Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 25, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » चटपटीत गॉसिप » Archive through February 25, 2008 « Previous Next »

Psg
Monday, January 14, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो का? दिपीका नुसती स्टॅंड्स मधे बसली तरी युवी ० वर आऊट होतो, सापु झाल्यावर तर ग्राऊंडवर उतरणारच नाही! :P अश्या रितीने मग क्रिकेटींग करीयर संपल्यावर देईल मग आपसूक दिपीकाला 'पाठींबा'

Nandini2911
Monday, January 14, 2008 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सापु? आणि दिपिकाचा????
परवा तर ती रणबीर"सोबत" होती. ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी. निहार पंड्या अजून आहेच तिचा गूड फ़्रेंड.
म्हटलं ना ऍशची कमी पूर्ण करणार ही बालिका.
हरमन बवेजाची हीरॉईन इतक्यादा बदललीये. की बास्स.. करीना एशा प्रियांका... :-)
तो मिमोह तर तीन वर्षं झाली पदार्पण अच करतोय. :-)
(तसाचे झोया अखतरचा पहिला पिक्चर. केव्हा येणार ते देवच जाणे.


Giriraj
Monday, January 14, 2008 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या corporate culture मुळे दिपिकाचा diversification वर विश्वास बसला असावा! :-)

Zakki
Monday, January 14, 2008 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोणि (भारताचा विकेट कीपर, नि २० / २० ओव्हर्स च्या सामन्यात भारताचा कर्णधार) याच्या मागे कोण नटी होती? त्या संदर्भात पण मी दीपिकाचे नाव ऐकले होते. की ही दुसरीच कुणि दीपिका?



Prachee
Tuesday, January 15, 2008 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करीना आणि शाहिदचे का बिनसले? खरं तर जोडी छानच होती. कोणी (म्हणजे अर्थातच नंदिनीच) सांगु शकेल का?

Chinya1985
Friday, February 08, 2008 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलमाननी ८-१० दिवसांपुर्वी कत्रिनाच्या कानफ़ाटात मारली या न्युजला काही अर्थ आहे का?????

Dakshina
Monday, February 11, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच मी रेडिओ मिर्ची वर न्यूज ऐकली की संजय मान्यता चं लग्न झालं. आता हे संजय - मान्यता आहे कि संजय मान्यता? काही कळायला मार्ग नाही. पुढे म्हणे कि हा संजय पोलिसांच्या गाडीतून पूण्याला येतो. मग वाटलं हा आपला संजूबाबा तर नाही? पण त्याने तर मध्यंतरी रेहा पिल्ले शी लग्नं केलं होतं ना?

Psg
Monday, February 11, 2008 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो संजूबाबा म्हणजे संजय दत्तच की. त्याचं हे तिसरं लग्न. पहिली बायको गेली बिचारी, दुसरीशी नुकताच ऑफ़िशियल काडीमोड झाला. आता ही.
बरं बेल वर सुटलेलं असताना लोकांना हे असलं काहीतरी करायला सुचतं


Satishbv
Monday, February 11, 2008 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैनिक सामना मध्ये संजय दत्त व मान्यता संजय दत्त यांच्या कडुन शुभेच्छा होत्या. तेव्हाच या बाबत कुजबुज सुरु झाली होती.

Savyasachi
Monday, February 11, 2008 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटत ते मान्यता अस नाव नसून मन्यता आहे.

Nandini2911
Tuesday, February 12, 2008 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते नाव खरं तर दिल नवाज आहे. त्याची मान्यता कशी झाली ते कुणालाच माहीत नाही.. :-)

Deepanjali
Tuesday, February 12, 2008 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल पासून सगळ्या channels वर दाखवत असलेला ' गंगाजल ' मधला मान्यता चा item number पाहिला का ? :-)
अगदीच cheap दिसते ती !
:

Dakshina
Tuesday, February 12, 2008 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणता म्हणे आयटेम नंबर..?

Chandya
Tuesday, February 12, 2008 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ते नाव खरं तर दिल नवाज आहे
सामनाच्या बातमी नुसार तीचे नाव शहनाज़ शेख आहे. बरीच नामंतरे केलेली दिसतात तिने. :-)
http://www.saamana.com/2008/Feb/12/Index.htm

Deepanjali
Wednesday, February 13, 2008 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न करण्या बाबतीत मान्यता संजुच्या एक पाउल पुढे आहे , तिचे हे चौथे लग्न आहे .
तिच्या सर्वात पहिल्या नवर्‍यानेही बरेचदा जेल ची हवा खाल्ली आहे ( अनेक अभिनेत्रींना अश्लील sms पाठवल्या बद्दल ) असं काल news मधे सांगत होते .
:-)

Ladtushar
Wednesday, February 13, 2008 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरयाच्या पर्सनल लाइफ मधे हे न्यूज़ चॅनल वाले का डोकावतात काय माहित ?

Tonaga
Wednesday, February 13, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता इथल्या पोस्ट्स हा दुसर्‍याच्या पर्सनल लाईफमध्ये डोकावण्याचाच प्रकार नाही का? की हे public interest litigation आहे?

Nuovokus7
Wednesday, February 13, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

These days there is fashion of papparazzi in journalism. So there is nothing new that such BB is opened on this website.
You can also find similar things on news channels .....
Breaking news like...
Amitaabh ko thand lagi
Kareena ki engagement/nikaah

Its disgusting to say the least.

Sayonara
Wednesday, February 13, 2008 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्या सर्वात पहिल्या नवर्‍यानेही बरेचदा जेल ची हवा खाल्ली आहे

म्हणूनच तिला जेलमधल्या संजूबाबाला कसा सपोर्ट करावा ह्याचा hands on अनुभव आहे. :-)

Nandini2911
Tuesday, February 26, 2008 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा हा बीबी शोधून काढलाय..
बाकीच्या बीबीवर मी काही लिहिलं की "हल्ली असं असतं का?" "वैयक्तिक पातळीवर का येता" असले उद्गार ऐकायला मिळतात. आपण आपलं होम ग्राऊंडवर खेळलेलं सेफ़.. :-)

२० फ़ेबला राहुल द्रविड, गांगुली, प्रीटी, शाहरूह, माल्या याना भेटले. दिवसभर त्याच्याच सोबत होते. :-) निमित्त होतं आयपेईलच्या खेळाडू लिलावाचं..

माल्या आणि द्रवीड आल्यावर मी बघतच उभी होते. द्रवीडची हाईट छान आहे. तो डोळ्याला लावायचा गॉगल रात्र झाली तरी त्याने डोक्यावर काठेवला होता ते मला समजले नाही. माल्या एकदम down to earth माणूस. मी कानडीतून बोलल्यावर एकदम खुश झाला.

प्रिती आणे नेस दोघंही "अति प्रेमात" आहेत हे साफ़ दिसत होतं. ती लाल कलरचा ड्रेस घालून आली होती.

आम्ही मारे सर्व फ़ॉर्मलमधे गेलेले असताना एस आर के मात्र फ़ाटकी जीन्स घालून आला होता. पण एकदम मस्त वाटत होता. ब्रेक मिळाला की आधी सिग्रेटी फ़ुंकणे चालू.

गौरी खान मात्र इतकी विचित्र आली होती. एक तर मला ते मोठाले गॉगल्स आवडत नाहीत. तसला गॉगल आणि चित्रविचित्र असा टोप.. केसाचा तो उंच बुचडा... लहान मुलाना दाखवलं तर ती घाबरतील असं सोंग.

गांगुली किती गोरा आहे!!! उन्हातान्हात खेळून पण इतनी अच्छी त्वचा का राज क्या है भाई.

लिलावामधे बेस्ट बिडिंग धोणी आणी इशांतचे झालं. माल्या, शाहरूख आणि नेस अगदी इरेला पेटोऊन बिड करत होते. मात्र वातावरण तितकंच खेळीमेळीचं पण होतं. :-) आता १८ एप्रिलला मॅच आहे बंगलोरला.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators