Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 20, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » KarmBhumi » Archive through March 20, 2008 « Previous Next »

Manuswini
Tuesday, March 04, 2008 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे चित्र सगळीकडे नसले तरी अजून नक्कीच आहे किंवा एवढे सत्य पचनी पडणे कठीण आहे.

पुन्हा pls समानतावर चर्चा करु नका.(खुप चर्‍हाटे झाली लिहून तिथे), तर इथे हे लिहायचे कारण फक्त ऑफ़ीसमधील mentality ,

मुद्दा हाच की मला वारंवार दुर्दैवाने मुलगी असून ह्या पोस्ट वर आहे ह्याचे बर्‍यापैकी कुसकट टोमणे एकायले मिळाले ते ही देसी भांऊ कडूनच.

आणखी एक जोक,

माझ्या पुर्वीच्या ऑफ़ीसमध्ये एका देसीने सगळ्यात कॉमन अशी थातूर मातूर सर्टीफीकेशन लावून ठेवली होती कुबीकल मध्ये फ़्रेम करून. हसायला येइल पण अगदी ऑफ़ीसने साधे basic Ms word चे ट्रेंनीग दीले ते ही.
आणि प्रत्येक मेल मध्ये ही लिस्ट signature म्हणून.



Hkumar
Tuesday, March 04, 2008 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाॅसच्या पुढे व गाढवाच्या मागे कधी लागायचे नसते कारण कधीही लाथ बसू शकते!

Dakshina
Tuesday, March 04, 2008 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाॅसच्या पुढे व गाढवाच्या मागे कधी लागायचे नसते कारण कधीही लाथ बसू शकते! >>>

HKumar,


Ladtushar
Thursday, March 13, 2008 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डबल ढोलकी !

डबल ढोलकी जी दोन्ही बाजूने वाजते....
आमच्या इथली एक चिवत्र (विचित्र) मेनेजर काम करते, ती च्या टीम मधल्यांची मला खरच इतकी कीव येते...बिचारे. कारण त्यांची हालत तोंड दाबून बुक्याचा मारा अशी झाली आहे. तसा मला ही तिचा असा अनुभव आला आहे...तुम्हाला ही असा अनुभव आला असेल त्यात काही नवल नाही, ही अश्या प्रवृतिची लोक म्हणजे च एक नवल आहे...

डबल ढोलकी ची काही लक्षणे देत आहे, अश्या लोकां पासून सावध रहावे हा दक्षतेचा इशारा !!!
१) दिलेले काम पूर्ण होण्याचा वेळे पूर्वी प्रचंड तकादा लावणे.
२) हातातले एक काम दिले असताना दूसरे काम देणे. आणि दिवसा अखेर दोन्ही काम पूर्ण होण्याचा तकादा लावणे.
३) काम देताना काही मीटिंग वैगरे न घेता, डेस्क जवळ येउन, आपल्या पीसी वर बारीक़ नजर देऊन, काही तरी पुट पुटू न जाने, आणि दिवसा अखेर हे नाही केले ते नाही केले. वर एवढे कळत नाही..., विचारायला यायचे... कितीदा सांगायचे.... इत्यादी इत्यादी....
४) एखादे काम करायला सांगायचे आणि वर नंतर हे का केले, कशाला केले, आणि नाही केले तर उलटी बोबं असतेच.
५) आणि महत्वाचे म्हणजे असमाधानी वृति, साधे दोन शब्द भरून कोतुक नाही कधी. (सहकारायन कडून गोड बोलून, समजून, समजावून, motivate, encourage, करून काम करून घेता येते हे याना पटतच नाही वाटत...)

Dakshina
Thursday, March 13, 2008 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, ती बाई मॅनेजर उगिच झालिये असं वाटतंय का तुम्हाला? हे सगळे गुण(?) तिच्या अंगात आहेत म्हणूनच झालेय ती मॅनेजर. अहो, तीच काय सगळीकडे बॉस हा असाच असतो. यशिवाय बरं का, कुणालातरी आपला पावर चा उपयोग करून खाली ढकलण्या पर्यंत सुद्धा अशा लोकांची मजल जाते.
उदा. सांगते. ३ वर्षापुर्वी आमच्या ऑफ़िसमध्ये एक मुलगी होती, प्रोजेक्ट मध्ये... मी तेव्हा ऑडमिन मध्ये होते. तिचा बॉस तिला रोज कही ना कहीतरी बोलायचा, तू इंटरनेटच जास्त वापरतेस, अम्हाला TSG कडून compalint आली आहे, किंवा, तू danger zone मध्ये आहेस, परफ़ॉर्मन्स लो आहे... इत्यादी... या बॉसने एके दिवशी रिझाईन केलं आणि गेला... मग हिने खूप लोकांकडे खातरजमा करण्याचा प्रयत्न केला, सर्वांनी कानावर हात ठेवले. कल्पना करा, तिने किती प्रेशर खाली काम केले असेल... आपण एम्प्लॉयी आणि मॅनेजमेंटच्या मधले कम्युनिकेटर आहोत म्हणून काय? वाट्टेल ते कन्व्हे करायचं? अशाने एखाद्याचं करियर बाद व्हायचं.

माझ्या बाबतीतही एक किस्सा लिहीन थोड्या वेळात.


Astha
Wednesday, March 19, 2008 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भारतात कधिच नोकरि केली नही. ईथे मात्र एका भारतीय कम्पनीत काम करवे लागले . MS नन्तेर नेहमीच १८ पगड ( १८ देषातल्या) लोका बरोबर काम करुन कधीच कही त्रास झाला नव्हता. पन देसी कम्पनी न भुतो न भविश्यति असा त्रास झाला. नेवेर से नेवेर म्हनतात पण खरच परत देसी नकोत अस वाटायला लागलय. स्वत्: देसी असून अस म्हनाव लागत हे दुर्भाग्य... ह्यात इकदच्या कधीही भारतात काम न केलेल्या देसीन्ना पन विछ्त्र वागताना पाहिल. I worked with other companies in US and always liked the respect for privacy. but Indian company was the limit... The company culture was full of politics and people were not at all professional. Most of these people were post graduates from India. They only talked about How good they are, what is their salary, and how they know better than others. The whole thing was too annoying.

I am not sure… was that because of Indian mentality or company culture or just mob psychology. Any ways doesn’t matter any more as I don’t work with the company. One good thing is in my new job I met few Indians and they seem very professional.


Naatyaa
Wednesday, March 19, 2008 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are ithe ajun zakkinche post nahi?? :-)

Zakki
Wednesday, March 19, 2008 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Most of these people were post graduates from India. They only talked about How good they are, what is their salary, and how they know better than others.

कदाचित् ते तुमच्यावर छाप पडावी म्हणून तसे तुमच्यासमोर बोलत असतील. इतरांसमोरहि ते तसेच बोलत असतील तर ते यडचाप आहेत असे समजावे व दुर्लक्ष करावे! ते बोलायला आले की , 'माफ करा, मी जरा कामात आहे' असे म्हणून त्यांच्याकडे पाठ फिरवून बसावे!

मी इथे बर्‍याच मराठी, देशी लोकांबरोबर काम केले. मुलेच काय, मुलीहि माझ्याकडे कामाशिवाय जास्त बोलत नाहीत.

फक्त माझे दोन मराठी नि दोन अमेरिकन मित्र होते. त्या सर्वांच्या बरोबर गप्पा मारताना दिवस कधी संपायचा ते कळायचे पण नाही. कामाला अर्धा एक तास पुरायचा. नाहीतरी कुणा कुणाला स्वत:ची कामे वाटून देणे एव्हढेच माझे काम!


Dakshina
Thursday, March 20, 2008 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आस्था, भारतातल्या बहुतेक ऑफ़िसांमध्ये तुम्हाला हेच चित्रं आढळेल. राजकारण, पाय खेचाखेची, unprofessionalisam, स्वतः ची बढती व्हावी यासाठी खुशामत इत्यादी. अर्थात सगळेच लोक असं करतात असं नाही. पण काही लोक जे खरोखरी सिन्सियर असतात त्यांना पण स्वातःच्या प्रगती साठी कधी कधी असले मार्ग अवलंबावे लागतात.
माझ्या मते तरी तुमची पहीली कॉर्पोरेट मधली नोकरी आणि तिथले अनुभव हे तुमच्या गाठीला कायम रहातात. काही कंपन्यांचं बिल्ड अप सिन्सियर असतं मुळात, मग ट्रेनीज ते शिकतात, मग पुढे (त्यांच्या मते) लाऊझी असलेल्या कंपनीत काम करायला लागलं की त्यांना अवघड जातं.


Dakshina
Thursday, March 20, 2008 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा मी इथे जॉइन झाले तेव्हा आमची संख्या खूप कमी होती. कॉर्पोरेट मधली अशी ही; माझी पहिलीच नोकरी होती. मी साधारण एप्रिल मध्ये जॉइन केलं. मला कॉर्पोरेटचा अनुभव नव्हता त्यात माझा मॅनेजर मला पहील्याच दिवशी म्हणाला होता की मी तूला काही शिकवणार नाही. खूप पंचाईत झाली होती माझी. आमचं एक क्षणही पटत नव्हतं. त्याच्याशी वाकडं धरूनही चालणार नव्हतं आणि गोड वागायची गोष्टंच उद्भवली नाही कधी. कुठेही गेला तरी सांगून जायचा नाही, पॉलिसिज सांगायच्या नाहीत, कामाची प्रोसिजर ही सांगितली नाही कधी समजाऊन. कधी चुकून बोललाच तर 'तुम्ही जरा Proactive व्ह्या...' इतकंच बोलायचा. मला दिवसेंदिवस फ़्रस्ट्रेशन येऊ लागलं होतं.
त्यात एके दिवशी ऑनलाईन अप्रेजल ची मेल आली. माझ्या मॅनेजरने मला सा.गितलं की तू भरू नकोस. मी पण मूर्खासारखं त्याचं ऐकलं. आणि भरलं नाही. मूळात माझा रिपोर्टींग मॅनेजर कोणितरी निराळाच होता, आणि तो मुम्बईत बसत असे.
एके दिवशी आमच्या एच. आर. मॅनेजरने मल बोलवून सांगितलं की तुझा प्रोबेशन पिरियड लांबवला आहे. मी तेव्हा का? कशासाठी? काय कारण काही विचारलं नाही. मूग गिळून गप्प बसले. आणि कामाला लागले. माझे दोष ही मला सांगितले गेले नव्हते. मनातलं कोणाला सांगू ही शकत नव्हते. कारण मी तशी नविन होते.
मला हे सगळं ओरली सांगण्यात आलं होत., लेखी काहीही नव्हतं. तेव्हा मला इतकीही अक्कल नव्हती की आपण त्याच्याकडून हे लेखी घ्यावं. HR Manejar ने सांगितलं की ३ महिन्यांनी विचार करू. मझं धबं दणाणलं होतं. माझं कामावरचं लक्ष अजूनच उडालं.
अप्रेजल्स डिक्लेअर झाली. मी लोकांचा आनंद, दुःख पहात होते. अचानक मला सेंटर मॅनेजर ने फोन करून त्याच्या केबिन मधे बोलावलं आणि माझ्या हातात इन्क्रिमेंट लेटर ठेवलं. मी उघडून पाहीलं त्यानं माझं अभिनंदन केलं. मी आश्चर्यचकित झाले. म्हणलं ही काय भानगड आहे? एकिकडे माझं प्रोबेशन वाढवल.य आणि दुसरीकडे हे इन्क्रिमेंट कशाला?
तिथे ही मी गप्प बसले आणि लेटर घेतलं. माझ्यासाठी ते अनपेक्षितच होतं. आणि मी ते माझ्या 'त्या' मॅनेजरला ही दाखवलं. त्याने ही माझं अभिनंदन केलं. मला तर काय भानगडच कळेना....
ते सांगितलेले ३ महीने उलटून गेले होते. माझ्यापरीने मी इतरांकडून फ़ीडबॅक घेऊन माझ्या कामाच्या पद्धतीत योग्य ते बदल करून घेतले होते. तरिही धाडस करून एच. आर कडे जाऊन 'माझ्या कन्फ़र्मेशन चं काय झालं?' म्हणून विचारायची माझी हिम्मत कधीही झाली नाही. नोकरी जाईल म्हणून मी फ़ारच घाबरले होते त्यावेळी....

असं भितीत.... मी जवळ जवळ पुढंहं वर्षं घालवलं. माझा इमिजिएट मॅनेजर सोडून गेला, 'तो' एच आर मॅनेजरही सोडून गेला... तो पर्यंत आणखिन सहा महिने उलटले. पुढचं अप्रेजल आलं. माझा रिपोर्टींग मॅनेजर (मुम्बईतला ) होता तोच होता. एके दिवशी मी मनाचा हिय्या करून माझ्या एका टिम मेंबरला माझी (रड)कथा सांगितली. तो 'बघतो-करतो' म्हणाला... त्याने ही बराच वेळ खाल्ला. दरम्यान मी ही माझ्या परीने एच आर मधल्या मित्र-मैत्रिणिंना सांगून ठेवलं होतं ते ही मला वेगवेगळी उत्तरं देत होते.
पण एक दिवस मला कुठून बळ आलं माहीत नाही. एक व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांना जाऊन भेटले. आणि त्यांना माझा प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी माझ्या मुम्बईच्या मॅनेजरला लगेच फोन केला आणि विचारलं की हे काय आहे म्हणून. त्या बिचार्‍याला याची काही कल्पना नव्हती. त्याने ते लेटर कधीच म्हणजे मी जॉइन झाल्यावर नेहमीप्रमाणे ६ महिन्यात कन्फ़र्मेशन देतात त्यचवेली इथल्या मॅनेजरच्या हातात दिलं होतं म्हणे.


Dakshina
Thursday, March 20, 2008 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग त्या व्हाईस प्रेसिडेंट नी माझ्या त्यावेळच्या मॅनेजरला बोलावून झापलं. वर हे ही सांगितलं की २ दिवसांच्या आत हिला बॅक डेटेड लेटर मिळालं पाहीजे. आणि आश्चर्य म्हणजे मला दुसर्‍या दिवशी लेटर मिळालं. आणि मी एक खूप मोठ्ठा श्वास घेतलां या सर्वं दिड पावणे दोन वर्षात मी कोणत्या मनःस्तापातून गेले ते आत्ता आठवलं तरी अंगावर काटा येतो.
पुढे मला बर्‍याच गोष्टींचा उलगडा झाला. की मला ज्यांच्या रेफ़रन्स ने मला हे ओपनिंग कळाले होते त्यांचे आणि माझ्या जुन्या मॅनेजरचे वाकडे होते. आणि त्याला भिती वाटत होती की मी त्या दोघांमधे आग लावीन. त्या एच आर मॅनेजरने आणि त्याने इंटरनली हे सगळं ठरवलं होतं. माझा परफ़ॉर्मन्स वाईट नसूनही निव्वळ भिती घालण्यासाठी इतका मोठा प्रकार केला..


Zakasrao
Thursday, March 20, 2008 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे दक्षिणा
कसल बेकार आहे हे राजकारण :-(
नोकरी जाण्याची भिती हम्म.. त्याचा फ़ाय्दा घेतात लोक्स. जितक दबुन राहणार तितका जास्त त्रास होतो आपल्यालाच.
आणि नवीन असताना आपल्याला देखील कळत नसत की कुठे तक्रार करावी किंवा पुढचा मार्ग काय.
असो.
ह्यातुन सावरली आहे हे तर चांगलच आहे. आता तुझ्या आजुबाजुला अस कोणी बळी जाणार असेल तर तु पुढाकार घेवुन मदत करत जा :-)


Dakshina
Thursday, March 20, 2008 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर हे ही कळले होते की माझ्या मॅनेजरने एक मुलगी फ़ायनल केली होती, आणि त्याला तिच तिथे हवी होती. माझं कधीही इन्डक्शन पण झालं नाही. हे काहीच नाही. त्या मॅनेजरने मला माझ्या रिपोर्टींग मॅनेजरपर्यन्त कधीच पोहोचू दिलं नव्हतं. तो माणूस म्हणजे एक मोठा Block होता...

मॅनेजर म्हणून राहू दे पण एक माणूस म्हणून सुद्धा तो अत्यंत इन-सेन्सिटिव्ह होता. एक दिवस मी एकटी कँटीन मधे जेवणासाठी टेबल बघत होते, ह्या माणसाने मला बोलवून त्याच्या टेबलावर बसवले. शिवाय कॉन्ट्रक्ट वर काम करणारा एक माणूस (त्याचा खास) असे तिघं बसलो होतो. थोड्या वेळाने, ते दोघं कानात खूसफूस करून बोलायला लागले. मी ऐकू नये म्हणून. मी म्हणलं कशाला इतका त्रास घेता... मी जाते, आता निवांत बोला... आणि मी निघून गेले.

असे अनेक प्रसंग घडले, पण त्यावेळी मी काही केलं नाही....
का? का? का? का? का? आता या विचाराने फ़क्त मुठी आवळण्याचं काम करू शकते, बाकी काही नाही....


Chyayla
Thursday, March 20, 2008 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मला वाटत असल राजकारण छोट्या मोठ्या प्रमाणात सगळीकडेच चालत गरज असते आपल्यालाही त्याचा सामना सजग राहुन जश्यास तसे उत्तर देउनच करायला हवे, भले त्याला कोणी राजकारण म्हणेल पण मी त्याला चांगल नाव देइल ते म्हणजे व्यावसायिकता ( Professionalism )

अनुभवातुन कार्यालयीन कामाच्या बाबतित माझी काही तत्व ठरलेले आहेत ज्यामुळे मला कधिच त्रास झाला नाही, झाला तरी उलट त्यातुन पुढे खरी परिस्थिती आल्यामुळे उलट प्रगतीच झाली.

१) आपल्या कामात आपण प्रामाणिक रहाणे ही मुख्य अट.
२)केलेल्या कामाच Documentation सगळ्यात महत्वाचे कारण केवळ हेच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतुन वाचवु शकत, व कोणीही तुमचे वाकडे करु शकत नाही.
३)निर्भिडपणे आपली मते मांडणे भले समोर कुणीही असो कुणासमोरही साहेब म्हणुन दबण्याची गरज नाही.
४)आवश्यक तिथे न चुकता Reporting करणे.
५) आवश्यक तिथे कुटनितीचा चांगल्या कामासाठी व न्यायासाठी वापर करणे.
६)कोणाचीही हुजरेगिरी अजिबात करण्याची गरज नाही.
७) नव्याने भरती झालेले, आपल्या खालच्याना शक्य तितकी मदत करणे, पण Spoon Feeding नव्हे.
८)कोणतेही काम स्वता:चे वा सहकार्याशी व्यव्हार करताना पण हसत खेळत करणे, म्हणजे ताण न ठेवता करणे.
९)एखाद्या गोष्टीला नकार द्यायचा तर एकदम नाही म्हणुन दुखवण्यापेक्षा नम्रपणे, कारणासहीत नकार देणे.
१०)वरिष्ठांशी जास्त जवळीकीही नको वा जास्त दूर पण नको Not too far to freeze, not too close to burn.


Dakshina
Thursday, March 20, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, तुम्ही सांगताय ते सगळं चोख आहे. कॉर्पोरेटमध्ये अगदी असंच रहायला हवं.
आणि हे सगळं आता जमतंय मला. मी सांगितलेली गोष्टं ही पाच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मला काहीही कळत नव्हतं. फ़क्त एक अनुभव लिहिला. जेणेकरून कोणाला वाचून फ़ायदा होणार असेल तर उत्तमच नाही का?


Itgirl
Thursday, March 20, 2008 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर तू छान लिहिलेस.

दक्षिणा, तुझा अनुभव वाचून वाईट वाटले, तू म्हणतेस ते खरेच, कॉर्पोरेटमध्ये प्रथम वावरत असताना तर दडपण येईलच. किती दडपणाखाली वावरली असशील ग सतत... :-(


Chyayla
Thursday, March 20, 2008 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद आयटी आणी मलाही कल्पना आहे की दक्षिणाची परिस्थिती कशी होती ते, तश्या ह्या गोष्टी अनुभवानीच शिकता येतात, तेव्हा आलेल्या कटु अनुभवांपासुनही योग्य बोध घेउन सुधारणा करणे ईष्ट.. असो एक चांगला किस्सा माझ्या टीम मधे घडलेला सांगतोय त्याचाही असाच कुणाला फ़ायदा झाला तर या उद्देशाने

माझ्या हाताखाली एक छोटीशी सपोर्ट टीम असुन त्यात अमेरिकन, गुलटी व ईतर लोक आहेत. एक दुसर्या प्रोजेक्ट मधुन माझ्या टीम मधे एक मुलगी नव्याने आली होती. ती तिच्या कामात चोख होती पण बाकीचे गुलटी सहकारी तितकेसे सहकार्य करत नसत. काही ना काही पेचात पकडायचा प्रयत्न चालायचा

माझ्या जेव्हा लक्षात आले तेव्हा एकदा दोघानाही समजावले, म्हटले तुम्ही Colleague आहात एकमेकाना मदत केल्यास, सहकार्य केल्यास तुमचेच चांगले होइल. कोणाची गरज कधी पडेल सांगता येत नाही. त्यापुढे त्या गुलटीनी तीला दम भरला की कोणतेही प्रकरण माझ्यापर्यंत येउ देउ नको म्हणुन.

मधे तीला दिर्घकालीन दोन महिन्याची सुट्टी घेउन भारतात जायचे होते त्यासाठी तीने काही दिवस कामाचे दिवस Exchange करण्याची विनंती केली जेणेकरुन तीला थोडे लवकर विमानाच आरक्षण करता येइल. त्याला तो गुलटीही तयार झाला. तशी मला त्यांनी तोंडी माहिती दिली. पण ऑफ़िशियली मेल नव्हती केली. मी तीची सुट्टी व दोघांच Exchange of Days ला मान्यता दिली.

त्यानुसार तीने विमानाच आरक्षण केले व तयारीही केली व मलाही तसे सांगितले मी तिला तिथेच बजावले की तु आधी मला व मॅनेजमेंटला मेल टाक. पण भारतात जाण्याचा आनंदात तिच दुर्लक्ष होत होते.

एका रात्री त्या गुलटीनी मला फ़ोन करुन सांगितले की तो Exchange of working Day नाही करणार व तीला तिच्या कामाच्या दिवसात शिफ़्टवर यावेच लागेल. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही बधला नाही, शिवाय काही ऑफ़िशियली मेल वैगेरेही नव्हती.

नशिबाने दुसर्या दिवशी तो कामावर नव्हता तर ती मुलगी शिफ़्टमधे होती तिचा एकदम निराश, रडका चेहरा पाहुन मी तीची विचारपुस केली व त्या गुलटीचा निर्णयही सांगितला. ती त्या कारणामुळेच निराश झाली होती. म्हणाली की माझे तिकिट आरक्षित झाले आहे व ती कामावर येउ शकत नाही पण त्या माणसाने एनवेळी धोका दिल्यामुळे गैरहजेरी लागुन नौकरी जायचीही पाळी येउ शकते, आता मी काय करु म्हणुन परत रडायला लागली. मला तिची खरच दया आली व त्या गुलटीचा रागही आला.

म्हटल अस रडुबाई होउन काही होणार नाही जरा Professionally याला सामोरी जा. तेव्हा तिला ताबडतोब एक मेल ड्राफ़्ट करुन दिला म्हटल दे मॅनेजमेंटला आणी मला पण कॉपी.

तीचा पहिला मेल गेला की ती आणी तो गुलटी exchange of working day करायला तयार आहेत... वेळ बरोब्बर साधल्या गेली आणी दुसर्या दिवशी तो गुलटी कामावर आल्यावर त्यानी ते रद्द केल्याची मेल टाकली, अश्याप्रकारे मेलयुद्ध सुरु झाली.

मग परत एकदा मीच तीला अजुन एक मेल ड्राफ़्ट करुन त्यात ह्या गुलटीनी कसा घात केला ते लिहिले व लिडलाच काय करायचे म्हणुन Suggestion मागवले. (मायबोलीवरच्या V&C चा फ़ायदा.. अगदी खर्र खर्र ) शेवटी यामुळे Lead च्याही लक्षात आले की ह्या गुलटीनी कसा धोका केला व त्यामुळे ती कामावर गैरहजर राहील, त्यावर त्यानी मला कळवले की ती कामावर गैरहजर राहिली तरी चालेल कारण तिचा आंतरराष्ट्रिय विमान प्रवास रद्द करणे बरोबर नाही त्यामुळे तीच्या जागी दुसरी व्यवस्था कर. ती व्यवस्था मी आधीच करुन ठेवली होती.

भारतात जाताना तिला शुभेछा दिल्या, आता मात्र ती हसु लागली कारण सुट्टीही मिळाली व नौकरीही वाचली, शिवाय त्या गुलटीचा डावही उलटला. तर कधी कधी असेही कुटनितीचे डाव खेळावे लागतात.


Zakki
Thursday, March 20, 2008 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातल्या बहुतेक ऑफ़िसांमध्ये तुम्हाला हेच चित्रं आढळेल. राजकारण, पाय खेचाखेची, unprofessionalisam, स्वतः ची बढती व्हावी यासाठी खुशामत इत्यादी

हे तर इथेहि मी पाहिले आहे. वर लिहिलेल्या मॅनेजरसारखे मॅनेजर इथेहि पाहिले आहेत.

माझ्या अमेरिकेत शिकलेल्या मुलीला असेच काहीसे अनुभव आले होते. तिने सटासट नोकर्‍या सोडल्या. आता जरा बरे चालले आहे तिचे.

माझेहि काही मॅनेजर असेच वाईट होते. त्यांनीहि माझे बरेच नुकसान केले. पण माझी कं प्रचंड मोठी होती, नि त्या कं त इकडून तिकडे जाणे सोपे होते. अर्थात वशीला कं तल्या कं त पाहिजेच.

च्यायला ह्यांनी लिहिलेल्या काही काही गोष्टी इथे बर्‍याच कं त असतात.


Jadoo
Thursday, March 20, 2008 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पहिलेला अनुभव सुद्धा असाच आहे.. भारतातिल एका well known software company च्या contractors बरोबर काम करण्याचा अनुभव माझ्या पुर्विच्या company मधे भारतातिल २ well known software company मधिल consultants २ वेगवेगळ्या projects वर काम करत होते. दोन्हि project ला काहि documentation common होते. बर्‍याचदा हि लोक एकमेकांना सहकार्य करित नसत. Information easily share करत नसत कदाचित competition मुळे आणि आपल्या हातचा project दुसर्‍या company कडे गेला म्हणुन सुद्धा....
ह्यातल्या एका company च्या manager चा तर अगदी वाईट अनुभव आला. ह्या manager ने एक-दोनदा meeting मधे एका गोर्‍यासाठी घाणेरडा शब्द उच्चारला. meeting मधे लोक फ़क्त त्याच्याच company मधिल होति ह्या manager च्या HR feedback मधे त्याच्या team मधल्या लोकांनी हे त्याचे शब्द repeat सुद्धा केले. पण company policy की कोणाला fire नाहि करायचे. मग काय ह्याने नंतर सगळा बदला काढुन घेतला. ज्याने ज्याने HR कडे complaint केलि सगळ्यांना ह्याने खूप त्रास दिला. एवढे करुन सुद्धा १ महिन्याने Program Manager म्हणुन promote सुद्धा झाला. त्याच्या team मधिल बरिच लोक company सोडुन गेलि आणि काहि लोकांनी project बदलुन घेतले.





Astha
Thursday, March 20, 2008 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या नव्या जोब मध्ये वतावरण खुप प्रोफ़ेशनल आहे. मी कामा पूरत लोकान्शी हसून खेलून बोलते. पण नो मित्र मैत्रिणी And I am very haapy abt it. My boss is Awesome. If I wanna work remotely or take a day off, he never asks me why. He says yes (mostly)or no (almost never:-)) depending on my work status and I love it. I am sure after perticular level in career lader there will be politics irrespective of company or country . I am truely happy as long as its not affecting me directly, specially now ( I am just 4-5 years old industry)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators