| 
   | 
| | Ajjuka 
 |  |  |  | Saturday, January 26, 2008 - 5:25 pm: |       |  
 | 
 संपूर्ण समाजात केवळ नाचगाणं येणं याला महत्व येणं. नाचगाणं तेही भीमसेन जोशी किंवा रोहिणी भाटे यांच्यासारखं आयुष्यभराच्या तपःश्चर्येतून आलेलं नाही तर केवळ फडतूस गाणी बघून्/ ऐकून कॉपी केलेलं असं. हेच आदर्श निर्माण होणं ह्यात काहीच चुकीचं नाही वाटत?
 अर्थकारण.. वाहिन्यांचं आणि  TRP  चं गणित यातल्या धंद्याचा भाग लक्षात घेऊनही हे बरोबर नाही वाटत.
 स्पर्धकाना नावं ठेवायची नाहीत मला पण झी मराठी वरच्या सारेगमप चा अपवाद सोडला तर कुठल्याही स्पर्धेची किळस वाटावी इतकं बाजारू प्रकरण आहे हे सगळं.
 अरे तसं काय आयुष्यभर पुरायला काय लागतं... थोडं क्रूड वाक्य पण  '__ भी पैसा कमाती है!'
 असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व..
 
 झक्की,
 अवांतर.. एकदा उसगावात एका ओळखीच्यांच्या घरी गेले होते. तिथे एकुणात लहान मुलांबद्दल विषय चालला होता. मी सांगत होते ५ ते ६ वर्षाच्या एका मुलीला एका डान्स स्पर्धेत लावणीवर नाचताना, अगदी खास तमासगिरणीसारखे हावभाव करत डोळे मारत नाचताना बघून मला किळस आली त्याबद्दल. त्यावर ज्याचे घर होते त्या मित्राने लगेच गर्वाने सांगितलं  "oh no no! we dont allow our Nisha to do anything like laavaNe and stuff. she dances on Britany spears' numbers!"  यावर निशाची भारतभूमधे जन्मलेली माता कृतकृत्य होऊन बघत होती.  (BTW  माझा मित्र हा वंशाने भारतीय असून अमेरीकेत जन्मलेल्यांच्यापैकी आहे. त्याची बायको भारतात जन्मलेली व मराठी माध्यमात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेली. आणि त्याच्या लग्नाच्या व्हिडिओ टेपमधे मी तिला त्याच्या पाया पडताना पाह्यले होते. ही ही ही)
 
 एकदम आठवलं म्हणून सांगितलं...
 
 
 |  | | Zakki 
 |  |  |  | Sunday, January 27, 2008 - 12:02 pm: |       |  
 | 
 ब्रिटनि नि तमाशातली बाई यात कदाचित् तमाशातली बाई, तमाशा संपल्यावर, खाजगी आयुष्यात चांगली असू शकते पण ब्रिटनीचा नुसताच 'आनंदी आनंद गडे'.  पण आपल्या लहान मुलीचे कौतुक!! मग उसगावात असो किंवा भारतात.
 
 कदाचित् ही बातमी रेडीयो वाल्यांनी गंमत म्हणून सांगितली असेल, नि मी पण खरे तर गंमत म्हणून इथे लिहीले.
 
 बाकी उसगावात काय, पैसा म्हंटले की लोकांना काऽही पण चालते. वास्तविक १२० मिलियन म्हणजे ११ ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेत किस झाडकी पत्ती! पण आपले उगीच त्यात पैसा आहे म्हंटले की अमेरिकन खूष!!
 
 अमेरिकन लोक जगाची नितीमत्ता धुळीला मिळवत आहेत, हे सत्य आहे. याला जरी त्यांचे अनुकरण करणारे लोक जबाबदार असू शकतील, तरी असले काहीतरी निदान भारतात नि इथल्या भारतीयांच्यात तरी होऊ नये असे वाटते.
 
 कारण भारतीयांना शास्त्रीय संगीत, कथ्थक, भरतनाट्यम हे प्रकार उपलब्ध आहेत!
 
 
 
 
 
 
 |  | | Ajjuka 
 |  |  |  | Sunday, January 27, 2008 - 4:09 pm: |       |  
 | 
 >> ब्रिटनि नि तमाशातली बाई यात कदाचित् तमाशातली बाई, तमाशा संपल्यावर, खाजगी आयुष्यात चांगली असू शकते <<
 मान्य. आणि तमाशामधे नाचायला गायलाही बरीच मेहनत करावी लागते. पण शेवटी दोन्हीपैकी काहीही ६ वर्षाच्या मुलीने कॉपी करावं हे अयोग्यच.
 
 
 
 |  | मला ते चुकीचच वाटत अज्जुका. पण मी वस्तुस्थिती लिहीली. की जसे इतर धंदे तसाच हाही एक पोटापाण्याचा धंदा झालाय, होऊ शकेल. जर बघणारे प्रेक्षक असतील तर. (आणि ते असणारच आहेत.)
 
 
 |  | | Tiu 
 |  |  |  | Monday, January 28, 2008 - 5:51 am: |       |  
 | 
 Talent hunt  शोज वाइट नाहीत. पण त्या शोजचं जे व्यापारीकरण होतंय ते वाइट आहे. त्यामुळे या कार्यक्रमांचा दर्जा खालावत चाललाय.
 सारेगम १० वर्षांपासुन चालु आहे. सोनु निगम होस्ट करायचा त्यावेळी खरंच बघण्यासारखं होतं. परिक्षक पण काय दिग्गज असायचे तेव्हा. श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, संजीवनी हे सगळे गायक / गायिका टलेंट शो मधुनच आलेत. त्यांच्या प्रतिभेबद्दल कुणाला शंका नसावी.
 
 पण आता एक तर व्होट्स मुळे निकालाची विश्वासार्हता कमी झालीये. तो स्पर्धक गायक म्हणुन किती चांगला आहे हा सर्वात कमी प्रायॉरिटी फक्टर असतो. मराठी स्पर्धकाला सगळे मराठी लोक व्होट देणार, असामीला सगळे नॉर्थ इस्ट वाले, तेलुगुला सगळे साउथ इंडियन...
 
 त्यात भर म्हणुन जजेस...एकमेकांशी भांडण्यातुन काही वेळ उरला तर  performance  जज करणार. त्यात पण हिमेश रेशमिया सारखे जज असल्यावर तर आनंदच आहे.
 
 हे ही कमी म्हणुन मग  celebrity judges!!!  सलमान खान, लारा दत्ता, गेला बाजार बिपाशा बासु हे लोक जज? ज्यांची अभिनयातच बोंब आहे ते लोक संगीत स्पर्धा जज करणार म्हणे!
 
 
 |  | टीऊ. सेलेब्रिटी जज फ़क्त शोसाठी येतात आणि स्पर्धकाचे मनोबल वाढवण्याव्यतिरिक्त ते काहीही करत नाहीत. तिथे नावे लिहायचीच होती तर महेश भट्ट, शबाना आझमी ही लिहायची होती..
   
 अनामिकाचे नाटक मला पण बिल्कुल आवडले नाही पण ते ठरवून केलेले नाटक नव्हते इतकं मला खात्रीने समजलय..
  ती बालिश आहे आणि ही लहान मुलाचीच स्पर्धा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं सोनु निगम म्हणाला. याच कार्यक्रमामधे वसुंधरा  visually imapired  आहे. भोपालचा आमिर खूप गरीब आहे मात्र या गोष्टीचा उल्लेख करून व्होट मागितलेले नाही. स्टार प्लसच्या प्रोग्राममधे मात्र जयंअच्या कमी होणार्या दृष्टीबद्दल आणि व्योमच्या घर के नाजुक हालात बद्दल आभास दर वेळेला सांगतो आणि मग व्होट अपील केलं जातं..
 
 बाय द वे,  MTV  चे रोडीज कुणी बघतं का? यावेळेला सव सायको भरलेत त्यामधे असं वाटतय.. तो आंधळा बकून आलेला कबीर म्हणजे मजा होती एकदम..
 You are nobody to judge me whether I am blind or not..   सध्या ऑफ़िसमधे याची धमल नक्कल चालू आहे.
 
 
 |  | NDTV Imagine  वरचा  Nachle with Saroj khan  हा  show  मला अवाडला .
 ती खरच एकदम  step by step  शिकवते ,  प्रत्येक  rhythm bit  चा  importance  चांगली सांगते .
 पण फ़क्त माधुरीची च गाणी का शिकवतेय म्हणे ती
   
 
 |  | डीजे, तुला ही बातमी समजली का?
 विशाल शेखर रवि चोप्राच्या "भूतनाथ"ला म्युजिक देताहेत.
 त्यामधे विशालने आमिर हाफ़ीझ, तन्मय चतुर्वेदी आणि मुसर्रत याना पार्श्वगायनाची संधी दिली आहे..
 
 
 |  | | Sayonara 
 |  |  |  | Monday, January 28, 2008 - 1:05 pm: |       |  
 | 
 परवाच्या 'लिटील चॅम्प्स' मध्ये अनाउन्स केलं त्यांनी भूतनाथ बद्दल.
 मला आधी अनामिकाचा ड्रामाच वाटला वोट्स करता. पण मग सगळ्यांची  expressions  बघून तो ड्रामा नसावा अशी खात्री पटली. त्य हिमेश, आणि ईस्माईलपेक्षा सोनू आणि सुरेश वाडकर १००० पटींनी चांगले.
 
 
 |  | | Divya 
 |  |  |  | Monday, January 28, 2008 - 1:42 pm: |       |  
 | 
 पण फ़क्त माधुरीची च गाणी का शिकवतेय म्हणे ती
   माधुरीची जादु जाम उतरायलाच तयार नाही तर काय...
   
 
 
 |  | झी मराठीच्या पाठोपाठ आता ई - टी व्ही मराठीवर स्वरसंग्राम नावाची गायन स्पर्धा सुरु झाली आहे.
 
 संचालक  -  सुनील बर्वे, निहिरा जोशी
 परीक्षक  -  साधना सरगम, मयुरेश पै
 
 काही गायक - गायिका ठीक वाटतात.
 
 
 |  | सा रे गा मा चे आत्ताचे परिक्षक, सोनू आणि सुरेश वाडकर हे दोघेही  Level Headed .. त्यामुळे दर्जा चांगला आहे.. त्यात परवाचे 'अनामिका' प्रकरण बघून जरा शंका यायला लागली होती, पण लगेच मिटले ते उत्तम.. (हा कार्यक्रम खरं तर  Recorded  असतो, त्यामुळे तो भाग कापला असता तरी चालले असते. पण निर्मात्याला  Cashing  करायचा मोह झला असावा...)...
 
 या पूर्वीचे परीक्षक आणि आत्ता यात जमीन असमानाचा फरक आहे
 
 
 
 |  | | Amruta 
 |  |  |  | Monday, January 28, 2008 - 2:29 pm: |       |  
 | 
 कुणि  lead India  बघता कि नाही. मी एकदाच पहिल. मला जाम आवडलेल. त्या नंतर परत पहायचा योग काहि आलेला नहिये.
  मला वाट्त शनिवारी असत ते. 
 
 |  | नन्दिनी ,
 सहीच   V-S rocks!!
 मुस्सर्रत ला  break  दिल्यामुळे  looking forward to music release of Bhootnath
   btw,
 अनामिका नी काय ड्रामा केला परवा ?
 
 
 |  | ETV  वर परवा निहिरा ला पाहिलं .
 बापरे ...  कसली ढोल झालीये  ,  आणि कसली भदा भद चालते
   गाते छान पण सूत्रसंचालन करण्याच्या  skill  मधे  solid  बोंब दिसतेय !
 आणि  last week  गजेन्द्र च्या  26 th jan special  मधे उज्जैनी आली होती ,  टुणटुण पेक्षा जास्त जाड झालीये ,  ओळखलच नाही मी आधी तिला !
 या मुली  showbiz  मधे राहून सुध्दा स्वत :  ला  maintain  कशा नाही करत ?
   
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Tuesday, January 29, 2008 - 7:30 am: |       |  
 | 
 अगदी अगदी,
 
 तसेच ते हिमानी  total shapeless .
 
 
 |  | DJ
 परवा अनामिकाने गाणं अर्धवट थांबवून 'मी  Quit  करते' असं जाहीर केलं.. कारण... 'स्मिता नंदी  Eliminate  झाल्यावर तिच्या वडिलांना  HeartAttack  आला, तसे आपल्या वडिलांना होऊ नये म्हणून...'
 
 सोनू, आदी, सुरेशजी एकदम  Stunned  वाटले पण नंतर (पुढच्या  Episode  मन्ध्ये) ते प्रकरण मिटले...
 
 
 
 
 |  | | Sayonara 
 |  |  |  | Tuesday, January 29, 2008 - 1:48 pm: |       |  
 | 
 DJ , गेल्याच्या गेल्या आठवड्यात ती स्मिता नंदी एलिमिनेट झाली. आणि तिने तिच्या वडिलांना फोनवरुन ही बातमी दिल्यावर त्यांना हार्ट अटॅक आला म्हणे. म्हणून मग ह्या अनामिकाने गाणं म्हणून झाल्यावर डिक्लेअर केलं की तिला क्विट करायचंय कारण उद्या जर ती ही एलिमिनेट झाली तर तिला तिच्या बाबांना असं काही होऊ द्यायचं नाही. मग सगळे तिला समजावत होते आणि दुसर्या दिवशी सॉरी म्हणून ती परत आली. हाच तो ड्रामा.
 
 
 |  | | Prajaktad 
 |  |  |  | Tuesday, January 29, 2008 - 4:17 pm: |       |  
 | 
 last week गजेन्द्र च्या 26 th jan special मधे उज्जैनी आली होती , टुणटुण पेक्षा जास्त जाड झालीये , ओळखलच नाही मी आधी तिला !
 >>>काय तो शो? अगदी शोबाजी... पुर्वीपासुन गजजिला देशभक्ति?? वैगरे विषय  cash करायला फ़ार आवडतात..सगळी प्रिरेकॉर्डेड गाणी नुसते सग़ळे लिपसिन्क करत होते. उज्जयनी अगदी रोशोगुल्ला झालिय.. हलवत सुद्धा नव्हत तिला..
 between  स्टार स्क्रिन  Awards मधे आचरट साजिदने अगदी उचांक गाठला..क्रिटिक  award  दर्शिल ला मिळाल्यावर शाहरुख्चा चेहरा साफ़ पडला होता... शाहरुख चा डान्स (उर्फ़ माकड्-उड्या) तोही शाहिद च्या जबरी  perrformans नंतर..ऽगदिच हास्यास्पद.
 award cermony  च
 तर पेवच फ़ुटलय..जो उठतो तो  award  देत सुटतो.
 
 
 |  | Thanks Vinay, Sayo!
   असले ड्रामा एक तर  arranged वाटतात नाही तर मुद्दाम  edit  न करता ठेवलेले तरी !
 गजेन्द्र च्या  program  मधेही  singers  चांगले आहेत पण मला तरी झी चे सारेगम किती तरी पटींनी चांगले वाटते .
 गजेन्द्र च्या छोटे उस्ताद मधे अतिशय  boring  वातावरण असते  ,  त्यात तो आभास पकवतो ! आणि प्रीतम सोडून इतर अति शहाणे  judges!
 त्या पेक्षा झी चे सध्याचे  judges  आणि  format  बरा वाटतो !
 ती वैशाली का कोण चिमणी आहे ती महा आगाउ आहे  ,  तन्मय आधी निरागस वाटायचा पण अता तोही त्याच मार्गाने चाल्लाय !
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
|   हितगुज दिवाळी अंक २००७
 |  |  
   |