|
Ramani
| |
| Friday, August 03, 2007 - 1:54 pm: |
| 
|
हे एलिस नीट कसं लिहायच? 
|
Akhi
| |
| Thursday, October 25, 2007 - 8:46 am: |
| 
|
आनंद या जीवनाचा सुगंधा परी हे टायटल songकोणत्या सीरीयल च आहे?
|
Vishee
| |
| Friday, October 26, 2007 - 2:37 am: |
| 
|
akhi , अग हे titile song एका बर्याच जुन्या सिरियलचं आहे, साधारण १९९३ ते १९९५ मधे आलेली ना ही सिरियल. मला पण खुप आवडायचं. आनंद ह्या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, झिजुनी स्वत: चंदनाने दुसर्यास मधुगंध द्यावा..... असं काहिसं होतं.
|
Monakshi
| |
| Friday, October 26, 2007 - 5:34 am: |
| 
|
मला वाटतं हे टायटल सॉंग संघर्ष म्हणून एक सिरीयल होती त्याचं असावं. डॉ. श्रीराम लागू, जयश्री गडकर यांची होती ती बहुतेक.
|
Akhi
| |
| Friday, October 26, 2007 - 6:18 am: |
| 
|
ह्म्म्म बरोबर... संघर्ष च..... खुप जुनी मालिका आहे. म्हनजे तेव्हा मी खुप लहान होते. पण त्या गान्यासाठी टी. व्ही लागायाच. मग आई ला पन ती मालीका आवडयला लागली. बाकि मला विशेष काही आठवत नाही
|
Slarti
| |
| Friday, October 26, 2007 - 8:49 pm: |
| 
|
आव्हान ही मराठी मालिका आठवते का कुणाला ? दया डोंगरे, आत्माराम भेंडे, उदय टिकेकर, निशिगंधा वाड, स्मिता जयकर... हुंडाबळीवर होती. त्याचे शीर्षकगीत उगीच आठवात राहिले आहे - आव्हान खुले आव्हान आव्हान खुले आव्हान नारीला समजून अबला छळ आजवरी जो झाला नावही त्याचे नकोच आता उठले धुंद तुफान... 'स्वामी'चे शीर्षकगीतही छान होते - जो जनतेचे रक्षण करतो, तारण करतो, धारण करतो, तोचि पिता साक्षात मानावा, बाकी सर्व निमित्त केवळ...
|
Slarti
| |
| Friday, October 26, 2007 - 9:06 pm: |
| 
|
अजून एक म्हणजे 'दुर्गा झाली गौरी'... कोणाला पूर्ण आठवतय का ते ? मला सर्वात जास्त आवडतात ते 'भारत एक खोज' आणि 'जंगलबुक'. 'भारत एक..' चे तर अंत्यगीतही सुरेख होते... वह था हिरण्यगर्भ सृष्टीसे पहले विद्यमान वह ही तो सारे भूतजात का स्वामी महान जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर जिस के बलपर तेजोमय है अंबर, पृथ्वी हरीभरी स्थापितस्थिर स्वर्ग और सूरज भी स्थिर ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर गर्भ में अपने अग्नी धारण कर पैदा कर व्यापा था जल इधर उधर नीचे उपर जगा जो देवों का एकमेव प्राण बनकर ऐसे किस देवता की उपासना करें हम हवि देकर ओ सृष्टीनिर्माता स्वर्गरचेता पूर्वजरक्षा कर सत्यधर्मपालक अतुल जलनियामक रक्षा कर फैलीं हैं दिशायें बाहू जैसी उसकी सब में सबपर ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर ऐसे ही देवता की उपासना करें हम हवि देकर शिवाय ducktales, tailspin यांची हिंदी शीर्षकगीते catchy होती.
|
Vishee
| |
| Saturday, October 27, 2007 - 4:09 am: |
| 
|
अजुन एक. दिलिप प्रभावळकरची "साळसुद" म्हणुन एक सिरियल लागायची त्याचे title song कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्तव उगीच कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो ज्याला जेव्हा जिथे सोयीचे जगात नसते कुणी कुणाचे
|
Zakasrao
| |
| Saturday, October 27, 2007 - 4:31 am: |
| 
|
स्लार्टी मस्तच. मलाही भारत एक खोज जे टायटल आणि अंत्य गीत फ़ार मस्त वाटत होत. रिपिट टेलेकास्ट ला मी त्याचे काही भाग पाहिलेत आणि अंत्य गीत आले की एकदम ट्रांस मधे गेल्यासारख वाटत होत.
|
Aashu29
| |
| Saturday, October 27, 2007 - 1:24 pm: |
| 
|
स्लार्टी तुला कसे काय लक्षात राहिले एवढे?
|
anagha, thanks a lot ! mi bareach divas ikade phiraku shakalo nahi karan desha bhaer phirat hoto. pan kahrach dhanyavaad
|
Anaani
| |
| Sunday, October 28, 2007 - 5:09 pm: |
| 
|
hello Mvdeshmukh , nothing to thanx. i am big fan of Friends..... friends chya saglya Cds aahet mazyakade ani vel milel tevha baghat asate.....
|
कुणाला "पाउलखुणा" या मालिकेच च title sond आठवतय का? माझि आवडति मालिका होति ती. शांता गोखले, शाल्मलि पालेकर ह्या दोघिंनि अभिनय केला होता त्या मालिकेत. title song पण फ़ार सुंदर होत, जागोजागि पाउलांच्या खाणा खुणा विखुरल्या.................सरत्या शतकांच्या वेचल्या पाउलखुणा.
|
Kshanik
| |
| Tuesday, November 13, 2007 - 6:11 pm: |
| 
|
५-६ वर्षापूर्वि दूरदर्शण वर संध्याकाळि ५ वाजता एक मालिका लागायची... नाव आठवत नाहि...त्याचे टायटल सॉंग ... "व्याकुळ ओल्या कातरवेळी एक खुणेची साद दे ".... फ़ारच सुंदर गाणे आहे
|
Palla
| |
| Saturday, November 17, 2007 - 9:45 am: |
| 
|
सोनी टिव्ही वर एक मालिका लागायची रोज दुपारी. ईग्लिश होती पण ती हिन्दी मध्ये दाखवायचे. सिलेस्टी नावाची. त्याचे टायटल सॉग खुप छान होते. जानम ये प्यार है ईस प्यार को हमने कभी खो दिया है लेकीन अब मैने जाना जो हुवा सो हुवा मुझे जाना होगा तेरी यादो के साये है घेरे मुझे चारो जास्त आठवत नाही आहे. कोणाला माहीती असेल तर सान्गा.
|
Badamraja
| |
| Thursday, December 06, 2007 - 7:00 am: |
| 
|
वादळवाट च Title Song कुठुन Download करता येइल.( Free मधे )
|
ओह ओह, टायटल सॉन्ग असा हे होय हा बीबी! डोळे फुटले माझे, खाचा झाल्या पाऽऽर सर्च पेजवर मी वाचले की टॉयलेट सॉन्ग, मनात म्हणल, म्हणत असेल कुणी अडला नडला बाथरुम सिन्गर टॉयलेटमधेच! DDD
|
Ankyno1
| |
| Monday, December 17, 2007 - 9:09 am: |
| 
|
फार पूर्वी दूरदर्शन वर सतीश पुळेकर आणि स्वाती चिटणीस ची 'अध्यात ना मध्यात' सीरिअल लागायची. त्याचं टायटल साँग अठवतय... अध्यात ना मध्यात कुणाच्या अध्यात ना मध्यात बुद्धीबळाच्या खेळामधली आम्ही पान्ढरी प्यादी हत्ती घोडे वजीराविना सेना अमुची साधी.... जसं जसं यची गोष्ट पुढे सरकली तसं तसं टायटल साँग चं कडवं बदलत गेलं मला इतर कडवी आठवत नाहियेत, कुणाला अठवत असेल तर लिहा.... ........................................................ सचिन खेडेकर च्या भोळाराम चं- भोळाराम मी भोळारम तुम्हा सर्वान्ना करतो सलाम बसा मंडळी राम राम ........................................................ दिलीप प्रभावळकर च्या राजा राजे चं- उघडा खिडक्या डोळ्यान्च्या ओठान्चे दरवाजे तुमच्यासाठी घेउन आला हास्याचे फुलबाजे राजा राजे... ........................................................
|
Prachee
| |
| Tuesday, December 18, 2007 - 12:43 pm: |
| 
|
@ मराठमोळी, तुला हवे असलेले गाणे असे आहे..... वाटेवरुनी जात जाता शतकाने थबकुन मागे वळुन पाहिले काय उरले उरुन मळलेल्या वाटेवर कुणी जाणिवा पुरल्या जागोजागी पाऊलांच्या खाणाखुणा विखुरल्या जुनेपण नवल्याले पाऊल उचललेले तिथल्या त्या जमिनीला मग विसरुन गेले तिला त्यागुन चालले खुण आपली सोडुन अनिश्चित अधांतर काही क्षणांचे भोगुन
|
Sahi
| |
| Tuesday, December 18, 2007 - 7:31 pm: |
| 
|
फार पूर्वी दूरदर्शन वर सतीश पुळेकर आणि स्वाती चिटणीस ची 'अध्यात ना मध्यात' सीरिअल लागायची. त्याचं टायटल साँग अठवतय... अध्यात ना मध्यात कुणाच्या अध्यात ना मध्यात बुद्धीबळाच्या खेळामधली आम्ही पान्ढरी प्यादी हत्ती घोडे वजीराविना सेना अमुची साधी.... लिम्बुटिम्बु डोळे माज़ेही फ़ुटलेत.... आन्क्य्नो१ चि पोस्ट आत्त्ता विजारी विना वाचले }
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|