Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 11, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through February 11, 2008 « Previous Next »

Jo_s
Sunday, February 03, 2008 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च .....
तुला अभिनंदन म्हणाव का धंन्यवाद ते न कळल्यामुळे ......
आता त्या मुलाला काय कळत आहे तो कामवालीचा मुलगा ते ...
पण अशा घटना नेहमीच दिसतात आणि तळपायाची आग मस्तकात जाते. अर्थात दर वेळेस आपण काही करू शकतोच असे नाही.
पण या अशा लोकांची वैचारीक पातळीच तेवढीच असते, त्यामूळे समजावण्याचाही काही उपयोग नसतो.



Asmaani
Sunday, February 03, 2008 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुम्हाला धमकावण्याचा उद्देश नव्हता माझा. कृपया गैरसमज करुन घेउ नये.

Lopamudraa
Sunday, February 03, 2008 - 3:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खेड्यातिल मुलि आणि शहरातिल मुलि या दोन वेगवेगळ्या देशात रहात आहेत अस वाटाव इतपत त्यांच्या परिस्थितित अंतर आहे>>>> एकदम खरे....हाच मुद्दा मी खुप्दा सांगितला आहे.. तेव्हा त्याची खिल्ली उडवली जात होती.

Lopamudraa
Sunday, February 03, 2008 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या जुन्या मायबोलिवर लिहायला आणि वाचायला कीती छान वाटते.. ..:-) म्हणुन कदाचित My experience सध्या जोरात चालु लागलाय..

Maanus
Sunday, February 03, 2008 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yael Naim

I'm a new soul
I came to this strange world
hoping I could learn a bit
about how to give and take
but since I came here
felt the joy and the fear
finding myself making every possible mistake

I'm a young soul
in this very strange world
hoping I could learn a bit
about what is true and fake.
But why all this hate
try to communicate
finding trust and love is not
always easy to make.

http://www.youtube.com/watch?v=jGXayRGgrcA


Divya
Sunday, February 03, 2008 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसा, मस्त आहे व्हीडीओ क्लीप.

Maanus
Sunday, February 03, 2008 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहे :-)

ओके मी हे चलचित्र पुर्वी पण एकदा टाकले होते, आज परत एकदा टाकतो.

http://www.youtube.com/watch?v=juOQhTuzDQ0

ok, lets talk about your options, Kellie Focus.

I am, like I am listening to what you are saying, but I'll only hear what I want to.

Thats just called being woman.

well we could just call the show are you smarter than man.

because women dont really want to hear man's opinion, they just want to hear their opinion in a deeper voice. thats what they want when they talk to us.

this is just to add some humor to BB, dont judge that I am taking the serious conversation here lightly.

Jo_s
Monday, February 04, 2008 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.....या जुन्या मायबोलिवर लिहायला आणि वाचायला कीती छान वाटते..

लोपा एकदम बरोब्बर्, जुन्या मायबोलीत पुर्वीची चाळ संस्कृती वाटते तर नवीन मधे फ्लॅट संस्कृती. प्रत्येक फ्लॅटमधे सेपरेट शिरावं लागतं.



Manishalimaye
Monday, February 04, 2008 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जुन्या मायबोलीत पुर्वीची चाळ संस्कृती वाटते तर नवीन मधे फ्लॅट संस्कृती. प्रत्येक फ्लॅटमधे सेपरेट शिरावं लागतं.<<

अगदी अगदी!!



Manishalimaye
Monday, February 04, 2008 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>जुन्या मायबोलीत पुर्वीची चाळ संस्कृती वाटते तर नवीन मधे फ्लॅट संस्कृती. प्रत्येक फ्लॅटमधे सेपरेट शिरावं लागतं.<<

अगदी अगदी!!



Dineshvs
Monday, February 11, 2008 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बीबी बंद का पडलाय ?

काहि पुराणकथेत अश्वमेघ यज्ञाचा उल्लेख येतो. या यज्ञाला राजमान्यताच काय समाजमान्यताही होती. हा यज्ञ केल्यास त्या राजाची महती उलट वाढतच असे. या यज्ञाच्याआधी समस्त स्त्रीजातीचा घ्रुणास्पद अपमान होईल, असा एक विधी केला जात असे. आधी मी नुसतेच याबद्दल वाचले होते, पण नंतर त्या संबंधी एक शिलालेखही बघण्यात आला. ( या शिलालेखाचा फोटो माझ्याकडे आहे, पण तो फोटो इथे देणे वा त्या विधीचा उल्लेखही करणे, मला शक्य नाही. इथे सर्वच जण सूजाण आहेत, तरिही मला याबाबतीत कमालीचा संकोच वाटतोय )

पण या विधीला कुणी विरोध केल्याचे माझ्या वाचनात नाही. ( कुणाला हा संदर्भ माहित असेल तर अवश्य लिहा ) पुढे प्रतीकात्मक रित्या का होईना, हा विधी केलाच जात असे.

सति जाणे, केशवपन यापेक्षाही हा विधी मला घृणास्पद वाटतो. आणि या विधीला समाजमान्यता कशी मिळाली, तिला विरोध का झाला नाही, हेही मला कळत नाही.

पुरुषाच्या बाबतीत, असे काहि विधी असल्याचे माझ्या वाचनात आले नाही. कदाचित पुरुषांसाठी अश्या विकृति समाजमान्य असाव्यात. एका थोर संताच्या एका अभंगात या विकृतीचा उल्लेख आहे, पण तोही मजेमजेतच.

मला तो शिलालेख बघुन खुपच लाज वाटली होती. अपराधी वाटले होते.



Deepanjali
Monday, February 11, 2008 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहा अली , जॅकी आणि रूपा गांगुलीच्या ' अंतरमहाल ' मधे या अष्वमेघ यज्ञाचा उल्लेख आहे , subtitles वाचता वचता नीट समजलं नाही पण अंदाज आला .


Ajjuka
Monday, February 11, 2008 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास वि का राजवाडे
वाचावे. अश्वमेध यज्ञाच्या सर्व सूक्तांन्चा नीट अर्थ समजावून दिलेला आहे. आणि त्यात अशीच कोणीही स्त्री नसून यजमानीण म्हणजे खुद्द राणीच त्या सगळ्या विधीला सामोरी जाणारी आहे.
भयानक शिसारी आणणारे प्रकरण आहे हे.
मात्र हे वाचल्यावर उगाच संस्कृती संस्कृती म्हणून बोंबलत फिरणार्‍यांची कीव आल्याशिवाय रहात नाही.


Ankyno1
Monday, February 11, 2008 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकिपीडिया वर शोधा....

साधारण कल्पना येईल....

किळसवाणा प्रकार आहे...


Mandard
Monday, February 11, 2008 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश हा विषय येथे काढायची गरज नव्हती. माॅडनी या पोस्ट डिलीट केल्यातर बरे होइल.

Dineshvs
Monday, February 11, 2008 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तकाना तसे वाटत असेल तर मला काहिच म्हणायचे नाही. पण जर माझ्या परंपरेत जर एक लाजिरवाणी गोष्ट असेल, तर त्याबद्दल खंत व्यक्त करण्याची मुभा मला असावी.

इथे दोन मुलीनी लिहिले आहे. त्याना हे अस्थानी वाटले नाही.

आणि मला तरी हा विषय इथे अस्थानी वाटत नाही. जर अश्या परंपरांचे पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणुन सतत प्रयत्न करण्याची प्रार्थना आपण शालेय जीवनापासुन करणार आहोत तर त्या परंपरांकडे डोळसपणे पहायला शिकवणेही गरजेचे आहे.



Peshawa
Monday, February 11, 2008 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तकाना तसे वाटत असेल तर मला काहिच म्हणायचे नाही. पण जर माझ्या परंपरेत जर एक लाजिरवाणी गोष्ट असेल, तर त्याबद्दल खंत व्यक्त करण्याची मुभा मला असावी. >>>

ह्यात लाजिर्वाणे काय हे समजले नाही आणी तुम्ही कसली खंत व्यक्त करताय हे सुधा समजले नाही. त्या काळात त्यांच्या विश्वासा नुसार ती लोक वागली ह्यात तुम्हाला लाजिर्वाणे होण्याची काय गरज? डोळसपणे पहाताना त्याला भावनिक किंवा moral रंग द्यायची गरज खरच आहे का? आजच्या morality नुसर bestility आणी nacrophilia हे समाज्मान्य नाही. पुर्वीचे अनेक समाज ह्या दोन्ही गोष्टिंकडे वेगळ्या प्रकारे पहात होते. इतकेच!

तुम्ही शिलालेख / विरंगळ पाहीलात जो bestility दर्शवीत होता तर माझ्य माहीती नुसार असे bestility दर्शवणारे कोरिव दगड पुश्कल आहेत आणि त्यांचे प्रयोगन एखदा indologist नक्कीच तुम्हाला सांगू शकेल.

पुरुषांसाठी अशा विक्रूती हे काही समजले नाही. zoophilia , nacrophilia ह्यांच्या संबंधी अधिक माहीती संकेत स्थळांवर उपलब्ध आहे. आणि त्यात फ़क्त पुरुशच सहभागी नसतात... अर्थात हेच तुम्हाला विचारायचे होते का? की ह्या अशा 'विक्रुती' बाब्तीत समानता का नाही? post वाचुन गोंधळ झाला...



Dineshvs
Monday, February 11, 2008 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा, मला नाही वाटत माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलाय. तुम्ही दिलेल्या गोष्टींशी त्याचा संबंध नाही.

एक राजमान्य विधी म्हणुन तो प्रकार करणे मला लाजिरवाणे वाटले.
असो. बहुतेक मायबोलीकरांची या विषयावरच्या चर्चेला मानसिक तयारी दिसत नाही. अज्जुका आणि DJ यानी मोकळेपणी दिलेल्या अभिप्रायाबद्दल, माझा त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.
अशी चर्चा इथे केल्यास आपल्यालाच विकृत ठरवले जाईल.


Slarti
Monday, February 11, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, त्या विधीला राजमान्यता / समाजमान्यता होती यात त्या काळच्या समाजाच्या मूल्यांचे प्रतिबिंब पडते एवढेच. इथे केवळ स्त्रीपुरूष समानता येत नसून लैंगिकतेसंबंधी मूल्येसुद्धा महत्वाची आहेत. तेव्हा या गोष्टी तिरस्करणीय वाटत नव्हत्या, त्यामुळे तशी मान्यता. मुळात या प्रकाराकडे ते वेगळ्या दृष्टीने बघत असतील. आता आपल्याला हा विधी लाजिरवाणा वाटणे हे साहजिक आहे, पण 'त्यांना तो लाजिरवाणा कसा वाटला नाही' अशी अपेक्षा ठेवणे हे त्या घटनांकडे त्या काळापासून दूर करून बघणे ठरेल. दुसरे म्हणजे 'हे इतके ओंगळ आहे की हे त्या स्त्रीच्या इच्छेविरुद्धच होत असले पाहिजे' हे मानण्यामागे परत आपल्यी सध्याची मूल्ये आहेत. मुख्य राणी या पदाबरोबर येणारी कर्तव्ये म्हणून अशा विधींकडे बघितले जात असेल. मुख्य राणी हे पद इतके महत्वाचे असेल की त्या बदल्यात ही तडजोड स्विकारली जात असेल. याही शक्यता आहेत. शेवटी, हे करणे खरच तडजोड असेल, हे मनाविरुद्धच होत असेल हे गृहीतक का ? ही आवड आपल्या समाजात नव्हतीच असे म्हणणे धाडसी होय.
मला नेहमी असे वाटते की लैंगिकतेकडे पूर्वज जास्त मोकळ्या (निदान वेगळ्या तरी नक्कीच) दृष्टीने बघत होते. बंधने, निर्बंध कमी असावेत असे मानायला वाव आहे. याची उदाहरणे कैक ठिकाणी सापडतात. हे असे विधी त्या मानसिकतेतून आले असण्याची शक्यता जास्त वाटते.


Kedarjoshi
Monday, February 11, 2008 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश माझ्या मते (माझ्या वाचणात म्हणा हव तर) हा यज्ञ निदान गेल्या ३००० वर्षात झालेला नाहीये.
तुम्ही ज्या विधीचे वर्णन करत आहात तो विधी मनु ने लिहीलेली आहे. (मनु कोण आणि कधी होता ह्याचाही वाद चालु आहे) पण तो कालावधी इस पुर्व चा आहे. साधारण १५० वर्ष ईस पुर्व.

पेशवा म्हणतो तसे त्या काळात त्यांचा विश्वासानुसार ती लोक वागली. आता तसे कोणी वागत नाही त्यामुळे तो विषय येथे उभा राहात नाही.

रामाने देखील अश्वमेध यज्ञ केला होता तेव्हा सिता त्या सोबत न्हवती. आणि राम ऐकपत्नीव्रत असनारा माणुस होता. जर त्या काळी सोन्याची सिता तयार होत असेल तर त्याचे उदा घेउन त्या नंतरच्या राजांनी आपल्या खर्या पत्नीला तसे करायला लावले नसेल तर प्रतिकात्मक पत्नी उभ्या केल्या असतील असे गृहीत धरायला हरकत नसावी.

अज्जुका दुर्दैवाने सर्वच प्रतिष्टीत संस्कृतीत ( ग्रिक, हिंदु व नंतरच्या ख्रिस्ती) स्त्रीला दूय्यमच वागनुक होती. म्हणुन संस्कृती संस्कृती करु नये काय. जी वाईट वा चांगली संस्कृती होती वा आहे ती आपली आहे असे म्हणने हे तर परिस्थिती ला सामोरेजाने होय त्या पासुन पळुन जाने हे चांगले नाही भले मग आपला ईतिहास कितीही वाईट असो.

स्लार्टी तुझे लैंगीकतेचे मत बरोबर वाटते. नाहीतर वात्सायना ने कामसुत्र त्या काळी लिहीले नसते. शिवाय त्या ग्रंथात पण कित्येक गोष्टी आहेत जसे आजचा गे हा विषय. तो त्याने तेव्हा वेगळ्या दृष्तीने मांडला आहे. रादर दोघांनी दुसरा पुरूष वा स्त्री कशी आपल्या जाळ्यात ओढावी हे पण लिहीले आहे.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators