|
Ajjuka
| |
| Monday, March 03, 2008 - 4:15 pm: |
| 
|
सायो.. तिने २००६ मधे विचारला होता प्रश्न!!
|
Sayonara
| |
| Monday, March 03, 2008 - 4:21 pm: |
| 
|
अरे हो की. ते पाहिलंच नाही मी. असू देत तिला फ़्युचरमध्ये उपयोगी पडेल. 
|
Sahi
| |
| Monday, March 03, 2008 - 4:35 pm: |
| 
|
ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात कुठे मस्त मिळतील? ज़ुन २००८ ला जायचा प्लन आहे. अजुन एक स्वच्छ-चान्गले ब्युटीपार्लर सुचवा... डेक्कन अएरिआत प्लीज साहि
|
डेक्कन भागात चांगले पार्लर म्हणजे भांडारकर रोडवरचं gazzelle आहे. प्रशस्त आहे पार्लर नि स्वच्छदेखील. इमिटेशन दागिन्यांसाठी रविवार पेठेत सोमेश्वर मंदिरासमोरचं कृष्णा ज्युलरी आहे, तिथलं महारानी सारीज जर्दोसी साड्यांकरता. साही, हाच बीबी वाचून काढ पूर्ण. बरीच माहिती मिळेल. 
|
Maanus
| |
| Monday, March 03, 2008 - 6:12 pm: |
| 
|
का पॅपीलॉन बंद झाले का? प्रभात रोड वर आहे ना ते.
|
Bsk
| |
| Monday, March 03, 2008 - 6:35 pm: |
| 
|
पॅपिलॉन आहे तिथे अजुन. आणि कर्वेनगरला पण अजुन एक ब्रॅंच सुरु झालीय त्यांची बहुतेक..
|
Ajjuka
| |
| Monday, March 03, 2008 - 6:35 pm: |
| 
|
लॉ कॉलेज रोडवर VLCC पण आहे. मस्त आहे.
|
Maanus
| |
| Monday, March 03, 2008 - 7:23 pm: |
| 
|
आपल्या पुण्यातल्या दोन चार नाव्ह्यांचा H1 sponsor करुन त्यांना ईकडे आणा रे. काय घाणेरडी कटींग करतात इथले न्हावी. आणि वर टीप घेताना लाज पण वाटत नाही.
|
Maanus
| |
| Monday, March 03, 2008 - 7:41 pm: |
| 
|
नीरजा इतका वेळ जागने चांगले नाही, झोपा आता.
|
Tiu
| |
| Monday, March 03, 2008 - 8:15 pm: |
| 
|
काय घाणेरडी कटींग करतात इथले न्हावी इथले न्हावी नाही, इथल्या न्हाव्या! माझी तर कटींग करण्याची इच्छाही होत नाही इथे...मागच्या ६ महिन्यात एकदाही गेलो नाही. पण आता जावंच लागेल बहुतेक! खांद्यापर्यंत केस वाढलेत!!!
|
Sonalisl
| |
| Tuesday, March 04, 2008 - 12:10 am: |
| 
|
काय घाणेरडी कटींग करतात इथले न्हावी >> अगदी अगदी. आणि किती वेळ लावतात केस कापायला. आख्खा माॅल फ़िरुन होईल तेव्हढ्या वेळात. देशात असताना, हे १५-२० मि.मधे केस कापुन यायचे. आता तर मी घरीच केस कापणार असं ठरवुन Hair cutting kit आणनार आहे. जरा बचत पण होईल. (पण त्यासाठी यांना तयार करावं लागणार बुवा!) :D * ही किट आणायची कल्पना मला ईथेच How to save money in USA? या बी बी वर मिळाली आहे.
|
Arun
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:57 am: |
| 
|
का पॅपीलॉन बंद झाले का? >>>> पॅपीलॉन आहे की अजून. भांडारकर रोडवरच आहे ...........
|
Ajjuka
| |
| Tuesday, March 04, 2008 - 5:55 am: |
| 
|
>>नीरजा इतका वेळ जागने चांगले नाही, झोपा आता.<< हो क्का आजोबा? बर हं!
|
सायो, धन्यवाद, बरे झाले आता सांगीतले कारण आता येत्या अप्रील मध्ये चाललेय. तेव्हा ही माहीती खरी आताच कामाला येइल असे वाटते. मला silk साड्या, designer साड्या, हलक्या फुलक्या साड्या घ्यायच्यात बरेच वर्षे मुंबईत जावून अश्या प्रकारचे शॉपींग केले नसल्याने पुन्हा कोणी नवीन शॉपची उजळणी करेल इथे नी मदत करेल तर बरे.खटाखट शॉपींग होइल एकाच ठिकाणी. गेल्या वेळेला भुलाभाईच्या हकोबा मध्ये मला स्वतला साडी घेतली चांगली वाटली. नल्ली पण चांगले वाटले. मिलन वगैरे ठीक आहे का अजून? दादर ला चंदेंरी,पानेरी,लाजरी आहे का अजून? पण ह्या वेळेला नंबर ज्यास्त असल्याने बजेट ठेवून घ्यायच्यात. दुसरे म्हणजे चांगले शरारा, लेंगा, silk कुर्ति छानसे चुणीदार ( casual Vs goodones ) वगैरे कुठल्या मॉल मध्ये मिळेल ते ही सांगा. इमीटेशन ज्वेलरी कुठे मिळेल? जुते?? आधीच इथे discussion झाले असेल तर ती link पण द्या pls ( आळशी कुठली मी)
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:12 pm: |
| 
|
मनु, तू नावं घेतलेली दुकानंही आहेतच दादरला. हल्ली 'जश्न' नावचं साड्यांचं चेन शॉप दिसलं ज्या त्या मॉलमध्ये. त्यांच्याकडेही डिझायनर साड्या चांगल्या आहेत पण रेंज हाय आहे. चक्कर टाकायला काहीच हरकत नाही.
|
Sayonara
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:22 pm: |
| 
|
आणि हो, इमिटेशन जुलरीकरता सांताक्रूझ स्टेशनसमोर काहीतरी 'सिल्वर....' नावाचं दुकान आहे. तिथेही छान मिळते असं ऐकून आहे. यावेळी जायला जमलं नाही. पुढच्या वेळी नक्की. शूज /सेँडल्सकरता catwalk मध्ये जा. चांगले असतात तिथे.
|
Zelam
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:42 pm: |
| 
|
मला वाटतं सांताक्रूझ स्टेशन जवळ सिया ज्वेलरी आहे इमिटेशन साठी प्रसिद्ध.
|
Zakki
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:47 pm: |
| 
|
मनुस्वीनि, इथे कुठे दुकान उघडायचा बेत आहे का? चांगला होईल धंदा! आमच्या घराजवळ उघडू नका!!
|
Arch
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:26 pm: |
| 
|
झक्की, घाबरू नका. तुमच्याशी लग्न झाल्यावर Mrs. झक्की Imitation Jewelry कशाला घालतील खरे हिरे माणकं सोडून? 
|
Supermom
| |
| Tuesday, March 04, 2008 - 3:38 pm: |
| 
|
झक्की, मला नाही वाटत तिचा दुकान काढायचा बेत दिसतोय. मला 'दुसरंच' कारण वाटतंय... मनू, अभिनंदन करू का ग?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|