी बोलत असेल तर ते ऐकून घेऊ नका. ही व्यक्ती तुमच्यासमोर तिसर्‍या व्यक्तीला वाईट बोलते ती तुमच्याविषयी अजून कुणाबद्दल नक्कीच वाईट बोलत असणार.

ऑफ़िसमधे बसून पर्सनल फोनवर बोलणे, स्वत्:च्या पर्सनल लाईफ़ची चर्चा करू नका.


Zakki
Monday, March 24, 2008 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तुम्ही मी जिथे काम करतो तिथे याल का?

तुमच्यासारखे लोक जर असले कामाला तर कदाचित् आम्ही पण (थोडेसे)काम करू!

बॉसला शिव्या देणारे सगळेच भेटतात, हाताखालचे लोकहि काय ताप काढतात, हे कुणि लिहीत नाही.


Arch
Monday, March 24, 2008 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, सगळे मुद्दे छान लिहिले आहेस.

Mrinmayee
Monday, March 24, 2008 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, जवळपास सगळे मुद्दे आवडले, पटले!
तुमच्या बॉसला कधीच मूर्ख समजू नका. तो तिथे आहे याचा अर्थ त्याला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. अक्कल आहे. युनिवर्सिटीत हे लागु होईलच असं नाही. एखाद्या प्रोफेसरच्या हाताखाली काम करणारा पोस्ट डॉक किंवा ग्रॅज्युएट स्टुडंट अकलेनी बॉसच्या दसपट हुषार असतो, (पोस्ट डॉक तर रिसर्च मधल्या अनुभवानी पण जास्त समृध्द असु शकतो). पण अश्या स्वत:ला डोईजड वाटणार्‍या पोस्ट डॉक किंवा ग्रॅड स्टुडन्टला चिरडून टाकायला हा प्रोफेसर काय पातळी गाठु शकतो हे जवळून बघीतलं आहे.(हा स्वानुभव नाही.कायम रिसर्च इन्स्टिट्युटमधे काम केल्यामुळे इतर क्षेत्रातला अनुभव नाही.)


Uday123
Tuesday, March 25, 2008 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अश्या स्वत:ला डोईजड वाटणार् ०दया पोस्ट डॉक किंवा ग्रॅड स्टुडन्टला चिरडून टाकायला हा प्रोफेसर काय पातळी गाठु शकतो हे जवळून बघीतलं आहे.

--- दुर्देवाने अशी सडकी माणसे सर्वच क्षेत्रात्-व्यावसायात असतात मग विद्यापीठ तरी त्याला का अपवाद ठरावा? असे अन्याय होताना मी देखील स्वत: पाहिले आहे पण मग तुमच्या शिक्षणाचा, बुद्धीचा काय उपयोग? तुम्ही उच्च विद्या विभुशीत जर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढु नाही शकलात तर मग कोणाकडुन अपेक्षा ठेवायच्या?

ज्या प्रमाणे एखाद्या कंपनीत नोकरी सुरु करायच्या आधी सर्व उपलब्द स्त्रोत वापरून त्या कंपनीची माहिती काढावी हा नियम आपण पाळतो (वर नंदिनी यांनी हेच सांगितले आहे), त्याच प्रमाणे उच्च शीक्षणात पण ज्या प्राध्यापका सोबत काम करायचे आहे त्याची (इत्यंभूत) माहिती असणे जरुर आहे असे मी समजतो. त्याचे संशोधन, आचरण (यात सर्व गोष्टी आल्यात) कसे आहे. या सर्व गोष्टी त्या-त्या प्राध्यापकाच्या संपर्कात आलेल्या लोकांकडुन सहज मिळु शकतात. मला स्वत्:ला खुप चांगले तसेच वाईट देखील अनुभव आले आहेत. पण एक काही नियम पाळले तर तुम्ही या परिस्थीतीवर सहजतेने मात करु शकता. च्यायला यांनी वाहुन गेलेल्या पानावर दहा मुद्दे एका वेगळ्या संदर्भात मांडले आहेत, माझ्या मते ते सर्व मुद्दे या क्षेत्रात पण लागु होतात.

शेवटी, तुम्हाला (चि)रडवण्याची परवानगी तुम्ही स्वत:च आपल्या वरिष्ठांना (अनवधानाने) देता असे मला वाटते.



Nandini2911
Tuesday, March 25, 2008 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युनिवर्सिटीत हे लागु होईलच असं नाही.
>>>>
मृण्मयी. प्रत्येक गोष्ट प्रतेक क्षेत्राल लागू होईलच असे नाही. हे मलाही माहित आहे. किंबहुना, रीसर्च हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. त्याला तुम्ही "नोकरी" म्हणू शकत नाही.
मी वरील बरेचसे मुद्दी कार्पोरेट क्षेत्राला धरून लिहिलेले आहेत. हेच मुद्दे एखाद्या मीडिया हाऊसमधे काम करताना लागू पडतीलच असे नाही.

उदय, अगदी बरोबर बोललात.
स्वत्:च अन्याय सहन करून घ्यायचा आणि मग रडायचं याला काहीच अर्थ नाही.

कधीही एक बाब मी कायम लक्षात ठेवलेय. जोपर्यंत या नोकरीमधे मला हवं तसं काम मिळतय. मी खुश आहे तवरच मी इथे राहणार. ज्याक्षणी मला असं वाटेल की मी इथे खुश नाहिये, त्याक्षणी मी बॉसबरोबर चर्चा करून मार्ग काढते. या आधीच्या ऑफ़िसमधे मी चोवीस तासात जॉब सोडला होता. तुमच्यावर अन्याय तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही बॉसला वीक आहात हे समजेल.

नोकरी वगैरे एक भाग झाला...
कुठेही असा अन्याय न होउ देण्यासाठी तुम्ही स्वत्: मनातून खंबीर असणं आवश्यक आहे. परत एकदा soft skills कडे.
माझं कुणीहीवाकडं करू शकत नाही कारण मी कुणाचंही वाईट करत नाही हा भाव तुमच्या मनामधे कायम असलाच पाहिजे. कुठलेही काम करताना तुमचा आत्मविश्वास त्यातून दिसला पाहिजे. हे काम नंदिनीनेच लिहिलेलं आहे. दुसरं कुणीही असं करूच शकणार नाही हे खात्री तुमच्या बॉसला आणि कलीग्जना पटली पाहिजे.
आपण एखादे काम करताना नुसतं ते करायचं म्हणून करतोय ही भावना मनातून काढून टाका. I love whatever I am doing हे ब्रीदवाकय ठेवा.
ऑफ़िसमधे सर्वाशी हसतमुखाने बोला.

जर तुम्हाला स्वत्:ला कुठे अन्याय होतोय, एखादा कलीग किंवा बॉस तुमच्या विरुद्धात जातोय असं वाटलं, जाणवलं तर त्याला आपल्या बाजूने करून घ्या. :-) चाणक्यनिती कधीच विसरू नका. एखादा तुमचा शत्रू बनायच्या आधीच त्याला मित्र करून घ्या.

हे कसं कराअय्चं.??? कुणाला माहिती हवी असल्यास मी देइन.
(चमचेगिरी हुजरेगिरी लाचखोरी हे ते उपाय नव्हेत. आधीच सांगते. अगदी subtle रित्या समोरच्याचा काटा काढता आलाच पाहिजे.


Zakki
Tuesday, March 25, 2008 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कुणाला यहुदी लोकांबरोबर काम करायचा अनुभव आहे का? महाभयंकर जात ती!! अर्थात् आपण अपमान, अन्याय सहन करत राहिलो तर कुणीहि तेच करेल. यहुदीच काय, कुणीहि.

पण अमेरिकेत काम करत असलात, तर त्या लोकांपासून अगदी सावध रहा.


Upas
Tuesday, March 25, 2008 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी तू म्हणतेयस तो मुद्दा बरोबर आहे, नरेंद्र जाधवांच आमचा बाप आणि आम्ही वाचताना त्यांनी त्यांच्या पी. एह. डी. दरम्यान आलेल्या अशाच अनुभवाची माहिती दिलेय..
नंदिनी, तुमचे मुद्दे अगदी बेसिक आणि बरोबरच आहेत पण सगळ्यांनाच २४ तासात जॉब सोडायला आणि बदलायला जमतेच असे नाही, उलट घरातील जबाबदार्या, कर्ज ह्या गोष्टींचा सारासार विचर करूनच नोकरीत वागावं लागतं.. तुमच्या family life चा professional life वर आणि vice-a-vesa परिणाम होतोच त्यातून समतोल साधत कायम हसतमुख, आनंदी, समाधानी वातावरण ठेवता येणं महत्त्वाचं..

Sandu
Tuesday, March 25, 2008 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यहुदी लोक म्हणजे कुठले लोक? यहुदी म्हणजे काय?

Mrinmayee
Tuesday, March 25, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय, तुमचं म्हणणं पटतंय! सगळ्याच क्षेत्रात असली माणसं आहेत. पण अन्यायाविरुध्द लढायला आर्थिक, सामाजिक क्वचित प्रसंगी राजकीय असे सगळे पाठींबे लागु शकतात असं नाही का वाटंत? अमेरिकेबाबत बोलायचं तर बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते मिळतात असंही नाही.लढेपर्यंत तुमची इथे राहण्याची मुदत संपत येते शेवटी!

झक्की, मी यहुदी लोकांबरोबर ७ वर्श काम केलंय! प्रोफेसर यहुदी, तेव्हा तो आपली भरपूर माणसं आणणार लॅबमधे! पण सुदैवानं अतीशय चांगले अनुभव आले.

नंदिनी, पोस्ट्डॉक्टरल लेवलचा रिसर्च (दुर्दैवानी) नोकरीच असतो. आणि इतर ठिकाणचे कायदेकानुन इथेही लागु होतात. म्हणूनच मी तुझे मुद्दे आवडल्याचं आणि पटल्याचं लिहिलंय.


Mrinmayee
Tuesday, March 25, 2008 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, हे पुस्तक वाचायची खूप इच्छा आहे. (मायबोली दुकानातून विकत घ्यावं म्हणते.)
२० वर्शांपूर्वीची युनिवर्सिटीतल्या आमच्या डिपार्टमेंटमधली एक दुर्दैवी घटना. PhD करणारा हा मुलगा, अत्यंत गरीब घरातला. आईवडील अशिक्षित, पण मुलाला अत्यंत मेहेनतीनं शिकवलं. ( UGC-CSIR ची फेलोशिप हा अर्ध्यापेक्षा जास्त घरी पाठवायचा.) ह्याच्या प्रोफेसरनी PhD च्या शेवटी रिझल्ट्स वरून, पब्लिश करण्याच्या पेपर्सवरून त्याला खूप छळलं. तु म्हणतोस तसं ह्या बापड्याचं कामातून लक्ष उडालं. कुणाला काही सांगता येईना. घरी सांगीतलं तर आईबापांना 'शिक्षकांचा मान राखायला हवा' येव्हडंच माहिती. मुलानी शेवटी आत्महत्या केली. आता ह्याला भित्रा नेभळट म्हाणायचं की दुर्दैवी? बरं हे सगळं उघडकीला आणणार कोण? प्रत्येकाचा स्वार्थ, सगळ्यांचे थिसीस अप्रुवल ह्यांच्या हातात!


Itgirl
Tuesday, March 25, 2008 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..मुलानी शेवटी आत्महत्या केली....

आई ग...! :-( खरोखर किती दुर्दैवी घटना... :-(


Maitreyee
Tuesday, March 25, 2008 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण मृण्मयीचे पोस्ट वाचून नरेन्द्र जाधवांचाच अनुभव आठवला!तेवढ्यात उपास चं पोस्ट दिउसलं. :-)

Zakki
Tuesday, March 25, 2008 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी असे ऐकले की Ph. D. चा thesis approve केला नाही म्हणून एका ३२ वर्षाच्या मुलाचे केस एका रात्रीत पांढरे झाले.

बरे त बरे लग्न आधीच करून घेतले होते!

अर्थात् आमच्या मते त्याला बाया बापड्यांचा नि आमचा शाप भोवला. त्याचा विषय काय होता माहित नाही, पण तो prgnant वटवाघळांना धरून आणायचा नि मारायचा!


Uday123
Tuesday, March 25, 2008 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अन्यायाविरुध्द लढायला आर्थिक, सामाजिक क्वचित प्रसंगी राजकीय असे सगळे पाठींबे लागु शकतात असं नाही का वाटंत?
--- गोष्टी या थराला जायलाच नकोत याची कळजी सुरवतीपासुन घ्यायला हवी. आता कधी-कधी तुमचे गणित चुकु शकते, पण त्यातुनही मार्ग काढता येतोच. तुम्ही कुठे आहात (भारत, अमेरिकेत), कोणाकडे काम करत आहात (भारतीय, चपटे, युरोपीयन) यावर गुंता कसा सोडवायचा हे अवलंबून आहे. याला/ हीला हात लावला तर आपल्याकडे पुढचे पाच वर्ष कुणी विद्यार्थी/ नी फ़िरकणार नाही एव्हढा धाक वाटेल असे तुमचे "नेटवर्क" हवे.

मुदत पुर्ण होण्याची का वाट पहावी? परिस्थीती या थराला जाण्या अगोदरच सोडून द्यावे. समजा प्राध्यपक तुम्हाला पुर्णत: अपरिचित असेल तरिही, २-३ महिन्यात तुम्हाला पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज बांधता येतो. काही लोकं वर्षाचे ३६५ दिवस, १२ ते १४ तास, काम करणे अपेक्षित करतात (आधुनीक काळातील शिकलेले वेठबिगार). तेव्हा मी असे करु नाही शकत हे सांगायला कचरायला नको.

आर्थीक परिस्थीती (जबाबदारी) कमजोर बनवु शकते, पण तेच नको व्हायला. तुम्ही कुठल्याही करणाने
soft target नाही आहात याची पुरेपुर जाणिव समोरच्याला करुन द्या. एक लक्षात ठेवा की जेव्हढी तुम्हाला कामाची अवशक्ता आहे तेवढीच समोरच्याला पण तुमच्या कामाची अवशक्ता आहे. प्राध्यापक देखील चांगला विद्यार्थी/ नी मिळवण्यासाठी जंग-जंग पछाडतांना मी पाहीले आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators