|
Manuswini
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:48 pm: |
| 
|
अरेरे काय हे विचार. छी! आमच्या घरात आम्ही १६ मुली नी १० मुलगे. ते ही फक्त आईची नी पप्पांची सखी भावंडे धरून नी त्यांच्या मुली धरून. सगळ्या मुली एकदम हुशार आहोत हां . माझ्या आईला नी पप्पांना कधीच काही वाटले नाही,आम्ही पण मुलीच(बहीणी) आहोत. उलट मी झाल्यानंतरचा किस्सा, आईला बरे वाटल्यावर तीन चार महिन्याने माझे बारसे एक मोठा हॉल घेवून केले, घरात करून आईला त्रास नको जेवण, नाश्ता बाहेरून मागवून वगैरे करायचा हा साधा सोपा विचार कारण आईला बरे न्हवते delivery नंतर. त्यात पपांचे friend circle खूप मोठे होते तर आजूबाजूच्या कीतीतरी जणांने काय सल्ले(फुकटचे) दीले, कशाला तो मुलीच्या बारशासाठी एवढा खर्च, काय मुलगा आहे का एवढे मोठे बारसे करायला वगैरे वगैरे . एक तर काकू अजूनही सांगतात तुझे पप्पा पुर्ण बारशाभर हसत होते स्वागत करायला उभे.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 05, 2008 - 7:55 pm: |
| 
|
हे का आहे असे कारण मुलीचे लग्न करताना मुलाकडची लोक ज्या पध्द्तीने पिळवणूक करतात(हे one of the reason ). आता कीती शिकलेले मुलगे आपल्या आई वडेलांना पण समज देतात की असे वागू नका. ताटाखालचे मांजर बनून स्वतची लाड करतातच ना ही मुले. जावई आहे मग करा माझे लाड. भले demand करत नसतील पण होत असतील करून घेणार आहेतच ना. इथे असे नसावे तसे नसावे असे विचार मांडणार्या किती जणांनी protest केलेय आजूबाजूला शक्य असताना?? हा ही एक प्रश्ण आहे. ह्याच चिंतेने मग मुली असण्यर्या आई-बापाला वाटते नकोच मुली (कृपया हे व्यक्यतीक विधान घेवु नका, पण एक विचार मांडला आहे फक्त. नाहीतर तळटीपेशिवाय कुठलीही पोस्ट लिहिणे कठीण आहे).
|
Ajjuka
| |
| Thursday, March 06, 2008 - 2:49 am: |
| 
|
सगळं पटत असून जेव्हा दिसतं की मुलगी आहोत म्हणून काही गोष्टी आपल्यावर लादल्या जातायत, ज्यात बदल होणार नाहीये तेव्हा त्या बाईला/ मुलीला वाटत असेल का की आपल्याला मुलगी नको मुलगाच हवा असं? म्हणजे कदाचित असं वाटण्याची intensity वेगवेगळी असेल आणि आविष्कारही पण ही शक्यता नाकारता येत नाही ना!
|
बरोबर आहे अज्जुका. आत्तापर्यंत मुलगी झाली की फक्त बायकांनाच रडताना पाहीले आहे.किंवा मुलगी झाली या विषयावर फक्त बायकांनाच बोलताना पाहीले आहे. कुठलाही पुरुष कधीच मुलगा होन्यासाठी उपाय करताना पाहीले नाही. ( भलेही मग ते मोरपिस किंवा आख्खा मोर खाणे असले तरी) आणि मुलगी झाली म्हणुन अत्याचार करनारी पण एक मोठी मुलगीच असते. बायकांचा विचारसरनी मध्येच काही चुक आहे का? खरतर हीच एक मोठी शोकांतीका नाही का?
|
माझ्या मते पुरुष (बहुतांशी) स्वत्: मध्ये काही कमतरता आहेअसू शकते या विचारापावेतोही पोहोचू इच्छित नाहीत त्यामुळे सन्तती प्राप्तीत विलंब असो वा पुत्र प्राप्ती असो यात उपाय योजना हीस्त्रीचीच जबाबदारी,उणिवपूर्ती तिनेच करायची अशी एक धारणा अनेक ठिकाणी पाहिली आहे.
|
Anaghavn
| |
| Thursday, March 06, 2008 - 5:15 am: |
| 
|
केदार, "बायका बायकाना त्रास देतात" ही खरच शोकांतिका आहे. पण तू जे म्हणालास की बायकांनाच जास्त करुन रडताना पहीले आहे--मुलगी झाली म्हणुन, त्यामागेही एक कारण असाव--लोक काय म्हणतील हा विचार. माझ्या कुटुंबात मुलगी झाली आनि मला जर त्याच वाईट वाटल नाही किंवा मी तस दाखवल नाही, तर आयुष्यभर हे लोक (नातेवाइक म्हणा किंवा आजुबाजुचे म्हणा) मला टोचुन बोलतील. कुणी ऐकुन घ्या त्यापेक्षा वाईट वाटल आहे अस दाखवा-- अर्थात हे सगळ अज्ञानातुन आणि मुख्या म्हणजे अंगी ठामपणा, विश्वास नसल्यामुळे येत. हे समर्थन अर्थातच नाही. चुक ते चुकच. पण जर त्यामागचे कारण समजुन घेण्याच प्रयत्न केला तर,निदान नंतरच्या लोकांकडुन त्या चुका टळतील. कुणी सांगाव कदाचीत या आडणी बायकांना जर आपण प्रशिक्षित करु शकलो तर खुद्द त्याच या चुका टाळतील. अजुनएक. मुलगी नको म्हणुन तिला गर्भातच किंवा UP मधल्या लोकांसारखं दुधात बुडवुन मारणं. हा गुन्हाच आहे, त्यात वाद नाही. पण मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय उपलब्ध आहेत. आपल्याला ते माहित नसतात. पुर्वीच्या काळी जेव्हा आयुर्वेद घराघरात उपलब्ध होता, तेव्हा त्याचे जाणकार लोक होते. (आजीबाईचा बटवा). पण नन्तर मात्र काही समज गैरसमज होत गेले--लोकापवाद. आणि आज बरेच लोक,ज्यांना अर्धवट ज्ञान असतं ते लोक गैरसमज पसरवतात. पण याच अर्थ मुळ ज्ञान चुकीच आहे असा होत नाही. फक्त त्याचा चुकीच्या पध्धतीने आणि अर्धवट वापर केला गेला. मुलगा हवा असण यात चुकीचा काही विचार आहे अस वाटत नाही. पण त्या मागचा द्रुष्टीकोण चुकीचा आहे अस वाटत. आणि त्या चुकीच्या द्रुष्टिकोणामुळे मुलींकडे चुकीच्या पध्धतीने पाहिले जाते.त्यांना वाईट वागणुक मिळते.
|
Meggi
| |
| Thursday, March 06, 2008 - 7:34 am: |
| 
|
कुठलाही पुरुष कधीच मुलगा होन्यासाठी उपाय करताना पाहीले नाही.>>मुलगीच होते म्हणुन दुसर लग्न करणारे पुरुष मी बघितले आहे. माझ्या एक colleague ने मुलगी झाली म्हणुन टीम मध्ये मिठाई देखिल वाटली नाही. अज्जुकाचं म्हणणं पटलं. आपण ज्या त्रासातुन जात आहोत तो आपल्या बाळाच्या नशिबी येऊ नये म्हणुन मुलगी झाली याचं वाईट वाटत असावं बाईला. आम्ही दोघी मुलीच असल्याने आम्ही आणि आमच्या आईने किती ऐकलं हे चांगलं आठवतय मला. आता मात्र लोकांची तोंड बंद झालीत.
|
Meggi
| |
| Thursday, March 06, 2008 - 7:40 am: |
| 
|
DJ शिकल्या सवरल्या लोकांचं काय घेऊन बसलीस. मध्ये सकाळ्च्या 'फमिली डॉक्टर' मध्ये वडाच्या उत्तरेकडे आणि पूर्वे जाणार्या फांद्यां च्या टोकाचा रस उजव्या नाकपुडीत पिळला तर मुलगा होतो असा उपाय सुचवला होता. हाच रस डाव्या नाकपुडित पिळला तर मुलगी. तिथेही मुलीला डावं स्थान देणं सोडलं नाही या लोकांनी. आयुर्वेदाचार्यांनी असे सांगावे म्हणजे कमाल आहे.
|
Ashbaby
| |
| Thursday, March 06, 2008 - 10:31 am: |
| 
|
कुठलाही पुरुष कधीच मुलगा होन्यासाठी उपाय करताना पाहीले नाही. करतात ना, पुरुषही उपाय करतात. मुलगा होत नाही हा स्त्रियांना त्यांच्या नशिबातला दोष वाटतो, त्यामुळे तो दोष दुर करण्यासाठी त्या देव्-देव, उपास्-तापास, भोंदुबाबा इत्यादी उपाय करतात. मुलगा होत नाही हा पुरुषांना स्त्रियांच्या जननक्षमतेचा दोष वाटतो. त्यामुळे मग त्यांना दुसरे लग्न करण्यावाचुन पर्याय रहात नाही. समाजालाही तसेच वाटत असल्याने अशा पुरुषांना स्थळेही लगेच मिळतात. आता दुर्दैवाने ती दुसरी बायकोही पहिलीसारखीच निघाली, तर तिसरी स्त्री सुध्दा समाजात बायको म्हणुन मिळते. हल्लीच एक मासिकात मंचरला डॉक्टरी व्यवसाय करणा-या एका डॉक्टरची मुलाखत्-माहिती वाचली. दोन उदाहरणे लक्षात राहिली. एकात, मुल होत नाही म्हणून एक जोडपे आले, बाईची तपासणी करावी लागेल असे डॉक्टरने सांगितले. नव-याने खर्च विचारला आणि तो ऐकुन ह्यापेक्षा कमी खर्चात दुसरे लग्न होईल. तर तेच करतो आता म्हणून सरळ उठुन गेला. बायको काही न बोलता त्याच्या मागुन गेली. दुस-या उदाहरणात, तिस-या बायकोलाही मुल होत नाही म्हणून एकजण बायकोची तपासणी करायला आला. डॉक्टरने त्याची तपासणी सुचवली तर त्याला ते आवडले नाही. एकुणच मानसिकता काय आहे ते या उदाहरणांवरुन ढळढळीतपणे दिसते. मुल होत नाही हा स्त्रीचाच दोष आहे, मग मुलगा होत नाही हा दोष पुरुषांकडे कसा जाईल? या दोषाची जबाबदारी आणी निवारण उपाय करण्याचि जबाबदारीहि फ़क्त स्त्रिचीच नाही काय? आणी दुस-या लग्नासारखा सोपा पर्याय समोर असताना कुठचा पुरुष देव्-देव, उपास्-तापास, भोंदुबाबा इत्यादी स्वत्:ला त्रास देणारे उपाय करेल?? साधना
|
Ashbaby
| |
| Thursday, March 06, 2008 - 10:46 am: |
| 
|
अजुन एक्- एखाद्या घरात, दोघी-तिघी बहिणी आहेत, त्यांच्या आईला पण दोन्-तिन बहिणी आहेत, तर अशा घरातील मुलीला सुन करण्यासही काही लोक कचरतात. कशावरून हिला तरी मुलगा होईल? मुलीच झाल्या तर काय करायचे? असा विचार करून काहीतरी फ़ुटकळ कारण सांगुन नकार देतात. मी दिलेली माझ्या मैत्रिणींची उदाहरणे मुंबई शहरातील, आपण सधन आणि 'सु'शिक्षीत, समजदार समजतो अश्या घरातील आहेत. इथे अशी परिस्थिती, तर मग जिल्हा, तालुका, खेड्यात काय असेल? आणि त्यांच्या अडाणीपणाला कोणत्या तोंडाने शिव्या द्यायच्या? साधना.
|
अजुन एक्- एखाद्या घरात, दोघी-तिघी बहिणी आहेत, त्यांच्या आईला पण दोन्-तिन बहिणी आहेत, तर अशा घरातील मुलीला सुन करण्यासही काही लोक कचरतात. कशावरून हिला तरी मुलगा होईल? <<<<<खरं कारण तर अजुन वेगळच असत ! मुलीली सख्खा भाऊ असावा अशी अपेक्षा सुध्दा सरळ लिहितात लोक , कारण मुली वर आई बाबांची जवाबदारी नको !
|
Uday123
| |
| Thursday, March 06, 2008 - 4:04 pm: |
| 
|
भले demand करत नसतील पण होत असतील करून घेणार आहेतच ना. --- काही जावाई लोकं फ़क्त एक रु. मानाचा घेतात (लग्नात आणी नंतरही). लग्नात पण एक रु + मुलगी/ नोंदणी पद्धत असा विचार मांडतात (हे प्रमाण खुप कमी असेल). इथे असे नसावे तसे नसावे असे विचार मांडणार्या किती जणांनी प्रोतेस्त --- जिथे स्वत:चा सहभाग असेल तिथे आक्रमक प्रतिकार, तोडफ़ोड! पण आजुबाजुला शुन्य, आपण तर भर घालत नाही आहे न या प्रकारात यावरच समाधान (थोडक्यात अल्प-संतुष्ट).
|
Uday123
| |
| Thursday, March 06, 2008 - 4:19 pm: |
| 
|
सगळं पटत असून जेव्हा दिसतं की मुलगी आहोत म्हणून काही गोष्टी आपल्यावर लादल्या जातायत, ज्यात बदल होणार नाहीये तेव्हा त्या बाईला/ मुलीला वाटत असेल का की आपल्याला मुलगी नको मुलगाच हवा असं? --- हे काही प्रमाणात पटतं. पण मग मी जो त्रास सहन केला आहे, ज्या जाचातून गेले आहे, त्यापासुन मी शिकुन तोच त्रास पुढे माझ्या मुलीला होणार नाही याची दक्षता घेईल, थोडक्यत तिला लढायला शीकवेल हा विचार का पुढे येत नाही? नपेक्षा ती नकोच हा विचार बळावतो. पुढे २०-२५ वर्षा नंतर (सासु झाल्यावर) भुमिकेत अमुलाग्र बदल का होतो?
|
Manuswini
| |
| Thursday, March 06, 2008 - 8:50 pm: |
| 
|
आता पर्यन्त मुलगी झाली की बायकाच रडतात,बायकाच मारतात मुलींना वगैरे वगैरे लिहिलेले " " ह्याचे उत्तर कारण मुलगी झाली की 'टोमणे' किंवा जाच हा बायकांना'च' होतोच. scientific कारण कीती लोकाना माहीती असते वा Accept केले असते की मुलगा वा मुलगी होणे हे पुरुषावर'च'(नवर्यावर'च') अवलंबून असते. बायकोला मुलगी झाली तर नवर्याला दोषी धरले जाते का ह्या कारणासाठी? नाही ना म्हणून बायका रडतात. वर्षानुवर्षे चालत आलेली समज नी रुढी ह्यात अडकलेले बाहेर यायला अजून तरी वेळ लागेल ना.... तर समाजाची विचारसरणी चुकीची आहे.
|
Meggi
| |
| Friday, March 07, 2008 - 4:18 am: |
| 
|
मी शिकुन तोच त्रास पुढे माझ्या मुलीला होणार नाही याची दक्षता घेईल, थोडक्यत तिला लढायला शीकवेल हा विचार का पुढे येत नाही>>त्याचं असं आहे की 'समानता' घरात शिकवु शकतो, मुलीला आणि मुलाला पण. पण बाहेरचं जग समानता मानत नाही. आपल्या मुलीला जाच होऊ नये याचि दक्षता आई घेतेच. स्वानुभवावरुन सांगते. पण आजुबाजुचे जेव्हा टोमणे मारायचे आम्हाला (बर्याचदा आई च्या नकळत) तेव्हा आईला वाईट वाटणारच ना. पुढे २०-२५ वर्षा नंतर (सासु झाल्यावर) भुमिकेत अमुलाग्र बदल का होतो? >> सासरे सासुच्या तोंडुन बोलतच असतात. घरजावई हा संकेत सर्वमान्य असता तर बहुधा सासर्यांच्या भुमिकेत बदल अपेक्षित असता. ज्यांना तडज़ोड करावी लागते तेच भांडतात. सासर्यांना करावी लागेल तेव्हा ते काय कुरकुर करणार नाहित? किंबहुना जरा जास्तच कुरकुर करतिल...
|
आहा.. समानता बीबीची चर्चा योग्य त्या मार्गावर आलेली बघून बरं वाटलं. आमच्या ओळखीच्या एक काकू आहेत. एम कॉम शिकलेल्या. नवरा MSEB मधे इंजेनीअर. या काकूना दोन मुली. तिसरा मुलगा व्हावा म्हणून उपास तापास, देव देवस्की करणी इत्यादि सर्व उपाय केले. त्याचबरोबर सात (हो... सात) गर्भपात. मोठी मुलगी दहावीत असताना या बाईला (एकदाचा) मुलगा झाला. वर्षभरात समजले की मुलगा मतिमंद आहे. आईच्या या वागण्याचा परिणाम मुलीवर झालेलाच होता. मोठी मुलगी आता कॉलेजमधे आहे. बेफ़ाम दारू पिते. "नाहीतरी तुला मी नकोच आहे ना.. मग मला विचारणारे तू कोण?" असा तिचा प्रश्न असतो. धाकटी मुलगी अभ्यासात एकदम हुशार होती. स्कॉलरशिपला जिल्ह्यात पहिली आली होती. ती मागच्या वर्षी दहावीला तीन विषयात नापास झाली. मुलगा हवा.. मुलगा हवा..
|
Arc
| |
| Friday, March 07, 2008 - 5:23 am: |
| 
|
बाप रे, त्या काकु उध्वस्थ ज़ाल्या असतील.... सन्गमनेरच्या एक प्रख्यात बालरोगतज्ञ बाइनी, वयाच्या चाळीशीत, २ मुली आहेत म्हणुन ३र्यान्दा मुल होउ दिले (सोनोग्राफी केली असनार हे ग्रुहीतच धरले आहे)त्याना जुळी मुले एक मुलगा आणि एक मुलगी ज़ाले अर्थात एवद्या उशीर वयात delivery चा खुप त्रस्स ज़ला. एक doctor आणि कर्त्रुत्ववान स्त्री असुन असे कसे वागु शक्तात लोक? .
|
Zakasrao
| |
| Friday, March 07, 2008 - 8:31 am: |
| 
|
लोकहो वरची चर्चा छान सुरु आहे. मी "लज्जा" पिक्चर पाहिला तेव्हा हादरलो होतो. त्याआधी माहितच नव्हत मुलगी जन्माला आल्यावर तिला असे मारण्याची प्रथा असते. अजुन एक पिक्चर पाहिला होता "मातृभुमी-द नेशन विदाउत वुमन" हा चित्रपट खरोखर मुलगी आहे म्हणुन गर्भपात करणार्या मंडळीना (पुर्ण कुटुंबाला) दाखवला पाहिजे. नन्दिनी यानी लिहिलेल उदाहरण अतिशय दुर्दैवी आहे. सगळ्यात प्रथम अशा स्त्रीनेच जर गर्भापाताला नकार दिला आणि नंतर चान्स घेण सोडल तरच हे असले प्रॉब्लेम्स सुटतील. तोवर नाही. खंबीर व्हायला हव.
|
Anaghavn
| |
| Friday, March 07, 2008 - 9:10 am: |
| 
|
नन्दिनी तु दिलेल उदा. खरोखर भयानक. जर त्या बाईचा यात जास्त पुढाकार असेल तर तिला शिक्षा मिळाली. पण मुलींच आयुष्य उधवस्त नको व्हायला. आई बापांवर किंवा कोणावर तरी राग म्हणुन लोकं काहीतरी करुन बसतात, आणि होश येई पर्यंतच आयुष्य उगाचच वाया जातं.
|
Asmaani
| |
| Friday, March 07, 2008 - 1:18 pm: |
| 
|
असमानतेची काही उदाहरणे: १. घरातला पुरुष जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो रजा घेऊन शांतपणे घरी झोपून रहातो. बायकोकडून छान सेवा वगैरे करुन घेतो. बाई आजारी पडते तेव्हा तिला सगळी कामं करावीच लागतात. नवरा कसा स्वयंपाक करणार नं? २. एका घरात आजी आजोबा दोघेच रहातात. वयात साधारण २ ते ३ वर्षाचा फरक असेल. आजोबा आराम करतात. आजींचे काय?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|