|
Ladtushar
| |
| Thursday, February 07, 2008 - 6:57 am: |
| 
|
Actuly एवढे professionalisum इथे आजुन आले नाही. त्यामुळे favourisum आणि personal cooperation सर्रास चालते. फक्त याचा परिणाम कामावर आणि कामाच्या गुणवत्ते मधे नसावा, गुणवत्ता सुधारन्या साठी ठीक, पण गुणवत्ता मोजमपताना हे relation मधे आणू नये. तिथे सर्वाना समान वागणूक असावी. इथे अजूनही स्वताच्या सुखात आणि दुःखा त ऑफिस मधले सहकारी सहभागी होतात. हीच तर मज्जा आहे भारतात काम करातानाची. आणि यामुळे productivity वर काही परिणाम होतो असे नाही. फक्त प्रतेकाने आपली सीमा ओळ्खुन राहावी, दुसरयाच्या पर्सनल लाइफ मधे ढ्वळाढ्वळ अथवा डोकवु नये!
|
Dakshina
| |
| Monday, February 11, 2008 - 6:54 am: |
| 
|
प्रतेकाने आपली सीमा ओळ्खुन राहावी, दुसरयाच्या पर्सनल लाइफ मधे ढ्वळाढ्वळ अथवा डोकवु नये!>>>> हेच तर लोकांना नाही जमत. उलट बरेच लोक आपला ऑफ़िसातला अर्धा अधिक वेळ यासाठीच सत्कारणी(?) लावतात.
|
Ajjuka
| |
| Monday, February 11, 2008 - 9:43 am: |
| 
|
एकुणातच favoritism इत्यादी बद्दल मला नेहमी एक शंका येते. तसं नसतंच किंवा तश्या पद्धतीने गोष्टी घडतंच नाहीत असं नाही. पण ते आपल्या लक्षात येतं तेव्हाच जेव्हा आपल्यावर अन्याय झाला असं आपल्याला वाटत असतं. हे जरा गमतीचं वाटतं मला. दोन उदाहरणं.. एक मुलगा होता. माझाच विद्यार्थी. तसा अगदी ब्रिलियंट नाही पण हुशार म्हणता येईल असा. त्याचं एम ए झाल्यावर काही काळ हा माझ्या हाताखाली एका प्रोजेक्टवर काम करणार होता. actualy काम सुरू व्हायला वेळ लागला त्यामुळे आम्ही खूप intial काम करत होतो काही दिवस. त्या काळात हा मला नेहमी सांगे की कसा याच्यावर अन्याय होतो. कसे सगळे शिक्षक दुसर्यांना फेवर करतात. कसं याचं क्रेडिट दुसर्याला मिळतं. इत्यादी इत्यादी. मी आपलं ते ऐकून घेत असे. त्याला फक्त एवढंच assure केलं होतं की जे काम तू करशील त्याचे तुलाच क्रेडिट मिळेल. काम सुरू झालं आणि मग याचे रंग कळायला लागले. प्रोजेक्टमधून तशी प्राप्ती काही होणार नव्हती हे आधीच त्याला सांगितलेलं होतं त्या आधारावर मला अमुक ठिकाणी पैसे मिळणारेत मी त्यांना नाही म्हणू शकत नाही इत्यादी कारणे सांगून माझे काम टाळणे सुरू झाले. सहायक दिग्दर्शक म्हणून तालमीव्यतिरीक्त जास्त वेळ देणे अपेक्षित होते पण तालमींना पण हा धड येत नसे. आला तरी सहाय्यक म्हणून काम करण्याऐवजी स्वतःचं काहीतरी वेगळंच करू बघत असे. पहिल्या प्रयोगाच्या २० दिवस आधी production च्या जबाबदार्या जमणार नाहीत असे सांगून दुसर्यावर ते ढकलले. पहिल्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी मी उद्या प्रयोगात नसेन कारण मला एका ठिकाणी भेटायला जायचंय तिथे कामाचे मला पैसे मिळणारेत. असं सांगून गडी गायब. पहिला प्रयोग मी कसा खेचला माझं मला माहित. पण या सगळ्यानंतर निर्मिती सहाय्य असं नाव त्याचं ठेवणं मला शक्य नव्हतं. ते आलं नाही म्हणून तू पण इतरांसारखीच असा ठपका माझ्यावर त्याने ठेवलाच. आता इथे याचय commitment चा घोळ होता की favoritism चा संबंध होता? अर्थातच स्वतःचा झोल लपवण्यासाठी favoritism च्या कारणाचा आसरा गेह्तला गेला. असे अनेक लोक दिसतात. तेव्हा favoritism बद्दलची ओरड किती खरी आणि किती खोटी हे कळत नाही. दुसरं उदाहरण असम नाही पण hypothetical situation म्हणूया. एखादं प्रोजेक्ट आहे. ज्यासाठी एका ठराविक कामासाठी दोन सारख्या दर्जाचे उमेदवार मिळाले आहेत. निवडणारा जो मुख्य आहे, त्याच्याच हाताखाली किंवा बरोबर हे लोक काम करणारेत. अश्या वेळेला त्या दोघांपैकी एक संपूर्ण अनोळखी आहे तर एकाशी या मुख्य माणसाचे tunning चांगले आहे. त्याच्याकडून काम करवून घेण्यात तो माणूस comfortable आहे. असे असताना त्या मानसाला निवडणं हे योग्यच नाही का? अगदी favoritism म्हणलं तरी मला यात काहीच ह्cउकीच वाटत नाही. असो.. खूपच बडबड केली...
|
Dakshina
| |
| Monday, February 11, 2008 - 10:43 am: |
| 
|
आमच्या ऑफ़िसमधल्या एका मुलीला निव्वळ फ़ेवरिटिझम मुळे मागच्या वर्षी (इतरेजनांसाठी) अशक्य (असलेलं) प्रमोशन मिळालं आणि 'य' वेळेला कसली कसली awards.
|
Arc
| |
| Tuesday, February 12, 2008 - 4:43 am: |
| 
|
दक्शिना अशावेळेस ठेविले अनन्ते (पक्शी: manager ) तैसेची रहावे चित्ति असावे समाधान... असा भाव ठेवावा वाईट वाटत नाही
|
Meggi
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:59 am: |
| 
|
फुकट काहिच मिळत नाही. साहेबाची मर्जी राखणार्या लोकांना या ना त्या मार्गाने त्याची परतफ़ेड करावी लागते. माझा एक सिनिअर होता. असाच मर्जीतला. बिचारा रोज सकाळी येऊन साहेबासाठी पाणी भरून ठेवायचा.. आता त्याच कंपनीतली माझी एक जुनिअर आणि तो एका नवीन कंपनीत जॉइन झालेत एकाच designanion ला. काय उपयोग त्याच्या आधीच्या कंपनीतल्या सिनिऑरिटीचा... !!!
|
Dakshina
| |
| Tuesday, February 12, 2008 - 7:49 am: |
| 
|
अगदी खरंय. फ़ेवरीट असून काही उपयोग झाला तर, फ़ार तर या कंपनीत होईल, ते ही तो बॉस असे पर्यंत. नंतर कोण विचारणार? माझ्या ऐकिवात एक अचाट प्रकार आला. व्हर्टीकल एच आर मधल्या एका असिस्टंट मॅनेजरने अप्रेजल्स जवळ असताना, आपल्याच व्हर्टीकल मधल्या लोकांना खोटे फोन केले, आणि सांगितलं की मी अमूक - ढमूक कंपनीतून बोलतोय. आणि प्रत्येकाची सॅलरी एक्स्पेक्टेशन विचारून, त्याची विशेष नोंद करून ठेवली. आणि वन टू वन डिस्कशन च्या वेळी, 'ते' सॅलरी एक्स्पेक्टेशन समोर ठेवलं. अशा पद्धतीने गिल्ट देऊन कोणाचंच अप्रेजल चांगल झालं नाही, 'त्या' असिस्टंट मॅनेजर चं सोडून... अर्थातच तो जो कोणी होता, तो फ़ेवरीटच असणार... बॉसचा हात डोक्यावर असल्याशिवाय थोडेच असे प्रकार घडतात?
|
भारतातल्या सिच्युएशन युनिक असतात. त्यामुळे बरेच वेळा आपण कसे वागावे तेच कळत नाही. तुम्हाला प्रत्येकाशी व्यवस्थित जमवुन घेणे भागच पडते. professional relationship हे काय असते याबाबतीत खुप खुप गैरसमज आहेत. कधी तुम्ही सांगितली की उद्या मला personal काम आहे आणि मी सुट्टीवर जाणार आहे तर ते काम सांगणे भाग पडते कींवा अपेक्षा असते की तुम्ही ते काम सांगावे. आणि employee ला शेवटी त्यांच्याबरोबरच काम करायचे असल्याने त्याला ते मुकाटपणे सांगणे भाग पडते.. तीच अवस्था उशीरापर्यंत थांबण्यासाठी ची चाललेली अह्म्हमिका... आमच्या मते जर तुम्ही आठ तास व्यवस्थित काम केले.. म्हणजे काही special स्पीड ने नाही पण तुमच्या तुमच्या speed प्रमाणे तरी ९५% वेळा काम व्यवस्थित न गोंधळ होता पार पडते. Conference वगैरे असल्याशिवाय थांबायची गरज पडत नाही... पण कामाची विभागणी ही व्यवस्थित पाहीजे. असो.... असोच..!
|
सकाळी ९ वाजता office ला यायचं ९ ते १० Canteen मध्ये breakfast साठी जायचं १० ते ११ personal emails चेक करायच्या ११ ते ११.३० हा वेळ collegues बरोबर gossip करण्यासाठी ११.३० ला आज काय काम करायचं ह्याचा आराखडा करायला सुरुवात करायची तो पर्यंत १२, १२.१५ वाजतात मग लगेच त्याच कार्यालयात काम करणार्या मित्राचा मैत्रीणीचा फोन येतो जेवायला जाण्याचे बोलावणे असते त्या फोन वर गप्पा मारून १२.३० पर्यंत जेवायला जायचं जेवण १.१५ पर्यंत नंतर २० ते २५ मिनिटे शतपावली (जेवणानंतर अत्यंत आवश्यक) म्हणजे १.४५ वाजतात. कामाला सुरुवात जवळ जवळ दुपरी २ वाजता मग हे काम करत असताना (दुपारच्या जेवणातील गोड पदार्थामुळे ) बर्याच जांभया द्यायच्या, कारण मस्त झोप घ्यायची भावना मनात घर करून असते. मग ४ वाजता झोप असह्य होते, पण मग office मध्ये असल्याने झोप घालवण्यासाठी coffee पिणे गरजेचे होते ४ ते ४.३० पुन्हा canteen चा दौरा ४.३० वाजता बापू ( boss ) अंगावर येतो, कामाचं status विचारत त्याला थापा लावण्यात परत अर्धा तास जातो. ५ वाजतात, आणि मग पुन्हा अर्धा तास personal emails चेक करणे, orkut वर भटकून येणे ह्यासाठी reserved असतो. ५.३० ला बापूचा भयानक राग येतो कारण त्याला आपण काम करत असलेले document आजच हवे असते आणि ते पुढच्या अर्ध्या किंवा एका तासात संपवणे अशक्य असते. ह्याच वेळेस आपल्याला उशिरापर्यंत office मध्ये थांबावे लागणार ह्याची जाणिव होते. मग कसे बसे ८ वाजेपर्यंत ते काम आपण पूर्णं करून घरी जायला निघणार तेव्ढ्यात बापूची काम नीट न झाल्याची email येते. मग पुन्हा १ ते २ तास असेच चरफडत काम करण्यात जातात. हे अस चित्र तुम्हाला हल्लीच्या IT companies मध्ये सर्रास दिसेल......
|
Hi_psp
| |
| Tuesday, February 12, 2008 - 2:08 pm: |
| 
|
शन्कासुर, अगद्दी १०० बरोबर.
|
Manuswini
| |
| Tuesday, February 12, 2008 - 7:02 pm: |
| 
|
LOL शंकासूर अगदी अगदी.
|
Zakki
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:11 pm: |
| 
|
हल्लीच्या IT companies मग यात वेगळे काय? मी १९७० पासून IT मधे आहे. तेंव्हाहि तसेच असायचे. त्यासाठी तर IT त जायचे. नि रात्री आठ वाजेस्तवर काम कशाला करायचे? गप्पा रंगात आल्या असल्या तरी कचेरीतून बाहेर पडायचे नि कुठेतरी रेस्टॉरंट, किंवा बारमधे जाऊन बसायचे.
|
Dakshina
| |
| Friday, February 15, 2008 - 5:30 am: |
| 
|
शंकासूर, मी ही तुमच्याशी १००% सहमत. तुम्ही म्हणता तसे चित्रं सर्व IT कंपन्यांमध्ये हमखास दिसतेच. माझे Admin (हे ऍड्मिन मधलं अँ कसं लिहायचं? ) असो... तर मी सांगत होते की माझा पण एक टिम मेंबर होता... त्याचं रूटीन विचित्रंच होतं. म्हणजे ११ / ११.३० च्या पुढे कधीतरी ऑफ़िसला यायचं, चहाचे आणि सिगारेटचे अतोनात ब्रेक्स. मग जमलं तर कधीतरी मेल्स चेक करायचे. जागेवरून पन्नस वेळा उठून इकडे जा, तिकडे जा... कॅम्पस राऊंड, सरप्राईज व्हिजिट... इत्यादी इत्यादी साठी. मोबाईल कधी उचलणार नाही. डेस्क फोन उचलण्याचा तर प्रश्नंच नाही. जेवायला कधीतरी.. असं ४.३० ला वगैरे... शिवाय रात्री २ / ३ पर्यंत ऑफ़िसात थांबायचं. मला ते प्रचंड विचित्रं वाटायचं. कधी चुकून समोर आला की कामचं किती प्रेशर आहे, रात्री कसं मरून काम केलं, जेवलो किती लेट (किंवा कसा जेवलोच नाही) असं सगळं सांगायला सुरवात. मला ते नेहमीच explaination वाटायचं. असो.. पण त्याच्या काही गोष्टी चांगल्या ही आहेत. डेटा अप टू डेट... flawless POs ... इत्यादी.... असो.. पण जनरली IT मध्ये काम खूऽऽप असतं ही ओरड जरा नाटकी आहे असं मला वाटतं. लोड असतो, पण तो आपण सहज मॅनेज करू शकतो. (हे माझं मत आहे.)
|
माझ्यावर बर्याचदा मी बॉसची फ़ेवरेट असल्याचा ठपका असतो.. आधीच्या ऑफ़िसमधे तर बॉस मला मुलगी मानायचा.. त्यामुळे तिथे तर मी चमची आहे हे सतत ऐकून घ्यायला लागायचं. नवीन ऑफ़िसमधे माझी टीम अशी आहे जेजे: बिहारी बाबू. एकदम कूल. त्याला सर्वजण लाऊडस्पीकर म्हणतात. इतका तो ओरडतो. पण माझ्या हातून जर काही गडबड झाली तर मात्र अगदी हळूच पाठीवरून आत फ़िरवून.. "बाबू ऐसा नही करनेका.. मेरेसे पूछ.. मै हू ना तेरी मदद केलिये..." रत्नदीप्: बंगाली. कम्युइनिस्ट. पण एकदम हेल्पफ़ुल. कुछ भी लफ़डा हो गया तो बोल दे रत्नदीपने किया.. मै संभाल लूंगा. पर्सी: टॉप बॉस.. पारसी. कुलाब्याला राहतो. एंग्लिश, गुजराती, मराठी हिंदी अशा भाषामधील शिव्यामधे प्रभुत्व. याचं शरीर जितकं अगडबंब आहे तितकाच तो मनाने चांगला आहे. "नंदु भाय तू मराठी चॅट करना छोड नही तो तेरेको मे प्रमोट नही करेगा," ,,   रोशन्: क्युट आहे. एकदम पप्पी फ़ेस. रॉंग नंबर आहे.. एकदम धमाल.. कामाला एकदम आळशी. पण जितके काम करेल ते एकदम चोख.. बास इतकेच लोक आम्ही. आता एवढ्यात काय कर्म भांडणार?? काम तर आम्ही केव्हा करतो समजात सुद्धा नाही.
|
Farend
| |
| Saturday, February 16, 2008 - 12:33 am: |
| 
|
नन्दिनी रॉंग नंबर म्हणजे आनंदी का? सध्याची स्लॅन्ग बरीच माहीत नाही. बापू हा शब्द सुद्धा मायबोलीवरच आहे की सगळीकडे वापरला जातो (बॉस बद्दल)?
|
Preetib
| |
| Friday, February 29, 2008 - 6:39 pm: |
| 
|
मी ईथे उसगावात काम कारत आहे. Indian mentaility cha अनुभव येत आहे देसी लोकापासुन, मुळात एक मुलगि लीडर आहे हेच पटात नाही, मग कुचकट बोलाना चालूच असत. मी पण भरपुर भान्डण करते. उगाच का काही पण ऐकुन घ्यायचा चुक नसताना.
|
Zakki
| |
| Saturday, March 01, 2008 - 12:47 pm: |
| 
|
अहो कुठेही नोकरीत काम खूऽप असतेच हो. फक्त आपले काम कमी कसे करायचे हे कळले पाहिजे. मी कधी कधी खूप काम केले आहे. पण जिथे जिथे मी जातो, तिथे तिथे लगेच काम आटोक्यात आणून नंतर मग 'केले तर करीन, नाहीतर उद्या', 'ठेवायचे असेल नोकरीवर तर ठेवा, नाहीतर काढून टाका,' असे म्हणण्याची क्षमता आली. नोकरीतील एकूण २४ वर्षे अशी काढली. आता नोकरीचीच गरज नाही! भारतीयच काय, कुणालाच स्त्री किंवा परकीय इसम आपला अधिकारी असावा, हे आवडत नाही. पण अधिकारी हे अधिकार बजावण्यासाठी असतात, लोकप्रिय होण्या साठी नसतात. मी नेहेमी लोकांना एकत्र करून सांगतो, की 'मी माझ्या कर्तुत्वावर अधिकारी झालो आहे. माझे असे असे नियम आहेत, मला कुजकट बोललेले ऐकू आले नाही पाहिजे. मी सांगतो तसे करायचे. जेंव्हा मतभेद होतील, तेंव्हा माझे खरे. असे असते नोकरीत. एव्हढहि कळत नसेल तुम्हाला तर मी दोनदा सांगीन, नाहीतर सुट्टी करून टाकीन तुमची!'
|
Tulip
| |
| Saturday, March 01, 2008 - 2:17 pm: |
| 
|
परफ़ेक्ट बॉस आहात झक्की . I like it!
|
Preetib
| |
| Monday, March 03, 2008 - 6:26 pm: |
| 
|
Zakki Attitude is gr8 
|
Dakshina
| |
| Tuesday, March 04, 2008 - 6:14 am: |
| 
|
मी कोणत्यातरी ऑफ़िसात एक नियमावली वाचली होती.. त्यात एक ते दहा असे अनेको नियम लिहीलेले होते. असेच फ़ुटकळ... काहीतरी कामाबद्दल.... पण ९वा आणि १०वा माझ्या विशेष लक्षात राहीले. ९वा होता Boss is always right १०वा होता if you do not agree, please refer rule no. 9 झक्कींचं लिखाण वाचून एकदम आठवण झाली....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|