|
टण्या, तुझा तो दुसर्याच्या रजिस्टर लग्नाचा किस्सा कहर आहे
|
सव्या, माझे नाही रजिस्टर लग्न.. मी पाहिलेले रजिस्टर लग्न म्हण.. इथे मुलगी भेटेना कुठली, लग्न कुठले करतोय मी.. कोणी हो म्हणाली ना तर रजिस्टरच काय राक्षस, गंधर्व, यक्ष.. इ.इ. कुठल्याही प्रकारचे लग्न करीन [:ड]
|
Asami
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:28 pm: |
| 
|
. इथे मुलगी भेटेना कुठली, >> garters catch करायची practice कर बरं मग तू
|
टण्या, अपडेट मारला रे, तेंव्हा घाबरू नकोस
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 09, 2008 - 11:27 pm: |
| 
|
माणसा, अश्यानी कसं होणार? 'हिम्मतवाला' भव! तु घालायला गेलाच असता ते गार्टर तीच्या पायात, तर काय ती उलटून तेच गार्टर तुझ्या हाताला बांधणार होती? CKP लोकांमधे लग्नात एक पध्दत असते (किंबहुना असायची). अंतरपाटापलीकडे आधी मुलीच्या मामानी तलवार घेऊन उभं रहायचं. क्षत्रीयाचं पहिलं लग्न तलवारीशी वगैरे अर्थ असावा. नागपुरातले एक गुरुजी हे सगळे विधी पार पाडायला लावायचे. तर लग्न लागायची वेळ झाली. गुरुजींनी "तलवार आणा" वगैरे आरडाओरड सुरू केली. हे असं काही होईल ह्याची कुणालाच कल्पना नसल्यामुळे ऐनवेळी तलवार कुठून आणणार? मुलीच्या मामांनी "गुरुजी, आधी कल्पना दिली असतीत तर.." वगैरे सुरु केलं. येव्हड्या वाक्यावरच का कोण जाणे गुरुजींचं टाळकं सटकलं. भरीस भर मुलीच्या अचरट भावानी खिशातून 'स्विस नाईफ़' काढून विचारलं, "हा चालेल का? improvise करु!" "नाहीतर हॉलच्या स्वयंपाकघरातली विळी आणा". मागून एक आवाज आला. "अहो, तो मुलगा पायलट आहे Air India त. कधी लुटुपुटूची तरी लढाई केलीय का विचारा!" आणखी एक सज्जन! शेजारी उभ्या असलेल्या एका लहान मुलाला धरून गुरुजी ओरडले, "मी निघतो. ह्या पोराला इथे उभा करतो लग्न लावायला. तुम्हीपण improvise करा!!!" एका आजोबांनी शेवटी मधे पडून गुरुजींना शांत केलं. आणि शेवटी डायरेक्टली नवर्या मुलीशीच नवर्या मुलाचं लग्न लागलं!
|
आणि शेवटी डायरेक्टली नवर्या मुलीशीच नवर्या मुलाचं लग्न लागलं! >>> आयला. म्हणजे मध्ये दुसरेच कोणी तलवारीशिवाय लग्नाला तयार वैगरे झाले होते की काय? 
|
Mrinmayee
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:10 pm: |
| 
|
मुलगी अत्यंत देखणी आहे. तेव्हा शक्यता नाकारता येत नाही!
|
Zakki
| |
| Thursday, January 10, 2008 - 9:56 pm: |
| 
|
मुलीने पण लावला होता का, की जो तरवार उपसून सिनेमातल्या शिवाजीसारखे तरवारीचे हात करून दाखवेल त्यालाच मी माळ घालीन?
|
Mrinmayee
| |
| Monday, February 04, 2008 - 3:29 pm: |
| 
|
नमुनेदार पत्रिका.. (अर्थात "लग्नाला याय्चं हं!!)-भाग १ 'हिरवाकंच शालु लेवून... गंधधुंद करणार्या निशिगंधाचा हार घेऊन... अंतरपाटापलीकडे असेल 'ती' उभी! ! तीचे थरथरणारे ओठ.. अबोल! फडफडणार्या पापण्या... वरच्या ओळींत 'अंतरपाट' हा शब्द आल्यामुळे ही थरथर-फरफर लग्नाच्या वेळाची असावी हा अंदाज बरोबर! नवरदेव हौशी कवी असल्यानं लग्नात सगळं कसं काव्यात्मक, तरीही शब्दांपलीकडलं हवं (म्हणजे नेमकं काय?) असा त्याचा आग्रह होता. "पत्रिका मीच लिहिलिय वहिनी! वाचून बघा!" "छानच हं!" (जास्त बोलले तर मला खीक करून हसु येईल याची भिती वाटली.) बरं आता प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची मजा! शालुचा हिरवा रंग हा सासुचा चॉइस असल्यामुळे नवरीनी (अर्थातच) लाल शालु निवडला होता! अंतरपाटापलीकडे उभी राहून ती नको तीतकी बडबडंत होती! "ताई, माझा शालु मागुन जरा नीट कर! परकर नाही नं दिसंत?" कसली अबोल डोंबलाची! पत्रिकेतल्या प्रमाणे फक्त अंतरपाट आणि निशिगंधाचा हार येव्हड्या दोनच गोष्टी बरोबर होत्या. निशिगंध अज्जीबात 'गंध धुंद' वगैरे करणारा नसला तरी स्वयंपाकघराच्या दिशेनी येणारा सकाळच्या न्याहारीच्या इडल्यांच्या मिश्रणाचा अंबुस वास मात्र आम्हाला सुसह्य झाला होता!
|
Divya
| |
| Monday, February 04, 2008 - 3:48 pm: |
| 
|
हा हा मृण्मयी, असला पत्रिकेचा मजकुर असु शकतो. पु. लं. चा असामी असामी मधला नानु सरंजामे आठवुन गेला. 
|
Mrinmayee
| |
| Monday, February 04, 2008 - 3:57 pm: |
| 
|
लग्नाला याय्चं हं-भाग २ आता हा पत्रिकेचा दुसरा नमुना! "बारा वर्षांपूर्वीचा १ फेब्रुवारीचा दिवस! शाळेच्या पहिल्या मजल्यावरून, दप्तरातून निसटलेली होम इकॉनॉमिक्सची माझी वही कुणी बरं झेलली असावी? शंतनूनी!!!" हे लाल शाईत छपलेलं होतं! (शंतनु हे नवरदेव). "तीथेच माझी आणि 'उत्तरेची' पहिली नजरानजर झाली!" हे निळ्यात! असली सटरफटर १०-१२ वाक्य आलटून पालटून लाल निळ्या शाईत लिहिली होती १२ वर्षांपासूनच्या प्रेमाच्या चाळ्यांचा आढावा घेतला होता. 'लग्नाजोगं वय झालंय! इतकी वर्ष भटकलेत! नशीब धरसोड केली नाही!एकदाच्या ह्या दोन कार्ट्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या की सुटलो!' असा विचार दोन्ही घरच्या शहाण्यासुरत्या मंडळींनी केला असावा. म्हणून लग्नाची तारीख, वेळ, स्थळ नीट लिहिलं होतं! लग्नाच्या हॉलमधे, "आत्ता कळालं उतू, तुला बारावीला इतके प्रयत्न का लागले!" हे शेजारच्या काकुंनी तीच्या कानात कुजबुजायची काही गरज होती का? लग्नाला याय्चं हं-भाग ३ ह्या पुढल्या पत्रिकेत वरमाय कवयित्री! पत्रिकेतला काही भाग येणेप्रमाणे.. सप्तपदीची सात पावलं साताजन्मांच्या गाठी.. यायलाच हवं तुम्हाला मंदार-अपर्णा साठी... अपर्णा कन्या दातारांची तीन भावंडात मोठी... मंदारही घरात मोठा आमची म्हातारपणची काठी... असलं बरंच 'ठी-ठी' वाचल्यावर म्हणावसं वाटलं..'साठी-बुद्धी नाठी' मंदारच्या बिचार्या वडलांना पत्रिका देताना संकोच होत असावा. आम्हाला हळूच म्हणाले, "आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!" लग्नात मंगलाष्टकं पण वरमायच्याच कृपेनी! त्यातही 'मंदार अमेरिकेत, न्यु यॉर्कला स्थाईक झालाय, अपर्णानी 'इंटिरिअर डिझाईनिंग'चा कोर्स केलाय हे सगळं कोंबलं होतं! पत्रिका आणि मंगलाष्टका हे काहीही म्हणा पण लग्नातले हायलाइट होते! लग्नाला याय्चं हं-भाग ४ दूधवाल्या भय्याच्या लग्नाची पत्रिका आली. .. "भेज रहे हैं प्रेमपत्रिका प्रियवर तुम्हे बुलानेको.. हे मानसके राजहंस तुम भूल न जाना आनेको!" नो कमेंट्स!
|
Asami
| |
| Monday, February 04, 2008 - 5:21 pm: |
| 
|
शेवटची महान आहे एकदम
|
Divya
| |
| Monday, February 04, 2008 - 5:30 pm: |
| 
|
मृण्मयी, दुसरा भाग जरा नीट तपशीलवार लिहायला पाहीजे होतास म्हणजे निळ्या शाईतल आणि लाल शाईतल आलटुन पालटुन लिहीलेल... शेवटचा मजकुर पण कमाल आहे.
|
Slarti
| |
| Monday, February 04, 2008 - 5:45 pm: |
| 
|
मृण्मयी,  दिव्याला लाल - निळ्याबद्दल अनुमोदन आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल.... हा बापुडवाण्या भावाचा कहर आहे
|
>>"आम्ही निघाल्यावर वाचली तरी चालेल!" >>हे मानसके राजहंस haa haa ... ultimate..
|
Prajaktad
| |
| Monday, February 04, 2008 - 7:01 pm: |
| 
|
म्रु अगदी अगदी ! मध्यंतरी अशा काव्यात्मक स्वरचित पत्रिकेंची साथच आली होती(अजुनही असेल) अशा बर्याच पत्रिका (इतक्या स्पेशल नाही हो!) वाचल्याच आठवतय.. माणुस मोड ऑन "नमुनेदार आमंत्रण पत्रिका" असा एखादा बीबी काढावा का? माणुस मोड ऑफ़ माणसा! दिवे घे रे
|
Farend
| |
| Monday, February 04, 2008 - 9:22 pm: |
| 
|
महान आहेत या पत्रिका! अशा पूर्वी पाहिलेल्या पत्रिका साठवून ठेवायला हव्या होत्या. ती बोलत असलेले बाकीच्या आवाजामुळे ऐकू न येऊन ओठ थरथरतायत वगैरे वाटले असेल त्याला त्या हिंदी लग्नात सर्वांना प्रेमपत्रिका? एवढे राजहंस येणार असतील तर कोणी तरी 'दूध का दूध पानी का पानी' केले असेलच कदाचित मध्यंतरी एका लग्नात एका 'कडव्यात' 'गंगा जशी मिळे सागराला' वगैरे आले आणि हातातील अक्षता आणखी किती कडवी पुरवायच्या आहेत ह्या विचारात असताना मी भूगोलात हरवून गंगा डायरेक्ट सागराला (किंवा उपसागराला तरी) कोठे मिळते, आधी ब्रह्मपुत्रेला मिळते वगैरे विचार करू लागलो. का नवरी चे याला भेटण्या आधी दुसर्याच कोणावर प्रेम होते वगैरे सुचवायचे होते?
|
solid..... आता भटजीने केलेल्या कविता पण यायला हरकत नाही... मध्यंतरी मंगलाष्टकात वधू-वरांचे, जमलेल्या नातेवाईकांचे, आई बाबांचे नांव कोंबण्याचीही प्रथा होती.. मग (दात पडलेल्या शार्दुलासारखे) ते खडबडीत मंगलाष्टक म्हणायचे (मंगलाष्टके शार्दुलविक्रिडित वृत्तात असतात)... (माझ्या लग्नात बायकोच्या काकांनी असा काही प्रकार केला होता... पण एक अष्टक झाल्यावर भटजींनी माईक खेचून घेतला म्हणून वाचलो. नाहीतर आम्ही दोघे माळ घालण्याऐवजी खी.. खी... खी हसत सुटलो असतो...)
|
Manuswini
| |
| Monday, February 04, 2008 - 11:06 pm: |
| 
|
अय्या! अश्या पत्रीका खरोखर छापल्या जायच्या. कायच्याकाहीच मं. मला वाटले मृने गमतीने लिहितेय. कमाल आहे लोकांची. मी फक्त हे बघितले होते, म्हणजे ते पत्रीकेत, नवरा चंद्या (BA first class) , नवरी राणी (BA second class) अगदी घरच्या नावासकट शिक्षण छापलेले. तेच मला अती वाटायचे.
|
मृण्मयी, सहिच आहेत तिनहि पर्तिका! मी बर्याच लग्नात हौशि कवि कंवा कवियत्रींनि लिहलेलि मंगलाश्तक ऐकलि आहेत पन इतक्या भन्नाट पत्रिका काहि बघितल्या नव्हत्या. पत्रिकेवरुन आठवल. माझ्या आजि आजोबांच्या लग्नाचि पत्रिका आमच्या घरि आहे (त्यांच लग्न १९३५ च्या सुमारास झालेल) पत्रिकेत सगळ्यात सुरुवातिला (वर आणि वधु यांच्या परिचय जिथे असतो) तिथे आजि आणि आजोबांचे दोन अड़आकृति फ़ोटो होते. आणि खालि दोन स्वतंत्र विभाग होते एकात यजमानिण बाईंनि खालिलप्रमाणे आमंत्रण केल होत "आदरणीय बाईसाहेब श्रीकृपेने (इत्यादि इत्यादि) आमच्या घरि होणार्या या मंगल प्रसंगि आपण आपल्या लेकिसुना, शेजारणि आणि मैत्रिणिंसह येउन वधुवरांना मंगलाशिर्वाद द्यावेत." अर्थातच दुसर्या भागात यजमाना.तर्फ़े पुरुष वर्गाला असच आमंत्रण होत. विचारकरण्यासारखि गोष्ट म्हणजे आमंत्रण हे पानसुपारि साठि होत (जेवणासाठि नाहि). त्याकाळि म्हणे ( irrespective of class ) लग्नात फ़क्त नातेवाइक आणि सोयरे यांच्यासाठिच जेवण असायच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|