|
Bee
| |
| Tuesday, February 12, 2008 - 3:40 am: |
| 
|
विदर्भात बहिणीकडे मला एक लग्नाचे आमंत्रन आले. लग्नात होते शरबत आणि बाकी काहीच नव्हते. बहिण म्हणाली इथे बरेचशे लग्न 'आणीबाणी साखरपाणी' असेच होतात. सुरवातीला हे 'आणीबाणी साखरपाणी' जरा विनोदी वाटले ऐकायला. पण मग तिच्याकडून तिच्याच ओघवत्या शैलीत तिथल्या लोकांची दैना ऐकली आणि खरच लग्न प्रसंगी देखील 'आणीबाणी साखरपाणी' शिवाय गत्यंतर नाही ह्या गरिबांना हे पटून गेले. विहीरीच्या गार पाण्यात गावठी लिंबाच साखर घोळवून केलेलं शरबत. (मला नक्कीच हे शरबत खूप आवडल कारण इथले packed juices आता घशाखाली उतरत नाही. उतरलेत तर बसलेला घसा लवकर बरा होत नाही.) विसंगती पदोपदी अनुभवयाला मिळते ती देशातच. लगेच दुसरे आमंत्रन आले. तिथे राजविलासी थाट होता. चहाची सोय तीही जय्यत, मग फ़राळाची सोय ती त्याहून जय्यत, जेवनाची, बिदाईची सर्वच कसे जय्यत. बुफ़े मधे वाया गेलेले जेवन तर होतेच शिवाय पानात उरलेले जेवन तेही खूप होते. इतके वाढून घ्यायचेच कशाला की पोटात रिचवायला जागा उरणार नाही. पण तरीही असे होतेच. ह्या बीबीचा उद्देश फ़क्त अन्नाच्या बाबतीतला चंगळवाद लिहियचा असा नाही. तर कुठलाही चंगळवाद तुम्ही लिहू शकता. जेणेकरून ज्यांना कधी असाही चंगळवाद असू शकतो हे कळलेले नसेल त्यांना कळेल.
|
बी तुमच्या भावना समजु शकतो. एक सिनेमा पाहीला तरी दोन माणसांसाठी पुण्यात तीनशेहे रुपये सहज उडतात. त्यानंतर जेवण बाहेरच.. म्हणजे आणखी दोनशे. म्हणजे पाचशेहे रुपये.. आणि यातुन नेमके आपण काय पाहतो आणि मिळवतो हा एक प्रश्नच आसतो. चहा दहा रुपायाला आणि लाह्या वीस पंचवीस रुपायाच्या खायच्या... पण एखाद्या वेळेला चांगलेसे पुस्तक घ्यायचे म्हणजे जीवावर येते..
|
Dakshina
| |
| Tuesday, February 12, 2008 - 4:50 am: |
| 
|
बी, मलाही तुमच्या भावना समजू शकतात. तुमची पोस्ट वाचून आणि तोन संदर्भातली तफ़ावत वाचून वाईट वाटलं. आजकाल चंगळवाद खरोखरी खूप बोकाळला आहे. अन्न सोडा, पैसे, वेळ, आणि इतर ही नैसर्गिक शक्तींचा दुरुपयोग केला जातोय. आणि हा ही एक प्रकारचा चंगळवादच आहे. २००३ ची गोष्ट असेल, मी माझ्या ऑफ़िसातल्या एका मूलाला ( USA ला जात होता म्हणून) बाय करायला त्याच्या घरी गेले होते. तो औंध मध्ये रहात होता. ४ खोल्यांचं घर, रहाणारी मुलं पण ४. सर्व खोल्यांमधले लाईटस सुरू. २ टि.व्ही. दोन्ही सुरू. फ़्रिज. त्यात कित्येक दिवसांचं अन्न. AC सुद्धा लावलेला होता. खिडक्या उघड्या. हा प्रवासाला जाणार म्हणून गिजर लावलेला... एका बाथरूमातला... तर हा म्हणाला तिकडे करतो, म्हणून दुसर्या बाथरूमातला लावला... म्हणजे पहिला वाया... कल्पना करा, लाईटचं बिल किती येत असेल? त्या पेक्षाही विचार करा की विनाकारण, गरज नसताना वीज वापरली किती आणि वाया किती गेली? याबाबतीत जुने लोक, आणि कोकणस्थ यांना खरोखरी मानलं पाहीजे. Canteen मध्ये अन्न वाया जाताना पाहून तर मला रोजच हळहळ वाटते. तुम्ही दहावेळा घ्या ना वाढून, पण थोदं घ्या, नाही आवडलं तरिही घेतलंय तितकं संपवा.. पुन्हा घेऊ नका....
|
Gobu
| |
| Tuesday, February 12, 2008 - 1:08 pm: |
| 
|
बी, फ़ार चांगला बिबि सुरु केला आहे... अभिनंदन!
|
तुम्हाला माहीत आहे का मुंबईतील की ५ स्टार होटेल्समधे दररोज जेव्हढे अन्न वाया जाते तेव्हढे अन्न जर गरीब मुलांना वाटले तर मुंबईतील सिग्नलवर,झोपडपट्ट्यांमधे रहाणारी मुले भुकेली झोपणार नाहीत.
|
Arc
| |
| Wednesday, February 13, 2008 - 6:15 am: |
| 
|
ह्या गरीब मुलाना खायला दीले तर नको म्हणतात.फ़क्त पैसेच हवे असतात त्याना
|
Hkumar
| |
| Wednesday, February 13, 2008 - 10:28 am: |
| 
|
बी, चांगला विषय. खरे तर प्रबंध लिहीण्याएवढा. पण आतापर्यंतच्या आयुष्यात मी यावर बोलून व लिहून प्रचंड थकलो आहे!
|
बी खूप चांगला विषय आहे. आपण खरंच खूप नैसर्गिक ऊर्जा वाया घालवतो. खूप महाग काही घेऊन ते वापरले तरी ठीक आहे पण न वापरता फेकून देणे म्हणजे माजोरीपणा आहे. >>तुम्हाला माहीत आहे का मुंबईतील की ५ स्टार होटेल्समधे दररोज जेव्हढे अन्न वाया जाते तेव्हढे अन्न जर गरीब मुलांना वाटले तर मुंबईतील सिग्नलवर,झोपडपट्ट्यांमधे रहाणारी मुले भुकेली झोपणार नाहीत. मी असं ऐकलंय की या हॉटेल्स मधलं उरलेलं जेवण हॉटेल बंद झाल्यावर अतिशय स्वस्त मिळतं फूटपाथवर आणि अगदी गरीब लोक ते घेऊन खातात अगदी दोन पाच रुपयांना. खरंखोटं देव जाणे.
|
Ajjuka
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:33 pm: |
| 
|
मी असं ऐकलंय की अनेक ५ स्टार्स मधे मिडनाइट बुफे म्हणून जो प्रकार असतो तो अश्या उरलेल्या अन्नाचाच असतो. (ताटात उरलेल्या नव्हे तर पातेल्यात उरलेल्या!)
|
>> ताटात उरलेल्या नव्हे तर पातेल्यात उरलेल्या!
हो हे स्पेसिफाय करत असतील. काय सांगता येत नाय म्हणा तरीही. पण येस मिडनाईट बुफे मात्र पा. ऊ. अन्नाचाच असतो.
|
Tonaga
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:03 pm: |
| 
|
काय की बुवा कोण लेकाचा गेलाय ५ स्टारात?
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:15 pm: |
| 
|
त्याकरिता पंचतारांकीत मधे जावेच लागते असे नाही काही.. माझ्याच घरचा अगदी ताजा किस्सा. भावाने १०० रुपयांचा भरपूर भाजीपाला आणला. त्या मागून ताई आली बाजारातून तिनेही भाजीपाला आणला. मीही वेगळाच गेलो होतो बाहेर. मीही १०० रुपयांचा भाजीपाला आणला. घरात बाजार भरला होता. मला हा प्रकार बघवून फ़ार वाईट वाटले. मी फ़ळभाज्या घरात ठेवून बाकी पालेभाज्या शेजार्यांना त्यांच्या घरी नेऊन दिल्यात आणि वर विनंती देखील केली की ह्या भाज्या संपवा. त्यांना झाला प्रकार प्रामाणिकपणे सांगितला आणि माझ्या भावना त्यांना समजल्यात म्हणून त्यांनी तो लगेच स्विकारला. त्यासाठी मला आजूबाजूचे किती घर ठोठवावे लागले मलाच माहिती. शिवाय चाळीत असे काही लवकर खपले असते फ़ुकटात दिलेले. पण कॉलनी मधे लोक कमी समजण्याचे भय असते.
|
Arc
| |
| Thursday, February 14, 2008 - 7:37 am: |
| 
|
मी आणि माज़्या मैत्रिणी share करतो excess असलेल्या वस्तु एकदा एकीकदे खुप jute bags साठल्या होत्या त्या तीने वातल्या सगळ्याना. कधी कधी exchange पण करतो वाया पण जात नाही आणि पैसे पण वाचतात. हो, पण आमचे understanding खुप चान्गले आहे.कधी कधी जुनी वस्तु देउ का म्हनतले तर लोकान्चे गैरसमज होउ शकतात.
|
Ladtushar
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:40 am: |
| 
|
आवडिच्या भाजी चे पातेले चाटुन फुसून खायला किती मज्जा येते, पण कोणी "पातेले चाटुन फुसून खा" असे सांगितले तर कसे वाटते ?? आणि असेच जर कोणी पाहुणे आले असताना जेवले तर कसे वाटेल ?? 
|
Dakshina
| |
| Thursday, February 14, 2008 - 10:19 am: |
| 
|
बी, तुझी पोस्ट खूपच आवडली. अर्थात चाळ व्यवस्था असेल तर असं वाटप करताना फ़ार विचार करावा लागत नाही. ते लोक खूप चांगल्या पद्धतीने घेतात अशा गोष्टी. फ़्लॅट संस्कृती मध्ये मात्रं लोकांना राग येऊ शकतो. असो.. पण मी काही लोक असे ही पाहीले आहेत जे कपडे, आणि इतर छानछोकीच्या गोष्टी अगदी सढळ हाताने खर्च करून विकत घेतील. पण एखादं फ़ळ, किंवा (वेळ पडली तर) हॉटेलात खाणं, चांगल्या प्रकारचं धान्य इत्यादी विकत घेताना मात्र शंभरदा विचार करतात. हा ही एक चंगळवादच आहे ना? बाकी कोणत्याही बाबतीत पैशाचा विचार केला तर हरकत नाही. पण खाण्या - पिण्याच्या बाबतीत कसला विचार करायचा?
|
Arc
| |
| Thursday, February 14, 2008 - 10:54 am: |
| 
|
अनुमोदन दक्शिना सिहगडावरचा प्रसन्ग, एकाने गडावरच्या विक्रेत्याला ताज्या लिम्बुसरबताचे ५रुपये देतान प्रचन्द खळ्खळ केली पण खाली आल्यावर, दुपटीहुन जास्त किमतीची soft drink ची बाटली विकत घेतली. PS: १ litre soft drink तयार करण्यासाठी ९ litre पानी वाया जाते. chemicals मुळे प्रदुषन होते ते वेगळेच
|
हा सिरियस बा.फ़ आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे
|
Tonaga
| |
| Thursday, February 14, 2008 - 3:30 pm: |
| 
|
इथे विनोदी पद्धतीने सिरियसच चर्चा चालू आहे....
|
Maanus
| |
| Thursday, February 14, 2008 - 6:25 pm: |
| 
|
ह्या गरीब मुलाना खायला दीले तर नको म्हणतात.फ़क्त पैसेच हवे असतात त्याना >>> आज पहील्यांदाच मी "अगदी अगदी" म्हणतोय जास्त भाज्या वैगेरे आणल्या असतील तर ziplocks च्या बॅग्स आणून त्यात भाज्या ठेवाव्या, खराब होत नाहीत.
|
Uday123
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:09 pm: |
| 
|
माझा एक रूम्-पार्टनर खुप विज्-पाणी वाया घालवायचा. साधी दाढी करताना, नळ पुर्ण वेळ सुरु ठेवणार (म्हणजे किमान १० मि.), जे काम २-३ लिटर पाण्यात होणार त्यासाठी हे महाभाग २०० लिटर वाया घलवणार. कशाला पाणी वाया घालवतोस तर वर मी बिल पैसे भरतोय ना? रात्री झोपताना देखील नळ अर्धवटच बंद, अरे रात्रभर थोडे-थोडे पाणी काहीही कारण नसतांना वाया जातेच न? मी आणी समविचारी सोबती जेव्हा-केव्हा दिसेल तेव्हा मग नळ बंद करायचो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|