|
Arch
| |
| Monday, February 25, 2008 - 5:30 pm: |
| 
|
संस्था आदरणीय आहे म्हणून त्यातल्या व्यक्तीनी नीट वागावे हा अट्टाहास का?? >> नीट वागाव हा अट्टाहास? ही साधी मानवजातीकडून केलीली अपेक्षा आहे. त्याचा संस्थेशी काहीही संबंध नाही. का हल्ली नीट वागणं हा कमीपणा मानला जातो?
|
Peshawa
| |
| Monday, February 25, 2008 - 5:42 pm: |
| 
|
आज भले स्त्रियाही शिक्षण करुन पुढे येतातही व बरोबरीने करीअर करतात पण त्यांची अपेक्षा असतेच की आपला नवरा हा जास्त शिकलेला, जास्त कमावता व आपल्या पेक्षा मोठ्या हुद्यावर असावा. मी फ़क्त त्याला साथ देईन, एकंदरीत पुढाकार हा पुरुषालाच घ्यावा लागतो. >>> हे नो झेप्स आपला जोडिदार आपल्यापेक्षा जास्त शिकलेला हव हे स्त्रीला वाटणे आणि पुरुशाने आपल्या पेक्षा कमी शिकलेला जोडिदार निवडने ह्यात power struggle/ego हे जास्त आहे असे वाटते. पुरुषानि स्वत्:ला बायकांच रक्षण्कर्ता, कुटुंबाचा प्रमुख्वैगेरे वैगेरे समजणे हेच तर सगळ्या प्रषणाचे मुळ आहे असे वाटते. माणुस म्हणुन असलेल्या कमतरता समजायला हव्यात आणी व्यक्त देखील करता याव्यात आणि तसे शिक्षण मुलाना द्यायला हवे
|
Athak
| |
| Monday, February 25, 2008 - 5:45 pm: |
| 
|
चटणी कलरचे आत्ता! अहो चटणी काय एकाच रंगाची असते? सगळ्या रंगतदार गोष्टींना आणखी रंग चढवणे हा तर यांचा गुण लाडतुषार , अरे काल्पनिकतेला जर तुम्ही वास्तव मानले तर सगळी संकलपना कल्पना राहत नाही
|
Uday123
| |
| Monday, February 25, 2008 - 5:57 pm: |
| 
|
काम करवून घेण्यासाठी एक काहीतरी कसब लगते. (अ) उगीचची खोटी स्तुती (लाळघोटे पणा) करवून, बातम्या ई. नियमीत पुरवणे (चमचेगिरी). (ब) पैसे देऊन (भ्रष्टाचार) काम करवणे. (क) मग काही स्त्रीयांचे म्हणणे असे आहे की, 'आमच्या कडे जे काही आहे का म्हणुन त्याचा वापर करु नये?' आदर्श समाज-रचनेत वरील तिनही गोष्टी वाईटच. पण म्हणुन जो ते करत नाही, अत्यंत सरळ मार्गने चालला असतो, त्याला हकनाक त्रास होतो. मला स्वत: ला पहिल्या दोन गोष्टींचा (जमत नाही म्हणुन) त्रास होतोच आहे.
|
Mrinmayee
| |
| Monday, February 25, 2008 - 6:58 pm: |
| 
|
समीर, चांगलं लिहिलं आहेस! फक्त एक खर्र खर्र सांग. तिकडे तो छत्री प्रसंग, इकडे हे सेंटी.. काय चाललंय नक्की?
|
Chyayla
| |
| Monday, February 25, 2008 - 10:26 pm: |
| 
|
आशुसचिन, अथक, संघमित्रा, लाडाचा तुषार यांचे प्रथम मनसोक्त दाद दिल्याबद्दल आभार मानतो, पण खरे तर मी अगदी हे निबंधासारखे लिहावे किंवा अशीच पोस्ट टाकुन द्यावी म्हणुन नाही लिहिले अगदी अंत:करणातुन लिहिले, तुम्हालाही ते आवडले हे माझे भाग्य. मृण्मयी, तुला पण विशेष धन्स.. मला वाटलच कोणी तरी हे विचारेल म्हणुन, तु मात्र हुषारच निघालीस आणी तुझ्या बरे लक्षात आले. असो तु थोडा वैयक्तिक प्रश्न विचारला तर ह्या सार्वजनिक बाफ़ चे भान ठेउन उत्तर देतोय. अगदी खर्र खर्र सांगायचे तर ती छत्री वाली माझी मैत्रिण (गर्लफ़्रेंड नव्हे ) अगदी अव्याज व निखळ मैत्री आहे आमची. का नसु शकते? कोणाला काही वाटो पण मला माझ माहित आहे. एवढच काय तीचा आवडीचा जोडीदारही मिळवुन दिलाय. ही मैत्री अशी आहे की आम्ही मनीच गुज, भावना विश्वासाने व्यक्त करु शकतो, अजुन काय लिहु? हो मला ईश्वरकृपेने खुप मीत्र, मैत्रीणी आहेत. तुला एक सांगु कदाचित अश्या प्रकारच्या मैत्रीतुन मी काय कुणीही स्वता:ला पुरुष म्हणुन व एकंदरीत स्त्रियांनाही थोडेफ़ार समजु शकतो ( वैसे लडकी क्या चीज है ये कोई समझ पाया है आजतक? ) पण सहजीवनातुन एकंदरीत जे काही कडु गोड अनुभव आलेत त्यातुन खुप काही शिकलो तर खुप काही शिकायचे बाकी आहेच तसे तर जीवनाच्या प्रवासात आपण शिकतच असतो, पण ह्या प्रवासाची तीच मजा आहे.. असो अधुन मधुन ते पण लिहिन.
|
Zakki
| |
| Monday, February 25, 2008 - 10:58 pm: |
| 
|
(ब) पैसे देऊन (भ्रष्टाचार) काम करवणे. मी मागे भारतात गेलो असता, या बाबतीत मी एक नवीन गोष्ट शिकलो. वास्तविक ते महाविद्यालय MBA चे (खरे खरे, माझ्या MBA सारखे नाही) होते. सर्व लोक सुशिक्षित, कायदेशीर, नि professionally वागणारे होते. पण भारतात काम करण्याची पद्धतच वेगळी आहे! ज्याला लोक लाच, वशिला म्हणतात, त्याला अमेरिकेत Interpersonal relationships असे गोंडस नाव आहे. आपल्यापेक्षा खालील दर्जाच्या व्यक्तींकडून सहकार्य हवे असल्यास, त्यांची खोटी खोटी स्तुति, त्यांना अधून मधून भेटी देणे हे इथेहि चालू असते. ओळखीच्या लोकांकडून सहकार्य लवकर मिळते. अनोळखी लोक, त्यात राजकारण इ. चा विचार करून दिरंगाई करतात, हे इथलेहि अनुभव. तर, मी जेंव्हा आमच्या Accounting विभागाबद्दल माझ्या मित्राकडे, जो Vice President होता, त्याच्याकडे तक्रार केली, तेंव्हा त्याने असे सांगितले, की एक तर ते लोकहि कामात असतात. मी म्हणूनच, तिकडे जाण्या आधी कॅंटिनला सांगून सर्वांसाठी चहा, बटाटेवडे पाठवतो. फारसा खर्च येत नाही. त्या लोकांनाहि कळते की आता मी येणार. मग ते तयारीत रहातात. हातातले काम आटोपून, माझ्या कामाचे कागद काढून तयार रहातात. मग माझे काम लवकर होते. त्याचप्रमाणे, मला आधी असे सांगण्यात आले, की कॉलेजमधून बाहेर फोन करायला परवानगी नाही. पण एकदा येता जाता मला ती फोन ऑपरेटर दिसली, तिला दुसर्या दिवशी १०० रु. चा चॉकलेटचा बॉक्स दिला. त्यानंतर माझे सगळे बाहेरचे फोन तिने लावून दिले. खालच्या मजल्यावरील उप प्राध्यापक, administrative लोक इ. साठी असाच एक २०० रु. चा चॉकलेटचा डबा पाठवला. त्यानंतर ते माझी कामे अगदी तत्परतेने करू लागले. तर आता त्या लोकांना काही पैशाची कमी होती, किंवा त्यांना चॉकलेटे मिळत नव्हती असे नाही, नि मला पण तेव्हढे पैसे जास्त नव्हते. पण आपुलकीने मी ते दिले. त्याचा उपयोग म्हणजे आमची interpersonal relationship सुधारली. असे असते ते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 26, 2008 - 3:26 am: |
| 
|
नंदिनी जर कुणाला एरिन ब्रोंकोविच मधला तो सीन आठवत असेल, तर माझे पोस्ट स्पष्ट होईल. ( या भुमिकेसाठी तिला ऑस्कर मिळाले होते. हि एक खरी व्यक्तिरेखा आहे आणि या सिनेमात तिनेही छोटीशी भुमिका केली होती. ) मी ज्या संस्थेचा उल्लेख केलाय तिथे बुद्धीचातुर्य वापरावे अशी अपेक्षा असते आणि तिथे आपले स्त्रीत्वाचे भांडवल करावे हे मला खटकते. ( पुरुष असे करु शकत नाही, याची खंत नाही, आनंद होतो. ) भक्ती बर्वेचे, अदा नावाचे हिंदी नाटक होते, त्यातल्या तिच्या एका पोझची आठवण झाली ( तिच अदा बरं का ) प्रा माधुरी शानभाग यांच्या एका लेखात, कोकणातील विधवा तरुण बायकाना, व्यवहारात पुरुष कसे फ़सवत असत याचे वर्णन होते, त्यातही पुरुषत्वाचे असे प्रदर्शन होते, पण तसे आता होत नसावे. असो आपण परत लाईट मूडकडे वळु या. तुमच्या विमानाचे बोर्डिंग झाले आहे. तरीपण दरवाजे बंद होत नाहीत. दिलेल्या बोर्डिंग पासाचा आणि विमानातील प्रवाश्यांचा हिशेब जुळत नाही. एअर होस्टेस अगतिक होवुन, ग्राऊंड स्टाफ़शी संपर्क साधतेय. आणि एक व्यकि खास गाडीने, धापा टाकत भरपुर सामान घेऊन येते. कोण असते ती ? नासिरुद्दिन शहाच्या, अगर ऐसा होता (CBDG) या सिनेमातल्या, एका व्यक्तीचे विमान का चुकते ? जरा लेट झालेले विमान उतरलेले आहे. अजुन दरवाजे उघडलेले नाहीत. सगळी पुरुषमंडळी बॅगा संभाळत उभी आहेत. अश्यावेळी एक व्यक्ति वरच्या कप्प्यातून, एक विचित्र आकाराची बॅग काढायचा प्रयत्न करते. आणखी एक विचित्र आकाराची आणि विचित्र आकारमानाची बॅग काढते. ( ती आणखी कुणी काढून द्यावी, अशी अपेक्षा असते ) तोपर्यंत काहितरी हरवलेय याची आठवण होते, मग सीटखाली, समोरच्या कप्प्यात शोधणे. तो पर्यंत विमानातल्या चिंचोळ्या मार्गिकेत ट्राफ़िक जॅम. !!! कोण असते ती व्यक्ती ? लक्षात घ्या, लाईटली घ्या, असे आधीच लिहिले होते.
|
Ladtushar
| |
| Tuesday, February 26, 2008 - 4:45 am: |
| 
|
>>> पण खरे तर मी अगदी हे निबंधासारखे लिहावे किंवा अशीच पोस्ट टाकुन द्यावी म्हणुन नाही लिहिले अगदी अंत:करणातुन लिहिले... समीर तू इतके छान, ववस्थित लिहिल्यावर का नाही आवडणार आणि पटणार... >>>तुला एक सांगु कदाचित अश्या प्रकारच्या मैत्रीतुन मी काय कुणीही स्वता:ला पुरुष म्हणुन व एकंदरीत स्त्रियांनाही थोडेफ़ार समजु शकतो... मैत्रीच्या सहजिवानातुन, एकमेकांचे विचार वाटून घेतल्यावर खुप काही शिकता येते! हे ही तेवधेच खरे...
|
Ramani
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:13 am: |
| 
|
मला वटते, पुरुषत्वाचा असा फायदा घेता येत नाही ही दिनेशदांची खरी व्यथा असावी. ~D मला वाटते, जर तिने स्त्रीत्वाचा वापर करुन काम करुन घेतले, तर तीचे काम करुन देणारा पुरुष, तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेतच होता ना? जर पुरुषांनी असे पघळणे बन्द केले तर कश्याला कुणी स्त्रीत्वाचा फायदा घेउ शकणार आहे? बायका फायदा उठवतात असे म्हणायचे आणि स्वत्: मात्र "तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे" अशी वर्तणुक ठेवावी हे एक प्रकारे हास्यस्पद आहे. पुरुषांनी स्वत्:ला मोहापसुन परावृत्त केले तर कोणीही स्त्री कसा फायदा उठवु शकणार आहे? जोवर हे होत नाही, तोवर समाजातल्या काही प्रवृत्ती असा फायदा घेणारच. आपल्या एसेटसचा फायदा उठवणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:40 am: |
| 
|
असा फ़ायदा न घेता येण्याची खंत नाही, आनंद होतोय, असे मी लिहिले आहे रमानी :-O) आणि माझ्यासाठी दोन्ही व्यक्ति निंदनीय. तो जर परस्पर खुषीचा मामला असता तर मला नाक खुपसायचे कारणच नव्हते, पण त्या संस्थेशी माझा निकटचा संबंध आल्याने वाईट वाटले. बाकी सगळ्या मुली त्या प्रवृत्तीला नैसर्गिकच म्हणताहेत. बरं वाटलं !!! जो जे वांच्छील तो ते लाहो.
|
Chyayla
| |
| Tuesday, February 26, 2008 - 12:13 pm: |
| 
|
हे नो झेप्स आपला जोडिदार आपल्यापेक्षा जास्त शिकलेला हव हे स्त्रीला वाटणे आणि पुरुशाने आपल्या पेक्षा कमी शिकलेला जोडिदार निवडने ह्यात power struggle/ego हे जास्त आहे असे वाटते. पेशवा, मी आधीच लिहिले की मी तक्रार मांडत नाहीये तर माझ्या अल्पबुद्धीनी वास्तव मांडतोय शिवाय त्यात वैज्ञानिक विश्लेषण, शास्त्रिय कारणमिमांसा नव्हे तर, अंतरीचे बोल आहेत. आता ज्याला त्याला स्वता:च्या बुद्धीने विविध दृष्टीकोनातुन किस पाडायचा तो पाडु शकता, पण मला जाणवलेले की जे असे आहे ते तसेच दाखवण्याचा प्रयत्न केला. अल्पबुद्धीने म्हणजे बुद्धी कमी आणी अंत:करण जास्त, दुसर्या शब्दात विचारापेक्षा भावना व्यक्त केल्यात.
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:44 pm: |
| 
|
सम्या लयी खास पोस्ट रे दिनेशदा विषयांतर होतय पण तुम्ही जे लिहिल आहे की पुरुषाना असा उपयोग करुन घेता येत नाही हे १००% खर नाही. पेज ३ पाहिलाय ना??? आणि अगदि रिअल लाइफ़ मधल उदाहरण आर्यन वैद CDBG ह्याने मध्ये असे आरोप केले होते की त्याचा "असा" फ़यदा घेण्याचा प्रयत्न झाला होता.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:40 pm: |
| 
|
अव्याज व निखळ मैत्री आहे आमची. का नसु शकते? अगदी असु शकते समीर! अनुभवली देखील आहे. खरंच गमतीत सुध्द्दा असा वैयक्तिक प्रश्ण जाहीररित्या विचारायला नको होता. (धुडकावून न लावता उत्तर दिलंस हा तुझा मोठेपणा!)
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 27, 2008 - 3:14 am: |
| 
|
झकास, विषयांतर नाही रे. आजच्या जगात आम्हीच मुर्ख ठरतो. आम्ही आपल्या संभाषणचातुर्यावर, ज्ञानावर, नीटनेटकेपणावर, तार्किक विचार करण्याच्या शक्तिवर विसंबून राहतो. शारिरिक सौंदर्यापेक्षा हे गूण, जास्त शाश्वत, चिरकाल टिकणारे आहेत असा समज आहे. आणि अजुनतरी त्याला फारसा धक्का बसलेला नाही. यापलिकडे आपल्याकडे काही असेट्स आहेत, त्यांचा उपयोग करता येतो, नव्हे करावाच, अशी जगाची रित आहे, याची कधी जाणीवच झाली नव्हती. आणि त्या वैद्यबाबाचे नुसते चिरगुट गुंडाळुन काढलेले फोटो बघितलेत कि. जे हवय ते मिळवण्यासाठीच त्यानी मोल दिले असेल, आणि मोल देऊनही हवे ते न मिळाल्याने, असा कांगावा केला असेल. पेज थ्री हे अत्यंत घृणास्पद प्रकरण असले तरी ते विश्व मर्यादित आहे. ती जीवनपद्धति आयुष्याच्या सगळ्याच क्षेत्रात नको रे बाबा.
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 27, 2008 - 3:26 am: |
| 
|
>>पेज थ्री हे अत्यंत घृणास्पद प्रकरण असले तरी ते विश्व मर्यादित आहे. ती जीवनपद्धति आयुष्याच्या सगळ्याच क्षेत्रात नको रे बाबा.<< Is this a joke? You mean to say that it is only related to certain class/ certain profession/ certain layer of society? It is present everywhere. Only that it is concealed or done subtly at many places.
|
Maanus
| |
| Wednesday, February 27, 2008 - 5:27 am: |
| 
|
Sir, I am sorry for this post. but I think you live in some kind of fairy land or something of that sort. All your posts sound so weird. I am sorry if this is offending post, but I had to say it since a long time.
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 27, 2008 - 5:43 am: |
| 
|
का रे बाबानो, एकदम विंग्रजीत का ? अज्जुका जर ते छुप्या रितीने केले जात असेल तर ते वाईटच असावे ना. ? माणुस, सर म्हणुन घ्यायची माझी योग्यता नाही. कदाचित वयामुळे आणि वादळी आयुष्यामुळे, मी जगाचा तुम्हा सगळ्यापेक्षा जास्त अनुभव घेतला आहे. मूल्य जपणारी माणसे थोडी आहेत. पण आहेत. मला भेटली. आणि ती भेटली म्हणुनच इथवर आलो. मूल्य जपणे हा वियर्डपणा ( म्हणजे विक्षिप्तपणा ना ?) ठरतोय का ? आणि सागर जर हे पोस्ट मला उद्देशून असले तर वाईट वाटुन घ्यायची गरज नाही. मला सवय आहे, अश्या प्रतिक्रियांची.
|
Maanus
| |
| Wednesday, February 27, 2008 - 11:21 am: |
| 
|
i am sorry, i dont know what was i thinking and why did i write that message. apologies
|
Athak
| |
| Wednesday, February 27, 2008 - 3:48 pm: |
| 
|
ये क्या हो रहा है पुरुष जन्मा
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|