|
Sonalisl
| |
| Tuesday, March 04, 2008 - 7:10 pm: |
| 
|
मुलगा आपल्या जवळ राहणार आपल्याला सांभाळणार, न मुलगी सासरी जाणार ही मानसिकता बदलायला बरीच वर्षे जातील.
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 8:08 pm: |
| 
|
माझ्या आईला सहा मुलगेच. म्हणून सगळ्यात धाकट्या भावाला तिने तो बराच मोठा होइस्तवर मुलीचे कपडे घातले. मग लोक त्याला हसायला लागल्यावर थांबली. माझ्या भावाला तिन्ही मुलेच. त्याच्या मोठ्या मुलाचे लग्न होऊन त्यालाहि दोन्ही मुलेच. पण माझ्या भावजयीला मात्र मुलींची अतिशय आवड! (अर्थात् तिने आमच्या आईने केले तसे केले नाही!) पण माझ्या मुलीवर फार प्रेम करते. अजूनहि, तिला नि जावयाला डोसे आवडतात म्हणून बरे नसताना सुद्धा डोसे करून खायला घातले! बाकी आमच्या घरी सर्वांना एक मुलगा, एक मुलगी असे आहे.
|
उदय जी,अमृता बाय द वे- तो मित्र म्हणजे मीच बर का!!!आणि तुमचे अनुभव मला खुपदा आले खूप मजा आली सगळ्या प्रवासात-सगळ्यात मजा आली मुलींन.आ आणि आम्हाला-उभयताना.आपण एकच क्लबात आहोत्-
|
Manjud
| |
| Wednesday, March 05, 2008 - 5:43 am: |
| 
|
अमृता, आम्ही दोघी बहिणीच. माझ्या बहिणीला एकच मुलगी, नणंदेला एकच मुलगी आणि मलाही एकच मुलगी. पण माझी आई, बहिण, नणंद आणि मी चौघीही जणी अतीव आनंदात आहोत. मुलगी झाली ह्याचा सार्थ अभिमान बाळगून आहोत. बरंय, सूनेचा जाच नको, मुलगी लग्न करून सासरी पाठवून दिली की झालं.
|
Psg
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:30 am: |
| 
|
मन्जू, वाचतीये बरंका मी हे! मी त्या बाबतीत खूपच सुदैवी आहे. आम्हीही दोघी बहिणीच, पण मला अजूनपर्यंत एकदाही असे ऐकावे लागले नाहीये माझा जन्म झाल्यानंतर आई-बाबांना आजी-आजोबाही (दुसरी मुलगीच झाली म्हणून) काही म्हणले नाहीत, त्यामुळे बाहेरच्या लोकांची तोंडं बंद झाली! आणि हे 'मुलीला एकदा सासरी पाठवली की झालं' हे खरंच असतं का खरं? आईला मुलीची काळजी असतेच, ती सासरी असो की कुठेही. कोणते आई-वडील मुलीचं लग्न केलं की तिची काळजी घेणं बंद करतात? आपल्या मुलामधे आपला जीव गुंतलेला असतोच, तो मुलगा असो वा मुलगी! आता थोडी गम्मत- मला मुलगा झाला तेव्हा बर्याच जणींना मुलगेच झालेले ऐकले/ पाहिले होते. तेव्हा मला जाम काळजी वाटली होती, मुली होत नाहीयेत की काय कोणाला.. तेव्हा एक मैत्रीण म्हणाली, की बरंय आत्ता मुली नाहियेत ते.. अजून २-३ वर्षानीच होऊदेत मुली.. आणि खरंच, २-३ वर्षानी पुष्कळ जणांना मुली झाल्या - हा पॅरा प्लीज हलकेच घ्या सगळ्यांनी! अज्जुकाच्या तळटीपा इकडे इम्पोर्ट करायला लावू नका!
|
Ajjuka
| |
| Wednesday, March 05, 2008 - 8:43 am: |
| 
|
मी एकुलती एक. काय हे एकच मुलगी असं कधी खानदानात कुणी म्हणल्याचं मी ऐकलं नाही. फक्त एकदाच तेही नातेवाइक नाही अश्याच एका बाईंकडून.. २० वर्षांपूर्वी आईबाबांनी नवीन घर घ्यायचं ठरवलं. आम्ही १ BHK मधून ३ BHK मधे आलो. आइबांची खोली, मला वेगळी खोली, आजी किंवा आजोबा किंवा कुणी पाहुणे आले तर वेगळी खोली असा साधा सरळ हिशोब होता. मी तेव्हा फक्त ८ वीत होते. तर एक भोचक बाई आईला म्हणाल्याच, "तुम्हाला काय करायचं मोठं घर? एकच तर मुलगी. ती जाणार सासरी!" "अहो पण त्याला वेळ आहे, तोवर तिला तिची वेगळी खोली नको का? परवडतंय तर काय हरकत आहे?" इति माझी आई. हे आईने घरी आल्यावर सांगितले तर आजीसकट आम्ही सगळे जोरदार हसलो होतो.
|
Dhanu66
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:32 am: |
| 
|
इथे लिहाव की नको? मला मुलगा झाला तेव्हा हॉस्पीटल मधली नर्स म्हणाली, बर झाल मुलगा झाला, मी तिला सांगीतले, मला मुलगी हवी होती तर ती म्हणाली, पण तिला हा त्रास सहन करावा लागला असता आणी तुमच्या आईच्या जागी तुम्ही उभ्या असता २४-२५ वर्षांनी.
|
Manjud
| |
| Wednesday, March 05, 2008 - 9:36 am: |
| 
|
पूनमे, पुढची तळटीप मी गंमतीत लिहिलीये, स्माईली बघ. एक प्रसंग आठवला: माझी एक मैत्रीण मोठ्या कुटूंबातली आहे. तिला दोन काका आणि एक आत्या. मैत्रीणीला एक मोठी बहिण. मधल्या काकाला एकच मुलगी आणि धाकट्या काकाला एक मुलगी, तेव्हा धाकट्या काकूला दुसर्यांदा दिवस गेले तेव्हा उगाचच सर्वांना असं वाटत होतं की हिला तरी मुलगा व्हावा. पण झाली ती मुलगीच. आम्ही हॉस्पिटलमध्ये बाळ बघायला गेलो. मैत्रिणीची आजी काकूजवळ बसली होती. आजीचं अभिनंदन केलं तेव्हा ती आनंदाने आम्हाला म्हणाली,'मुलींनो, माझ्यासारखी भाग्यवान मीच बरं का.... पंचकन्या स्मरे नित्यं महापातक नाशनम........ मी मेल्यावर मला स्वर्गात प्रवेश मिळेल. माझी सगळी पापं ह्या पोरींच्या दर्शनाने धुतली जातील आता रोज.' मला मुलगी झाल्यावर माझ्या बहिणीच्या आणि माझ्या लग्नात आईबाबांची काय अवस्था झाली असेल हे मला पूरेपूर कळलं. आई तर माझं लग्न ठरल्याची बातमी आजीला सांगताना काही न बोलता रडायलाच लागली. आजीला सुद्धा लगेच कळलं काय बातमी असेल ती.
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:22 am: |
| 
|
मला मुलगी झाल्यावर माझ्या बहिणीच्या आणि माझ्या लग्नात आईबाबांची काय अवस्था झाली असेल हे मला पूरेपूर कळलं. आई तर माझं लग्न ठरल्याची बातमी आजीला सांगताना काही न बोलता रडायलाच लागली. आजीला सुद्धा लगेच कळलं काय बातमी असेल ती.>>>> काही कळले नाही यातून! (खाजगीत डोकावणे असा या पोस्टचा उद्देश्य नाही)
|
Bee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:28 am: |
| 
|
मला सर्वात जास्त वाईट वाटत ते ह्याच की लिन्ग बघून जर ते मुळीच गर्भ असेल तर पाळायचं. ज्या अर्थी लिंग कुठल ते कळत त्या अर्थी नक्कीच बाळाला अवयव आले आहेत असा त्याचा अर्थ होतो. फ़क्त ते मुल जगाबाहेर अजून यायचे आहे. पण तरीही किती कृरपणे हा निर्यण घेतला जातो की नाही बाळ मुलगी आहे तेंव्हा abort her! बहुतेक दांपत्य, पहिले मुल होऊ देतात. दुसर्याच मुलाच्या वेळी अधिक विचार करतात. जर पहिले मुल मुलगा असेल तर ते आनंदाने दुसरे मुल होऊ देतात. जर पहिले मुल मुलगी असेल तर दुसरी पण मुलगीच झाली तर ह्याची त्यांना सारखी चिंता लागलेली असते. माझ्या एका जवळच्या नातलगात मी चार चार गर्भपात पाहिले आहेत एकाच स्त्रिचे. मग पाचव्यांदा तिला मुलाचा गर्भ राहिला. ती खूश झाली. पहिली मुलगीच होती तिला. कधी थांबेल हा जिवघेणा प्रकार!
|
Manjud
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:39 am: |
| 
|
गिरीदादा कृप्या हे असे वाचावे : लग्नात मुलीची पाठवणी करणे मुलीच्या आईवडिलांना किती कठिण जात असेल ह्याची कल्पना मला स्वत:ला मुलगी झाल्यावर आली. माझ्या आईला तर माझं लग्न ठरल्यावर आपली मुलगी आता सासरी जाणार ह्या कल्पनेनेच सारखं भरून येत होतं. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू अशी तिची अवस्था माझ्या आजीनेही लगेच ओळखली.......
|
Ashbaby
| |
| Wednesday, March 05, 2008 - 10:55 am: |
| 
|
कित्येकदा, गर्भपात करवून घेणा-या स्त्रियांना सुध्दा हे नको असते, मुलगामुलगी काहीही होवो पण हे नेहमीचे गर्भारपण नको असे वाटते, पण त्यांच्या हातात काहीच नसते. घरच्यांच्या दबावाखाली भरडल्या जातात बिचा-या. सगळ्यात वाईट म्हणजे गर्भपातानंतर तीची काळजीही घेतली जात नाही. जणू मुलीचा गर्भ राहू दिला हा तिने खुप मोठा मुर्खपणा केला. माझी एक मारवाडी मैत्रीण या दिव्यातुन गेलीय. इतकी रडायची, म्हणायची आई-बाबानी, पैसेवाल्याचे स्थळ पाहून दिले आणि हा वनवास नशिबी आला. ह्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या घरात जास्त सुखात राहीले असते. (माझ्या अजुन एका मैत्रिणीला पहिली मुलगी झाली, तिची सासू जी शाळेत शिक्षीका होती, ती म्हणाली, तु अशी धष्टपुष्ट, जाडी, माझा मुलगा बारीक, म्हणून मुलगी झाली. आम्हाला तर तिला हसावे की ८वी च्या जीवशास्त्रात जे शिकवतात ते बिचारीला शिक्षीका झाली तरी समजले नाही म्हणून किंव करावी हे कळेनासे झाले. त्या मैत्रीणीच्या नव-याने, दुसरी पण मुलगीच होईल या भितीने मैत्रिणीच्या इच्छेविरूद्ध दुसरा चान्स घेतला नाही) साधना
|
Ashbaby
| |
| Wednesday, March 05, 2008 - 11:12 am: |
| 
|
धानू६६- ती नर्स अजुन आई झाली नसावी. नर्स म्हणून तिने फ़क्त बाळंतपणातला त्रास पाहिला दिवसरात्र. पण एकदा आपले मुल हातात आले की आईला त्या त्रासाचा कसा विसर पडतो ते अनुभवले नाही. मला तर आता आठवतही नाही काय त्रास झाला तो, आठवतंय ते माझ्या ऐशूचं पहिलं दर्शन, आणि तिचा पहिला स्पर्श. साधना.
|
Anaghavn
| |
| Wednesday, March 05, 2008 - 11:28 am: |
| 
|
माझ्या माहितितली (मैत्रिणीची मैत्रिण) एक मुलगी-- शाळेपासुन पहात होते तिला. एकदम हुशार, चटपटित,स्मार्ट. व्यवस्थित शिकलेली. गरीब अजिबात नव्हती स्वभावाने. नन्तर अस ऐकल, की लग्ना नन्तर तिचे सारखे गर्भपात सुरु आहेत्--कारण गर्भात मुलगी असते दर वेळेस. माझ्या मैत्रिणीने सांगितल की तिला तू ओळखु शकणार नाहिस इतकी गरीब झाली आहे. सगळी रया गेली आहे. खुप वाइट वाटलं.
|
Maitreyee
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:47 pm: |
| 
|
काय बोलावं कळत नाहिये खरंच! वरचे इतके पोस्ट्स अन प्रत्येकाच्या ओळखीतली उदाहरणं वाचून असं वाटलं की हे गर्भलिंग निदान अन पर्यायाने मुलीची भ्रूणहत्या हे अनैतिक उद्योग आपल्याला वाटते त्याहून भयाण प्रमाणात सर्रास होतायत! उद्वेगजनक आहे हे सगळं!!
|
Giriraj
| |
| Wednesday, March 05, 2008 - 2:55 pm: |
| 
|
माइत्रेयी,महारष्ट्रात कायद्याने बंदी आहेच पण लोकही शिक्षणामुळे जरातरी जागरुक आहेत. त्यामुळे इकडे बेकायदेशिर रित्या गर्भपातावर जरा तरी नियंत्रण आहे पण त्यामुळे महाराष्ट्रातिल forward public गुजरातेत किंवा मध्यप्रदेशात जऊन हा प्रकार करून घेतातच वरून 'अडल्य नडलेल्याला' पत्तेआणि शिफ़ारसही देतात! आपल्याकडे येऊन रद्दि गोळा करणार्या कर्नाटकातिल माणसालाही तिकडे तोळ्यांमध्ये सोनं मिळतं. त्यामुळे सुरवातिलाच relatively कमी भांडवलात 'ब्यादच' नाहिशी केली जाते!
|
बंदी आहेच पण लोकही शिक्षणामुळे जरातरी जागरुक आहेत <<<दुर्दैवाने मी पाहिलेले लोक हे उच्च शिक्षित आणि medical field शी related च आहेत . औषध देणारे आणि घेणारे दोघेही शिकलेले असले तरी त्यांना ' अडाणी ' म्हणणे मला जास्त योग्य वाटते . विदर्भात मी पाहिलेली एक भयंकर हास्यास्पद घटना : एक ( so called शिकलेली ) बाई इतर बायकांना सांगत होती कि मोराच्या पिसा मधला डोळा कापून मिक्सर मधून वाटा आणि त्यात गूळ कालवून लाडू बनवून खा म्हणाजे मुलगा होतो म्हणे आणि हे ऐकणार्या बायकां कडे पाहून हसावे कि रडावे कळत नाही !.. नाही सुधारणार असे लोक जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आणि कितीही क्रांति घडली तरी ! मला तरी कधीही हे चित्र बदलेल असं वाटत नाही ... उलट दिवसें दिवस असले अडाणी लोक जास्त पहायला मिळातात !
|
Asami
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:27 pm: |
| 
|
देशात कशाला ग ? मला इथे पण असे लोक माहिती आहेत ज्यांना मुलगा झाला म्हणजे हात आकाशाला टेकले असे वाटते. कोणाला कशात मर्दुमकी गाजवली ह्याचा अभिमान वाटू शकेल ह्याचा काही नेम नाही खरच . तरी बर तर बर कि actually plan नाही करता येत मुलगा कि मुलगी ते
|
Supermom
| |
| Wednesday, March 05, 2008 - 4:44 pm: |
| 
|
'मोराच्या पिसामधला....' आई ग... दीपांजली मला पण वाईट वाटतं म्हणताना पण हे चित्र कध्धीच बदलणार नाही ही खात्री आहे माझी... आम्ही बहिणींनी पण खूप ऐकलंय भाऊ नसल्याबद्दल.. मी कॉलेजमधे असताना मी नि माझी मैत्रीण एकदा एका काकूंकडे गेलो असताना त्या म्हणाल्या.. 'अगबाई, मुलीच मुली का ग तुम्ही? मग वंश कसा वाढणार?' गंमत म्हणजे आईबाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता पण लोकांना कित्ती कित्ती काळजी....
|
Uday123
| |
| Wednesday, March 05, 2008 - 6:17 pm: |
| 
|
<<<दुर्दैवाने मी पाहिलेले लोक हे उच्च शिक्षित आणि medical field शी related च आहेत . --- मला हे मान्य आहे, हे लोक "पण" हात भार लवतात. दुकान काढूनच ही लोकं बसली आहेत. अगदीच चिड आणणारी गोष्ट आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|