|
Ajjuka
| |
| Monday, February 11, 2008 - 6:31 pm: |
| 
|
जया, तू म्हणतोस ते बरोबर आहे. लाजिरवाणे हा वेगळा मुद्दा. धक्कादायक आहेच कारण ते आपल्यासाठी नॉर्मल नाही. लाजिरवाणे असं नाही पण आमची हजारो वर्षांची संस्कृती, आमची हजारो वर्षांची लग्न व कुटुंबव्यवस्था इत्यादी गोष्टींबाबत गळे काढणार्यांनी आधी संस्कृतीचा हा भागही समजून घ्यावा एवढंच. अर्थात समानतेच्या संदर्भात हे तसं इथे विषयांतरच पण म्हटलं तर नाहीही. संस्कृती, कुटुंबव्यवस्था, लग्न इत्यादी गोष्टींचं नको इतकं उदात्तीकरण करून माणसाला आधी निव्वळ माणूस म्हणून न बघता स्त्री अथवा पुरूष अश्याच लेबलांच्याखाली बघितले जाते. त्या मानसिकतेसाठी ह्या facts म्हणजे अंजन आहे झणझणीत असं म्हणायला हरकत नाही. नाही का? दिनेश, आपल्यासाठी हे सुसंगत किंवा समाजमान्य नाही म्हणून ते लाजिरवाणे वाटते. शिसारी आणणारे आहे कारण ते आपल्यासाठी नॉर्मल नाही. एरवी जर आपण काही पिढ्यांपूर्वी आपल्या पूर्वजांनी केलेल्या गोष्टींबद्दल आपण आत्ता देणं लागत नाही म्हणतो तर याबद्दल लाजिरवाणे वाटण्यासारखे काहीच नाही हे खरंय.
|
Ajjuka
| |
| Monday, February 11, 2008 - 6:42 pm: |
| 
|
>>अज्जुका दुर्दैवाने सर्वच प्रतिष्टीत संस्कृतीत ( ग्रिक, हिंदु व नंतरच्या ख्रिस्ती) स्त्रीला दूय्यमच वागनुक होती. म्हणुन संस्कृती संस्कृती करु नये काय.<< केदार, तू चुकीचा अर्थ घेतोयस. एकतर तू ज्याला दुर्दैव समजतोस ते मी तसम समजत नाही. उत्क्रांतीच्या किंवा मानवाच्या जीवनशैली बनण्याच्या प्रक्रियेचा तो एक भाग एवढंच मी समजते. त्यातलं वाईट ते टाकून देणं यालाही संस्कृतीचा विकासच म्हणतात पण संस्क्रुतीचं नाव पुढे करून काहीच बदल घडू देण्यास विरोध करणं हे योग्य नाही ना. माझा आक्षेप एकतर आमच्या संस्कृतीत असं असं आहे असं म्हणत संस्कृती टिकवण्यासाठी एका गटाने दुसर्या गटावर अन्याय करण्याला आहे (इथे एक गट म्हणजे पुरूष आणि दुसरा म्हणजे स्त्री असं घ्यायला हरकत नाही.) आणि दुसरं म्हणजे लैंगिकतेच्या संदर्भात आपण जी सगळी झाकपाक करत रहातो संस्कृतीच्या नावाखाली तो आपल्या नैसर्गिक व मुक्त संस्कृतीचा विपर्यास आहे. झाकपाक म्हणजे लैंगिक शिक्षणाबद्दल आजही जो संस्कृतीचा मुद्दा पुढे करून वाद चालू आहे ते. आजही मुलीच्या मनात लैंगिक भावना येणे लग्नाआधी हे चुकीचे मानले जाते (मग भले तीने वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत लग्न केलेले नसले तरी..). हे ही संस्कृतीच्या नावाखालीच. या सगळ्यावर माझा आक्षेप आहे.
|
संस्क्रुतीचं नाव पुढे करून काहीच बदल घडू देण्यास विरोध करणं हे योग्य नाही ना. >> नाही मुळीच नाही. नाहीतर आपल्यात आणि तालीब्स मध्ये काय फरक.
|
Sumedha
| |
| Monday, February 11, 2008 - 6:57 pm: |
| 
|
दिनेश उपस्थित केलेला मुद्दा मल गैरलागु वाटत नाही. अगदी असे समजले की ज्या काळी या प्रकारचे 'साहित्य' / ' धार्मिक साहित्य' लिहिले गेले त्या काळातल्या सामाजिक मान्यता वेगळ्या होत्या, तरिही हेच लिखाण आपला 'सांस्कॄतिक परंपरा' समजले जाते. समाज मनावर त्याचा प्रत्यक्ष दिसत नसला तरी प्रभाव असतोच. त्यामुळे समानतेच्या चर्चेत हे संदर्भ टाळुन कसे चालतील? आ. ह. साळुंखे यांच्या 'हिंदु संस्कॄति आणि स्त्री यापुस्तकात अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. असमानतेचे मुळ हे 'सांस्कॄतिक परंपरे' मधे आहे. त्यामुळे समानतेवर बोला पण आमच्या परंपरे बद्दल नको या दॄष्टिकोनातुन समानता कशी येणार ठावुक नाही. किड झाडाच्या खोडाला लागलेली असताना आपण पानांवर उपचार करतो का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 12, 2008 - 3:02 am: |
| 
|
केदार, अज्जुका, सुमेधा सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझ्या वाचनात आल्याप्रमाणे हा विधी प्रतीकात्मक रित्या केला जात असे, म्हणजे कुठेतरी विरोध होताच. पण तो विरोध क्षीण होता. जर राणीची इतकी अवहेलना सम्पुर्ण समाज बघत असेल, चालवुन घेत असेल, तर ते लाजिरवाणे नाही का ? बरं जे काहि कारण असेल किंवा विश्वास असेल त्यासाठी, राणी म्हणजे एका स्त्रीनेच का पुढे व्हावे ? तिची संमति घेण्यात येत असे का ? आणि रामाच्या यज्ञाच्यावेळी सीता नव्हती ते ठिकच झाले, नाहीतर बिचारीचे आणखी धिंडवडे निघाले असते. यज्ञ राजाच्या महत्वाकांक्षेसाठी करायचा ना, मग राजानेच या विधीला सामोरे जायचे होते. तो काळ काहि फार जुना नाही. तो पर्यंत वैद्यकिय ज्ञान बरेच विकसित झाले होते. या विधीचा फोलपणा कळलाच असणार, तरीही केवळ परंपरा म्हणुन ते पुढे चालवले गेले. आणि असेच आपण अजुनही करत आहोत. संस्कृतीमधले श्रेष्ठ ते अवश्य स्वीकारा, पण जे पटत नाही ते नुसते नाकारु नका तर त्याचा धिक्कारही करा. हा धिक्कार म्हणजे सत्याचा स्वीकार. एक सत्य असे कि हो माझ्या भुतकाळात असे होते, आणि दुसरे सत्य हे कि मला त्याची आता लाज वाटते. हि स्त्रीकडे हीन नजरेने बघायची वृत्तीच, समानतेच्या आड येते. आणि हे आठवायचे कारण ठरले म्हणजे, कोल्हापुर भागात सर्रास दिली जाणारी, एक शिवी, कानावर पडली. शिवी देणार्याच्या मनात हा संदर्भ नसेलही, पण शिवीचा उगम इथुनच झालाय हे नक्कि.
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 12, 2008 - 5:40 am: |
| 
|
>>माझ्या वाचनात आल्याप्रमाणे हा विधी प्रतीकात्मक रित्या केला जात असे, म्हणजे कुठेतरी विरोध होताच. पण तो विरोध क्षीण होता. जर राणीची इतकी अवहेलना सम्पुर्ण समाज बघत असेल, चालवुन घेत असेल, तर ते लाजिरवाणे नाही का?<< राजवाड्यांच्या पुस्तकात ते स्पष्टपणे म्हणतात की प्रतिकात्मकतेची शक्यता वाटते पण प्रतिकात्मकता येते तेव्हा काही काळ आधी खरोखरीचे तसे घडत असले पाहीजे. परंपरा चुकीची वाटली तरी ती जायला खुप वर्ष लागतात. आत्ताचंच उदाहरण घ्यायचं तर आपल्या सगळ्यांना मान्य असतं की वस्तू समजून कन्येचे दान करणे हे मुलीसाठी कमीपणाचे आहे. पण तरी विधीवत लग्न करताना ते केलंच जातं की. ही तशी सूक्ष्म बाब आहे अश्वमेध यज्ञ तोही चक्रवर्ती राजाचा हे खूपच मोठे प्रकरण तेव्हा त्यातली प्रतिकात्मकताही अपरीहार्य. जस लग्न करणार्या मुलीला आपलं दान केलं जातंय ह्याच्यातलं कमीपण जाणवत नाही बहुतांशी तसंच प्रतिकात्मक रित्या या विधीला सामोरं जाणार्या राणीलाही जाणवत नसणार. तिच्यासाठी ते समर्पणाचे mind conditioning असणार. थोडक्यात आपण आता कन्यादान चालवून घेतो तसेच त्यावेळेला संपूर्ण समाज हा विधी चालवून घेत असला पाहिजे. आणि नंतर तो प्रतिकात्मकरित्या सुद्धा बंद झाला याचा अर्थ कुठेतरी मानवाच्या सभ्यतेच्या प्रगतीची एक पुढची पायरी चढली गेली होती. हे सगळं आता समानतेच्या बीबीच्या मुद्द्यांच्या कक्षांबाहेर जाऊ लागलंय का?
|
Slarti
| |
| Tuesday, February 12, 2008 - 6:35 am: |
| 
|
हा विधी 'स्त्रीला आत्यंतिक अवहेलनेची वागणूक देवून तिच्यावरचे स्वामित्व सिद्ध करणे' या हेतूतून आला असेल का ? तसे असेल तर तो खरा समानतेचा विषय होऊ शकेल. किंवा, 'स्त्रीचा दर्जा कनिष्ठ' अशी मानसिकता या विधीमागे असू शकते, तेव्हा तो समानतेचा मुद्दा ठरतो. पण त्या समाजाची मानसिकता फक्त या काळाच्या चष्म्यातून बघणे उचित आहे का ? अन् जर या विधीमध्ये 'स्त्रीचे गौणत्व' हा मुद्दा तत्कालिन समाजासाठी गौण असेल तर या बाफच्या कक्षेबाहेरचा हा विषय आहे.
|
Chyayla
| |
| Tuesday, February 12, 2008 - 10:41 am: |
| 
|
भयानक शिसारी आणणारे प्रकरण आहे हे. मात्र हे वाचल्यावर उगाच संस्कृती संस्कृती म्हणून बोंबलत फिरणार्यांची कीव आल्याशिवाय रहात नाही अज्जुका, तुझे विचार मी नेहमी वाचतो ईतर BB वरही तुझे विचार वाचलेत आणि ईथे तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला असे वाटले होते की MF Husain ज्याच्या विकृत चित्राचे स्पष्ट समर्थन नव्हते तरी हा माणुस फार मोठा आहे वैगेरे.. (संदर्भ BB भारतात होणारे पाकिस्तानी कलाकारांचे लाड) अशा मोठ्या माणसाने काढलेली नग्न देवी देवतांची चित्रे, ही त्यानी खरी संस्कृती चित्रीत केली असावी. त्यातल्या त्यात तुझ्याच शब्दात म्हणायचे तर अत्यंत शिसारी आणणारे सिंह व दुर्गा देवी, हनुमान व सिता यांच्यात लैंगिकता चित्रीत करणे ही कदाचित तुला संस्कृती वाटत असावी. भारत मातेला नग्न दाखवणे ही तर आपली राष्ट्रिय संस्कृती असावी व त्याला आक्षेप नसावा. कारण शेवटी तो फारच महान कलाकार आहे. मला हा विषय ईथे आणायचा नव्हता पण अगदीच रहावले नाही म्हणुन लिहितोय. तुला ही अशीच संस्कृती व्यक्ति व कला स्वातंत्र्याच्या नावाखाली अपेक्षीत आहे का? शिवाय कुणीतरी आंतर महाल या चित्रपटावरुन लगेच त्याला प्रमाण मानुन चक्क तेव्हाची समाजव्यवस्था अशीच होती हा निष्कर्ष काढलेला पाहिला. तसलाच प्रकार उद्याची पिढी आजची MF Husain ची चित्रे पाहुन करणार नाहीत हे कशावरुन. याचा सुज्ञ वाचकानी विचार करावा. आता ईथे खरच कुणाची कीव करावी बरे? दिनेशदांच पण मला अप्रुप वाटत जीथे रामसेतु आणी राममंदीर यांचे हजारो पुरावे असुनही त्याला नाकारणारे मात्र कुणी तरी काही तरी विकृतीकरणासाठी लिहिले ज्याला काहीच आधार नाही आणी मान्यताही नाही असल्या तकलादु पुराव्यावरुन तेच अगदी १००% सत्य मानुन त्यावर हा BB भटकवायची काय गरज असावी हे न कळे? अश्या प्रकारचे लाखो लेख तुम्हाला google वरही मिळतील मागे असामीनी यज्ञात गोमांस खाणे हे समाजमान्य होते असे दाखवणारा एक लेख दाखवलेला आठवतो व त्यावर चर्चाही झाली होती. तसलाच हा प्रकार वाटतोय. स्लार्टीच्या मुद्याला समर्थन, यात अजुन एक जोडु ईछितो कि त्या काळात काय परिस्थिती होती व तसले प्रकार का घडले हे आजच्या काळावरुन ठरवणे बरोबर नाही. सती, केशवपन का होत होते त्यामागची आगतिकता काय होती यावरही छान चर्चा झाली होती परत तो मुद्दा काढायची गरज का पडली हे कळाले नाही. शेवटी परत एकदा सांगु ईछितो कोणतीच व्यवस्था अगदी समाजव्यवस्थाही १००% परीपुर्ण नसते (ग्रीक, रोमन वैगेरे सुद्धा)काळानुसार, परिस्थितीनुसार त्यात काही विकृती येतात पण मला अभिमान आहे आपल्या संस्कृतीचा की जी काळानुसार बदलली व असल्या रुढीन्ना कवटाळुन न बसता, ईतिहासापासुन बोध घेत पुढे जात आहे. ज्याना जुन्या कालबाह्य रुढीवरुन संस्कृतीला शिव्या द्यायच्यात त्याना बसु देत बापडे. असो चर्चा मुळ विषयावर येवो ही ईछा:
|
Madhavm
| |
| Tuesday, February 12, 2008 - 10:52 am: |
| 
|
इथे रामाला इतका दोष दिला गेला आहे पण सितेची काहीच चूक नव्हती का? १. अयोध्या सोडून वनात जायचा निर्णय सितेचा होता. रामाने तिला अनेक प्रकारे परावृत्त करायचा प्रयत्न केला पण तीने आपला निर्णय बदलला नाही. तिचे रामावरचे प्रेम म्हणून हे एकवेळ मान्य केले. २. राम सुवर्ण्-मृगामागे जायला राजी नव्हता कारण त्याला त्याचे खरे रुप माहित होते. पण सितेने खूपच हट्ट केला त्याला जाणे भाग पडले. आता स्त्री हट्ट करते म्हणजे किती कटकट करते हे वेगळे लिहायची गरज नाही. ३. लक्षमणाला ती खूप अपशब्द बोलली शेवटी तर ती त्याला, "तुला माझी अभिलाषा आहे म्हणून तू रामाला वाचवायला जात नाहिस " असे म्हटले. हा म्हणजे तिच्या बेताल बोलण्याचा कळसच झाला. तिच्या अपहरणानंतर बाकिच्या घटना घडल्या पण तिच्या अपहरणाला ती स्वत:च जबाबदार होती मग तिचा काहिच दोष नाही का? फक्त रामाला दोष देउन कसे चालेल?
|
Ashwini_k
| |
| Tuesday, February 12, 2008 - 11:34 am: |
| 
|
-----लक्षमणाला ती खूप अपशब्द बोलली शेवटी तर ती त्याला, "तुला माझी अभिलाषा आहे म्हणून तू रामाला वाचवायला जात नाहिस " असे म्हटले.----- शीSSS! असले काही मुळ वाल्मिकी रामायणात असणार नाही. असल्या विकृत गोष्टी पुढे पुरुषप्रधान समाजातील विकृत लोकांनी घुसडल्या आहेत. सीता ही लक्ष्मणाची नुसती वहिनीच नाही तर आई व बहीणही होती. हा! तिचा दोष (प्रज्ञापराध) नक्कीच होता (१) जेव्हा तिने कांचन मृग अस्तित्वात नाही याकडे दुर्लक्ष करून सत्य असत्याची पडताळणी केली नाही. (२) लक्ष्मणाने घालून दिलेली लक्ष्मणरेषा याचकरुपी रावणावर अपात्री दया करताना उल्लंघली (मर्यादा उल्लंघन). अहो पण हे सर्व झाले नसते तर रावण कसा मेला असता?
|
... आता स्त्री हट्ट करते म्हणजे किती कटकट करते हे वेगळे लिहायची गरज नाही. ही पोस्ट " त्या " बीबी वर ही शोभुन दीसेल. आपल्याला आपल्या संस्क्रुतीचा काही अभिमान मान अपमान याची जाणीव आहे की नाही?.. कोणताही मुद्दा हा आपल्या संस्क्रुतीचे वाभाडे काढल्याशिवाय का चर्चिला जात नाही? एव्हढ्या पुरातन ईतिहासात जेव्हा ईतर्त्र मानवजात ही प्राण्यासमान होती तेव्हा आपला विकास होत होता आणि त्या विकासाला क्रमप्राप्त घडल्या असतील काही घटना कींवा नसतीलही.. पण त्यातुन आलेले तत्वज्ञान पाहा ना.. योगविज्ञान, आयुर्वेद, शरीर्शास्त्र, न्यायमीमांसा, विमानशास्त्रावरील ग्रंथ, पंचांग, वेगवेगळ्या गीता, जीवनावर केलेला विचार, धम्मपद, जिनवाणी,... भारताने दीलेली वैदीक गणित रीत, चार आश्राम आणी त्यातुन विश्वाचे कोदे आणि मी कोण याचा शोध घेण्याची आस... एक ना दोन कीतीतरी गोष्टी आहेत की ज्यांची महती संपणार नाही.. शिकागोच्या science musium मधे जा आणि पाहा की ० ही भारताची देणगी आहे ते लिहीले आहे. केवळ ० च काय पण दशमान पध्द्द्त ही केवळ भारताची देणगी आहेऽरे डीग्री मिळाली तरी आजही तुम्हाला आकाशात सात ग्रह दाखवता येतात काय? आणि पहा त्यावेळी केलेला अभ्यास. कधी विचार केला आहे पंचांगाचा? ग्रहण आणि कालगणना यांचा केलाय कधी अभ्यास?.. तुम्हाला काय कल्पना आहे या देशाच्या संस्क्रुतीची?.. ईथे देवेळादेवळावर सोने लगडलेले असायचे आणि संन्याशाना मान असायचा आणि तो हीमालयापासुन खाली तीरुपतीपर्यंत आणि आयोद्या ते द्वारका, मथुरा कुठेही भ्रमण करायचा. राजे लोकही एक्मेकात लढायचे पण कसे?.. दुसर्याच्या प्रजेवर, निशस्त्रावर, गाईवर, देवळावर हल्ला नाही करत.. इतपत maturity सर्व समाजाला येण्यासाठी केती उच्च संस्क्रुतीची आणि सामाजिक एकतेची गरज आहे याचा कधीतरी केलाय विचार?.. .... अरे या संस्क्रुतीची शिसारी येते म्हणणार्यानो जरा पहा एखादे चित्र काढुन. जी symmetry आपल्याला फुटभर कागदावर साधत नाही ती त्या लोकानी उंच उंच मंदीरे बांधताना साकारली आणि शिलपकला तरी कीती अप्रतिम... पुरुषाप्रमाणे स्त्री ही देवी म्हणुन पुजली जाते. आईचा मान या देशात आहे तेव्हडा बापाचा तरी आहे काय? भाउ, बहीण, आई, बाप, काका, मामा... आजी, आजोबा या नात्यातील संप्न्नता तुम्हाला देसु नये येवढे आंधळे नका होवु. ईथली दारे बंद नाही ठेवत आम्ही.. मनाचीही आणि घराचीही. कधी कोणत्या देशावर केलाय हल्ला भारताने.. आजपर्यंत?... संस्क्रुतीची शिसारी येते म्हणण्याआधी हा विचार करा. जे लोक मंदीर बांधण्यासाठी ईतका विचार करत त्यांची शहरे आजच्या so caaled प्रगत देशांतील शहरापेक्षाही सुंदर असावीत... आपण जे पाहति ते आक्रमण केल्यानंतरचे अवषेश.. ईतिहासाचे आणि देशाचेही. त्यामुळे भारतावर कोणतीही negative comment करताना मी हजारवेळा विचार करीन. हाच भारत आज ना उद्या supar power होईल आणि मग जगाला पुन्हा जुन्या संस्क्रुतीच्या महानतेचे भरते येयील या बाबतीत आमच्या मनात तीळमात्र शंका नाही...!
|
Ramani
| |
| Tuesday, February 12, 2008 - 12:12 pm: |
| 
|
मी विकीपिडीआ वर शोधले. पण इथे चर्चिला जाणारा विधी काही समजु शकला नाही. मल कुणी लिन्क देउ शकेल का? म्हणजे चर्चा नक्की कशावर चालु आहे ते कळेल.
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 12, 2008 - 12:21 pm: |
| 
|
बघितलंस का केदार? मी जे म्हणत होते ना ते हे. काही वाचन नाही, काही अभ्यास नाही आणि केवळ 'आमची संस्कृती' म्हणत केलेलं उदात्तीकरण. उदाहरणासकट स्पष्ट केलं बघ इथे. अथक संशोधनातून ज्या facts मांडल्या गेल्यात त्याही त्यांना मान्य नाहीत. एक मध्ययुगीन विचारसरणी 'संस्कृती' या शब्दाचा आसरा घेऊन जगावर थोपू पहातायत. करेक्ट आहे तुझं यांच्यात आणि तालिब्ज मधे काही फरक नाही. चिन्या, तू एकतर कुठले कुठले prejudices घेऊन माझं पोस्ट वाचतोस किंवा तुला जो अर्थ अभिप्रेत असतो तोच त्यातून काढतोस नीट न वाचता. दुसर्या बीबीचा विषय असला तरी इथे उगाच धुळवड माजवतोयस म्हणून एकदाच स्पष्ट करणारे मी.. देवदेवतांच्या नग्न चित्रांना, वादग्रस्त चित्रांना मी कधीच योग्य म्हणाले नाही. हुसेनची इतर पेंटींग्ज पाह्यलीयेस का तू? मी पाह्यलीयेत. आणि मला ती खरंच ग्रेट वाटतात. तुला वाटत नसतील तर मी काय करू? मला वाटतात. समकालीन भारतीय चित्रकार म्हणून त्याचे योगदान वादग्रस्त चित्रांपेक्षाही मोठे वाटते. आता याचा अर्थ तुला जर हुसेनने देवतांची कशीही चित्रे काढली तरी चालतील असं माझं म्हणणं आहे असा वाटत असेल तर देव तुझं भलं करो. बाकी माधव आणि धोंडोपंत यांच्या पोस्टसबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. त्यांना चर्चा नकोय. जे जे पुरूषप्रधान ते ते चांगले आणि स्त्रिया या वाईटच, त्यांनी पतीच्या आज्ञेत रहावे एवढंच म्हणत रहायचंय. यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही.
|
Ajjuka
| |
| Tuesday, February 12, 2008 - 12:34 pm: |
| 
|
>>दिनेशदांच पण मला अप्रुप वाटत जीथे रामसेतु आणी राममंदीर यांचे हजारो पुरावे असुनही त्याला नाकारणारे मात्र कुणी तरी काही तरी विकृतीकरणासाठी लिहिले ज्याला काहीच आधार नाही आणी मान्यताही नाही असल्या तकलादु पुराव्यावरुन तेच अगदी १००% सत्य मानुन त्यावर हा BB भटकवायची काय गरज असावी हे न कळे? अश्या प्रकारचे लाखो लेख तुम्हाला google वरही मिळतील मागे असामीनी यज्ञात गोमांस खाणे हे समाजमान्य होते असे दाखवणारा एक लेख दाखवलेला आठवतो व त्यावर चर्चाही झाली होती. तसलाच हा प्रकार वाटतोय.<< तुमच्या कल्पनेत जी संस्कृती आहे तेवढीच व्याप्ती का संस्कृतीची? थोडा अभ्यास करायला काय घ्याल? वि का राजवाडे हा कोणी विकृत माणूस नाही. एका महान व्यासंगी माणसाबद्दल इतकं खालच्या पातळीवर बोलण्याइतकी आपली लायकी आहे का? गोमांस खाण्याबद्दल तर स्वतः सावरकरांनी अनूकूलता दर्शवली होती. आर्य खात होते. यज्ञामधे नैवेद्य असे गोमांसाचा हे अनेकांनी संशोधन करून मांडलेय. या बाबतीत इतकं टची होण्याची काय गरज आहे? भारतीय संस्कृती काही आभाळातून नाही पडली. किंवा एका रात्रीत तयार नाही झाली. माणसाचे पशुत्व संपून civilisation च्या दिशेने जो प्रवास आहे त्या वाटेवरच्या या काही पायर्या आहेत. सत्य ते सत्य म्हणून स्वीकारा ना. नाहीतर संपूर्ण संशोधन करून ते तसं नव्हतं हे सिद्ध करा. उगाच भावनांच्या आहारी जाऊन 'आमची संस्कृती!' म्हणत गहिवरण्यापेक्षा ती नक्की काय आहे आणि कशी कशी बनत गेली हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. कृपया तुमचा indology चा अभ्यास असेल तर अधिकारवाणीने बोला ना भारतीय संस्कृतीबद्दल. ज्यांनी थोडंफार तरी वाचलंय त्याबद्दल त्यांनाच तुम्ही शिकवणार की तुम्हाला काय माहिती सोन्याचे कळस होते तेव्हा (जसे काही हे होतेच तिथे!).. BTW सोन्याचे कळस हा काही संस्कृतीच्या महानतेचा पुरावा होऊ शकत नाही. नाही का?
|
Gobu
| |
| Tuesday, February 12, 2008 - 12:39 pm: |
| 
|
च्यायला, अहो चुकीच्या ठिकाणी आलात आपण... हा VC नाही.... तिथे हा तुमचा मुद्दा न कंटाळता शेकडो वेळा वाचलाय आम्ही!... इथे वेगळ्या विषयावर चर्चा चाललीय... अहो चुकीच्या बिबि वर आलात आपण!
|
शिवाय कुणीतरी आंतर महाल या चित्रपटावरुन लगेच त्याला प्रमाण मानुन चक्क तेव्हाची समाजव्यवस्था अशीच होती हा निष्कर्ष काढलेला पाहिला. <<<<च्यायला , मी फ़क्त या प्रकाराचा अंतरमहाल चित्रपटा मधे असलेला उल्लेख लिहिला , त्या वेळी समाज व्यवस्था अशीच होती वगैरे वाक्य कुठेही लिहिल नाहीये .
|
Asami
| |
| Tuesday, February 12, 2008 - 1:36 pm: |
| 
|
मागे असामीनी यज्ञात गोमांस खाणे हे समाजमान्य होते असे दाखवणारा एक लेख दाखवलेला आठवतो व त्यावर चर्चाही झाली होती. तसलाच हा प्रकार वाटतोय.>>च्यायला तुम्हाला हवी असेल तर link शोधून देतो पण out of reference विधाने देउ नका. तुझ्या " प्राचीन इस्लामी लोक हिंसक किंवा तामसी प्रव्रुत्तीचे असतात (नि पर्यायाने हिंदू नसतात) कारण ते मांसाहारी असतात " ह्या विधानाचा फोलपणा दाखवण्याकरता दिलेला तो reference होता. क्रुपया अस्थानी quote करू नये अशी विनंती.
|
नवीन बीबी सुरू करा की लोक्स. खरंच एवढी माहितीपूर्ण आणि नवीन चर्चा चुकीच्या बीबीवर कशाला?
|
Chyayla
| |
| Tuesday, February 12, 2008 - 2:06 pm: |
| 
|
कृपया तुमचा indology चा अभ्यास असेल तर अधिकारवाणीने बोला ना भारतीय संस्कृतीबद्दल LoL ... म्हणजे भारतिय ईतिहास, संस्कृती भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर दुर युरोपात ऑक्सफ़ोर्ड, केम्ब्रिजच्या विश्वविद्यालयात Indology शिकल्याने कळतो... बाकी चालु द्यात..
|
Zakki
| |
| Tuesday, February 12, 2008 - 2:26 pm: |
| 
|
अहो आता, पुरे ती जुनी भारतीय संस्कृति! त्यात कित्येक चांगल्या गोष्टी होत्या, त्या तर आता कुणि पाळत नाहीत, वाईट गोष्टी फक्त लोकांना आठवतात, त्याबद्दल विकृत लोकांनाच आदर वाटत असणार. नाहीतर स्त्री ही दुय्यम आहे, नि तिचे दान करावे वगैरे गोष्टी काय अभिमान बाळगण्याजोग्या गोष्टी आहेत का? मी म्हणतो की गेल्या शेकडो वर्षात भारतात बाहेरून आक्रमणामुळे, शास्त्रीय ज्ञानामुळे, तंत्रज्ञानामुळे, वैश्विकीकरण या मुळे बराच फरक पडला आहे. तर जुनी संस्कृति राहू दे बाजूला. तुम्ही तरुण लोक आता नवीन संस्कृति का नाही सुरु करत? वेळ आली आहे. धंद्याचे नियम बदलतात, मग संस्कृतीचे का नाहीत? धंद्यात जसे Re engineering करतात, तसे संस्कृतीचे पण Re engineering करा!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|