|
Divya
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:57 pm: |
| 
|
काही काही लोक तर सोयीने पुणेकर आणि सोयीने .. कर, बर का. नाव ठेवायला म्हणल कि आम्ही नाही बा पुणेकर आणि भाव खायचा असला कि हो हो आम्ही पण पुणेकर आहोत म्हणायच. आता त्या .. च्या जागी आपापल्या दुसर्या गावाच नाव लावायच सोप आहे ना.

|
Zakki
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:29 pm: |
| 
|
पाखंडीपणा आपण कधी सोडणार यात पाखंडीपणा काय? मी असे मुळीच म्हंटले नाही की त्याचे काही चुकले. मी आपले काय झाले ते सांगितले. तुम्हाला उगीचच असे का वाटले की यात काही चुकले? हे पुणेकर असलेच. कुणि काही सत्य सांगितले, तरी एकतर कुत्र्यासारखे अंगावर येणार, नाहीतर रडत बसायचे, सारखे सारखे आम्हालाच का बोलता! सगळ्या प्रसंगाकडे केवळ विनोदी प्रसंग म्हणून बघा की! मग त्यात काही वाटणार नाही. नि अहो दिव्या, मीच तसे करतो. कारण पुण्यात राहिल्याचा परिणाम! (म्हणजे तेव्हढा शहाणपणा फक्त पुण्यातच असतो, इतरांना ती गंमत कळत नाही!)
|
Pha
| |
| Wednesday, February 20, 2008 - 7:13 am: |
| 
|
>>कुणि काही सत्य सांगितले, तरी एकतर कुत्र्यासारखे अंगावर येणार, नाहीतर रडत बसायचे, सारखे सारखे आम्हालाच का बोलता! झक्की, खरंतर ती 'कुत्र्यासारखं अंगावर येणार' वगैरे उपमा तुमच्याच वर्तनाला जास्त शोभून दिसत नाही का? नाही, म्हणजे तुम्ही पुणेकरांच्या वर्तनावर (आणि तुमच्या 'विशेष' खप्पामर्जीतल्या मंडळींवर) प्रत्येक वेळेला धावून धावून पोस्ट टाकता त्याला 'भुंकणे' म्हणणार नाही तर अजून काय?
|
Bee
| |
| Wednesday, February 20, 2008 - 11:00 am: |
| 
|
खूप दिवसानंतर आज हा बीबी वाचला. खरच अफ़लातून आहेत ही वाक्यं. इतके शुद्ध आणि साहित्यीक मराठी वाक्य पुण्यातच वाचायला मिळतील.
|
Zakki
| |
| Wednesday, February 20, 2008 - 8:01 pm: |
| 
|
बरे बाबा. आजपासून (काही दिवस तरी) पुणेकरांच्या वर्तनावर भुंकायचे लिहायचे नाही. अगदी त्यांनी काहीहि केले तरी! अर्थत् इतर लोकांनी काहि लिहीले तर त्याला मी काय करू?
|
Ramani
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:31 am: |
| 
|
झक्की तुम्ही चालु ठेवा पोस्टणे, ज्यांना आवडत नाही, त्यांनी वाचु नयेत, अश्या अर्थाची जा.सु. आपण या बा. फ. च्या सुरुवातीला टकुन देउ. मग कसे अगदी पुण्यतल्यासरखे वाटेल. हा दुवा बघा. http://www.busybeescorp.com/puneripatya/
|
पुणेरी पाट्या काय म्हणता... " पुणेरी विनंतीवजा आज्ञाफलक " म्हणा.
|
Zakki
| |
| Thursday, February 21, 2008 - 11:02 pm: |
| 
|
ज्यांना आवडत नाही, त्यांनी वाचु नयेत असली साधी पाटी त्या गावात चालत नाही. 'खबरदार इथे आलात तर. अपमान झाल्यास आम्ही जबाबदार नाही. (आणि तो होईलच)' अशी पाटी लावायला हवी. तरी तत्वाचा प्रश्न असल्याने ते येतीलच नि पुन: आपण काऽहीहि लिहीले तरी त्यांना नावे ठेवतो असेच समजतील. स्वत: ते ' काय सुंदर आहे मुलगी' असे म्हणून थांबत नाहीत, 'ती या माणसाचीच आहे हे खरेच वाटत नाही' असेहि म्हणतात! आता हे दुसरे वाक्य बोलायची गरज होती का? पण निव्वळ प्रशंसा करणे हे त्यांच्या रक्तातच नाही. कुणाचे तरी काहीतरी उणे काढलेच पाहिजे! मग यांना कुणि काही नावे ठेवली तर मात्र राग येतो.
|
Zakki
| |
| Thursday, February 21, 2008 - 11:09 pm: |
| 
|
ता. क. पेटत्या मशाली घेऊन इकडची आग तिकडे, सगळीकडे पसरवणे हा माझा उद्योग आहे. कारण मला दुसरे काही काम नाही!
|
Shrini
| |
| Friday, February 22, 2008 - 6:32 am: |
| 
|
क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जनः किम करिष्यती अतृणे पतितो वन्ही स्वयमेव उपशाम्यति :D
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 10:01 am: |
| 
|
वा सुरेख आहे.. ..
|
(लहानपणी आपण च च्या भाषेत बोलायचो तशी) संस्कृतात हळूच आयडीया दिली की काही लोकांना कळणार नाही असा प्लॅन दिसतोय. असो पण श्लोक सुंदर आहे आणि चपखल.
|
Ramani
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:18 am: |
| 
|

|
Ramani
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:36 am: |
| 
|

|
Ramani
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:52 am: |
| 
|

|
Itgirl
| |
| Tuesday, February 26, 2008 - 12:13 pm: |
| 
|
रमणी, सही पाट्या शोधल्या आहेस!!
|
Zakki
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:35 pm: |
| 
|
चांगल्या स्पष्ट शब्दात लिहील्यात. नि बरोबर पण आहेत. इथे अश्या पाट्या नसतात. पण वस्तूंचे भाव आकाशाला भिडवून मग वाट्टेल तितके रस्सा, कढी कांदा, लिंबू घ्या असले काहीतरी वाया घालवण्याचे प्रकार करण्यापेक्षा, भाव वाजवी ठेवून पुरेसे खायला देणे हेच बरोबर आहे. त्यांना जसे अनुभव आले असतील त्याप्रमाणे त्यांनी लिहीले. कुणाचा अपमान होत असेल तर त्याने येऊ नये तिथे. भारतात लोकांना स्वत:हून शिस्त कुठे आहे? कुणितरी फटकारल्याशिवाय मधे घुसणे, दुसर्याच्या जागेवर अतिक्रमण करणे असले प्रकार अत्यंत सुशिक्षित नि श्रीमंत लोकांकडूनहि होत असतातच.
|
Bee
| |
| Tuesday, February 26, 2008 - 3:30 pm: |
| 
|
रमणी, पहिली पाटी अफ़लातून आहे. खरच अशा पाट्या हव्याच भारतात. कारण खूप जणांना नाक शिंकरायची आणि गळा खाकरायची इतकी घाण सवय असते बेसिनमधे की त्यांचे ते आवाज ऐकून शिसारी येते. झक्की, अजिबात ऐकत नाहीत हं :-)
|
सोसायटीतले लोक सोसायटीचा सामायिक संडास कशाला वापरतील? ( Unless they're driven out by quarrelling family members- त्याही परिस्थितीत कुणी तसले 'मानवी हक्क' सहसा डावलत नाही!!)
|
ता.क.- आणि घरी आलेल्या पाहुण्यांना सोसायटीच्या संडासात पाठवण्याइतकी पुणेरी आतिथ्याची मजल गेली नाहीय!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|