Hkumar
| |
| Monday, March 10, 2008 - 5:13 am: |
| 
|
परंपरेने स्वयंपाक हा स्त्रियांवर लादलेला होता. गेल्या २-३ दशकात पुरूष स्वयंपाकघरात जरा तरी लुडबूड करू लागले आहेत. तेव्हा पुरूषांनी आपले 'स्वयंपाक किस्से', त्यातील फजिती इ. चे अनुभव इथे लिहावेत.
|
Kedar123
| |
| Monday, March 10, 2008 - 5:45 am: |
| 
|
असा काही धागा असावा अस बरेच दिवस मनात होत. आपले आभार हेमंत. मी बाहेर देशी जाण्यासाठी म्हणून मुद्दाम स्वयंपाक शिकलो. सर्वात प्रथम प्रयोग म्हणून 'लज्जतदार मजेदार' कूकर मध्ये भात लावला. मापाच पाणी घालून भाताच भांड कूकर मध्ये ठेवल. बराच वेळ झाला पण कूकर 'शीळ' घालेना. वाटल जड पाण्यामूळे कदाचित अस झाल असेल. थोड्या वेळान पाहील तर 'लज्जतदार मजेदार' कूकर च लेबल जळून काळपट पडलेल. तरीही तो कूकर शीळ न घालता 'शीळा' होऊन पडलेला बापडा. शेवटी लक्षात आल की कूकर चा 'सेफ्टी व्हॉल्ट' उडून गेलेला. 'स्कॉटलन्ड यार्डच्या' धर्तीवर तपास केल्यावर लक्षात आल की भांड्यात मापाच पाणी घालणारा महाभाग (कोण बर तो) कूकर मध्ये पाणी घालण्यास विसरलेला
|
Hkumar
| |
| Monday, March 10, 2008 - 5:49 am: |
| 
|
धन्यवाद केदार. बा फ ची सुरूवातच मोठ्या स्फोटाने झालीय! बघूयात पुढच्या गमतीजमती.
|
परवा सन्ध्याकाळची गोष्ट. सौ दोन दिवसासाठी माहेरी गेली होती. सन्ध्याकाळी सात च्या सुमारास दूध तापवायला ग्यास वर ठेवले व अचानक भूक लागली म्हणून पलीकडील टपरीवर दोसा खायला गेलो.दोसे वाल्याचा ग्यास सम्पला व म्हणून त्याने मला थांबायला सान्गितले. अण्णाने असे सांगताच मला घरात ग्यास वर ठेवलेल्या दूधाची आठ्वण आली आन धूम परत आलो.पहातो तो काय,घर भर धूर च धूर. नशीब ग्यास ची फ्लेम अजून चालू होती भान्डे काळे ठिक्कर झाले होते,अन घरभर जळक्या दूधाची दुर्गन्धी पसरली होती.५-६ उदबत्त्या लावल्या,आफ्टर शेव स्प्रे केले.पन्खे फूल चालू केले.बर पुढचे दार उघडायची सोय नाही कारण समोरच्या आजी आमच्या हिची हेरगिरी करते असा माझा संशय असल्याने ते दार उघडणे म्हणजे माझी चूक जगजाहीर करण्याला आमन्त्रण होते. आधी एकदा मी एक पातेले असेक जाळले होते. रात्री धाकट्या मुलीला फोनवर सर्व हकीकत सांगितली आणि म्हटले की ते पूर्णपणे जळलेले पातेले फ़ेकून देतो अन एक नवीन आणून ठेवतो तर ती म्हणाली"बाबा असे काहीही करू नकोस कारण आईला घरातील पातेलेच काय चमचा ही बदलला तर कळ्ते.- आणखी ५-६ उदबत्त्या लावून आणखी अफ्तेर शेव ची अख्खी बाटली स्प्रे करून पुराव्याचा नायनाट केला.जळके पातेले वर माळ्यावर ठेवले. दुसर्या दिवशी ने अर्धान्गीने घरात पाऊल ठेवताच प्रश्न केला "कसला जळल्याचा वास येतोय आणि हे काय घरभर राख कसली? असा आमचा मोर्रू झाला-
|
हे तुमच्या मते पुरूषी अनुभव बायका सुध्दा घेतात बरं.. कुकर कधी तरी पाणी विसरतंच.. दुध तापत ठेवून एकदा मी पण बाहेरच्या खोलीत वाचत बस्ले.. नंतर काही तरी खालुन आणायचं आठवल म्हणून लगेच बाहेर ही गेले.. दहाच मिनिटांनी घरी आले तर शेजीबाई दारात (तिच्या) उभी म्हणते.. १ल्या मजल्यावर काहीतरी करपते आहे... तेव्हा एकदम टाळक्यात प्रकाश पडला... अन आत गेले... ग्यास चालू अन पातेले काळे ठिक्कर झालेले..
|
Hkumar
| |
| Monday, March 10, 2008 - 10:31 am: |
| 
|
'नेहमीचा स्वयंपाक येतो का?" या प्रश्नाला माझे उत्तर आहे,''पोळ्या सोडून सगळे''. पोळ्य्यांचा अनुभव मात्र नामी! एकदाच घाट घातला होता. ५ पो. करायला ४५ मिनिटे घेतली व सगळा राडा ओट्यावर! आमच्या मेडिकलच्या भाषेत पो. करण्यात operative पेक्षा post-operatives कटकटीचे असते. उत्तम भाकरी करता येणे ही स्वयंपाकातील Ph.D च मानली पाहिजे! तेव्हा मी मला जेमतेम bachelor's च मानतो.
|
"प्रायोगिक स्वैपाक "म्हणून मी एकदा वांगी भाजून त्यावरील साल काढून मगज मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतला होता.कान्दा वगैरे काहीही घातले नाही. आलेल्या पाहुण्याना ते श्रीखन्ड वाटले होते पण चव कल्पना केलेल्या पदार्थाच्या विपरीत डोळ्यासमोर जे दिसते त्याची चव ओळखीची म्हणावे तर पण जे दिसते ते भलतेच असा काही तरी संभ्रम चालू होता.
|
Ajjuka
| |
| Monday, March 10, 2008 - 11:46 am: |
| 
|
हा हा हा!! सगळ्यांचेच असे घोळ होतात की स्वैपाक करताना. गॅसवर चढवलेले पातेले तसेच विसरून जाणे आणि मग पदार्थ जळून काळा ठिक्कर पडेतो लक्षात न येणे किंवा कुकर मधे पदार्थात्/ कुकरात पाणी विसरल्याने कुकरचा आणि पदार्थाचा सत्यानाश होणे हे प्रत्येकाने केल्याशिवय त्याला/ तिला स्वैपाक शिकायची eligibility च मिळत नाही असं मला वाटतं! पोळ्या हा प्रकार सर्वस्वी सरावाचा आहे. हल्ली माझ्या खाता येईल इतपत होतात पण मधेच काहीदिवस ब्रेक झाला की नंतर पापड नाहीतर चिवट!! ही ही ही! पण चुकीच्या वस्तू म्हणजे साखरेऐवजी मीठ किंवा तत्सम असं काही करणे ही गोष्ट मला आजपर्यंत कशी जमवता येते हे कळलेलं नाही. एकतर जागा ठराविक असतात. डबे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. साखरेचा डबा हा घट्ट झाकणाचा असतो आणि मीठाच्या सटाचे तोंड चमच्याच्या दांड्यासाठी किंचित उघडे असते. अगदी पिठीसाखर म्हणली तरी ती मीठासारखी दिसत नाही. साखरेचा डबा उघडला की एक किंचित गोडुस दरवळ असतो. मीठाचा डबा उघडल्यावर डब्यातली ओलसर हवा जाणवते. एवढ्या खुणांच्यानंतरही साखरेऐवजी मीठ वापरणार्यांचं मला कौतुक वाटतं! (अर्थात असं करणारे असतात हे मी फक्त ऐकूनच आहे, खरोखर माहित नाही! केवळ बायकाच गॉसिप करतात सारखी ती एक कविकल्पना असावी!)
|
मी शाळेत असताना एकदा पोळ्या करायचा प्रयत्न केला होता. आई गावाला गेली होती. वडिलांनी पोळ्या कशा करायच्या हे सांगिततलं अन् ते बाहेर गेले. पोळ्या दोघांसाठीच करायच्या होत्या. मी पीठ घेतलं त्यात पाणी मिसळलं. ते जास्त झालं. कणीक पातळ झाली म्हणून अजून थोडं पीठ घातलं. तर कणीक जास्तच घट्ट अन् कोरडी झाली. म्हणून परत पाणी घातलं. परत कणीक पातळ. परत थोडं पीठ घातलं. आता माझ्या समजूती प्रमाणे कणीक व्यवस्थीत झाली होती. थोडी मळली. अन् पोळ्या लाटायला घेतल्या. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी कणीक पाहिली अन् ते खो खो हसत सुटले. मला कळेचना. ते म्हणाले "अरे गावजेवण द्यायचा विचार आहे का तुझा? किती कणिक मळली आहेस? आपल्याला ८ दिवस पुरेल एवढी कणिक तू मळली आहेस." थोडी कणीक काढून ठेवली. अन् पोळ्या लाटल्या. या पोळ्यांचे आकार जगातल्या कोणत्या ना कोणत्या देशाच्या / राज्याच्या / जिल्ह्याच्या / तालुक्याच्या नकाशाशी नक्कीच जुळले असते असे झाले होते. परत पोळ्यांच्या भानगडीत आजपावेतो पडलो नाही. लग्न झाल्यावर एकदा सौ. गावाला गेली. फोनवर "ब. ची भाजी" (म्हणजे बटाट्याची हो..) कशी करायची हे सांगितलं. वर परत "आहे की नाही सोप्पं?" असंही म्हटलं. मी ते कसबसं आठवत भाजी केली. अन् खाताना आपण खतरनाक लोच्या केलाय हे लक्षात आलं. कारण, खाताना आपण बटाट्यांच्या फोडींना तिखट मीठ लावून त्या तेलात बुडवून खात आहोत असं वाटायला लागलं. वर परत चार मोहर्यांचे दाणे ही तोंडात टाकून खातोय. असं ही वाटायला लागलं. दोन घास खाऊन ती "ब. ची भाजी" वेगळी काढून ठेवली. अन् मस्तपैकी लोणचं, चटणी बरोबर पोळ्या खाल्ल्या. मी स्वैपाकघरात खायचे पदार्थ करण्यासाठी म्हणून नंतर कधीच गेलो नाही. जातही नाही. तो माझा प्रांत नाही हे परत एकदा सिद्ध झालं.
|
Kedar123
| |
| Monday, March 10, 2008 - 12:24 pm: |
| 
|
वास्तविक सारख्या आकाराच्या पोळ्या करणे हा एक अवीट आणि अविस्मरणीय अनूभव असतो. 'थंड' तव्याला स्पर्श करून सांगतो की दोन सारख्याच आकाराच्या पोळ्या घडविणे मला अजून तरी शक्य झालेल नाहीये. असच एकदा दोन तीन पोळ्या घडवल्यावर मला जरा जास्तीचा हूरूप आला. पंचतारांकीत उपहार गृहात जसा सराईत बावर्ची रूमाली रोटी उंच उडवतो तशी मी ही एकदा पोळी तव्यावरून उंच उडवली. गूरूत्वाकर्षणाच्या नेहेमीच्या यशस्वी नियमानूसार ती पोळी परतून सरळ रेषेत तव्यावर येणे अपेक्षीत होते. पण........ पण प्रत्यक्षात ती 'दूष्ट गरम' पोळी तव्यावर परत न येता माझ्या मनगटावर येऊन विसावली. संत ज्ञानेश्वरांनी जशी पाठीवर भाकरी भाजून घेतली तशीच मी ही तळहातावर पोळी भाजून घेतली
|
मी आज काल मित्रांसोबत राहुन ( नाईलाजाने) थोडा थोडा स्वयंपाक करयला शिकलो आहे. कणीक अगदि व्यवस्थित मळता येते. पण पोळ्या लाटणे म्हणजे अगदि अशक्य काम आहे. त्या तव्यावर भाजणे म्हणजे अजुनच कठीण काम. कायम एक तर कच्चि तरि राहते नाहीतर करपते तरि. पण मी पण हुशार आहे हो! पाच सात पोळ्या लाटतो मग त्यातले करपलेले आणि कच्चे राहिलेले भाग काढुन जे शिजले आहेत ते खातो. म्हणजे मग तीन चार चापत्या नशीबी येतात. भाजी मात्र छान ( माझ्या द्रुष्टीने खाण्यायोग्य) बनते. कारण सगळे मसाले बाजारात तयार मिळतात, मिठ, मोहरी आणि पाणी तर टाकायचे ते जरा जमते. फसलेले प्रयोग लिहायला घेतले तर मला चार पाच दिवस ईथे बसुन नुसता लिखाण करावे लागेल आणि तरी थोडे सांगायचे राहतीलच.
|
गोल पोळ्या करायची कृती. पोळी हवी तशी लाटा. (भूगोल आठवत आठवत) एखाद्यामोठ्या डब्याचे झाकण त्यावर मारा. उरलेला विचित्र आकार काढून टाका. झाअण उचला. गोल गोल पोळी तव्यावर भाजून घ्या.    हे गोल पोळिई कृत्रिम दिसत आहेत असे वाटत असेल तर हलक्या हाताने लाटणं फ़िरवून घ्या. आई आजी आत्या करते तशा आकाराची पोळी.
|
एकदा मी केलेली उडदाच्या डाळीची आमटी खूपच उरली होती. दुपारी ती गरम करायला शेगडीवर ठेवली. लवकर गरम व्हावी म्हणून शेगडी मोठी केली. आणि थोड्याच वेळात विचित्र गंध यायला लागला. आमटीकडे बघीतले तर गरम होताना दिसत होती. तरीही शेगडीवरून खाली उतरली. आणि दुसर्या टोपात ओतल्यावर कळले की, आमटीतली डाळ सकाळपासून न हलवता ठेवल्यामुळे तळाशी जमा झाली होती आणि मोठ्या शेगडीवर करपली होती. चवही करपट झाली होती. सगळी वाया गेली. शेगडीवर ठेवण्याआधी पळीने ढवळायला पाहिजे होती. एकदा दूध गरम करायला ठेवले. तेवढ्यात दूरध्वनीची घंटा किंचाळली. त्यात दुधाचे विसरूनच गेलो. मग पातेले साफ करता करता बेजार झालो.
|
अभिजीत आपल्या दृष्टीने खाण्यायोग्य जेवण करण पुरेस आहे. णन्दीनी अशा पध्दतीने पुर्या करतात ना!!!
|
Maanus
| |
| Monday, March 10, 2008 - 5:23 pm: |
| 
|
corn balls मोदक जेवण few more are there somewhere, but not able to find now
|
ईथेच तर गोम आहे यार. पोळ्या गोल करण्यापेक्षा मोठे आव्हान आहे ते कि प्रत्येक पोळी प्रत्येक ठिकाणी समान जाडीची पाहिजे नाहितर मग जिथे पातळ आहे तिथे करपते आणि जिथे जाड आहे तिथे कच्ची राहते. आणि मग माझ्या सारख्या ना प्रत्येक पोळी जेवढी भाजली आहे तितकी च खावुन बाकिची फेकावी लागते.
|
Uday123
| |
| Monday, March 10, 2008 - 6:23 pm: |
| 
|
एखाद्यामोठ्या डब्याचे झाकण त्यावर मारा. उरलेला विचित्र आकार काढून टाका. झाअण उचला. ---- मी हा पण प्रयोग केला होता, पण मग काय व्हायचे की ती गोल पोळी पोळपटावरून काढताना एका बाजुने लांबुडकी व्हायची, मग दुसरी कडुन आधार दिल्यावर त्या पण बाजुने लांब होणार. कशी तरी कसरत करुन तव्यापर्यन्त पोळी जातेवेळी लक्षात येणार की मध्य भागी भगदाड पडले आहे, मग पुन्हा त्याचा हाताने छान गोल गोळा करायचा... असे बरेच प्रयत्न केल्यावर केव्हा तरी यश येणार... पण मग ती टोस्ट/ पापडा सारखी कडक. आता धास्तीच घेतली आहे. ही कमतरता मी दुसरी कडे भरतो (भाजी धुणे चिरणे, भांडी घासणे अकुशल कमगार समजा).
|
एक महिनाभर न कंटाळता रोज पोळ्या केल्या तर ह्या सगळ्या घोटाळ्यांच्या पलिकडे पोचून आपल्या हातची मऊसूत पोळी खायचा निर्मळ आनंद प्राप्त होतो. मधेच एखादी तव्यावरची गरम पोळी थेट ताटात घेऊन त्यावर तूप साखर घालून खावी. अजून एक महिना पोळ्या केल्या की तेवढ्याच वेळेत दुप्पट पोळ्या होतात (आणि आपलं वजनही दुप्पट होतं!). प्राप्त झालेली ही कला सूज्ञ bachelors नी गुप्त ठेवावी.
|
आजकाल प्रत्येक bb हा पुरुषांचा तो स्त्रीयांचा अस का सुरु झाल आहे? एक आहे ना bb स्वयपाकतल्या घोटाळ्यांचा? मग परत हा कशाला?
|
हा बीबी कशाला? समानता त. टी. : पुरुषांना पण समानता हवीय नाही दीली तर पुरुषी व्यथा
|