|
Ladtushar
| |
| Tuesday, February 19, 2008 - 10:53 am: |
| 
|
आवडता छन्द असेल तर तो चंगळवाद म्हणू शकत नाही, पण का जर चंगळ करणे हीच आवड असेल तर त्याला काय बोलणार!!!, मग अश्या वक्तिंचा हा चंगळवाद त्याला हौस आहे किंवा असते एखाद्याची हौस असे म्हणुन पठीशी घातली जाते...
|
Zakki
| |
| Tuesday, February 19, 2008 - 11:47 am: |
| 
|
जुने (नसले तरी वाटणारे... ) तसेच नवे (असले तरी न वाटणारे) सुद्धा अनेऽऽक असतात. तिथे लोकांकडे ५-६ जोड असतात. अंदाज चुकला तुमचा, २५ - २६ म्हणालात तर मध्यमवर्गाकडेच असतात. इमेल्डा मार्को कडे शेकड्यानी होते म्हणे!

|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 11:53 am: |
| 
|
मी आधिच स्पष्ट केल आहे की, चंगळवाद हा वक्ती सापेक्ष असतो. आता कुणाल २ बादल्या पाणी घेउन आंघोळ करायला आवडते. पण ती हौस नाही हा चंगळवादच.. असच जर कोणी म्हणले कि, ग्रंथालयात पुस्तक असतात ति आणुन वाचावी, विनाकारण कशाला विकत घ्यायची?? ह्यासाठी माझ उत्तर होत कि तो माझा छंद आहे कोणी काहीही म्हणो
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:40 pm: |
| 
|
>>जुने कपडे (लहान झालेले, खराब न झालेले) असतील तर त्याची पायपुसणी किंवा हात पुसणी करण्या पेक्शा गरजु व्यक्ती ला वापरायला देणे हा मला चंगळवाद नाही वाटत.<< माझं पोस्ट नीट वाचाल का? मी म्हणालेय की असे कपडे जे कुणाला देता येत नाहीत आणि आपणही घालू शकत नाही. उदा: वापरून जुने झालेले बनियन्स ही गरजू माणसाला देण्याची गोष्ट नव्हे. गरजू आहे म्हणून त्याचा असा अपमान करणं मला नाही पटत.
|
Bee
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:21 pm: |
| 
|
दक्षिणा, डायरीला घरीच कपड्याचे कव्हर! छान युक्ती आहे. मी पुर्वी कधी विचार केला नाही असे करता येईल म्हणून. फ़क्त पेपराचेच कव्हर बनवायला येते. आता तर कव्हर घालणे ही सवय देखील राहिली नाही. वर कुणी तरी लिहिल की चंगळवाद सापेक्ष आहे. विचार केल्यावर असे वाटके की कुणालाही आपण जेंव्हा असे म्हणतो की 'तू अमूक गोष्टींबाबत चंगळ करतोस', तर त्याला ते आवडणार नाही. हे वाक्य ऐकणार्याने इतरांच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण चंगळ करतो आहे की सोयीखातिर तसे करतो आहे हे लक्षात येते. पुर्वी मलाही असे बोललेले पटायचे नाही पण आता मी सन्मुख होऊन विचार करतो तेंव्हा काय चुक नि काय बरोबर हे ध्यानात येते.
|
Maanus
| |
| Tuesday, February 19, 2008 - 9:39 pm: |
| 
|
कन्नड भाषेत एक म्हण आहे, त्याचा मराठी शब्दशः अर्थ असा की आपन कपडे लोकांसाठी घालतो व जेवण स्वतःसाठी करतो. म्हणजे आपले कपडे, बुट, गाडी, घरातली बैठक वैगेरे हे सर्व टापटीप असावे, कारण त्याचा उपयोग आपल्यापेक्षा लोकांसाठी जास्त असतो. मला स्वतःला एकाच शर्ट पॅन्ट मधे रोज ऑफिसला गेलो तरी काही वाटनार नाही, पण माझ्या बॉस ला, client ला, माझ्या आजुबाजु च्या लोकांना ते पटेल का. नाही. स्वतःची प्रगती व्हावी व काळाची गरज म्हणुन टापटीप रहावे. पण अमुक अमुक म्हणतो म्हणुन फक्त पालेभाज्याच खाणे मला जमेल का, तर नाही. ते जेवण शरीर ठिक टेवण्यासाठी असते, भौतीक गोष्टींनी शरीर सुद्रुढ रहात नाही, म्हणुन आपल्याला पटेल तसे जेवण करावे. -------------------------------------------- जमेल तेव्हा पेपर वापरणे टाळावे, पण वापरायचाच नाही असा अट्टाहास, किंवा अतिरेक करु नये. जुन्या गोष्टी ठिक असतात, पण त्यांनी झुरळ, ढेकणांना खतपानी मिळते. जुन्या कपड्यांमधे घाम असतो, ज्याच्याकडे ढेकुण आकर्षीत होते. झुरळे तर काय कोठेही जातातच.
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 20, 2008 - 3:18 am: |
| 
|
या बीबीवर फारच टोकाची चर्चा चालली आहे... डायरीला कापडाचे कव्हर, कपडे जपुन ठेवुन ते फडकी म्हणुन वापरणे.. ई...ई घरात कपडे ठेवायला जागा नाही बर्याच लोकांकडे. १ BHK मधे लोक काय काय ठेवणार?.. २ BHK ही पुरत नाही. तेव्हा जुने कीती साठवणार आणि कधी वापरणार? १३-१३ तास, सकाळी ६.३० ते रात्री ८.०० असे शेड्युल असते लोकांचे.. त्याना ह्या गोष्टी पटल्या तरी वळत नाहीत. देशातली परीस्थिती कमालीची तणावपुर्ण असते.. या ना त्या कारणाने.. त्यात या गोष्टी त्यानी कशा कराव्यात? दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण प्रत्येक बाबतीत एव्हढे टोक गाठु लागलो... तर मग गाडी, पीसी, टीVही, रेडीओ या सर्व चंगळवादाच्या गोष्टी ठरतात. खुप वेळ असल्याशिवाय एव्हढे टोकाचे काटकसरीचे विचार सुचणे अशक्य आहे असे वाटते.
|
Ladtushar
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:59 am: |
| 
|
पंत तुमचे अगदी बरोबर आहे... चंगळवाद म्हणजे कुठल्याही वापरण्या, खाण्या, उपयोग करण्या जोग्या वस्तुचा निरुपयोगी अतिरेक करणे....आणि हे प्रतेक वक्तिच्या आर्थिक, शारीरिक, भोगोलिक, मानसिक, स्वाभविक, आणि सामाजिक परीस्थीती वर अवलंबून आहे... :D
|
Dakshina
| |
| Wednesday, February 20, 2008 - 6:21 am: |
| 
|
आमचेही वेळापत्रक हे सकाळी ७.४५ ते रात्री ८.४५ असे आहे. (झाले ना १३ तास?) पण आम्ही हे उद्योग सगळे सुट्टीच्या दिवशी करतो. डायरीला जुन्या कपड्याचे कव्हर या गोष्टीकडे काटकसर म्हणून पाहाण्या ऐवजी कल्पकता म्हणून पाहीलं तर बरं होईल. आणि वेळ काय, कुणाकडेच नसतो, तो काढावा लागतो. ( हे माझं वाक्यं पुस्तकी वाटू शकेल, पण इलाज नाही.) कारण मला स्वतःला ते पटलेलं आहे. मला मोठं घर ही चंगळ वाटते. मोठी घरं आणि मोठ्या गाड्या... लोकांना लागतात कशाला देवच जाणे. कुटूंब मोठं असेल तर गोष्टं वेगळी. पण आजकाल नवरा बायको आणि एक मूल असलं तरिही २ BHK घरं लागतात.
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 20, 2008 - 8:04 am: |
| 
|
मोठी घरे, मोठ्या गाड्या, उत्तम कपडे, रुंद रस्ते... जेव्हडे काही मोठे वापरु शकाल तेव्हडे वापरा.. बाजारात गेलात की एक्च साबण नका आणु.. तीन चार दहा खरेदी करा. घरी आल्यावर तुम्हालाच बरे वाटेल. मन ही असेच विस्तार असलेले होईल.. आपोआप. मन ही मोठे होईल. आधी बाहेरुन सुरुवात करा. कुणाला ईछ्छा आहे मोठी जागा सोडुन लहान जागेत राहण्याची?.. कुणीही सांगाव. नवरा बायको आणि एक मुल याना कमीत कमी टु बेईचके घर तरी हवच हव. काटकसर, गरज आणि चंगळ याचा ईथे चमत्कारीक मेळ घातला जातोय असे नाही वाटत?
|
Arc
| |
| Wednesday, February 20, 2008 - 8:45 am: |
| 
|
2 BHK is must स्वत्:ची space जपण्यासाठी मुलाना वेगली खोली मला अत्यन्त आवश्यक वाटते. आणि मला असेही वाटते की मुलाना वेगळी खोली देता येत नसेल तर त्यान्ची सन्ख्या मर्यादीत ठेवावी. तसेही माणुस हाच चन्गळवादी प्राणी आहे,त्यची सन्ख्या कमी ज़ाली की चन्गळवादही कमी होइल
|
Soha
| |
| Wednesday, February 20, 2008 - 9:19 am: |
| 
|
चंगळवाद कशाला म्हणावे ह्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. पण चंगळवादमुळे रोजगारनिर्मिती होते, उद्योगधंद्याल चालना मिळते. हे लक्श्यात घेणे आवश्यक आहे. पाश्चात्य राष्ट्रांमधे उद्योगधंदे अधिक वाढले ह्याला काही प्रमाणात तरी त्यांची चंगळवादी जीवनशैली कारणीभूत आहे.
|
>>कुणाला ईछ्छा आहे मोठी जागा सोडुन लहान जागेत राहण्याची?.. >>काटकसर, गरज आणि चंगळ याचा ईथे चमत्कारीक मेळ घातला जातोय असे नाही वाटत? ही दोन्ही विधानं मान्य. चंगळवाद हा प्रकार वैयक्तीक रित्या हॅंडल करता येईल असं वाटत नाही. प्रत्येक पिढीवरच्या एकत्रित संस्कारांवर ते अवलंबून आहे. तरीही छोट्या मुलांचे वाढदिवस मॅकडोनाल्ड्स किंवा पिझा हट मधे साजरे करणं, चव ना ढव असले कोक पेप्सी सारखे द्रव फॅशन म्हणून घशाखाली ओतणं, शाळांच्या खोल्यांना एसी बसवणं (फॉर दॅट मॅटर बेडरूमला किंवा ऑफिसेस ना सुद्धा) असे प्रकार मला चंगळवादात मोडणारे वाटतात. ज्या गोष्टीने तुमच्या मनाच्या प्रसन्नतेमधे वाढ होणार आहे अशा एखाद्या गोष्टींवर उधळपट्टी करणं ठीक आहे पण त्याचं व्यसन लागू नये. दरिद्रीपणा, कंजूसपणा करू नये पण कुठल्याही गोष्टीवर हवा तेवढा पैसा खर्च करण्याच्या आहारी गेलं तर तो चंगळवादच होईल. माझ्या पिढीच्या एकत्रित संस्कारात या गोष्टी गरज या सदरात निश्चितच बसत नाहीत आणि या समजुती पुढं मोडीत निघतीलही(निघतीलच खरं तर) तरीही आता मी त्या बदलू शकत नाही. मला चांगली पुस्तकं खाणं, कपडे, दागिने हे विकत घेणं, चांगल्या ट्रिप्स ना जाणं, चांगले कार्यक्रम बघणं हे चंगळवादात मोडतं असं वाटत नाही पण याबाबत प्रत्येकाची मतं वेगळी असणार. पुढच्या आणि मागच्या पिढ्यांची तर नक्कीच. (हे लिहीतालिहीता मीच कन्फ्युज होतेय आणि चंगळवाद हा शब्द फक्त आपल्या मध्यमवर्गीय शब्दकोषातच असेल असं वाटतंय. )
|
Hkumar
| |
| Wednesday, February 20, 2008 - 9:55 am: |
| 
|
परंतु, हे फसवे समर्थन आहे. चंगळवादातून वाढलेले उद्योग शेवटी उपलब्ध संसाधनांचा लवकर नाश करतात व त्यामुळे मानवी विनाश जवळ येतो. जर्मन विचारवंत शूमाखर यांचे small is beautiful हे वचन याबाबतीत अगदी मर्मिक आहे.
|
Arc
| |
| Wednesday, February 20, 2008 - 10:24 am: |
| 
|
हो, पण एवध्या मोठया populationa ला रोजगार हवा असेल तर चन्गळवाद हवाच
|
Bee
| |
| Wednesday, February 20, 2008 - 10:31 am: |
| 
|
करणं, चव ना ढव असले कोक पेप्सी सारखे द्रव फॅशन म्हणून घशाखाली ओतणं>> खरच संघमित्रा, अगदी मनातली बोललीस. माझ्यासाठी हे द्रव्य धडा ना गोडाचे आहेत तुला कदाचित माहिती नसेल पण परदेशात जेवायला जर बाहेर गेलो तर पाण्या ऐवजी असेच द्रव्य विकत घ्यावे लागतात. देशी लोक देखील ही सवय आनंदाने स्विकारतात. कारण फ़ॅशन अमलात आणायला कुणाला बरे वाटणार नाही! मुलांची खेळणी हा देखील चंगळवादाचा विषय होऊ शकेल. दरवेळी मी येथून घरातील मुलांकरिता खेळणी घेऊन जातो. पण ही मुल जितकी खरोखरीच्या कुत्र्याला वा मांजरीला खेळणी म्हणून जवळ करतात त्या तुलनेने बनावटी खेळणींसोबत खेळत नाही. पण खरोखरीचा कुत्रा वा मांजर ह्याच्यापासून आपण मुलांना लांबच ठेवतो.
|
Bee
| |
| Wednesday, February 20, 2008 - 10:42 am: |
| 
|
चंगळवादातून वाढलेले उद्योग शेवटी उपलब्ध संसाधनांचा लवकर नाश करतात >> कुमार ह्याचा अर्थ काय, एखादे उदा. मिळेल?
|
Akhi
| |
| Wednesday, February 20, 2008 - 11:55 am: |
| 
|
१. १ लि. कोक बनवताना ९ लि. पाणी वाया जाते. २. अनावश्यक furniture करताना, किति तरी लाकुड वाया जाते. ३. tissue paper साठी लागणारा कागद त्यासाठी होणारी जंगलतोद असे अनेक आहेत.
|
Dhondopant
| |
| Wednesday, February 20, 2008 - 12:46 pm: |
| 
|
संघमित्रांनी जे म्हटले आहे ते बरोबर आहे... .ज्या गोष्टीने तुमच्या मनाच्या प्रसन्नतेमधे वाढ होणार आहे अशा एखाद्या गोष्टींवर .... मन करारे प्रसन्न| सर्व सिद्धींचे कारण्|| अशी मनाच्या प्रसन्नतेची महती आहे. मन प्रसन्न कधी होते ते सर्व करावे. च्म्गळ करुन ईंद्रीयाना क्षणिक त्रुप्ती मिळते.. पण काही creative केल्यानेच मन प्रसन्न होते. जसे डायरी ला कव्हर घालणे ई. ई... चंगळ म्हणजे काय हे व्यक्तीसापेक्ष आणि कालसापेक्ष आहेच. जुन्या जमान्यात बाहेर दोन रुपयांचा शिनीमा तो ही जत्रेत आणि मग भेळ खायची ही पण एक्प्रकारची चंगळ वाटत असे.. भैरच काय बी खाणे ही चंगळच असायची..(कोल्हापुरकडच्या लोकाना जत्रा आणि ते पाळणे, भेळ ती बी चिंचेच पाणी आणि भरपुर कांदा घालुन.. यात काय मजा असते ते माहीती असेल.... नंतर उसाचा रस ) आज ती परीस्थिती नाही.. शिकलेसवरलेला मुली अगदी खेड्यातल्याही बाहेर जावुन खातात यात त्याना चंगळ नाही वाटत. मुलांचे ही तसेच आहे.. आमच्या लहानपणी चार आण्याची दोन पारले बिस्कीटे घेण्यासाठी आम्हाला चार आणे मिळत... आज चार आणे चालत पण नाहीत. कीती पैसे लागतात हे आपण पाहातोच. ईतर अनेक गोष्टी आहेत... तारत्म्माने घ्यायच्या आहेत आणि काय?.. कस म्हंता?
|
Zakasrao
| |
| Thursday, February 21, 2008 - 4:45 am: |
| 
|
बी एक उदाहरण आहे आताच ते म्हणजे ओज़ोनच्या थराला पडलेले छिद्र आणि ग्लोबल वॉर्मिंग. माणसाच्या अतिसुखाच्या हव्यासापोटीच घडलय हे. ओझोनच्या थराला पडलेल छिद्र हे आधी जे रेफ़्रिजरेटर आणि A/C वापरायचे त्याच्यामुळे आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|