|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:08 pm: |
| 
|
मुळात स्त्रियांनीच एकमेकिचा आदर करायला शिकणे खूप गरक्जेचे आहे. सासू-सून हे नातं किती बदनाम आहे हे माहीत आहेच. पुरुषांचा सहभाग यात मदतीचाच असू शकेल. (अर्थात हे सगळे भारतिय आणि खुपश्या प्रमाणात मराठी जनतेबद्दलचे निरिक्षण आहे.) >> वा! केवळ सासू सूनेचच नात नाही गिरिराज तर भावजय नंदेच, जावा जावाच नातही बदनाम आहे आणि त्यात फ़ार मोठे तथ्य आहे. का बायका अशा विकृत वागतात इतक्या जवळच्या नात्याशी कळत नाही. एकमेकींवर प्रचंड जळ जळ जळतात. अडाणी बायका तर त्यात आहेतच सामिल वर अति सुशिक्षित स्त्रिया देखील आहेत. ९९ टक्के स्त्रियांचे एकमेकींशी पटत असेल तर शपथ. आणि खरच पुरुषांचा ह्यात काही दोष नसतो. निदान ह्या बाबतीत तरी ते सपोर्टच करतात दोन स्त्रियांचे मेतकुट जमावे म्हणून. पण स्त्रिया पुरुषांना भंडावून सोडतात. मग काय ते घराबाहेरच अर्धेउप्पर जीवन कंठायला लागतात. बरेचसे पुरुष व्यसनी होतात त्याला एक कारण हेही आहे की घरात स्त्रिया एकजुटीने राहत नाहीत.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:08 pm: |
| 
|
मीराधा, अहो मी नुकतेच लग्न झलेल्या, आर्थिक दृष्ट्या तितकेसे सक्षम नसलेल्या जोडप्याची कथा सांगत आहे. परवडते का सगळ्यांना बाई ठेवणे? आणि परवडले तरिही, घरातल्यांच्या टोमण्यातुन सुटका आसते का सगळ्याजणींची?
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:12 pm: |
| 
|
बी, तसं घडायला कारण आहे. तुम्हाला तुमच्या मेहुण्यांबरोबर, सासु, सासरे यंच्याबरोबर रहवे लगत नाही. पन बायकांना मत्र, य व्यक्तींबरोबर रहवे लगते, आणि वेळोवेळी तडजोडही करावी लागते. तेव्हा हे मतभेद स्वाभाविक आहेत नाही का?
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:16 pm: |
| 
|
पुन्हा बायकांवर सासरी स्वत्:ला प्रूव्ह करण्याचा सोशल प्रेशर पण असतच. त्यापोटी स्वत्:ला प्रूव्ह करण्यासाठी ही चढाओढ निर्माण होते. हे प्रेशर जर तुमच्याकडे असते, तर? जिकडे हे प्रेशर असते, त्या आपल्याच ऑफिसमध्ये, हे पुरुष काय करतात हे आपल्याला माहित आहेच.
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:20 pm: |
| 
|
नाही रमणी, संसार वेगळे जरी ठेवलेत तरी देखील त्यांचे ३६ चेच आकडे असतात. अगदी घरचे किस्से आहेत रमणी.. पुरुषांचे पुरुषांसोबत ईसिली पटते तसे मात्र स्त्रियांचे स्त्रियांशी पटत नाही.. आणि ते ऑफ़ीसमधे पुरुष काय करतात ते समजले नाही. कल्टी मारू नकोस हं रमणी
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:20 pm: |
| 
|
आणि एक जवळची नाती म्हणजे काय? जर जावा जावा, सासु सुना, नणंद भावजय ह्यच्यात संवाद नसेल तरच हे त्रास होतात, मग ही नाती लग्नामुळे लादली गेलीत असेच वाटते, नाही का? त्या नात्यंमध्ये स्पर्धा आली की ओलावा कसा उरेल बरं? ही स्पर्धा पुरुषांकडे येत नाही, याचं कारण वर म्हटलेलं सोशल प्रेशर असावं.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:22 pm: |
| 
|
मला म्हणायचे होते की, जेव्हा स्वत्:ला प्रूव्ह करण्याचे प्रेशर येते, (कामाच्या ठिकाणी) तेव्हा पुरुषही असे हिणकस राज्कारण करतच असतात
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:25 pm: |
| 
|
पण तो सामाजिक मुद्दा झाला. मला फ़क्त घरगुती मुद्दा मांडायला होता. बाहेरच्या जगात स्त्रिया तशा खेळीमेळीने राहतात. फ़क्त घरातच त्यांना काय होतं कळत नाही..
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:29 pm: |
| 
|
According to my opinion, men and women are so opposite to each other in this world that no other living being can be compared with them there is a strong force of attraction between them is not only because of of various differences based on physique but also on mentality.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:31 pm: |
| 
|
संसार जरी वेगळे ठेवले, तरी तुम्हाला तुमच्या सासरी संबंध ठेवण्याबाबतीत जसा चॉइस असतो, तसा बायकांना नसतो बी. उदाहरणर्थ्: तुमच्या सासरचा सत्यनारायण. तुम्हाला चॉइस आहे, एखादवेळ टाळण्याचा. पण बायकांना? नाही. त्या आल्या नाहीत तर, घरच्या कार्याला पण हजर नाही. मग तिला रजा असो नसो काहीही. जावई आला नाही, तर, तो सुट्टीचा दिवस असला तरिही, "नाही त्यला एकेच दिवस मिळतो हो सुट्टीचा, त्यमुळे नाही आला तो" हे स्पष्टीकरण चालुन जातं. हे चालेल बायकांच्या बाबतीत? मग ही लदलेली नाती मनाविरुद्ध वागवावी लागतात.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:34 pm: |
| 
|
लाखातलं बोललात बी. >>>पण तो सामाजिक मुद्दा झाला. मला फ़क्त घरगुती मुद्दा मांडायला होता. बाहेरच्या जगात स्त्रिया तशा खेळीमेळीने राहतात. फ़क्त घरातच त्यांना काय होतं कळत नाही..>>> कारण घरी पण सामाजिक बंधनं येतात ना त्यांच्यावर.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:42 pm: |
| 
|
बी?? आता तुमची कल्टी का?
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:42 pm: |
| 
|
रमणी, तुझा मुद्दा कळला पण पुरेसा पटला नाही कारण असे की मान्य आहे बायकांना एक नविन कुटुंब स्विकारावे लागते, सासरच्या लोकांशी तडजोड करावी लागते. पण मग म्हणून काय फ़क्त स्त्रियांनी त्यासाठी एकमेकींशी वाद घालावा. आणि सुरवातीलाच फ़क्त सासरचा नवखेपणा असतो. पाचेक वर्षांचा काळ उलटला की नविन सूनेला देखील अधिकार मिळतातच की. मुळ प्रश्न त्यांच्या नैसर्गिक शक्तीतच आहे. की स्त्रि स्त्रिला जुमानत नाही.
|
Bee
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:44 pm: |
| 
|
कसली आली कल्टी. आत्ताच जेवण करून भांडी घासली. ओटा पुसला सिंगापोरला सध्या रात्रिचे साडे अकरा वाजलेत. आता टेकायला हवा कणा.. तुझ्याशी बोलून छान वाटले मला. भेटू परत इथेच कुठेतरी मायबोलिवर.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:45 pm: |
| 
|
असं काही नाही. जर हे खरे असते तर, कुठल्याच दोन स्त्रीयांचे पटले नसते. पण तसे नसुन, त्यांचे फक्त सासरच्याच स्त्रीयांशी पटत नसते.
|
Nuovokus7
| |
| Wednesday, February 13, 2008 - 4:46 pm: |
| 
|
hello, new to this site. But gone through all archives of this topic. What I feel after reading all these details is that its hard to strike balance when you talk about equality between men & women. Becasue there are too many exceptions in men when you consider do's/don't's in society as compared to women. So inequality starts from there itself which needs to be understood everytime we make such statements. Such inequality works in favour of such men who want to exploit unwritten/unintended rules of society by exploiting women. But there is also otherside to it where such inequality of exceptions can pose terrible problems to men in day to day life. I don't have scientfic data/measures to prove my statement above, but these are based on personal experiences. Hence, I would safely assume that, men posted there opinions over here most probably will reflect social opionion of men. But sadly, I could not say so when it comes to women. I mean, honourable ladies over here are pointing towards equality which men should also avail, but this is definitely absolutely minute percentage. In most of the other cases, this is not true. Lets discuss that inequality first before coming to equality. Women face lusty looks/touches in crowded places. ::: Too many men are there who do it. So, lots of exceptions to well behaved men society. Men face objectionable behaviour of women. (For e.g. I have been subjected to disgusting advances from a woman in Ambabai Temple, Kolhapur) ::: Very less exceptions but they STILL are there, exploiting women oriented social attitude. Inequality in exceptions of men & women is too much to discuss the normalcy of these groups.
|
Slarti
| |
| Wednesday, February 13, 2008 - 5:29 pm: |
| 
|
नमस्कार nuovokus7 . तुमचे स्वागत. इथे मराठीत लिहावे अशी विनंती. मायबोलीच्या मुख्यपानावर हितगुज अशी लिंक आहे. तिथे जा. त्या पानावर welcome to hitguj अशी पहिलीच लिंक आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला इंग्रजी कीबोर्ड वापरून मराठी लिहीण्यासाठीचा transliteration chart शिवाय, formatting अशा लिंक्स दिसतील. त्यांचा व इथे खाली असलेल्या 'देवनागरी' बटनाचा वापर करून मराठीत लिहिणे सोपे आहे. काही मदत लागली तर अवश्य सांगा. हितगुजच्याच पानावर सर्वात खाली help and feedback अशी लिंक आहे. अरे हो, तुमचे नाव नक्की कसे उच्चारायचे तेही सांगा कृपया
|
Sonalisl
| |
| Thursday, February 14, 2008 - 1:39 am: |
| 
|
बायकांना एक नविन कुटुंब स्विकारावे लागते, सासरच्या लोकांशी तडजोड करावी लागते. पण मग म्हणून काय फ़क्त स्त्रियांनी त्यासाठी एकमेकींशी वाद घालावा. मुळात लग्नानंतर मुलीकडून बर्याच अपेक्षा असतात. सगळ्यांच्या मनाप्रमाणे ती वागली तरच ती चांगली ठरते. त्यामुळे तडजोड ही तीलाच करावी लगते. जेथे तडजोड होत नाही तेथे वाद होतात. आपल्या आई-वडिलांशी, भावंडांशी झालेले मतभेद किंवा वाद हे कालांतराने दोन्हीबाजूंकडून विसरले जातात. पण सासरी तसं होताना दिसत नाही. कितीही चांगलं वागलं तरी पण एकदा केलेला विरोध किंवा वाद सगळ्या चांगलेपणावर बोळ फ़िरवुन जातो. का? एकाच कुटुंबात वाढलेल्या लोकांना एकमेकांचा स्वभाव पुर्णपणे माहीत असतो. त्यानुसार त्यांनी एकमेकांना सहज स्विकारलेलं असतं. कधी एखादी गोष्ट अगदीच नाही पटली तर "जाऊदे, तो//ती तसाच//तशीच आहे" म्हणुन सोडून दिलं जातं. पण त्या घरात लग्नहून आलेल्या मुलीबाबत असा विचार होतोच असं नाही. कारण ती नव्या कुटुंबात//घरात आल्यावर तीने त्याप्रमाणे स्वत्:मध्ये बदल करावे अस अपेक्षित असतं. अशा बर्याच महिला आहेत ज्या घर सांभाळून नोकरी करतात. "तुला नोकरी करायची तर कर, पण घराची जवाबदारी सांभाळून", अशावेळी खरच सुपरवुमन व्हावं लागतं. अशा कुटुंबामध्ये आधी सासुने घर सांभाळलेले असते तेव्हा मुलावर घरच्या कामाची वेळच आलेली नसते. आता जर बायको नोकरी करते म्हणून तीला मदत व्हावी म्हणुन हा घरातील कामात सहभागी झाला तर आतापर्यंत माझ्यासाठी केलं नाही अन आता हिच्यासाठी काम करतो याचा राग सुनेवरच निघण्याची शक्यता जास्त असते. ईथे वाद न होता दोन्ही बाजुने मुद्दे यावेत ही अपेक्षा. ज्यामुळे माझे विचार स्पष्ट होतील.
|
Sakhi_d
| |
| Thursday, February 14, 2008 - 3:56 am: |
| 
|
>>"तुला नोकरी करायची तर कर, पण घराची जवाबदारी सांभाळून", अशावेळी खरच सुपरवुमन व्हावं लागतं. अशा कुटुंबामध्ये आधी सासुने घर सांभाळलेले असते तेव्हा मुलावर घरच्या कामाची वेळच आलेली नसते. आता जर बायको नोकरी करते म्हणून तीला मदत व्हावी म्हणुन हा घरातील कामात सहभागी झाला तर आतापर्यंत माझ्यासाठी केलं नाही अन आता हिच्यासाठी काम करतो याचा राग सुनेवरच निघण्याची शक्यता जास्त असते. >> अगदि बरोबर सोनाली. आणि हा राग फ़क्त सासुकडुनच होतो असे नाही तर त्यात पुरुष मंडळीहि सामील असतात. तसेच एकदा केलेला विरोध हा कायम लक्षात ठेवुन त्याप्रमाणेच वागणुक दिली जाते आणि अर्थात टोमणेहि. सुनेकडुन तीने सगळेच छान केले पाहिजे आणि तेहि सासरच्यांच्या मर्जीप्रमाणे ह्यात तीने विरोध केला कि संपलेच.... माझ्या अजुन एका मैत्रीणीचा अनुभव.... आम्ही सगळ्याजणी पावसाळ्यात एक दिवस सहलीला जाणार होतो. अर्थात रवीवारीच. हिचे लग्न होवुन ३ -4 महिने झाले होते. घरी सांगितले हिने कि आम्ही ७ जणी जाणार आहोत. तेव्हा हो म्हणाले सासरे आणि सा.बा. जाण्याच्या आदल्यादिवशी म्हणाले कि तुझ्या सगळ्या मैत्रीणींना घरी येवुन आम्हाला सांगायला सांग, का तर म्हणे त्यांना कळले पाहिजे तु आमचा किती मान राखतेस ते. तीने तीथेच त्यांना सांगितले कि मी तुमचा किती मान राखते किंवा नाहि राखत हे त्यांना दाखवायची गरज नाहि. मी उद्या जाणार आहे. ह्यानंतर कितीतरी वेळा तीला बोलुन दाखवले गेले आहे. लग्न झाले म्हणजे तीचे स्वत:चे असे काहि मत नसतेच का??
|
Princess
| |
| Thursday, February 14, 2008 - 4:07 am: |
| 
|
स्त्री पुरुष समानता... मी आर्चशी सहमत आहे. स्वयंपाक करता येणे/ न येणे, कपडे स्त्रीला साजेसे घालणे/ न घालणे, दारु सिगरेट पिणे/ न पिणे या गोष्टीत समानता मागुन काय साधणार आहोत आपण? साला आयला मायला बोलले की स्त्री पुरुषासारखी होते का? "स्वयंपाक करता येतो का?" या प्रश्नाने दुखावुन जाण्यासारखे काय आहे? त्यात स्त्रीचा अपमान होतोय असे मला तरी नाही वाटत. घरात, कार्यालयात जर काम करुनही तुम्हाला दुय्यम वागणुक मिळत असेल तर तिथे समानतेचा प्रश्न येतो. सारखेच काम करुनही पगार कमी मिळणे, किंवा प्रमोशन न मिळणे, हे वादाचे मुद्दे असु शकतात. मला स्वयंपाक येतो, नवर्याला मुळीच येत नाही. मला घर छान ठेवायला आवडते, त्याला पसारा करायला आवडतो. मी एवढी काम करते म्हणुन त्याने पण तितकीच करायला हवीत अशी अपेक्षा करणे मला चुकीचे वाटते. कधीतरी घर आवरायचा कंटाळा आला तर मी तस्साच पसारा टाकुन सरळ ताणुन देते. आणि त्यासाठी माझा नवरा मला घालुन पाडुन बोलत नाही, ओरडत नाही यातच मला स्वातंत्र्याचा आनंद मिळतो. शेवटी समानतेपेक्षा स्वातंत्र्य महत्वाचे नाही काय? एका लहान गावांत बालपण घालवले असल्यामुळे मी पाहिलय शहरात मिळतात त्याच्या एक टक्का देखील सुविधा खेड्यातल्या स्त्रीला मिळत नाहीत. समानता तर दुरच. अजुनही नवर्याच्या हातचा मार खाणारी एक कमावती शिकलेली स्त्री माझ्या गावात मी पाहिलीय. खुष नसुनही संसार करणार्या स्त्रिया पाहिल्यात. माझ्या आईची एका लहान गावांत बदली झाली होती. त्या कार्यालयात स्त्रियांसाठी टॉयलेट्स नव्हते. इतक्या बेसिक गोष्टीसाठी शहरात राहनार्या स्त्रीला समानता मागावी लागते का? पाण्यासाठी वणवण भटकणे, सरपण गोळा करणे यातले कष्ट फक्त ऐकुन समजणारे नाहीत. ते प्रत्यक्ष बघावच लागते. भारतीय स्त्रीला समानतेच्या आधी सुविधा मिळाव्यात. समानताही मिळेलच हळुहळु. समानता बीबीवर आता होणारी चर्चा मला घर, संसार, तडजोड वर कित्येकदा झालेल्या चर्चेसारखीच वाटतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|