|
Dineshvs
| |
| Monday, February 11, 2008 - 1:28 pm: |
| 
|
नमस्कार मी माझी, नाव घेऊन लिहायची धमक तुमच्यात नसली तरी माझ्यात आहे, आणि बहुतेक मी आपल्याला ओळखतोही. ( जरी आपले पोस्ट सहावेच असले तरिही ) वैयक्तिक बाबींची चर्चा करायचे जाहिर आमंत्रण देतोय.
|
Meggi
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:10 am: |
| 
|
गॉसिपिंग (हे पुरुष बायकांपेक्षा जास्त करतात. फक्त त्याला ऑफिस किंवा सोसायटी पॉलिटिक्स असं नाव देऊन) >> अगदी अगदी...
|
Zakki
| |
| Tuesday, February 12, 2008 - 2:40 pm: |
| 
|
हा विनोदाचा बीबी आहे तसाच रहावा पन उगाच असले अति खाजगी विषय काढून बायकांच्या वाट्याला न जातील तर बर. च्यायला!! (इथले मा. बो. कर नव्हे, पुरुषांचा उद्गार!) चक्क धमकी! अहोऽऽऽ, असले बोललात तरी इथे कुणि घाबरणार नाही!! ' समानता ' BB वर पुरुषांच्या व्यथा discuss करायच्या नाहीत असं कुठे लिहिलय ? तिथेच का नाही लिहिलं या BB वर्चं सगळं च च्च्, अहो दीपांजली तिथे सगळ्या बायका बोलत असताना कुणा पुरुषाला काही बोलायला कसा वाव मिळेल? म्हणून तर हा BB चालू केला. नि आता इथे येऊन पुन: बायकाच धमक्या काय देतात, दुसरीकडे जा का सांगतात? धन्य आहे बायकांची! असले काहीतरी करायचे नि मग म्हणायचे पुरुष बायकांचे काही ऐकत नाहीत, लक्ष देत नाहीत! आम्ही काय एकदम यडे आहोत का असल्या बोलण्याकडे लक्ष द्यायला? केवळ तुम्हाला समजावे म्हणून मी जरा वाचून सांगितले हो, नाहीतर म्हणाल, वदतो व्याघात!
|
मी माझी, तुम्ही म्हणता आहात तसे जर कोणी तुमच्या समोर काही दडपून/लघळपणा करत असेल तर तुम्ही काय करता? का तुम्ही नुस्त्याच पोस्ट करता?बोटे दाखवयची असतील तर समोर येवून पुरावे पण द्यावेत. आसे आसेल किन्वा असावे असे ग्रुहित धरुन एखाद्याच्या integrity वर आरोप करु नयेत.
|
Prr
| |
| Tuesday, February 12, 2008 - 4:46 pm: |
| 
|
@Mimajhi अग मला तुझे म्हणणे नाही पटले. तु म्हणतेस तसे पुरुष बॉस फक्त फायदाच घ्यायलाच टपलेले असतात ... जगात सगळ्याच (चांगली/वाईट) प्रकाराची लोक असतात. त्यामुळे प्रत्येक बॉस तसाच असेल असे काही नाही. आणी प्रत्येक वेळेला तुमच्या समस्या सांगायला जवळचे कोणी असतेच असे नाही. त्यामुळे ज्या व्यक्तिला आपण problems मोकळेपणाने सांगु शकतो ती कोणीही असु शकते....बॉस(पुरुष/स्त्री) देखील. गॉसिपिंग (हे पुरुष बायकांपेक्षा जास्त करतात)>>>>
मलापण हे पटले.
|
अजुन एक मुलींची घाण सवय. jump to conclusion . बघा कशी ती मी-माझी काहीही बिनबुडाचे आरोप करत सुटलिय. ती राधा नामक व्यक्तीही 'देव काय आहे' बा.फ़. वर असाच उतावळेपणा दाखवायची. मी मुलींबरोबर बोलत असताना माझ बोलण पुर्ण होउ न देताच बडबड सुरु करतात याचा मी वेळीच विरोध करतो पण त्या तोपर्यंत बोलत बोलत स्वत्:च्या धुंदीत गेलेल्या असतात आणि अर्धवट ऐकुन काहीकाही बोलत सुटतात. दुसर म्हणजे पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त गॉसिपिंग करतात हा मुद्दाच चुकिचा आहे
|
अजुन काही सवयी चिन्या १. ग्रुहित धरणे २. दुसरी बाजु ऐकुन न घेणे अथवा परस्पर दुसरी बाजु आशीच आहे असे स्वताहाच ठरवणे ३. आसेच असेल किन्वा आहेच! असे स्वताहाच ठरवणे ४. सतत काळा चष्मा घालुन नवर्याशी सम्बन्धीत लोकान्कडे बघणे ५. सतत जर-तर च्या भाषेत बोलणे, त्या मधे कायम negative बोलणे
|
Zakki
| |
| Tuesday, February 12, 2008 - 10:26 pm: |
| 
|
अरे हा काय स्त्रियांना दोष देण्याचा बा. फ. आहे की, पुरुषांच्या व्यथा सांगण्याचा बा. फ. आहे? स्त्रिया अश्या आहेत म्हणून पुरुषांनी नि पुरुष असे आहेत म्हणून स्त्रियांनी रडायची गरज नाही! जे आहे त्याला धीटपणे तोंड द्या. मग काही व्यथा रहाणार नाहीत!!
|
Manuswini
| |
| Tuesday, February 12, 2008 - 11:15 pm: |
| 
|
exactly झक्की काका, मला तेच कळत नाहीये सर्व पोस्ट्स वाचून की स्त्रीयांच्या सवयी सांगायचा बीबी आहे की पुरुषांची व्यथा? का पुरुषांना हा त्रास / व्यथा आहे जसे 'सहन होत नाही नी सांगता येत नाही' असे म्हणून काहीच्या काही स्त्रीयांच्या सवयीवर फक्त पोस्ट्स करत आहेत. मग नक्की प्रॉबलेम पुरुषांनाच आहे की. नी उगाच म्हणायचे की बायांना आजार असतो 'कसेतरीच होतेय' म्हणून. झक्की, आलाच आहात इथे तर तुम्हीच काहीतरी मर्गदर्शान करा ह्या बीबी वरील पुरुषांना हलकेच घ्या सगळ्यानी.
|
Ashusachin
| |
| Wednesday, February 13, 2008 - 12:18 am: |
| 
|
हा दोष देण्याचा बा. फ. नाही की, पुरुषांच्या व्यथा सांगण्याचा बा. फ. नाही.हा हलकेच घ्यावा सगळ्यानी असा सत्यम शिवम सुन्दरम BB आहे 
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:14 am: |
| 
|
मनुस्विनी या सवयीचा आम्हा पुरुष मंडळीना त्रासच होतो कि. छ्या !! आमच्या व्यथा ऐकुन घेणे तर सोडाच, आम्हाला व्यथा असु शकतात, हि शक्याताही फ़ेटाळुन लावण्यात येत आहे. बाकि झक्कीनी सल्ला दिलाच आहे. तो मानायलाच हवा.
|
Slarti
| |
| Wednesday, February 13, 2008 - 8:39 am: |
| 
|
प्रश्न (=पुरूषी व्यथा) : "मी या ड्रेसमध्ये जाड दिसते का / मी जाड झाले आहे का ? " उत्तर : (विनाविलंब, तत्क्षणी, ठासून) "छे ! छे !! मुळीच नाही !!!" हे उत्तर दिल्यावर एकही क्षण तिथे थांबू नये, हा संवादाचा विषय नव्हे. ही विषवल्ली इथेच खुडून टाकावी.
|
Rajya
| |
| Wednesday, February 13, 2008 - 9:25 am: |
| 
|
या बा. फ. वर या बायका काय करताहेत? सवय, सवय बाकी काही नाही
|
>>या बा. फ. वर या बायका काय करताहेत? जे त्यांना पुरुषांच्या बाबतीत नेहेमी करावं लागतं. लक्ष ठेवणं स्लार्टी मान्य की पुरुषांना काऽऽऽही वाटत नाही कितीही वजन वाढलं तरी पण बायकांचं नसतं ना तसं. बाय द वे बा. फ. म्हन्जे काय म्हणे?
|
Arun
| |
| Wednesday, February 13, 2008 - 10:32 am: |
| 
|
सन्मे : बा. फ. म्हणजे बातमी फलक, म्हणजेच BB . कळ्ळं ??????????????
|
Slarti
| |
| Wednesday, February 13, 2008 - 10:58 am: |
| 
|
अहो, पुरूषांना वजन वाढल्याचे दुःख असते आणि ते सत्य ते स्विकारतातसुद्धा.... बायकांना 'वजन वाढले' हे (सत्य) ऐकूनही घ्यायचे नसते (सवय, दुसरे काय ! ) त्यामुळे, या प्रश्नाला हरिश्चंद्री / मनोहरपंती / चाणक्यी असे काहीही उत्तर दिले तरी पुरूषाचा शेखचिल्लीच होतो ही व्यथा...
|
Milindaa
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:02 pm: |
| 
|
इथे कृपया वैयक्तिक पातळीवर येऊ नका ही सर्वांना (पक्षी मी माझी आणि दिनेश) विनंती. मी माझी, तुम्हाला जर कोणावर आरोप करायचे असतील तर ते पुराव्यांसकट केलेत तर बरे होईल. म्हणजे खरं खोटं पडताळता तरी येईल. दिनेश, 'वैयक्तिक चर्चा करायचं जाहीर आमंत्रण'? हे जरा विसंगत वाटतंय. तुम्ही नाहीतरी बहुतेक आयडी कोणाचे आहेत ते ओळखता(च), मग कृपया ही चर्चा offline नेऊ शकाल का?
|
Zakki
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:05 pm: |
| 
|
पुरुषांना व्यथा नाहीत असे कोण म्हणते? जरूर त्यांना व्यथा आहेत. त्याच आपआपसात बोलायला इथे आलो, तर इथेहि बायका! नि एकदा बायका बोलायला लागल्या की पुरुषांना तोंड उघडायची पण संधी मिळत नाही. या साठी बायकांची भीशि (ज्याला मराठीत तुम्ही kitty party म्हणता) त्या आठवड्यातून दोनदा तरी कराव्या, म्हणजे तेव्हढीच पुरुषांना मोकळीक. लहान मुले असतील तर त्यांनाहि घेऊन जावे, म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार होतील! ( )
|
Slarti
| |
| Wednesday, February 13, 2008 - 1:41 pm: |
| 
|
झक्की, तुमच्या सुचनेला अगदी संपूर्ण अनुमोदन, पाठींबा अन् जे काय असते ते... पण kitty party (उच्चारी किची पार्ची) हे जुने झाले. आता hen party, girls' night out असे म्हणतात.
|
Ramani
| |
| Wednesday, February 13, 2008 - 3:03 pm: |
| 
|
वर सगळे सामान पलंगावरच ठेवण्याच्या पुरुषी आग्रहाविषयी चर्चा झाली आहे, हे त्या संदर्भात. Why Guys should tidy up: http://www.youtube.com/watch?v=0ePnCmxbyPo
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|