|
ह्या उलट देखिल उदाहरण बघीतलंय! ताईच्या घरी धुणं भांडी करणार्या बाई. ह्यांच्या सुनेला ओळीनी तीन मुली झाल्या. प्रत्येक बाळंतपणात सुनेची तब्बेत खालावत गेली. वर नवर्यानी "तीन्ही कार्ट्या जन्माला घातल्या" म्हणून बडवली. ह्या बाईंनी ३० वर्ष्याच्या आपल्या लेकाच्या थोबाडीत दिली, सुनेच्या अंगावर हात उगारला म्हणून!!!!!! अगदी शेजार्यांसमोर!! सुनेला स्वत:च्या घरी आणली. तीला१-२ आठवडे स्वत:कडे ठेवून घेऊन तीचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करवून आणलं. आणि ताईला सांगीतलं, "माझ्या नाती अशी धुणं भांडी करणार नाहीत. तुमच्यासारखं शिकून मोठ्या होतील! पण त्यासाठी पोरींची आई पुढल्या बाळंपणात मरून चालणार नाही" ताईनी विचारलं, "तुमच्या लेकाला कळलं की त्याला बायकोकडून मुल होणं शक्य नाही तर?" बाई म्हणाल्या, "जाऊ तर दे शेण खायला, त्याचा असा बंदोबस्त करीन की परत जायचा नाही कुठे!!"
|
मृ, खुपच मस्त वाटल वाचुन. हाच फ़रक असतो सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांमध्ये. अश्या आज्यांचि संख्या वाढायला लागलि तर भारताला महासत्ता होण्यापासुन कोणिहि थांबवु शकणार नाहि हे नक्कि.
|
Manjud
| |
| Saturday, March 08, 2008 - 5:34 am: |
| 
|
जागतिक महिला दिनाच्या सर्व मायबोलीकर महिलांना हार्दिक शुभेच्छा!!
|
Ashbaby
| |
| Saturday, March 08, 2008 - 7:28 am: |
| 
|
अजुन एक उदाहरण.. आज महिलादिन, आणि अशा दिवशी हे सगळे लिहिताना वाईट वाटतेय, पण महिलांसाठी सगळे दिवस सारखेच असतात हेच खरे... माझ्या आधीच्या नोकरीत अकाऊंट्स बरोबर मला पगार काढायचे काम पण करावे लागे. एकदा ऑफ़िसातील एक मैत्रिणीने पगाराची स्लिप बदलुन मागितली. ख-या स्लिपपेक्षा तिला अजुन एक स्लिप पण रक्कम बदलून पाहिजे होती. मी अर्थात नकार दिला आणि कारण विचारले. तिने मग तिची कर्मकहाणी ऐकवली. तिच्या घरात ती मोठी, धाकटा भाउ तिच्यापेक्षा १०-१२ वर्षानी लहान. त्यामुळे तिच घरातील मिळवती झाली. वडिल आखातात नोकरी करत होते, पण त्यांनी येताना आणलेली पुंजी, घर घेण्यात, दोन मुलीम्ची लग्ने करण्यात गेली. लग्न झाल्यावरही हिला घरची जबाबदारी टाकायची नव्हती कारण भावाचे शिक्षण चालू होते. पण नव-याचा ठाम नकार. त्याचे म्हणणे, मी माझ्या घरात काही देत नाही, मग तुसुद्धा द्यायचे नाहीस. हिचे म्हणणे, तुझ्या घरात तु सगळ्यात धाकटा, तुझ्या पैशांवर आईबाबा नाहीयेत अवलंबुन पण माझे तसे नाहिये, माझ्या घरी गरज आहे. (लग्न करताना पुढे असे होईल याचा विचारच तिने केला नाही) हिचा पुर्ण पगार नवरा घेई, मग ही घरी मदत कशी करणार? त्यावर तिने युक्ती अशी काढली की, ऑफ़िसच्या क्रेडीट सोसायटीतुन कर्ज काढले, त्यातुन आईबाबांची सोय लावली, घरी पगार थोडा कमी सांगितला, आणी कर्ज फ़िटेपर्यंत पगार स्लिप बदलुन दाखवत राहीली. अशीच काही वर्षे गेली, दरम्यान कंपनीचा विस्तार वाढला. पगार बनवणे आउटसोउर्स केले. पगार परस्पर बॅंकेत जमा होउ लागला. तिनचार वर्षांपुर्वी मी सकाळी ऑफ़िसात पोचल्यावर नेहेमीप्रमाने सगळ्याना हाय वगैरे करत जेव्हा तिच्या टेबलाकडे पोचले तर ती डोळे पाण्याने भरुन काम करतेय, अग झालं काय विचारले, तर एक नोटिस काढुन माझ्या हातात दिली. तिच्या नव-याने घरातल्या घरात तिला वकिलाकरवी नोटिस पाठवली होती. वकिलाने लिहिले होते माझा बिचारा अशिल ५ वर्षापुर्वी व्हीआरएस मध्ये नोकरी गमाउन बसल्यावर छोटीमोठी कामे करून कसेबसे पोट भरतोय. पण याच वेळी त्याच्या बायकोने मात्र त्याला अन्धारात ठेऊन तिच्या अकाऊंटावरील लाखो रुपये कुठच्यातरी तिस-या पार्टीच्या नावे ट्रान्स्फ़र केले. बिचा-याला खुप मोठा मानसीक धक्का बसलाय, आणि बायकोने पैशान्चे काय केले ते पुर्ण हिशोब लिहुन त्याला ७ दिवसात कळवावे. ती मला म्हणाली, कि तिच्या नव-याने व्हीआरएस घेतल्यावर तिच्या पगाराचा पुर्ण ताबाच घेतला. बचत वगैरे सगळे तोच पाही. हिला काहिच माहिती नव्हते आणि माहिती करुन घ्यायचा प्रयत्नही तिने केला नाही. तोपर्यन्त भाऊही कमावता झाल्याने घरीहि एवढि गरज नव्हती. एकदा तिच्या बहिणीला पैशांची गरज लागली. तिने परत करायच्या बोलीवर हिच्याकडे ५००० रुपये मागितले. तर हिच्याकडे एकही पैसा नाही. बहीण फ़टकळपणे म्हणाली, काय तू, एवढ्या मोठ्या कंपनीत काम करतेस, एवढ पगार घेतेस आणि ५००० रु. सुद्धा तुझे स्वत्:चे नाहीत? तिला ही गोष्ट खुप लागली. मग तिने पुढच्या वेळेस पगार वाढल्यावर नव-याला सांगितलेच नाही. परस्पर जुन्या अकाऊंटमध्ये पैसे ठेवायला लागलि. बोनस मिळालेले २०,००० रु. ही स्वत:कडेच ठेवले. त्यातुन एकदा वडिलांच्या मोठ्या आजारपणात भावाला मदतही केली. नव-याला पगार स्लिप बदलून दाखवत राहीली. पण नव-याने एकदा रिकामपणाचा उद्योग करायचे ठरवले. तो तिच्या ब्~ंकेत गेला, जॉईंट अकाऊंट होते, त्याने पुर्ण वर्षाचे व्यवहार मागवले, आणि घरी जाऊन आपल्या हिशोबाशी ताडून पाहीले. हिचे सगळे भांडे फ़ुटले, पण त्याने हिला जाब विचारण्याऐवजी, थेट वकिलाकडे धाव घेतली. नोटिस पाठवल्यावरही नव-याने ह्या विषयी बोलण्याचे टाळले. वकिलाने प्रत हिच्या वडिलांन पण पाठवली होती. वडील नोटिस हाती पडताच हिच्या घरी धावले, पण त्याना पाहताच तो घरातुन निघून गेला. काय करावे सुचत नव्हते, मग वडिलांनी गप्प बसून तो पुढे काय करतो ते पहायचे असा सल्ला दिला. सात दिवस पुर्ण झाल्यावर त्याने तिच्याकडे संध्याकाळी विषय काढला आणि अपेक्षेप्रमाणे दोघांचे भाण्डण झाले. माझ्या घरातुन आत्ताच्या आत्ता निघुन जा अशी तिला आज्ञा देउन तो रात्रि साडेनवाला बाहेर गेला. तिने मग वडिलांना फ़ोन करून बोलवले. वडील रात्रि अकरा वाजता आले, तिने शेजारी झोपलेले त्यांन उठवुन मी मुलिला घेउन जातेय हे नवरा आल्यावर त्याला कळवायला सांगितले. शेजा-याना हे सगळे सांगताना मेल्याहुन मेल्यासारखे वाटत होते, पण नव-याने तिला एकटीला जायला सांगितले होते, उद्या माझ्या मुलीला पळवले म्हन्णुन तो पोलिसात गेला तर ह्या भितिने सांगावे लागले. नव-याने ती गेल्यावर काहीच संपर्क ठेवला नाही. वडिलांच्या फ़ोनला पण उत्तरे दिली नाहीत. सासरच्यांचे म्हणणे, तुमचे तुम्हीच निस्तरा. आठ दिवस मुलगी घरी बसुन राहीली. नववीतल्या मुलीला किती दिवस घरी ठेवणार म्हणुन तिने शाळेसाठी चौकशी सुरु केली. शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी जुन्या शाळेत फ़ोन केला तर नव-याने आधिच 'मुलीला बरे नाही म्हणुन ती काही दिवस येणार नाही असे कळवले होते. काय करावे अश्या विवन्चनेत अजुन दोन तिन दिवस गेले आणि मग ऑफ़िसात त्याचा फ़ोन आला. मी खाली आलोय, भेटायचेय म्हणाला. उगाच ऑफ़िसात सीन नको म्हणुन ति त्याला हॉटेलात घेउन गेली. म्हणाला, मी मुलीशिवाय राहू शकत नाही. . तिला पाठव. ती म्हणाली, मी मुलीला माझ्यापासुन दुर ठेवणार नाही. तर मग तु पण ये परत. तिने घरी विचारते म्हणाली. घरच्यानी अर्थातच जायला सांगितले. ती म्हणाली, माझे बाबा तुझ्या घरून मला घेउन गेले, आता तु त्यान्च्या घरुन मला घेउन जा. तो मोठ्या मुश्किलिने तयार झाला. कॉर्नरला उभा राहिन, घरी येणार नाही. घरचे म्हणाले जास्त ताणण्यात अर्थ नाही. तु जा. मग ती आली घरी परत, सगळे पहिल्यासारखे सुरु झाले. पण मनातुन थोडेच जाणार. ती म्हणते, मुलीला बाबा हवाय, मग नाते तोडून काय फ़ायदा? ह्या सगळ्यातुन एकच चांगले झाले, तीचे आता ऑफ़िशिअली वेगळे अकाऊण्ट आहे, तिचे पैसे तिचेच आहेत. नवराच अजुनही सगळे व्यवहार बघतो, पण ती लागेल तसेच पैसे देते. पहिल्यासारखे सगळेच्या सगळे हातात देत नाही. ह्या सगळ्या मंथनातुन एक विचार जाणवला, की काम करणा-या स्त्रिचा कमावलेल्या पैशांवर काहीच हक्क नाही? कितीतरी बायका सगळे व्यवहार नव-याच्या हातात देतात. अर्थात विश्वासावर चालतो हा व्यवहार. पण तिला जर स्वत्:साठि काही पाहीजे असेल तर अणि मागुन नवरा देत नसेल तर काय करावे? आधि मागायची वेळ च का यावी? (हुश्श्य कित्ती टंकले मी आज.. बस्स झाले आता. अजुन भरपुर प्रश्न आहेत पण ते नंतर.) साधना
|
Manuswini
| |
| Saturday, March 08, 2008 - 9:10 pm: |
| 
|
साधना, ह्म्म ह्म्म विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. मागे ह्याच विषयावर joint account असावे का हा प्रश्ण मी विचारला होता. त्यावर बराच गोंधळ घातला होता काहींनी. काय हे माझे तुझे करायची वृती वगैरे वगैरे. असो.
|
Ajjuka
| |
| Sunday, March 09, 2008 - 5:31 am: |
| 
|
वाचल्यावर मला पण त्याच बीबी ची आणि लोकांनी माझे-तुझे करण्यावरून घातलेल्या गोंधळाची आठवण आली.
|
Zakki
| |
| Sunday, March 09, 2008 - 12:25 pm: |
| 
|
म्हणजे आता लग्न करताना, झाल्यावरहि, त्या नवर्याचे खरे प्रेम पैशावरच! आता या बायकोलाच एक काम लगेच करायला पाहिजे. एक वकील गाठून त्याला चांगली अद्दल घडवली पाहिजे. माझे पैसे घेतले, ते सर्व सात दिवसात परत कर, मुलीला भेटायचे असल्यास माझ्या उपस्थितीच, या नि असल्या अटी मान्य केल्या नाहीस, तर सात दिवसात, घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर!
|
फ़ार वाइट वाटल हे वाचुन. खरोखर इतकि वर्ष असा मानसिक छळ सहन करवा लागणे भयंकर आहे. पण ही गोष्ट generalise केल्या जावु शकत नाहि. आर्थिक व्यवहार हे नवराबाय्कोच्या नात्यानुसार ठरावेत. इतर कोणाला वाइट अनुभव आला म्हणुन सावध जरूर रहाव पण पूर्वग्रह मात्र असु नयेत. माझच उदाहरण देतेय. २००४ सालि माझ लग्न झाल तेंव्हा माझा bank balance शुन्य होता. एका महिन्याच्या आत नवर्याने त्याचा ५ एक वर्शान्चि शिल्लक ज्या account मध्ये होति तो account, joint account केला. काय सांगाव विश्वास टाकला नाहि म्हणुन काहि नाति तुटु शकतात. वरिल उदाहरण हे दुर्दैवि आहेच पण त्यातुन लक्षात घेण्याचि गोष्ट अशि की लग्न ठरतानाच अश्या काहि गोष्टिंवर मोकळेपणाने चर्चा करावि. याचा अजुन एक फ़ायदा म्हणजे एकमेकांच्या स्वभावाचि पारख पण होइल आणि लग्न करावे कि नाहि हा निर्णय घ्यायला सोपे जाइल.
|
१००% अनुमोदन, पुर्वग्रह असू नये पण पारख जरूर ठेवावी.
|
Ajjuka
| |
| Monday, March 10, 2008 - 1:41 am: |
| 
|
>>मोकळेपणाने चर्चा<< लाख दुखोंकी एक दवा बघ मराठमोळी!! पण ते शक्य असायला हवं! दोन्ही बाजूनी!
|
Ashbaby
| |
| Monday, March 10, 2008 - 7:08 am: |
| 
|
ही गोष्ट अर्थातच जनरलाईज करता येणार नाही. याच ऑफ़िसात मला याच्या उलटही अनुभव आलाय. या मैत्रिणिला भाऊ नव्हता. वडिलांची कमाईही दारुतच उडायची. तिने लग्न स्वत्:च ठरवले (नाहीतर कदाचित झालेही नसते), त्याला घरची परिस्थिती पुर्ण माहित होती. तिने आधिच सांगुन ठेवलेले त्याला की दर महिन्याला पगार घरी द्यावा लागणार म्हणुन. त्यानेही ते मान्य केले. आज इतकी वर्षे झालीत लग्नाला. बहीण कमावतीही झाली, पण अजुनही तिच्या पगारातुन ठराविक रक्कम घरी जाते. नवरा कधीही तिला काहीही बोलला नाही ह्या विषयी. त्या दोघांमध्ये दुस-या एका कारणावरुन वाद आहेत. अगदी लग्न तोडण्यापर्यंतही भाषा झाली, पण तरिही नव-याने या गोष्टीचा भाण्डणामध्ये कधी उल्लेख केला नाही. मी तर तिला नेहेमी सांगते, तुझ्या नव-याच्या या एका चांगुलपणाखातर तु त्याला बाकी गुन्हे माफ़ कर. (अर्थात तिचा नवरा एकटाच गुन्हेगार नाही. त्या वादात तिचाही सहभाग आहेच.) नवराबायकोचे नाते विश्वासाचे असावे, माझे-तुझे करु नये हे खरे. पण हा विश्वास दोघांनी एकमेकांना द्यायला हवा. कित्येक स्त्रियांनाही नव-याने त्याच्या घरी केलेली मदत आवडत नाही. त्यात त्याला अजुन भाऊ असतील, त्यांची आर्थिक परिस्थिती यांच्यापेक्षा जास्त चांगली असेल तर त्यानी जास्त जबाबदारी उचलावी असे वाटते. मला वाटते, आईवडिलाना मदत हा प्रश्न कधीकधी भावनिक पण असु शकतो. प्रत्येक मुलाचे आपापल्या आइबाबाशी स्वत्:चे असे नाते असते. चार भावंडात प्रत्येकाचे नाते सारखेच असेल असे नाही. काही वेळा, एखाद्या मुलाला आईबाबांसाठी करावेसे वाटते, त्यासाठी स्वत्: थोडे जास्त कष्ट करण्याची तयारीही असते. अशावेळी बायकोनेही त्याची मानसिकता समजुन घ्यायला हवी. अजुनही खुप पुरुष लग्न झाल्यावरही आईबाबांच्या घरची जबाबदारी उचलतात. बायकोचा विरोध असेल तरिही. पण तेच बायकोने करायचे ठरवले तर मात्र तिला फ़क्त तोच नाही तर कधिकधी सासुचाही विरोध असतो. मी पाहिलेल्या काही बायका, घरी मदत करतात स्वत्: कमवलेल्या पैश्यातुन, पण सासरच्यांच्या नकळत. उगाच त्यानी नंतर वर्म काढायला नको, म्हणुन आधीच सांगतच नाही.
|
Ashbaby
| |
| Monday, March 10, 2008 - 7:21 am: |
| 
|
लग्न ठरतानाच अश्या काहि गोष्टिंवर मोकळेपणाने चर्चा करावि. याचा अजुन एक फ़ायदा म्हणजे एकमेकांच्या स्वभावाचि पारख पण होइल आणि लग्न करावे कि नाहि हा निर्णय घ्यायला सोपे जाइल. हल्लि ही जागरुकता ब-याच मुला-मुलींमध्ये आली आहे.
|
Manjud
| |
| Monday, March 10, 2008 - 8:54 am: |
| 
|
साधना, एकदम छान मुद्दे मांडतेयस तू. माझं अरेंज्ड मॅरेज आहे. आम्हा दोघांचिही लग्नाची सुट्टी संपायच्या आधी माझ्या नवर्याने पहिलं काम केलं ते त्याच्या सगळ्या बॅंक अकाऊंटमधे माझं नाव ऍड केलं. माझ्या लग्नाआधीच्या बॅंक अकाऊंट बद्दल त्याने मला काहीही विचारलं नाही आणि वर लग्न झाल्या नंतरच्या पहिल्या पगाराचं माझ्या नावे रीकरींग डिपॉझीट अकाऊंट उघडून टाकला. संसाराच्या गरजा वाधायला लागल्यावरच त्याने माझा पगार घरात वापरायला सुरुवात केली आणि तेही मला विचारूनच. प्रत्येक महिन्याला त्याची पे-स्लिप मला तो आठवणीने ई-मेल करतो. सगळी महत्वाची financial transactions तो आमच्या जॉईंट नावानेच करतो. ह्याबाबतीत त्याचा आदर्श ठेवा असं मी माझ्या सगळ्या भावांना सांगते.
|
Dakshina
| |
| Monday, March 10, 2008 - 9:17 am: |
| 
|
तुझ्या नव-याच्या या एका चांगुलपणाखातर तु त्याला बाकी गुन्हे माफ़ कर.>>> एक कमावती मुलगी जर लग्न होऊन दुसर्या घरी गेली, तर तिची कमाई ही लगेच सासरकडच्यांची होते का? तिचा त्यावर काही हक्क असू नये? माझ्यामते तरी, बायकोच्या पैशावर नवर्याने कोणताही हक्क ठेवू नये, गरज असल्यास मागणी करावी, आणि ते ही परतीच्या बोलिवर.
|
Ashbaby
| |
| Monday, March 10, 2008 - 11:19 am: |
| 
|
हो दक्षिणा, मला ही असेच तुझ्यासारखेच वाटते, पण लग्न झाल्यावर माहेर विसरायचे ही आपली पुर्वापार संस्कृती, आणि संस्कृतीतले आपल्या सोयीचे तेवढेच वापरात ठेवायचे ही आपली आजची संस्कृती. त्यामुळे एखादा नवरा लग्नानंतरही माहेरी मदत चालू ठेवायला संमती (??) देत असेल तर तो त्याचा चांगुलपणाच वाटायला लागतो. मंजु, तुझा नवराही असाच चांगुलपणाच दाखवतोय. नशिबवान आहेस. मुद्द्यांचे म्हणशील तर आजुबाजूला दिसतेच हे रोज. स्त्री असमानतेची उदाहरणे घरात्/ घराबाहेर रोज दिसतात. आपल्यावर अन्याय होतोय असे स्त्रियांना वाटतेही, पण त्यासाठी भांडत बसणार कोण? आणि भांडायचे कोणाशी? ज्याच्याबरोबर जन्म काढायचा त्या नव-याशी? वरच्या उदाहरणात सांगितलेली माझी मैत्रीण आजही त्या नव-याबरोबर संसार करतेय. पण तो तिचा विश्वास गमावून बसलाय. तिला राग येतो त्याचा तिच्याशी असे वागल्याचा. नको तो संसार असे वाटते कधीकधी. पण जाणार कुठे? मुलगी, वृद्ध आईवडिल सगळ्यांचा विचार करावा लागतो. जिथे रोज एकमेकांची तोंडे पहावी लागतात तिथे भांडत बसण्यापेक्षा प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष केले तर निदान थोडीफ़ार मानसिक शांतता तरी मिळते. अर्थात सगळेच असे नाहीयेत. उडदामाजी काळे गोरे तसे समान दृष्टिकोण ठेवणारेही आहेत. आपल्या वाट्याला तसा कोणीतरी आला तर आपले नशीब, नाहितर मग निदानपक्षी 'आपल्या वाट्याला चांगला नवरा आला' असे सुनेला वाटावे असे संस्कार आपल्या मुलावर आपण करणे, आणि असल्याच विचारांची सासु आपल्या मुलीला भेटावी अशी देवाची प्रार्थना करणे, अजुन काय? साधना.
|
Manjud
| |
| Monday, March 10, 2008 - 11:37 am: |
| 
|
बायकोच्या पैशावर नवर्याने कोणताही हक्क ठेवू नये, गरज असल्यास मागणी करावी, आणि ते ही परतीच्या बोलिवर. दक्षिणा, माझं मत थोडं वेगळं आहे. संसार हा नवरा आणि बायको दोघांचाही असतो. ह्या संसारात नवर्याच्या माहेरची आणि बायकोच्या माहेरचीही मंडळीही येतात. संसाराची गरज ओळखून दोघांनीही आपापसात चर्चा करून पैशाचे निर्णय घ्यायचे. एकदा दोघांचा संसाअर म्हटल्यावर मग तुझं माझं का म्हणून करायचं? हे तुझं माझं करताना मग दोघांच्या पगारांची तुलना आपोआपच सुरू होते. जी अगदी चुकीची आहे.
|
Ajjuka
| |
| Monday, March 10, 2008 - 1:17 pm: |
| 
|
मंजु, अगदी अगदी! मिळकतीवर पहिला हक्क मिळवणार्याचा आणि दुसरा जोडीदाराचा आहे. हे दोन्ही बाजूने असायला हवे ना. आईवडिलांना मदत करताना बायकोने सासरच्यांची परवानगी घेण्याची काही गरज नाही पण दोघांनीही आपापल्या आइवडिलांना मदत करताना एकमेकांशी बोलून निर्णय घ्यायला हवेत. पण होतं काय की नवर्याच्या आइवडिलांना अशी मदत घेणं(सुनेच्या पगारातून सुद्धा) हा हक्क वाटतो तर बायकोच्या आइवडिलांना ते संकट किंवा नाइलाजाने करावी लागणारी गोष्ट वाटते(स्वतःच्या मुलीच्या मिळकतीतून मदत येत असली तरी). दोन्ही बाजू समान असायला हव्यात हे गृहित धरूनही मला असं वाटतं की कुणाची गरज जास्त मोठी आणि खरी आहे याचा तारतम्याने विचार करणे महत्वाचे.
|
"दोन्ही बाजू समान असायला हव्यात हे गृहित धरूनही मला असं वाटतं की कुणाची गरज जास्त मोठी आणि खरी आहे याचा तारतम्याने विचार करणे महत्वाचे. " अज्जुका १००% अनुमोदन. (मागल्या वेळि मला दिलेल परत करतेय ).
|
Karadkar
| |
| Monday, March 10, 2008 - 4:59 pm: |
| 
|
एक कमावती मुलगी जर लग्न होऊन दुसर्या घरी गेली, तर तिची कमाई ही लगेच सासरकडच्यांची होते का? तिचा त्यावर काही हक्क असू नये? माझ्यामते तरी, बायकोच्या पैशावर नवर्याने कोणताही हक्क ठेवू नये, गरज असल्यास मागणी करावी, आणि ते ही परतीच्या बोलिवर. >> दक्षीणा, मग बायकनि पण नव-याच्या पगारावर हक्क दखवू नये. आपला पगार पुर्णपणे बंॅकेत ठेवुन त्यने सम्पूर्ण खर्च करावा हे मला देखील पटत नाही. संसार त्याचा आहे तसाच तुमचा देखील आहेच and vice versa . सतत माझे तुझे करत राहिल्याने मनात आढी बसू शकते त्याच्या आणि स्वत्:च्या पण. इथे एक नमुद करावेसे वाटते, व्यक्ती तितक्या प्रक्रुती त्यामुळे one size fits all हा approach असल्या नातेसंबंधांमधे चालत नाही.
|
आता इथे चर्चा चाललेलीच आहे म्हणून seriously विचारतेय कारण खरेच माहीत नाही, मुद्दा हाच मी सगळ वरती म्हणताहेत के लग्न ठरवतानाच वरील गोष्टीची( पैसे कसे handle करावे,घरखर्च कसा करावा वगैरे वगैरे) मोकळपणाने चर्चा करावी, पण १)नक्की सुरवात कशी करावी ह्या विषयावर?? (नाहीतर मुलगी / मुलगा वरचढ आहे किंवा आणखी काही चुकीची मते होवु शकतात ना जर 'असे' विषय सुरवातीलाच काढलेले तर कारण एवढीही काही 'खूप' ओळख नसते ना(हे मी love-marriage विषयी नाही बोलत जिथे ओळख बरीच असते)) २)आणि विचारायचे तरी नक्की काय एकमेकांना 'ह्या' subject वर? (एकतर आधीच इतका awkwardness असतो बर्याच baisc गोष्टी विचारताना त्यात हे आणखी एक). कोणी सांगेल का मग ह्या प्रश्णांचे उत्तर? (कृपया टिंगल टवाळी करु नका)?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|