|
Ajjuka
| |
| Friday, February 01, 2008 - 3:26 am: |
| 
|
दिनेश, तुमच्या उदाहरणांच्यात एकही उदाहरण नाव न बदललेल्या कर्तुत्ववान व्यक्तीचे नाही. सगळ्या उदाहरणात बघा नाव बदललं तरी कर्तुत्वच महत्वाचं ठरलं ना असं म्हणताय तुम्ही. आणि मग नाव ठरवण्याचा अधिकार महत्वाचा म्हणताय. हे दुहेरी झालं नाही का? बर वरच्या पूर्ण चर्चेत कुणीच नाव बदलणं हे बावळटपणाचं आहे असं म्हणलं नव्हतं. मुद्दा तुम्हीच सुरू केलात. शब्दही तुमचाच. त्यावर उलटी उदाहरणं दीली तरी तुम्ही नाव बदललं तरी कर्तुत्व कमि होत नाहे हेच म्हणत बसलात. तेव्हा तुम्ही नक्की कुठल्याबाजूने बोलताय याबद्दल शंका निर्माण होणं साहजिक आहे. जाहीराती किंवा सिरियल्स यातून जे काही चित्रण होतं त्याबद्दल काही बोलायचं नाही इथे असं मी ठरवलंय. तुमचा मुद्दा मान्यच आहे पण सिरीयल्सबद्दल बोलल्यावर मायबोलीवरच माझी अक्कल काढण्यात आली होती. परत हे असलं ऐकून घ्यायची माझी इच्छा नाही आणि तेही निरर्थक सिरीयल्स निर्बुद्धपणे पहाणार्यांकडून. तेव्हा त्या विषयावर मी माझे मत देणार नाही.
|
Dineshvs
| |
| Friday, February 01, 2008 - 3:39 am: |
| 
|
नाव न बदलता स्वतःला सिद्ध करण्याचे तुझेच उदाहरण आहे कि. शर्मिला टागोर कुठे आयेषा बेगम झाली, पण लग्ना नंतर तिच बाजुला झाली. हेमामालिनीने कुठे नाव बदलले ? मुळात लग्ना आधी काहि करुन दाखवायची संधीच अनेकजणीना मिळत नाही. नावापेक्षा कामगिरी महत्वाची, हाच माझा मुद्दा आहे आणि राहिल. आजचे युग जाहिरातींचे आहे. प्रचंड मारा होतोय त्याचा. संस्कार करण्यात त्या मह्त्वाच्या आहेत. त्यातल्या आदर्शांचा, जीवनशैलीचा फ़ार परिणाम होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. स्त्रीला उपभोग्य वस्तु म्हणुन सादर करण्याचे, काम करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. नॉर च्या जाहिरातीत सर्व कुटुंबासाठी सूप करुन आणणारा नवरा मला आवडतो. च्यवनप्राश च्या जाहिरातीत एक दिवस घरातील बाई होवुन बघा, किती कठिण असते ते, असे सांगणारी जाहिरातही मला आवडते, आणि उत्तम राजकिय संदेश देणारी टाटा टीची जाहिरातही मला आवडते.
|
Bee
| |
| Friday, February 01, 2008 - 5:46 am: |
| 
|
ह्या बीबीला तोच तोच पणा येतो आहे. स्त्री पुरुष समानता हे झाले. आणखी वेगळे विषय असू शकतात त्याचाही विचार करा.
|
Mandarp
| |
| Friday, February 01, 2008 - 10:54 am: |
| 
|
नमस्कार, ह्या विषयाशी निगडित हा लेख आहे असे वाटते, म्हणून लिन्क देत आहे. दिनेशदा नी नेतेपणाची बरीच उदा. दिली आहेत. त्यापैकि काही ह्या लेखात वाचायला मिळतील. धन्यवाद, मन्दार http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2563008.cms
|
मला आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे, बर्याच सुशिक्षीत मुलीपण दुय्यम status accept करतात. त्यामुळे मुलांनापण घरून mixed signals मिळतात. <<<<हे अगदी बरोबर आहे ! लहान पणी आमच्या कॉलनी मधे पाहिलेला महिला मुक्ति कि अशा कुथल्या तरी विषयावर परिसंवाद आठवला ! त्यात एका so called स्त्री मुक्ति वादी एका महिलेने ( नाव लिहित नाही ) मांडलेले मत " भारतीय स्त्री मुळात स्वतंत्र आहेच , त्यावर एवढा परिसंवाद घेण्याची काय गरज , आजही प्रत्येक घरी चटनी - भाजी कुठली करावी हे स्त्रीच ठरवते " यावरून इतर बायकांनी केलेला गदारोळ पण पहाण्या सारखा होता .. " इतर देशातल्या स्त्रीया अंतराळात जातात आणि तुम्ही फ़क्त चटणी भाजी च्या स्वातंत्राय धन्यता मानता का etc.. etc..
|
पुरुषाना जगायचा हक्क आहे की नाही?
|
Anaghavn
| |
| Friday, February 01, 2008 - 1:42 pm: |
| 
|
आत्ता exactly काय करत आहात?
|
Divya
| |
| Friday, February 01, 2008 - 1:46 pm: |
| 
|
LOL दिपांजली, हसु आवरेना.
|
Asmaani
| |
| Friday, February 01, 2008 - 2:32 pm: |
| 
|
काल एका wellknown hospital मधे गेले होते. reception च्या माणसाने case paper करायला सुरुवात केली. नाव वगैरे विचारुन झाल्यावर मला विचारले " मालक" कुठे काम करतात? आईशप्पथ इतकं डोकं out झालं होतं! नवरा म्हणजे मालक? बर्याच ठिकाणी अजूनही नवर्याला मालक म्हटलं जातं. पण पुरुषांना बाकी कुणी, " तुमच्या मालकीणबाई काय करतात ?" असं कुणी विचारलेलं ऐकिवात नाही. बाकी dj अज्जुका आणि स्लार्टी, तुमचे विचार आवडले आणि पटले. आता मुद्दा देवस्थानांचा. अशी भरपूर देवळं आहेत जिथे स्त्रियांना गाभार्यात प्रवेश नाकारला जातो. आणि त्याबद्दल निषेध व्यक्त केला जातो. पण मुळात अशा देवळांवर स्त्रियांनीच बहिष्कार का टाकू नये. अरे नकोत आम्हाला असले भेदभाव करणारे देव! अज्जुका, तू वरती उल्लेख केलेलं ते कोल्हापूरचं कुटुंब बहुतेक माझ्या ओळखीचं आहे.
|
Arch
| |
| Friday, February 01, 2008 - 3:46 pm: |
| 
|
सामाजीक समानता ... ह्या खेपेला भारतात गेले असताना, एका उच्चभ्रू सोसायटीतल्या play area त घडलेली गोष्ट. तेथेच रहाणार्या भाच्याला खेळायला घेऊन गेले असताना दिसलेली आणि घडलेली गोष्ट. तिथे ३ - ४ झोपाळे होते. सगळ्यावर मुलं झोके घेत होती. एका झोक्यावर सोसायटीत घरकाम करायला आलेल्या बाईचा मुलगा बसला होता. खरं तर तो नुकताच झोपाळ्यावर बसला होता. तेवढ्यात एक बाई (कामवाली नाही ) अगदी up-to-date कपडे घालून आपल्या मुलाला खेळायला घेऊन आली. आल्या आल्या तिने त्या कामवाल्या बाईच्या मुलाला म्हटलं " ए उतर रे. ह्याला बसू दे (म्हणजे तिच्या मुलाला) " ते पोरगं लगेच उतरायला लागल. मी तिथेच भाच्याबरोबर नुसत्या उड्या मारत होते. त्या बाईला सांगितलं " तो आताच बसला आहे. ५ - १० मिनिटं बसू द्या मग बसेल तुमचा मुलगा. " लगेच म्हणते. " कामवाल्यांची मुलं अडवून बसतात झोके. " आता त्या मुलाला काय कळत आहे तो कामवालीचा मुलगा ते आणि त्याने झोपाळ्यावर बसायच नाही ( आणि का म्हणून बसायच नाही?). पण मी तेथेच उभी असल्यामुळे तिला काही त्याला उतरवता आलं नाही. अशा गोष्टी आपण सहज करू शकतो.
|
"इंदिरा गांधींचे सर्व दोष लक्षात घेऊनही त्यांच्यासारखा कणखर नेता, भारताला परत मिळाला नाही, हे सत्य उरतेच. पण त्यानंतर राष्ट्रपातळीवर स्वकर्तृत्वावर पुढे आलेली एकहि महिला मला दिसत नाही. " इंदिरा गांधि आणि जयललिता या दोघिहि स्वकर्तुत्वावर पुढे आलेल्या नेत्या नाहित. पंडित नेहरुंचि कन्या असल्यामुळे शास्त्रिजिंच्या मंत्रिमंण्डळात इंदिरा गांधि ह्या माहिति आणि नभोवाणि मंत्रि होत्या. पुढे शास्त्रिजिंच्या दुर्दैवि मृत्युनंतर मोरारजि देसाइंच्या पक्षांतर्गत विरोधि गटाने त्याना नेत्या म्हणुन पुढे केले कारण तोपर्यंत फ़ारसा अत्मविश्वास दाखवु न शकलेलि हि मुलगि हि आपल्याला 'कठपुतळि' सारखि वापरता येइल असा त्यांचा अंदाज होता. म्हणुनच त्यांना "गुंगि गुडिया" म्हंटले गेले. जयललिताचा राजकारणातिल उदय हा सर्वस्वि M. G. Ramachandran यांच्यामुळे झाला. पण पुढे या दोघिंनिहि राजकारणाचि अफ़लातुन समज दाखवत आपलि राजकिय कारकिर्द आकाराला आणलि. याउलट त्यांचा वैय्यतिक performence कसाहि असला तरि ममता आणि मायावति या दोघिहि स्वकर्तुत्वाने पुढे आल्या आहेत. याशिवाय दुसर्या फ़ळित बर्याच महिला नेत्या अश्या आहेत ज्या स्वकर्तुत्वावर राजकारणात आल्या आणि टिकुन आहेत. सुषमा स्वराज, मार्गारेट अल्वा, जयन्ति नटराजन, जया जेटलि हि काहि मोजकि उदाहरणे. माझा मुद्दा हा आहे कि जर वडिलांच्या किंवा गुरुंच्या(?) पुण्याइवर राजकारणात आलेल्या स्त्रिया स्वत:चे राजकिय कर्तुत्व सिध्ध करुन दाखवु शकतात तर तसच काहितरि महिलांसाठि असलेल्या राखिव जागांमधुन निवडुन आलेल्या स्त्रीया नाहि दाखवु शकणार? दोन्हि परिस्थितित गुणात्मक फ़रक काय? "नेतेपणाच्या बाबतीतही माझा मुद्दा वेगळा आहे. नेतेपण म्हणजे राजकिय नेतेपदच असे नव्हे. अगदी हाऊसिंग सोसयटीचे नेतेपदही घेता येते. मला निवडुन द्या मग मी तुमच्यासाठी यंव करीन आणि त्यंव करीन असे सांगण्यापेक्षा, तुम्ही आमच्यासाठी इतके केले आता गावासाठी, शहरासाठी करा असे म्हणत, निवडणुकिला उभे राहण्याचा आग्रह झाला पाहिजे. " १०० flats च्या हाउसिंग सोसायटित आणि १०० उम्बर्याच्या गावात लोकसंख्येच्या बाबतित काहि फ़रक आहे का? जर तिथे महिला चालतात तर इथे का नकोत? पोलिस किंवा इतर सरकारि खात्यात हाउसिंग सोसायटिच्या नेतेपदाचा काम करुन घेण्याच्या दृष्टिने कितपत उपयोग होइल? शिवाय हा अनुभव पुढच्या राजकिय कारकिर्दित जमेस धरला जाणार नाहिच. याउलट सरपंच पदाचा या दोन्हि बाबतित जास्त उपयोग नाहि का? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा कि खेडेगावात अश्या किति हाउसिंग सोसायट्या आहेत जिथुन तुमच्या म्हणण्याप्रमाणे (तिथल्या) स्त्रीयांना श्रीगणेशा करता येइल? "मी तुमच्यासाठी यंव करीन आणि त्यंव करीन असे सांगण्यापेक्षा, तुम्ही आमच्यासाठी इतके केले आता गावासाठी, शहरासाठी करा असे म्हणत, निवडणुकिला उभे राहण्याचा आग्रह झाला पाहिजे. " जेंव्हा एखादि व्यक्ति एखाद्यापक्षातर्फ़े निवडणुकिला उभि रहाते तेन्व्हा तिला त्या पक्षातिल लोकांचा पाठिंबा असतो, तुम्हि आमचे नेते (नेत्या) होवु शकता याचि (तुमच्या पुर्वकर्तुत्वामुळे) आम्हाला खात्रि आहे म्हणुन आम्हि तुम्हाला पाठिम्बा देतो असे कुठल्याहि उमेदवारांच्या निवडिमागचे (आदर्श) सुत्र असणे अपेक्षित आहे. (सध्या जी खरेदि विक्रि चालते ती राजकारण सेवेसाठि नसुन पैसा कमावण्यासाठि आहे ह्या भ्रष्ट मनोवृत्तिमुळे.) अगदि अपक्ष उमेदवारांना देखिल कुणाचा तरि पाठिम्बा लागतोच. पण हा पाठिम्बा हा मर्यादित लोकांचा असतो त्यामेळे निवडणुकिला उभे राहिल्यावर या उमेदवाराना जनतेला "मी योग्य उमेदवार आहे" हे पटवुन द्यावे लागणारच. एक उदाहरण म्हणुन बघा, कि अत्यंत कार्यक्षम आणि प्रामाणिक शासकिय अधिकारि म्हणुन प्रसिध्ध असलेले अविनाश धर्माधिकारि जेंव्हा निवडणुकिला उभे राहिलेत तेंव्हा राजकिय नेता म्हणुन त्यांचा अनुभव काहिच नव्हता त्यामुळे "मला निवडुन द्या कारण.............." हे त्यानाहि सांगावेच लागले.
|
रश्मी मला स्वतला तरी तुझा मुद्दा आणि हे वरचे पोस्ट आवडले. एकदा का राजकिय फ्रंटवर महीला पुरुषांचा बरोबरीने काम करु लागल्या की बाकी कोणाचे आडनाव लावायचे, घरी काय करायचे, हे प्रश्न दुय्यम ठरतील रादर ते प्रश्नच उठनार नाहीत कारण त्या स्त्रिया निर्णय घ्यायला मोकळ्या होतील. शहरी स्त्रियांनी खरतर पुढाकार घेन्याची वेळ आली आहे पण त्या दिनेश म्हणतात तश्या सिरियल्स पाहान्यात गुंग आहेत. गावातल्या कितीतरी स्त्रिया ह्या सरपंच असतात वा निदान गावपातळीवर पेढ्या चालवतात तसे शहरात फारसे दिसत नाही.
|
मनापासुन धन्यवाद केदार. तुमचे मायबोलिवरचे लिखाण मी नेहमि वाचते, तुमच्यासारख्या balanced व्यक्तिचि पसंति माझ्यासाठि खुप महत्वाचि आहे. मला स्वत:ला अस प्रामणिकपणे वाटत कि स्त्रीयांना राजकारणात सक्रिय होण्याचि आवश्यकता आहे. दुर्दैवाने काहि स्त्रीयांना यात रस नाहि हे खर आहे पण बर्याच जणि (विशेषत: खेड्यात) संधिअभावि पुढे येवु शकत नाहित हि पण वस्तुस्थिति आहे. त्यांना उत्तेजन मिळाव म्हणुन अश्या राखिव जागांचि सध्याच्या परिस्थितित गरज आहे. तुम्हि म्हणता तस एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रीया राजकारणात आल्या तर त्यांचा आत्म्विश्वास आणि निर्णय क्षमता तर वाढेलच पण परंपरावादि पुरुषांचा दृष्टिकोण बदलायला पण मदत होइल.
|
>>मी तिथेच भाच्याबरोबर नुसत्या उड्या मारत होते. अरे बापरे !
|
Yog
| |
| Friday, February 01, 2008 - 6:36 pm: |
| 
|
>>मी तिथेच भाच्याबरोबर नुसत्या उड्या मारत होते. बहुतेक "तिथेही" समानता हवी असेल... ~D
|
Ajjuka
| |
| Saturday, February 02, 2008 - 2:35 am: |
| 
|
अस्मानी, आपल्या ओळखीचे कोल्हापूरचे ते कुटुंब एक असेल किंवा वेगळे त्यांचे नाव इथे जाहीर करणार नाही आपण एवढी आशा मी बाळगू शकते काय? त्यांचं उदाहरणच केवळ महत्वाचं आहे इथे. त्यांचं नाव नाही. आर्च, झोपाळ्याचा मुद्दा अतिशय thought provoking! thanks!
|
Dineshvs
| |
| Saturday, February 02, 2008 - 3:34 am: |
| 
|
मराठमोळी, सरपंच पदाचा मुद्दा मला अगदी योग्य वाटतो. मी अनेक लहान गावात धडाडीच्या महिला सरपंच बघितल्या आहेत. त्यांचा बाबतीत घरच्या जबाबदार्या, बाई असणे हे मुद्दे गौण ठरलेले मी बघितले आहेत. पण मला बाकिच्या राज्यातील परिस्थितीची कल्पना नाही. सगळ्या देशभरातच असे होईल तर छान होईल. आज खेड्यातील अनेक जणीना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. मुलीच्या जातीला काय करायचेय एवढे शिकुन हा विचार आहेच. आणि अगदी शिकली तरी, मुलीने नोकरी करायची म्हणजे कमीपणा, हाहि जरा बरी आर्थिक अवस्था असलेल्या घरातील विचार आहे. यात मुलीची कमाई खाण्यातला कमीपणा, तसेच शिकली तर हिच्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा कुठुन आणायचा, हा खुळचट विचार आहे. पाण्याचा आणि इंधनाचा प्रश्न खेड्यात आहेच. मी खुपवेळा बघितले आहे कि, या कामात बायकांचा बराच वेळ जातो आणि शक्तीही खर्च होते. या कामात त्याना घरातील पुरुषमाणसांचे अजिबात सहकार्य मिळत नाही. गोवर्या हा एक इंधनाचा प्रकार आहे. पण मला क्वचितच कुणी पुरुष गोवर्या थापताना दिसला.
|
Anaghavn
| |
| Saturday, February 02, 2008 - 4:54 am: |
| 
|
मराठमोळी, राजकारणात रस नसण हे दुर्दैव कस होउ शकेल? हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा भाग आहे. हा तु जर अस म्हणालीस की, अन्याया विरुध्द बोलण्यात, किंवा आर्च ने केलं तसं बोलण्यात रस नाही हे दुर्दैव आहे--तर ते मला पटेल.
|
धन्यवाद दिनेश, खेड्यातिल मुलि आणि शहरातिल मुलि या दोन वेगवेगळ्या देशात रहात आहेत अस वाटाव इतपत त्यांच्या परिस्थितित अंतर आहे. शिवाय आर्च नी उपस्थित केलेला मुद्दा आहेच. सामाजिक प्रतिष्ठा हि आर्थिक निकषांवर अवलंबुन असण्याच्या आजच्या काळात खेड्यातिल गरिब आणि अशिक्षित मुलिना किति पावलोपावलि किति संघर्ष करावा लागत असेल याचि कल्पनाच केलेलि बरि. अनघा, मी in general विधान केल नव्हत,विषय असा सुरु होता की शहरातल्या महिलांना फ़क्त (एकता कपुर type ) tv serials बघायला आवडतात त्यामुळे त्यांना (आरक्षित जागांचि) संधि मिळालि तरि त्या तिचा उपयोग करणार नाहित आणि यातुन नेत्रुत्व निर्माण व्हायच्या ऐवजि 'कठपुतळ्या' निर्माण होतिल. माझ विधान हे त्या संदर्भात होत, की या स्त्रीयांमुळे बाकिच्या ज्या संधिच्या प्रतिक्षेत आहेत त्यांचा हक्क हिरावुन घेतला जावु नये.
|
Anaghavn
| |
| Saturday, February 02, 2008 - 7:31 am: |
| 
|
well in that case माझा गैरसमज झाला असावा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|