|
Bee
| |
| Wednesday, February 27, 2008 - 3:35 pm: |
| 
|
वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.) तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, February 27, 2008 - 7:04 pm: |
| 
|
ज्या पुस्तकांची अखंड पारायणं आजही सुरु आहेत, (कितव्यांदा वाचतेय ते देखिल लक्षात नाही) अशी माझ्या संग्रही असलेली पुस्तकं.. स्वामी, मृत्युंजय, मंत्रावेगळा, झुंज, झेप, राऊ, छावा, आणि अर्थातच श्रीमान योगी!! पुलंची जवळपास सगळी पुस्तकं. बटाट्याची चाळ वाचताना आजकाल मायबोली अगदी अशीच नमुनेदार आहे ह्याचा प्रत्यय येतो. चाळीतल्या नमुन्यांचं मायबोली आयड्यांशी असलेलं साम्य शोधताना पुस्तकाची मजा आणखी वाढते! ही सगळी पुस्तकं का आवडतात ह्याचं कारण सांगण्यात हशील नाही!
|
Preetib
| |
| Wednesday, February 27, 2008 - 8:06 pm: |
| 
|
मी सध्या अनिल अवचट या लेखकाची सागळी पुस्तका वाचात आहे. हा एक सुन्दर अनुभव आहे.
|
Dakshina
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:12 am: |
| 
|
बी, तुम्ही म्हणता ते सर्व अगदी खरं आहे. आपल्याला वाचनाची आवड आहे हे सांगितलं की प्रतिमा खरंच उंचावते. पु.ल. यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकाचं पारायण मी किती वेळा केलंय ते खरंच मोजलं नाही. बसमधून ऑफ़िसला जाताना जर नविन पुस्तक वाचायला नसेल तर एव्हरग्रीन 'व्यक्ती आणि वल्ली' बरोबर घेतेच. त्यातही 'नारायण' हे असंख्य वेळा वाचलेलं पात्रं. शिवाय शारदा संगितातला जिलबीचा पहीला धडा पण (का काय माहीती, पण या पुस्तकातल्या प्रकरणांना गोष्ट म्हणण्यापेक्षा धडा म्हणावंसं वाटतं) माझ्या मते हलकं फ़ुलकं साहीत्य हे कायम पुन्हा पुन्हा वाचलं जातं. (निदान माझ्याकडून तरी) परवा असाच कंपनीतून येताना बसमध्ये पुस्तकांचा विषय सुरू होता, एक (अती)उत्साही मुलगी म्हणाली की मी 'Not without My Daugher ' ५ / ६ वेळा वाचलंय म्हणे. आता त्या पुस्तकात ५ / ६ वेळा वाचण्याजोगं काय आहे? (म्हणजे मला असं वाटतं) ते पुस्तक इतक्या वेदना आणि दुःखाने भरलेलं आहे, की निदान मला तरी दुसर्यांदा वाचायला नसतं आवडलं बाबा... असो... बी, माफ़ करा... पण 'आहे हे असं आहे' चे लेखक कोण आहेत?
|
Anaghavn
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:24 am: |
| 
|
"स्वामी"--एक अप्रतिम अनुभव!!!! हे पुस्तक पहिल्यांदा केव्हा वाचले लक्षात नाही. पण engg ला असताना प्रत्येक sem च्या परीक्षेनंतर मी त्याच्या पारायणं केली आहेत. अजुनही करतेच आहे. त्यातला प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर जिवंत होऊन उभा राहतो. डोळ्यासमोर माधवराव राघोबादादा म्हणुन्-भरदार आवाजाचे-श्रीकांत मोघे,आनंदीबाई--चारुलता(चु.भु.दे.घे.),माधवराव--रवींद्र मंकणी आणि रमा-- अर्थातच म्रुणाल. प्रत्येकवेळा एक नवीन अनुभव आला--शनीवार्वाडा, "थेऊर गणपति मंदिर" आणि खुप काय काय. दुसरं परायण=="अपुर्वाई--अर्थातच प्रिय प्रिय लाडके पुलं"--किती वेळा लंडन ला भरार्या मारुन आले गणति नाही. तिसरं--"मजेत कस जगावं--शिवराज गोर्ले" आप्रतिम सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाने माझ्या सगळ्यात पडक्या, वाईट काळात माझा माणुस म्हणुन स्वत: बद्दल चा विश्वास कायम ठेवला. या परीस्थितीतुन आपण बाहेर पडु शकतो, पडणार आहोत ही जाणिव, विश्वास मनात कायम जागत ठेवला. मी किती वेळा ते पुस्तक वाचल याची काही आठवण नाही आणि ठेवण्याची गरजही नाही. याच धरतीवरची आणखी पुस्तकं आहेत ज्यांची खुप परायणं केली आहेत करते आहे--"स्वसंवाद एक जादु" हे सरश्री तेजपारखीजी यांच पुस्तक सुध्धा खुप छान आहे. अशी अनेक "मानसशास्त्राच्या जवळची पुस्तक आहेत, जी मला आवडतात. bb खुप छान काढला अहे.
|
Ladtushar
| |
| Thursday, February 28, 2008 - 5:29 am: |
| 
|
  बापरे किती हा आनंद सांगू मी !!! अगदी एकदम अवडीचा विषय आहे हा! बी अगदी उत्तम सुरवात... माझी पारायण केलेली काही थोडीशी पुस्तके वपुर्झा,सखी, ही वाट एकटीची, घर हरवलेली माणसे, अगनिपंख, एक होता कार्व्हर, सावरकर, थोरल राजे संगुन गेले. यातील सावरकर आणि निनाद बेडेकर यांचे थोरल राजे संगुन गेले तर अप्रतिमच....पारायण मोजली नाही. निनाद बेडेकर यांचा कथा लिहिण्याचा स्टाइल सही आहे, त्या मधे इंग्रज, मराठे आणि जंजीरा चा सिद्धि यांची उन्देरी खान्देरी ची समुद्रातिल लढाई कसली रंगवली आहे... आणि तसे एव्हर ग्रीन पु. ल आणि वपु यांच्या कथाकथनाचे तर किती पारायण झाली ते माहित नाही. या तुन काही अतिशय अवडिचे असे, सखाराम, चितळे मास्तर, हरी काका, पेस्तंजी, म्हैस, हसरे दुःख, वन फॉर रोड, बदली... अजुन खुप काही..
|
Satishbv
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:24 am: |
| 
|
सद्ध्या राधेयचे पारायण चालु आहे. का कुणास ठावुक, मी प्रत्येक वेळी महाभारताचा Real Hero म्हणुन कर्णाच्या जास्तीत जास्त जवळ जातोय तर पांडवांपासुन दुरावतोय.
|
Akhi
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:36 am: |
| 
|
राधेय, पार्टनर, दुनियादारी, रंग सुखाचे, रारंग ढांग खुप खुप वेळा वाचुन झाली आहे आणी अजुन वाचायची इच्छा आहे. प्रवीण दवणे, सुशि, वपु कितितरी वेळा वाचले तरि समाधान होतच नाही.
|
Anaghavn
| |
| Thursday, February 28, 2008 - 6:52 am: |
| 
|
तुषार सध्या "थोरलंराजं सांगुन गेलं" वाचतेय. खरच छान शैली आहे. आवडलं. दक्षिणा, अगं मी पण not without my daughter खुप वेळा वाचल आहे, माझ्या अतिशय आवडीच पुस्तक आहे ते. त्यात दु:खाचा भाग आहेच. पण त्याहुन जास्त लक्षात ठेवण्यासारखं आहे ते म्हणजे तिचा विश्वास्--की मी इथुन एक दिवस माझ्या मुली सकट जाणारच. त्यासाठी तिने सातत्याने केलेलं काम, स्वत:च्या मनाला निराशेतुन बाहेर काढुन परिस्थितीवर केलेली मात. तिची जिद्द. तिच्या मनात तेवत असलेली ती ज्योत--सगळं प्रेरणादायी. मी तो चित्रपट पण पाहीला आहे.(कलाकारांची नावं आठवत नाहीत) पण त्या छोट्या मुली सकट सगळ्यांनी अप्रतिम काम केल आहे. मी US ला असताना पाहिला होता तो. इथे भारतात मिळत नाही. अनघा
|
Bee
| |
| Thursday, February 28, 2008 - 7:41 am: |
| 
|
दक्षिणा, 'आहे हे असे आहे' ह्या पुस्तकाच्या लेखिका गौरी देशपांडे आहेत. कदाचित तुला माहिती असतील पण मी 'लेखक' म्हंटल्यामुळे तुझी गडबड झाली असावी. खूप बुद्धिमान आणि प्रामणिक व्यक्ती होती ही लेखिका.
|
माणसे अरभाट आणि चिल्लार, कोसला, पिंगळावेळ, हिरवे रावे, गंधर्व (बाळकृश्ण प्रभुदेसाईचे), रथचक्र, सारे प्रवासी घडीचे.. खुप खुप पुस्तकं जी अनेकदा वाचली.. अर्थात मराठी नसले तरी एका पुस्तकाचा उल्लेख केल्याशिवाय ही यादी पुर्ण होऊच शकत नाही.. हेमिंग्वेचे 'Old man and the sea'..
|
Anaghavn
| |
| Thursday, February 28, 2008 - 9:30 am: |
| 
|
"आनंदी गोपळ" हे जोशी यांच पुस्तक खुपच छन आहे. त्यातल वर्णन, आणि सगळ्यात शेवटी आनंदीबाईंच्या तोंडी असलेले गोपाळ रावांचे विश्लेषण--खरच सुंदर.
|
Anaghavn
| |
| Thursday, February 28, 2008 - 9:38 am: |
| 
|
"महोत्सव" हे व.पुंच आणखी एक छान पुस्तक. त्याशिवाय "दोस्त",वपुर्झा-----
|
Swa_26
| |
| Thursday, February 28, 2008 - 11:46 am: |
| 
|
सध्या माझे 'गारंबीचा बापु' चे पारायण चालु आहे!! अशीच पारायण फेम पुस्तके म्हणजे, स्वामी, श्रीमान योगी, एक होता कार्व्हर, वपुर्झा, पार्टनर, पु.ल. एक साठवण, दुनिया तुला विसरेल, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली ही आणि अशी अनेक!!
|
Sheshhnag
| |
| Thursday, February 28, 2008 - 12:12 pm: |
| 
|
एकदम मस्त विषय! तुम्ही वर लिहिलेली बहुतेक सर्व पुस्तके मी अनेकवार वाचली आहेत. त्याशिवाय माझा स्वत्:चा असा सहाशे अधिक पुस्तक संग्रह आहे, जी माझी अमूल्य ठेव आहे. हा संग्रह पाहून मला एकाने केतकरांचा `ज्ञानकोश' आणि १९२५ मधील ८ खंडांचा मराठी शब्दकोश दिला, जे आज केवळ दुर्मिळ आहेत. `कुणा एकाची भ्रमणगाथा`, `अग्निपंख', `एक होता कार्व्हर`, `इडली, ओर्किड आणि मी` विशेष आवडीची पुस्तके.
|
वनवास
|
Bee
| |
| Thursday, February 28, 2008 - 3:01 pm: |
| 
|
१९२५ मधील ८ खंडांचा मराठी शब्दकोश दिला, जे आज केवळ दुर्मिळ आहेत. >>>>>>> शेषनाग, अभिनंदन! मला वरील वाक्य अजिबात कळले नाही. १९२५ मधील म्हणजे नक्की कुठले शब्दकोश? आधी मला वाटलं तुम्ही शब्दकोशाच पण पारायण केल :-)
|
Divya
| |
| Thursday, February 28, 2008 - 3:54 pm: |
| 
|
बी, छान विषय. पु.लंची सगळी पुस्तक परत परत वाचण्यासरखीच आहेत, त्यातही असामी असा मी, पुर्वरंग, अपुर्वाई कितिहि वेळा वाचले तरी कंटाळा येत नाही. प्रकाश नारायण संतांची सगळी पुस्तक अशीच. एक होता कार्व्हर एक असच. वर लिहीलेली बरीच पुस्तक आवडलेली. व. पुं. च महोत्सव छान आहे. ऐतिहासीक म्हणले कि श्रीमान योगी पासुन स्वामी पर्यन्त. गो. नि. दांडेकरांच मृण्मयी पण मला फ़ार आवडल होत. दहावीच्या सुट्टीत सांता शेळकेच अनुवादित चारचौघी नावाच पुस्तक कितीतरी वेळा वाचल असेल. आता सुद्धा कधीतरी असच त्यातली काही प्रकरण हुक्की आली कि वाचावीशी वाटतात. फ़ारच छान आहे हे पुस्तक. कितीतरी आहेत अशी कि मिळाली तर परत वाचावीशी वाटतील.
|
Tulip
| |
| Thursday, February 28, 2008 - 4:15 pm: |
| 
|
पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटणारी पुस्तके खरं तर माझी दर काही वर्षांनी बदलत असतात. तरी बाहेर जाताना पटकन बॅगेत कोंबावसं वाटणारं, प्रवासात, किंवा जेवताना वगैरे नेहमी बाजूला ठेवून वाचावसं वाटतं, ऑल टाईम फ़ेव्हरीट .. त्यात सतीश एलकुंचवारांचे मौनराग, सुनिता देशपांडेंच मण्यांची माळ, अनिल अवचटांच जगण्यातील काही, गौरी देशपांडेंच दुस्तर हा घाट, एकेक पान गळावया, तेरुओ, सानिया चं ओमियागे, प्रतिती, आश बगेंच भूमी, नीरजा चं ओल हरवलेली माती, माधव आचवलांच किमया, जीएंचं पिंगळावेळ, मिलिंद बोकीलचं झेन गार्डन, शरदिनी डहाणूकरांच हिरवाई, रिल्केची दहा पत्रे, रस्किन्बॉन्डची सगळीच, जोनाथन लिविंग्स्टन, चीपर बाय दी डझन, संतांची चारही, ग्रेसचं सांध्यपर्वातील वैष्णवी, माडगुळकरांच जंगलातील दिवस. बाकी नावं आठवत नाहीयेत आता चटकन म्हणजे कदाचित ती ह्या लिस्ट मधे घेण्यासारखी नसतील. काही वर्षांपूर्वी ही लिस्ट रॅंडच्या फ़ाउंटनहेड शिवाय पुरी झाली नसती पण आता ते मी बर्याच महिन्यांत वाचलेलं नाही. आवडीच्या पुस्तकांमधे जीएंची सगळीच आहेत पण ती मी पुन्हा पुन्हा वगैरे वाचत नाही. मला डीप्रेशन येतं. सामंतांच आयवा मारु, नेमाड्यांचं कोसला एकेकाळी परत परत वाचलं होतं. आता कित्येक वर्षांत उघडलेलंही नाहीये. सो ती सुद्धा ह्या लिस्ट मधे नाहीत. परत परत वाचाविशी वाटणारी पुस्तके माझ्या साठी कम्फ़र्ट बुक्स शिवाय वेगळी नाहीत. आवडीच्या पुस्तकांची यादी एन्डलेस आहे.
|
रारंगढांग, रारंगढांग, रारंगढांग, युगांत, मौनराग, जी एंची सगळीच, पुलंचीही सगळीच, उत्तररात्र, बनगरवाडी, सावित्री, लंपन series , Jonathan , Rand ची पारायणं करणं कठीण आहे, पण Night of Jan 16th ( छोटं असल्यामुळे असेल), Seinlanguage , आणि सद्ध्या Emily Dickinson . किमया, कोसला, स्वामी, सुरेश भटांचे गज़लसंग्रह, गौरी देशपांडेंची सगळीच, दिलीप कुलकर्ण्यांचं निसर्गायण, प. वि. वर्तकांचं स्वयंभू, राजा शिवछत्रपती - ही एकेका phase मधे पारायणं केलेली पुस्तकं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|