|
Farend
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:10 pm: |
| 
|
जास्त वेळ बसून... थोडा वेळ बसून तसे प्रकार केले तरी चालतील
|
Psg
| |
| Thursday, December 06, 2007 - 7:36 am: |
| 
|
हा प्रभात टॉकीजमधला नमुना

|
Gsumit
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:52 pm: |
| 
|
पुनम, ही नक्कि एखाद्या खिसेकापुची आइडिया असणार...
|
Psg
| |
| Friday, December 07, 2007 - 5:38 am: |
| 
|
ही अजून एक.. कसला कॉंफिडेन्स आहे ना.. दुकान पहा ना आणि खालचं कसलं आहे ते!! खूपच आवडली मला ही पाटी

|
पूनम. जबरी आहे गं पाटी.
पण काही म्हणा मराठी भाषा समृद्ध (झाली तर) पुण्यातच होणार. ही असली ठसकेबाज वाक्यं ठळकपणे पाटीवर लिहायची हिम्मत फक्त तिथेच.
|
Dakshina
| |
| Friday, December 07, 2007 - 6:45 am: |
| 
|
ही पाटी मला आज कुणितरी मेल केली.. 
|
Dakshina
| |
| Friday, December 07, 2007 - 6:52 am: |
| 
|

|
श्या... शिंचा हा बीबी बंद करा नाहीतर या बीबी चे नाव तरी बदला.. पुणेरी नमुने अशा उपमर्दकारक नांवापेक्षा " अपुणेकरांना पुणे हे असे दीसते " असा पुण्याच्या वैशिष्ट्यपुर्ण जीवनशैलीचा मागोवा घेणारे नाव का ठेवु नये? पुणेरी लोक पाट्या लावतात कारण तुम्हालाच त्रास होवु नये म्हणुन. पाटी ही एक सुविधा आहे. अपुणेकरांना ती दुविधा वाटते यांत पुणेकरांची काहीही चुक नाही. स्वताचा वेळ आणि पैसा खर्च करुन पाटी लावणार्या पुणेवासीयांचे आभार मानण्याचे सोडुन त्यांची अशी खिल्ली उडवणार्या अपुणेकरांचा आम्ही निषेध करतो. बहुतेक ते अपुणेकरच असावेत. पुण्यातल्या पाट्या वाचल्यान ना तरी मराठी सुधारेल तुमचे... हों..!
|
मी परदेशी येउन सुध्धा पुणेरी पाट्यांचा करिष्मा दाखविणे सोडले नाहि आहे. माझा रुम पार्टनर अतिशय गांजाड्या आहे( चेन स्मोकर) मी त्याला अनेकदा सांगीतले कि तुला सिगारेट ओढायची असेल तर बाहेर जाउन ओढ ईथे नको. मला त्रास होतो. अजिबात ऐकत नाहि. त्याचे दोन चार मित्र पण जे आमच्या रुम वर पडिक असतात ते सुध्धा आमच्या रुम वर बिनधास्त सिगारेट ओढतात. मग मी एक नो स्मोकिंग चा बोर्ड आणुन लावला तरि या निर्लज्ज लोकांवर परीणाम नाहि. मग दुसरा बोर्ड लावला" ओनली बा**ड्स कॅन स्मोक इन धिस रुम " सगळे जण बाहेर जाउन सिगारेट ओढतात आता.:-) पुणेरी पाट्या वाचण्याचा असाहि उपयोग होतो बरे.
|
Zakki
| |
| Monday, January 28, 2008 - 11:24 am: |
| 
|
पुण्यातल्या पाट्या वाचल्यान ना तरी मराठी सुधारेल तुमचे... हों..! ते कसे बुवा? 'याद है तो ... 'वगैरे वाक्य मराठीतच आहे असे समजतात का आजकाल? काही सांगता येत नाही, इतर भाषा वापरून आपली भाषा 'समृद्ध' होते, त्यातला प्रकार असावा!
|
काल मी मराठी वर सलाम पुणे पाहिला. अत्यंत भंगार कार्यक्रम होता. फ़क्त फ़्लाशेस होते पुणेरिपणाचे. हा प्रमो होता की स्टेज वरील कार्यक्रम अस्साच आहे?
|
Jaideep
| |
| Sunday, February 17, 2008 - 8:22 pm: |
| 
|
पुण्यातल्या पाट्याच नाहीत तर लोकही नमुनेदार आहेत. मी एकदा सिंहगड रोडवरच्या चितळ्यांच्या franchise मधुन पेठा घेतला. दुकनातुन बाहेर पडल्यावर लगेच पुडी उघडुन एक तुकडा तोंडात टाकायचा मोह आवरला नाही. पण लक्षात आल पेठा खराब झाला होता. जवळच असल्याने परत दुकानात गेलो आणि त्याना सांगितलं तर आधी तयारच होत नव्हते की पेठा खराब असु शकतो. मी म्हटलं तुम्ही चाखुन बघा. त्यानी चाखुन बघितल्यावर खराब आहे हे मान्य केलं. खरी गम्मत पुढेच आहे. मग मी जो एक तुकडा खाल्ला त्यामुळे वजन जितकं कमी झालं, तितक्या कमी वजनाचा पेठा मला परत केला. मुंबईत एखाद्या ठक्कर नाहीतर ब्रिजवासी कडे गेलो तर नुसती चखायला म्हणुन १०० ग्राम मिठाई देतील.
|
Anaghavn
| |
| Monday, February 18, 2008 - 11:31 am: |
| 
|
अरे जयदीप ते "चितळे" आहेत म्हटलं आणि त्यातुन पुण्यात रहतात. जेव्हढ्यास तेव्हढे असं त्यांच धोरण.
|
Zakki
| |
| Monday, February 18, 2008 - 3:29 pm: |
| 
|
पुणेरी विक्रेता: एकदा चितळ्यांकडे गेलो नि अर्धा किलो मिठाई मागीतली. विक्रेत्याने एक प्लास्टिकची पिशवी घेतली नि त्यात तो मिठाई भरू लागला. पण पिशवी भरल्यावर वजन केले तर ते जेमतेम ३०० ग्रॅम भरले. तर तो विक्रेता म्हणतो, या पिशवीत आता जास्त मावणार नाही, तर तुम्ही ३०० ग्रॅमच घ्या. मी म्हंटले मला अर्धा किलो आणण्याची आज्ञा आहे घरून, कमी आणली तर माझा शिरच्छेद होईल. त्यापेक्षा तिथेच इतर पिशव्या आहेत त्यातली जरा मोठी पिशवी का घेत नाही? तर तो म्हणाला अर्ध्या किलोच्या पिशव्या संपल्या आहेत, नि एक किलोच्या पिशवीत अर्धा किलो माल दिला तर मालक रागावतो. तर मी म्हंटले मग दोन छोट्या पिशव्यात दे. तर तो म्हणाला असे कसे, एक ऑर्डरला एकच पिशवी! वर मला म्हणतो, अहो ३०० ग्रॅम म्हणजे जवळ जवळ अर्धा किलोच की. त्यात काय? मी नाही म्हणताच तो म्हणला मग तुम्ही दुसर्या दुकानात बघा!! तरी मी चिकाटीने म्हंटले की अर्धा किलोच्या पिशव्या कधी येतील? मी आधी फोन करून पिशव्या असतील तेंव्हा येऊ का? तर तो म्हणाला आम्ही अशी माहीति देत नाही फोनवरून! अश्या रीतिने पूर्ण पराभव होऊन मी माघार घेतली! असे आहेत आमचे भारतीय शूरवीर, उगाच अमेरिकेहून आला म्हणून भाव देत नाहीत! ' They are म्हणजेऽ फारच you know अगदी हेऽ, I mean स्वाभिमानी' असे मला सांगितले.
|
Mansmi18
| |
| Monday, February 18, 2008 - 4:04 pm: |
| 
|
खरी गम्मत पुढेच आहे. मग मी जो एक तुकडा खाल्ला त्यामुळे वजन जितकं कमी झालं, तितक्या कमी वजनाचा पेठा मला परत केला. ----------------------------------------------- भन्नाट!
|
पूनम, खतरनाक पाटी... फार हसलो झक्की, जयदीप, सहीच.
|
झक्की... तुम्ही घरातुन पिशवी का नाही नेली? तुम्ही पेठा आणायला गेला होतात. पिशव्या नाही. तुम्ही परत बाहेर येवुन २०० ग्राम खरेदी करावयास हवा होता. हेच अमेरीकेत जाहले असता.. त्यांची आणिक कैसी आगळी दुनिया आणि कैसी ती शिस्त यैसी भलावण आपणच करु जाणे. हा पाखंडीपणा आपण कधी सोडणार?.. म्हणजे अखिल भारतीय पातळीवर बोलतोय मी.. लक्षात आले असेलच.
|
Manuswini
| |
| Tuesday, February 19, 2008 - 8:41 am: |
| 
|
जयदीप, सही, अगदी हो.. मुंबईचा कुठलाही पंजाबी घसिटाराम पकडा का चंदूराम अगदी अक्खा तुकडा ठेवेल चवीला मागीतला तर.... मग ती शुद्ध तूपातली बालुशाही असो वा गरम जलेबी... ते पुण्यात उणे काय म्हणतात ते हेच वाटते दिवे घ्या हो अक्खे उणेकर पुणेकर...
|
काही म्हणा, पण ही पुणेरी लोकं म्हणजे अगदी भामटीच बर का अगदी परसाकडं जातिल तरी मोजुन मापुन पाणी नेतिल
|
Hi_psp
| |
| Tuesday, February 19, 2008 - 1:50 pm: |
| 
|
पुणेची पार वाट लावली तुम्ही मुम्बईकरानी. हा हा हा. पण आम्ही सुधरनार नाही ह. (बाहेरुन आलेला व पुणेत रमलेला)
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|