|
Maanus
| |
| Friday, January 25, 2008 - 6:16 am: |
| 
|
अजुन एक गंभिर प्रश्न म्हणजे रस्त्यावर भिक मागत फिरणार्या लहान मुलांचा. पुर्वी college मधे असताना पुणे स्टेशन ला बस साठी यावे लागे.>>> तु कॉलेज मधे नाकासमोर चालणारी मुलगी होतीस का? कारण मुल पैसे देतात अशा मुलांना आणि अमुक अमुक मुलींच्या मागे लाग असे सांगतात. ड्रेस वैगेरे पकडतात तेव्हा ते भिक मागत नसतात. त्यांना ती आधीच मिळालेली असते.
|
Sush
| |
| Friday, January 25, 2008 - 8:31 am: |
| 
|
माणुस, self experience का?
|
Maanus
| |
| Friday, January 25, 2008 - 6:24 pm: |
| 
|
नाही ग, कॉलेज मधे मी फारच गावठी, शेंबडा, साधा मुलगा होतो. एम्रोडरीचा शर्ट, कोल्हापुरी आवाज करणारी चप्पल, काय घाणेरडे ड्रेसींग सेन्स होते माझे तेव्हा हे असले काही जमले नाही. पण ईतर लोक काय करतात ह्यावर नजर असल्याने माहीती होती
|
नुकतिच मी देशात जावुन आले, तेंव्हा लक्षात आलेलि हि गोष्ट. एका मराठि वाहिनिवर 'सास्-बहु' मालिकेचा मराठि अवतार वाटावि अश्या 'वहिनिसाहेब' मालिकेचि जाहिरात सतत चालेलि असायचि. या जाहिरातित, एक साडि मंगळ्सुत्र अश्या typical dressup मधलि खलनायिका(?) तश्याच typical dressup मधल्या नयिकेवर(? ) तलवारिचे वार करते हे अत्यंत graphic दृश्य दाखवल जायच. एकदा पाहुनहि विसरण अशक्य असलेल हे दृश्य सतत बघुन लहान मुलांवर काय परिणाम होत असेल असा विचार मनात आला. उसगावातल्या ज्या काहि गोष्टि मला मनापासुन आवडतात त्यापैकि viewer's discretion ची कायद्यानि असलेलि सक्ति आहे.भारतिय channels वर हिंसाचार इतक्या सरार्स दाखवल्या जातो कि त्याचा लहान मुलांवर परिणाम होवु शकतो हि शक्यताच कुणाला मान्य नाहि अस दिसत. पण अश्या संभावित परिणामांचि चर्चा अधुनमधुन मराठि वृत्तपत्रातुन वाचायला मिळते. एक जबाबदार नागरिक म्हणुन अश्या प्रकारचि कायदेशिर सक्ति channels वर लागु करण्यासाठि आपण आग्रह धरु शकु का?
|
Dakshina
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:36 am: |
| 
|
मराठमोळी तुम्हाला अनुमोदन. ही प्रसार माध्यमं आजकालच्या मुलांनाच काय पण मोठ्याना ही पेचात टाकतील अशा गोष्टी दाखवतात. तुम्ही म्हणता तशा अनेको मालिकांमधून एकिकडे स्त्री ही अत्यंत साळसूद, भावूक, नाजूक स्त्री मर्यादा जपणारी दाखवतात. आणि त्याच मालिकेत ते याच्या बरोब्बर विरूद्ध वागणारी स्त्री पण दाखवतात. आणि मुलं बरोब्बर तेच फ़ॉलो करतात.
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 11:30 am: |
| 
|
हम्म. आपल्याकडे कायम फक्त black and white shades दाखवतात. एक तर एकदम चांगली (म्हणजे गरीब बिच्चारी) किंवा अती वाईट. एकाच व्यक्ति मध्ये होणारे चान्गले आणि वाईट दोन्ही बदल्--विचार अस नसतच.
|
Maudee
| |
| Thursday, January 31, 2008 - 11:52 am: |
| 
|
त्याच मालिकेत ते याच्या बरोब्बर विरूद्ध वागणारी स्त्री पण दाखवतात. आणि मुलं बरोब्बर तेच फ़ॉलो करतात. - हे वाचून मला एक गंमत आठवली. माझ्या मावशीच्या शेजारी एक कुटुंब रहात. लहान ४-५ वर्षांचा मुलगा आहे त्यांचा... त्याला काहीतरी चांगला परीणाम होईल म्हणून srikriShNa दाखवला त्यच्या आईने.... तर पट्ठ्या कंसाचे गुण उचलायला लागला.. म्हणजे एकदा तो bedsheet ची गुंडाळी करून भिंतीवर मारत होता... आईने विचारल काय करतो आहेस तर म्हणे कंस आहे मी आणि देवकीच्या बाळाना मारतो आहे....
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 12:08 pm: |
| 
|
अगदी same . माझ्या नणंदेने तिच्या मुला राम्-रावण, क्रिश्न वगैरे गोष्टी सांगितल्या--पण याला रावण आवडतो, कंस आवडतो. म्हणजे रावणात सुध्धा घेण्यासारखे गुण होते, पण काय घायचं आणि काय नाही, हे समजवण्या इतका मोठा तो नाहीये. माझी नणंद वैतागते. पण काय करणार, मुलांच्या कलाकलाने घ्यावं लागतं.
|
Thanks Dakshina, Anagha , त्या डोके उठवणार्या मालिका हा isseu तर आहेच. दुसर काहिच बघायला नाहि म्हणुन नाईलाजाने प्रेक्षक ह्या मालिका बघतात आणि प्रेक्षक बघतात म्हणुन अश्या मालिकान्चि गिरणि सुरुच रहाते हे एक दुष्टचक्र आहे. पण ज्यांनि हे बघु नये अश्या लहान मुलांसमोर prime time ला सतत अश्या जाहिराति का केल्या जातात? US मधल्या मुलांच्या बाबतित अस म्हणतात की हि मुले vidio games मधुन हिंसा शिकतात. आपल्याकडे vidio games च प्रस्थ किति आहे मला कल्पना नाहि पण अश्या उठसुठ बघितल्या जाणार्या जाहिरातिंच काय? US मध्ये कुठल्याहि चित्रपटाचे promos दाखवताना एक गोश्ट आवर्जुन सांगितलि जाते कि chitrapaTaachaa viShay kaahihi asalaa tari या जाहिरातितिल दृष्ये सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांना दाखवता येतिल अशि आहेत. कारण तस करण त्यांना कायद्याने बंधनकारक आहे. आपल्याकडे असा कायदा कधि येणार?
|
Dakshina
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:37 am: |
| 
|
वाढत जाणार्या करियर ओरिएंटेशन मुळे उशिरा होणारी लग्नं आणि त्यापुर्वी तयार झालेली तात्पुरती 'नाती' त्यातून उत्पन्न झालेला स्ट्रेस, वेदना, त्रास.... शिवाय इतक्या उशिरा लग्नासाठी मुलगा / मुलगी शोधताना येणार्या अनेको अडचणी हा ही एक सामाजिक प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते का?
|
Shraddhak
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:01 am: |
| 
|
दक्षिणा, माझ्या मते हा प्रश्न वैयक्तिक जास्त आहे. कारण स्वतःच्या आयुष्यातले प्राधान्यक्रम ठरवून असे प्रश्न शक्यतो उद्भवणार नाहीत याची काळजी घेता येऊ शकते. करीयरमध्ये किती वर्षांत काय लक्ष्य गाठायचंय, लग्न करायचं आहे का, करायचं असेल तर केव्हा?, उशिरा लग्न केल्यास कदाचित रूढ पद्धतीने ( संस्थेतून माहिती मिळवणे, फोटो पत्रिका देवाणघेवाण, इ.) वेळ लागू शकेल, तेव्हा नवीन पद्धतींचा ( ऑनलाईन विवाह साईट्स) स्वीकार करायची तयारी, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल, स्वतःच्या स्वभावाचं योग्य मूल्यमापन अशा सगळ्या गोष्टी आधी विचारात घेऊन आखणी करता येऊ शकते. तरीही आजकाल निरीक्षण केल्यास बर्याच लोकांची लग्नं, विशेषतः जे सॉफ़्टवेअर मध्ये आहेत त्यांची, उशिरा झाली तरी हवा तसा जोडीदार मिळून होताना दिसतात.सॉफ़्टवेअरमधल्या बर्याच मुलींचंही लग्नाचं वय तीस किंवा पल्याड गेलंय आणि त्याबद्दल कुणी फ़ारसा आक्षेप घेतल्याचं बघण्यात नाही किंवा त्यांना गंभीर प्रश्न वाटू शकतील अशा अडचणी आल्याचंही बघण्यात नाही.
|
Anaghavn
| |
| Thursday, February 28, 2008 - 7:11 am: |
| 
|
"बेशिस्त गर्दी आणि त्यामुळे येणारा stress " हा सामाजिक प्रश्न आहे--माझ्या मते. कारण त्यामुळे खुपच problems सुरु होतात्--सामुदायिक रित्या- उद. सिग्नल च्य बेश्तिस्तिमुळे होणारी भांडणं, उशिर,येणारं दडपण, हरवणारं मन:स्वास्थ्य--तेही सगळ्यांचच. (मी भारतातल्या बद्दल बोलत आहे सध्या). मी स्वत: त्याची शिकार आहेच. सकाळ च्या प्रसन्न वेळी छान मनही उत्साहीत असत. पण मग सिग्नल वरच्या कशाही उभ्या असणार्या वाहनांकडे बघुन सिग्नल तोडणार्यांकडे बघुन मन उद्विग्न होतं. तुम्हाला काय वाटतं?
|
Bee
| |
| Thursday, February 28, 2008 - 8:33 am: |
| 
|
अनघा, social indiscipline ही तर पहिली गहन सामाजिक समस्या म्हणता येईल. प्रत्येकाला जर बाहेर कसे वावरावे हे कळायला लागले आणि कळून वळायला लागले तर कित्येक प्रश्न सुटतील. रोज बस थांब्यावर सिगारेट पिणारे इतके दिसतात आणि त्यांच्या पासून दहा मीटर दुर उभे रहावे लागते.
|
Anaghavn
| |
| Thursday, February 28, 2008 - 9:53 am: |
| 
|
खर अही बी. प्रत्येक जण जर शिस्तित वागायला लागला तर खुप म्हणजे खुपच प्रश्न कमी होतील. रस्त्यावर चालताना, बसमधुन, सायकलवरुन थुंकणे ही तर अतिशय गलिच्छ गोष्ट आहे, जी सातत्याने होताना दिसते.
|
Kashi
| |
| Friday, February 29, 2008 - 6:25 am: |
| 
|
Apli shikshan padhat hi pan ek samajik samasya aahe... beshista vartanuk,bhrashtachar he sagle tithunch chalu hotat..va te sampavnya sathi aapli shikshan padhat badalane avashyak aahe sorry font naslyane miglish madhe lihite aahe
|
Ninawi
| |
| Friday, February 29, 2008 - 8:25 am: |
| 
|
अनघा, तुम्ही म्हणता तो प्रश्न लवकर सुटेल असे वाटत नाही. ह्या फोटोवरील comments वाचा
|
Uday123
| |
| Friday, March 07, 2008 - 4:03 am: |
| 
|
रोज बस थांब्यावर सिगारेट पिणारे इतके दिसतात आणि त्यांच्या पासून दहा मीटर दुर उभे रहावे लागते. ---दहा मीटर दुर गेलात तर तेथे तरी न पिणारे असतात का? जिच्या दहा मीटर वर्तुळात कोणी धुम्रपान करत नाही अशी जागा मिळायला देखील तुमचे नशीब किंवा पुर्व-पुण्याई लागते.
|
Dakshina
| |
| Tuesday, March 11, 2008 - 10:01 am: |
| 
|
आमचं घर, road touch building मध्ये आहे. दुपारच्या वेळेत आम्ही घरी नसतो पण, सुट्टीच्या दिवशी किमान ५ लोकं कसल्या ना कसल्या तरी देवाच्या कार्यासाठी वर्गण्या मागायला येतात. आज काय साईबाबांची पालखी, उद्या काय मातांचं किर्तन, परवा राम जन्म सोहळा.... एक ना अनेक कारणं सांगून लोकं पैसे मागतात. दिले नाहीत की देव शाप देईल असे ही म्हणतात. या अशा लोकांचा इतका सूळसूळाट झालाय की बास, देवाचं नाव घेतलं की लोकांच्या भावनेला अपोआप हात घातला जातो, शिवाय कुणाला इतका वेळ आहे खरोखरी खातरजमा करायला की खरोखरी अशी पालखी निघणार आहे का? किंवा आज कुठल्या मातेचं किर्तन असलं तरिही आमच्याकडून पैसे कशाला हवेत यांना? कुठूनतरी या दरवाज्यात येणार्या लोकांपासून आपण सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो, आणि ती आपण मिळवतो सुद्धा १० - १२ रुपये देऊन. पण आपण कधी एक मिनिटं थांबून विचार करतो का या गोष्टीचा?
|
Hkumar
| |
| Tuesday, March 11, 2008 - 11:11 am: |
| 
|
उशीराने लग्न करणे हा वैयक्तिक प्रश्न असू शकतो पण स्त्रीच्या वाढलेल्या वयात झालेली संतती हा गंभीर प्रश्न होऊ शकतो. अशी जन्मजात विकृती असलेली मुले हा समाजावरील प्रचंड बोजा होतो. तेव्हा पहिले गरोदरपण ३५ वर्षे वयानंतर येणे ( व ते करीअरच्या पायी) हा नक्कीच गंभीर प्र. आहे.
|
Shraddhak
| |
| Tuesday, March 11, 2008 - 12:07 pm: |
| 
|
दक्षिणा, दरवाज्याला बाहेर कोण आलंय ते बघण्यासाठी आयपीस नसतो का? दरवाजा प्रत्येक व्यक्तीसाठी उघडायलाच हवा हे बंधन आहे का? देव शाप देत असेल तर देऊ दे, मला पैसे द्यायचे नाहीत... मी पैसे देणार नाही, अशी भूमिका कधीच घेता येत नाही का? लोकांना फ़ुटवायचे असेल तर तोंडावर दरवाजा बंद करता येतो, हे माहीत नसतं का? मुळात आपल्याला समजून उमजून वागता यायला हवं. ज्या त्या गोष्टीला सामाजिक प्रश्न बनवून त्यावर विचार का करायचा?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|