Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 28, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मला चुकीची ऐकू आलेली गाणी » Archive through February 28, 2008 « Previous Next »

Supermom
Wednesday, January 16, 2008 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर चक्क एकाला 'अरे अरे ज्ञाना, झाला चित्पावन...' गाताना ऐकलेय...
तसंच 'सरगम' मधलं
कहां तेरा इंसाफ़ है, कहां तेरा दस्तूर है?
मै तो हू मजबूर भगवन, क्या तू भी मजबूर है? हे गाणं माझी मैत्रीण मोठ्ठ्याने
'मै तो हू मशहूर भगवन,
क्या तू भी मशहूर है' असं गायची. अनेकदा सांगूनही...


Manishalimaye
Wednesday, January 16, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा लहान असताना आजीच्या कविता आणि त्या वेळी सतत सगळीकडे लागणारी 'साथीया'ची गाणी यांच्या एकत्रीतित परीणामतुन ह जेव्हा सार्वजनीक ठीकाणी...

"जुल्फ के निचे गलगलपे
निळे तांबडे ऊन पडे"

अस एकच गाण असल्याच्या थाटात म्हणायचा तेव्हा....




Kedarjoshi
Wednesday, January 16, 2008 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अरे अरे ज्ञाना, झाला चित्पावन

Rishikeshkale
Friday, January 18, 2008 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणी "आज फिर तुमपे" हे गाणे ऐकताना मला असे वाटायचे की गाण्याचा हिरो अकाऊंटन्ट आहे (हिशोब ठेवण्याचे काम करतो) आणि नुकतेच प्रेम झाल्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नाही आणि बर्याच चुका होत आहेत (हिशोब लागत नाही आहेत).

Yogesh_damle
Tuesday, January 29, 2008 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरची 'काले-काले अन्ना' ची एन्ट्री वाचून मनात पुढची ओळ गायलो सुद्धा- "तेरे अन्ना- तेरे अन्ना, हमे डसते हैं तेरे अन्ना!" :-)

Shanky
Wednesday, January 30, 2008 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकेश चे एक गाणे चल अकेला अकेला चल अकेला तेरा "मैला" पिछे छूटा राही चल अकेला
खरे त्या ठिकाणी मेला आहे


Anaghavn
Thursday, January 31, 2008 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मैला" पिछे छुटा!!!!!!
खरय, सगळ्याच गोष्टी बरोबर घेऊन जाता येत नाही.


Jaanbhide
Monday, February 04, 2008 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही मुलं मराठी शाळेत असल्यानं आम्हाला इंग्रजीचा काहीही गंध नव्हता. स्पायडर मन सीरीयलचं टायटल साँग आम्हाला असं ऐकू यायचं आणि आम्ही वाडाभर ते गात सुटायचो.

स्पायडर मन स्पायडर मन जस्पटीस्पस स्पायडर मन
अँथनी स्पायडर मन युवे युवन स्पायडर मन अनन स्पायडर मन


Anaghavn
Monday, February 04, 2008 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही म्हणायचो--स्पायडर मन स्पायडर मॅन ऑटोमटीक स्पायडर मॅन--आणि पुढच आठवत नाही आता.

Farend
Monday, February 04, 2008 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुन्या रंगबिरंगीमधे मी असेच आम्हाला तेव्हा वाटणारे शब्द लिहिले होते
येथे पाहा :-)

Sonalisl
Friday, February 08, 2008 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होम मिनीस्टर मध्ये बांदेकर ने एका वहीनीला अभंग गायला सांगितला कारण तिचे आडनाव 'अभंग' होते. ती बोलली, "अभंग येत नाही भक्तिगीत गाते...."

देहाची ही झोळी, भक्तिचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा

आत्तापर्यंत मी 'देहाची तिजोरी' असं चुकीचं गात होते कि काय? असं वाटत असतानाच बांदेकर बोल्ला,"ते चुकलं"


Mitraa
Wednesday, February 13, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचे हे तर "देवाची ती जोडी " अस गातात अनेकदा सांगून पहिल तरी तेच.
आणखि एक त्यांच नेहमी गुणगुणायच गाण मी दुरुस्त करकरुन थकले.

ओ बसन्ती पवन पागल नजा रे नाजा रोको कोई

ते "पवन पागल"च्या जागी "कमला का घर"म्हणतात


Ballalsachin
Wednesday, February 13, 2008 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गाणं आठवलं की अजुन पण हसु येतं. माझा एक मल्लु मित्र आहे, त्याला लहानपणी हिंदीचा फारसा गंध नव्ह्ता.
दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार आ रहा असं म्हणायचा.
ईथपर्यंत ठीक आहे.. गम्मत अशी की, त्याला वाटायचं २ मित्र एकत्र स्नान करतायेत, आणी त्यांना एकमेकांविषयी तसं(!!!) आकर्षण वाटतंय.
ना रहा म्हणजे नहा रहा.. असं
हे गाणं गातांना तो नेहमी विचार करायचा, हे असं काहिही काय लिहीलंय


Jaanbhide
Thursday, February 14, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आन मिलो आन मिलो शाम सावरे फ़्रिज में अकेली राधा कुइ कुइ करे

Dakshina
Thursday, February 14, 2008 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रिज में अकेली राधा कुइ कुइ करे >>>>

Too Much


Yogesh_damle
Saturday, February 16, 2008 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कृष्णा!! कुई कुई... सोडव रे!! कुडकुडतेय!!" :-)

हे- मी चुकीचं वाचलेलं गाणं...

लताबाईंचं एक गाणं होतं- 'शागिर्द' किंवा 'ज़िद्दी' सिनेमातलं-- "कान्हा आन पडी मैं तेरे पांव"- मि त्यच्या English inlay card मध्ये लिहिलेलं " Aan Padi" वाचून हसायचो- "त्याच्या पावलांशी जाऊन कशाला?"


Nandini2911
Sunday, February 17, 2008 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कहने को चष्मा भर आया
लोग ये देख के हैरान है,,
छुपा है कोइ रंजे फ़िझाके गुलशनमे
फ़ूल है फ़ूल है अपने चिलमन मे
सोये सोये सारे नजारे है
जागे जागे वक्त के धारे है

माझा कलीग केव्हाचे हे गाणं म्हणतोय
बरोबर ओळी चारदा सांगून झाल्यात तरी हेच म्हणतोय. :-):-):-):-)

योगेश, मेल ला उत्तर वगैरे देत नाहीत का तुमच्यात??



Jaanbhide
Monday, February 18, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेंबीच्या पानावरं मनं अजून झुरतय गं

Runi
Thursday, February 28, 2008 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात के हमसफ़र, थक के घर को चले
तो मैने उन्हे रसना पिला दिया.

An Evening in Paris सिनेमातले हे गाणे माहीत नाही का पण लहानपणापासुन मी असेच म्हणते. ही ओळ मी कशी काय घुसडली माहित नाही पण ती इतकी फिट्ट बसलीये डोक्यात की खरे गाणे माहीत असुनही माझ्या तोंडात याच ओळी येतात

खर गाणे असे आहे
रात के हमसफ़र, थक के घर को चले
झुमती आ रही है सुबह प्यार की


Tanyabedekar
Thursday, February 28, 2008 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"विठ्ठला, तू वेडा कुंभार" हे गाणं मी कितीतरी वर्षे "विठ्ठला, पुर्वेला अंधार" असे ऐकत होतो...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators