|
Ajjuka
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:00 am: |
| 
|
अवांतर... अरे त्या मृण्मयीला संपूर्ण नावानेच हाक मारा किंवा मृ म्हणून पुढच्या शब्दाआधी स्पेस द्या. मृताई किती विचित्र वाटतंय. माफ कर मृण्मयी पण जामच खटकलं म्हणून लिहिलं.
|
राखिव जागा समानता अस्तित्वात यावि म्हणुनच हव्या आहेत. जगाच्या (अर्वाचिन) इतिहासातिल महिला नेत्यांचि नाव मी सहज आठवायचा प्रयत्न केला. अजुनहि हातच्या बोटांवर मोजता येतिल एवढिच नावे आहेत हि योगयोगाचि गोष्ट निश्चितच नाहि. (सिरिमावो बांदर्नायके, गोल्डा मायर, ईंदिरा गांधि, मार्गारेट थेचएर, बेनझिए भुट्टो, बेगम खालिदा झिया, मेघावति सुकार्णोपुत्रि, चंद्रिका कुमार्तुंगा, शेख हसिना वाजेद आणि अंजेला मार्केल.) मझ्या मते ह्याच एकमेव कारण म्हणजे महिलांना आपल्या राजकिय नेत्रुत्वाच्या रुपात मान्य करण्याइतकि पुरषांचि मानसिकता प्रगल्भ झालेलि नाहि. लोकशाहित निवडुन येण्यासाठि कुठल्याहि उमेदवाराला गुणवत्तेपेक्शाहि बहुमताचि (दुर्दैवाने) आवश्यकता असते. आता जर महिलांना ५०% पुरुषांचा मुळातच विरोध असेल (एक गृहितक म्हणुन विचार करा) तर त्या निवडुन कश्या येणार गुणवत्ता असुनहि? आपलि भारतिय राज्यघटना अस म्हणते कि समाजातिल अल्पसंख्यांक गटालाहि संसदेत प्रतिनिधित्व मिळवण्याचा हक्क आहे आणि ते मिळण्याचि शक्यता नसेल तर त्यांना ते तस मिळाव म्हणुन कायद्याने त्या गटाला संरक्षण दिले जावे (मि anglo-Indian गटाचा मागच्या post मध्ये उदाहरण म्हणुन वापर केला आहे). याच विचारतुन महिलाना grass root level वर राखिव जागा देण्यात आल्या. सुरुवातिला proxy contenstants चे प्रकार झालेतहि पण हळु हळु सकारात्मक परिणाम दिसायला लागलेत किंबहुना अजुनहि दिसताहेत. अलिकडे तर राखिव जागा नसताना देखिल सरपंच पदि महिला निवडुन येण्याचि उदाहरण दिसुन आलियेत (प्रमाण अर्थातच कमि). मग हाच प्रयोग देशव्यापि करण्यात काय हरकत आहे? निदान महिला पायलट असुनहि सुखरुप पोह्चवलस म्हणुन देवाचे आभार मानणार्या! पुरुषि मानसिकतेत काहि सकारात्मक बदल होइपर्यंत तरि. भारतिय राज्यघटनेतच आरक्षण हे अनिर्बंधित काळासाठि नाहि अस दुसर मार्गदर्षक तत्व आहे (ते सध्या पाळल जात नाहि हि सर्वस्वि वेग़ळि गोष्ट). तर एकदा महिलांना राजकिय जबाबदार्यांचि आणि पुरुषांना त्यांना नेतेपदि सहन करायचि सवय झालि कि ह्या राखिव जागा काढुन टाका. माझि खात्रि आहे तेंव्हा महिला गुणवत्तेवर निवडुन येतिल.
|
Giriraj
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:13 am: |
| 
|
स्त्रीला असमानता शिकवण्यात स्त्रियाच अग्रभागी असतात! इथे लिहिणार्या स्त्रिया काही भारतीय स्त्रीमानसाचे प्रतिनिधी नाहीत. उलट इथे लिहिणार्या आणि इतका विचार करू शकणार्या अपवाद म्हणूनच आहेत! नियमाला सिद्ध करण्रारे अपवाद!! कोण्या एके काळी स्त्रियांना दाबण्याची प्रवृत्ति समाजात भिनली आणि शेकडो वर्षात द्रूढ होत आजच्या थराला पोचली. ती अशी लगेच नाही जाणार. जाणून बुजूऊन प्रयत्न करावे लागतील. लहान वयातच मुलांना हे शिकवले जायला हवे की व्यक्ती म्हणून स्त्रीयांचा आदर केलाच पाहिजे. आज कर्मठ असणारी पिढी काही वर्षात 'रिटायर' होणार आहे. त्यांच्याशी भांदून त्यांना समानता शिकवत बसण्यापेक्षा पुढच्या पिढीला समानतेची जाणीव आतून करून दिली पाहिजे. मात्र हे लक्षात घेतलेच पाहिजे की आज आपण ज्या गोष्टींना समानता म्हणून लागू करण्याच्या बाजूने आहोत त्यापेक्षा अधिक काही समानता पुढच्या पिढ्यांना अभिप्रेत असेल. तेव्हा मग आपण इतके विचार करणारेही त्या पिढीच्या दृष्टीने 'कर्मठ' दिसू! कुणीतरी शनि शिंगणापूरबद्दल लिहिले आहे. तिथे पुरुषांनाही तिथे मिळणारे कपडे पेहरूनच चौथर्यावर जाता येते. यात धार्मिकता काही नाही तर फ़क्त 'आर्थिकता' आहे. तसे पंचे,धोतर भाड्याने देणार्यांचा धंदा व्हावा इतकाच उद्द्येश्य त्यात मला दिसला. आम्ही आपले खालूनच शनिदेवाला हात जोडले. बाकी स्त्रियांच्या सावलीनेही विटाळणार्या देवांचं देवच भले करो!!
|
Sanish
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:17 am: |
| 
|
>>>सतत हे करत राह्यलाचा मानसिक व शारिरीक थकवा? त्याचे काय? हा मुद्दा अतिशय महत्वाचा. theoritically प्रतिकार करावा ठीक आहे पण डोक्याला त्रास होतो त्याला कोण तोंड देणार असतं? मानसिक त्रासावरून कोर्टात जाणं किंवा मानसिक त्रासाला वेगळी किंमत देऊन भरपाई मागणे हे अमेरिकेत घडतं पण भारतात एकूणच कुठल्याही डोक्याला झालेल्या त्रासाला कुणीतरी किंमत देतं का? ह्या चर्चेत भरपाईचा मुद्दा गौण आहे पण चूक कुणाची आणि त्रास कुणाला?? दामिनी वकिलाच्या प्रश्नावर का डळमळते ह्याचं ही उत्तर ह्यातच आहे.
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:56 am: |
| 
|
म्रुन्मयी अतिशयच सुन्दर कविता. असलेच विचार माझ्या मनात या विषयाबद्दल आले होते, post करण्यासठी म्हणुन.( लोक्स मी माझी तुल तुलना "अम्रुता प्रितम बरोबर करत नाहीये याची क्रुपया नोंद घ्यावी). दिनेशदा, तुमचे मुद्दे बरोबर आहेत. बलात्कार ह प्रत्यक्षपणे एकदा होतो, पण आजुबाजुचे लोक मनावर असंख्यावेळा करतात. त्यापेक्षा त्यात तिची चूक नसुन "त्या माणसाचीजनावराची चुक आहे" आता स्वत:ला शिक्षा करुन घेऊ नये. त्याला शिक्षा देण्यासाठी पावलं उचलावीत, आम्ही पाठीशीबरोबर आहोत. पण दामिनी चा मुद्दा मात्र पटला नाही. कुठली बाई सुरुवातीला असे प्रश्न विचारल्यावर बावचळुनच जाणार, कारण तिला या गोष्टी सार्वजनीक पध्धतिने विचारताना शरम वाटत असते. (याचं उदाहरण तुम्हाला घरातच मिळेल्--आईच्याबहीणीच्या रुपात).
|
Bee
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:45 am: |
| 
|
बर्याच वर्षांपूर्वी मी रामायणावर एका लिखिकेचा लेख वाचला होता. त्यात तिने रामायणाच निरुपण केल होतं सीता रामाला म्हणते, " दुसर्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेऊन मला अग्निपरेक्षेला उतरवून तू माझा त्याग करणारा कोण? मीच तुझा त्याग करते " आणि ती भूमीत निघून गेली. मला हेच निरुपण पटल. >>अर्च, इतक छान निरुपन मी ह्यापुर्वी कधीच वाचल नाही. जर पुर्ण निरुपन असेल तर प्लीज मला मेल करून पाठव. मनुस्विनी, निरुपन म्हणजे कुठल्याही साहित्यप्रकाराचा खरा अर्थ लावण्याचा एक प्रयास. जेंव्हा एखादी गोष्टी imaginary वाटायला लागते तेंव्हा त्यामागचा संदर्भ काय असेल, हे असे कसे घडले, का घडले हे सुगावे लावत आपण बसतो. त्यालाच वांगमयीन शब्दात निरुपन म्हणतात. मीरेने विषप्राशण केले नि तिला त्यात कृष्ण दिसला. ह्याचेही निरुपन मी वाचले होते.
|
Slarti
| |
| Thursday, January 31, 2008 - 7:24 am: |
| 
|
>>> बाकी देऊळ हे जरी खाजगी मालमत्तेत गणले जात असले तरी तिथे जातीवरून कुणाला मज्जव करता येत नाही आता मग स्त्री-पुरूष यावरून पण असता कामा नये. अंगभर कपडे हे ठीक आहे पण साडी हा अंगभर कपडा आणि पंजाबी ड्रेस हा नाही ह्याला काही अर्थ नाही. अज्जुका, हा विवाद्य मुद्दा आहे. मी समजा एका Bachelor's club/Gentlemen's club ची स्थापना केली आणि तिथे स्त्रियांना येण्यास मज्जाव केला तर ते बेकायदेशिर होते का ? किंवा मी जर Women's club स्थापन करून तिथे पुरूषांना येण्यास मज्जाव केला तर... कोणी कायद्याचे जाणकार हे संगू शकतील का ? एकवेळ कायदा बाजूला राहू दे, ते नैतिक आहे की अनैतिक ? अशा ठिकाणी जाऊ न शकल्याने स्त्रियांना / पुरूषांना मिळणार्या स्वतःच्या प्रगतीच्या संधींमध्ये फरक पडतो आहे का ? एका विशिष्ट देवळामध्ये जाऊ न दिल्याने अध्यात्मिक उन्नतीची संधी दिली गेली नाही असे म्हणता येईलही, पण मग त्या विशिष्ट दैवताला स्त्रियांचा सहवास चालत नाही हे जाणकार दाखवूनही देऊ शकतील...किंवा उद्या जर मुरूगन देवस्थानाने Murugan Gentlemen's club असे स्वतःचे status बदलले तर... मग ते समानतेचा निकष लावून योग्य की अयोग्य ? हेच पुढे जाऊन कपड्यांबद्दलही म्हणता येईल. नियम असा आहे का की अंगभर कपडे असावेत ? तसे असेल तर मग आपल्याला वाद घालता येईल की पंजाबी अंगभर आहे की नाही हा. पण जर नियम असा आहे की साडीच असावी तर तो आवश्यक dress code झाला. पण एक आहे... पुरूषांना काहीच dress code नाही आणि स्त्रियांना मात्र आहे हे कसे ? हे जरा subtle आहे असे वाटते.
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 7:30 am: |
| 
|
खरच सुन्दर निरुपण पाठवल होत आर्च ने. बी, मला ते "मीरेच" निरुपण पाठवशिल का? वाचायच आहे. (आवड म्हणुन)
|
Dineshvs
| |
| Thursday, January 31, 2008 - 7:51 am: |
| 
|
अज्जुका, आपण थेट बोलु या. इथे अनेकजण तुला ओळखतात, अगदी अलिकडेच आम्ही तुला थेट रंगमंचावर बघितले, त्या पुर्वी तुझे कामच तेवढे आम्हाला दिसले, तु विवाहित आहेस हेही आम्हाला माहित आहे, तुला कधी कुणी विचारले का, कि तु सासरचे नाव का लावत नाहीस ? बहुतेक नसावे. याचे कारण एकच कि तुझ्या कामामुळेच आम्ही तुला ओळखतो, नावामुळे नाही. पुर्वी तर सर्रास बाईला तु कोण ? कुणाची ? असे थेट विचारले जात असे. लताच्या, लाविला तुरा फ़ेट्यासी, या गाण्यात तश्या ओळीच आहेत. माझा मुद्दा हाच होता, कि नाव काय यापेक्षा काम काय करु शकतो याचा विचार करा. नावाने ओळखण्यापेक्षा, नावाला ओळख द्या. हि काय करते पेक्षा, हे कोणी केले, असा प्रश्न पडु द्या. प्रतिकाराचा मानसिक थकवा येतो, कारण त्यांची तुम्ही दखल घेता. का घेता ? त्यांच्या संस्काराप्रमाणे वागणार ते. त्यांच्यावर तुम्ही संस्कार करु शकता का ? असेल तर जरुर करा. कठिण असले तरी अशक्य नाही. आणि त्यासाठीच तर आपण चर्चा करतो आहोत. राजकारणात राखीव जागांचे विधेयक संमत व्हायला खुप कठिण गेले. ( आता झालेय का ते ?) समजा ते झाले तर काय होणार, कि पुरेश्या बायका पुढे न आल्याने, बॅकलॉग येणार. तो भरुन काढण्यासाठी, कठपुतळ्या उभ्या राहणार. तेच मला नकोय. थेट निवडणुकीला उभे राहण्यापेक्षा गावगल्ली पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करा. आजही बचत गट, दारुची दुकाने बंद पाडणे, अशी कामे होतच आहेत. ( शहरभागातल्या बायका अजुनही खुळचट मालिका बघण्यात वेळ घालवुन, स्वतःची मानसिक प्रगति करुन घेत आहेत. त्याना शुभेच्छा देऊ या. ) यातुनच नव्या नेत्या पुढे येतील. आणि त्या खर्या नेत्या असतील.
|
Slarti
| |
| Thursday, January 31, 2008 - 9:48 am: |
| 
|
"स्त्रियांनी दखल घेऊ नये" हा एक अपूर्ण उपाय आहे असे वाटते. संस्कार सुधारणे याला बरीच वर्षे जावी लागतील, ते सुरू असताना प्रतिकार करावाच लागेल, म्हणजे जरब बसेल. जरब बसणे आवश्यक आहे नाहीतर समाज सुधारेपर्यंत बायकांना हे सहन करावे लागणारच. आता हे बायकांनी 'सहन न करण्याजोगे' या यादीतूनच काढून टाकावे अशी अपेक्षा ठेवणे मला आततायीपणाचे वाटते. मुळात इथे 'आत्मसन्मान' हा प्रश्न आहे का खरेच ? साधी गोष्ट आहे...माझ्या शरीराला माझ्या इच्छेविरुद्ध हात लावण्याचा कोणालाच अधिकार नाही. माझ्या मालकीच्या निर्जीव वस्तूलासुद्धा मी कोणाला परवानगीशिवाय हात लाऊ देत नाही, मग शरीर तर आधी येते. इथे आत्मसन्मानाचा प्रश्न मला तरी दिसत नाही. त्यामुळे 'तू माझ्या मालकीच्या गोष्टीला माझ्या परवानगीशिवाय हात का लावलास ? ' यासाठी मी प्रतिकार करेन. दुसरा मुद्दा नाच वगैरेचा.... त्या नाचांमधले सौन्दर्य बघण्याची दृष्टी देणे महत्वाचे आहे. स्त्रीपुरूष संबंधांकडे, त्या नात्याच्या सर्वच पैलूंकडे निरोगी दृष्टीने बघायला शिकवू ना आपण मुलांना लहान असल्यापासून... अभिरुची बदलायची आहे तर तिला जास्त समावेषक करू, संकुचित नको.
|
Bee
| |
| Thursday, January 31, 2008 - 10:34 am: |
| 
|
अनघा, तो लेख मिळणे आता अवघड आहे. ५ वर्षांपुर्वी अक्षर दिवाळी अंकामधे वाचला होता. स्लार्टी, तुमचे विचार सुंदर आहेत. अशी निरोगी दृष्टी लाभणे गरजेचे आहे म्हणून त्यासाठी संस्कार करायला हवेत. ते संस्कार कसे असावेत हे जर उदाहरणासहीत सांगता आले तर नक्की त्याचा उपयोग होईल.
|
Arch
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:14 pm: |
| 
|
मला आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे, बर्याच सुशिक्षीत मुलीपण दुय्यम status accept करतात. त्यामुळे मुलांनापण घरून mixed signals मिळतात. मला हवा तसा नवरा मिळतोय न, मग आईवडिलांना हुंडा द्यावा लागला तरी हरकत नाही किंवा वाटेल तसा खर्च करायला लागला तरी हरकत नाही अशी त्यांची विचारसरणी असते. मी तर इथे आलेल्या सुशिक्षित indian families मध्ये आईने मुलगा मुलगीमध्ये फ़रक केलेला पाहिला आहे आणि वेगवेगळे rules लावलेले पाहिले आहेत. म्हणजे काय तर समानता हवी असेल तर बायकांनी सर्वधिक आपली मानसिकता बदलली पाहिजे इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा.
|
Ajjuka
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:38 pm: |
| 
|
<<याचे कारण एकच कि तुझ्या कामामुळेच आम्ही तुला ओळखतो, नावामुळे नाही.>> याचा इथे संबंध काय? तुम्ही नाव बदलण्याच्या बाजूने बोलताय की न बदलण्याच्या? <<आता हे बायकांनी 'सहन न करण्याजोगे' या यादीतूनच काढून टाकावे अशी अपेक्षा ठेवणे मला आततायीपणाचे वाटते.>> very well said slarti! <<मला आणखी एक मुद्दा इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे, बर्याच सुशिक्षीत मुलीपण दुय्यम status accept करतात. त्यामुळे मुलांनापण घरून mixed signals मिळतात.>> correct! यामधे आया किंवा घरातल्या इतर बायकाच जास्त जबाबदार असतात. अर्थात आईला घरात सतत खालमानेने वावरावे लागत असेल तर मुलगा आपल्या बायकोला तसेच वागवणार आणि मुली कधी कणखर होऊच शकणार नाहीत. माझ्या TYBSc - Botany च्या वर्गात एक मुलगी होती. १२ वीला ९०% पडलेली. तिला डॉक्टर व्हायचं होतं. कसलीतरी स्कॉलरशिपपण मिळाली असती की ज्यातून शिक्षण झाले असते पण एका मार्काने ती हुकली त्यामुळे मेडिकलला मिळालेली सीट सोडून BSc . वडीलांची परिस्थिती होती पण वडीलांनी तिला सांगितले की ते पैसे भावाच्या शिक्षणासाठी आहेत. त्याचे शिक्षण महत्वाचे. म्हणून ही मुलगी निमूट आपल्या स्वप्नांवर, मेहनतीवर बोळा फिरवून बसली. एका शब्दानेही भांडली नाही. हे कळल्यावर मी खूपच upset झाले होते.
|
"राजकारणात राखीव जागांचे विधेयक संमत व्हायला खुप कठिण गेले. ( आता झालेय का ते ?) समजा ते झाले तर काय होणार, कि पुरेश्या बायका पुढे न आल्याने, बॅकलॉग येणार. तो भरुन काढण्यासाठी, कठपुतळ्या उभ्या राहणार. तेच मला नकोय. थेट निवडणुकीला उभे राहण्यापेक्षा गावगल्ली पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करा. आजही बचत गट, दारुची दुकाने बंद पाडणे, अशी कामे होतच आहेत. ( शहरभागातल्या बायका अजुनही खुळचट मालिका बघण्यात वेळ घालवुन, स्वतःची मानसिक प्रगति करुन घेत आहेत. त्याना शुभेच्छा देऊ या. ) यातुनच नव्या नेत्या पुढे येतील. आणि त्या खर्या नेत्या असतील." गावगल्लि पातळिवर स्वत:चि ओळख निवडणुकिला उभे राहुन निर्माण करता येणार नाहि का? दारुचि दुकाने बंद पाडण्यासाठि महिला आंदोलन करतात हे मान्य पण बरेच ठिकाणि अस आढळुन आलय कि दारुचि भट्टि चालवणार्या दुकान्दार स्थानिक राजकिय नेत्यांचा आणि पोलिसांचा आशिर्वाद असतो. अश्या परिस्थितित नेतेपदि महिला असतिल तर आंदोलनाला बळकटि येइल असे नाहि का वाटत? आणि सध्या ज्या स्त्रीया अश्या आंदोलनाचे नेतृत्व करतात आहेत त्यानि काय निवडुन येण्यासाठि पुरुषांचि मानसिकता तयार होण्याचि वाट बघायचि? कश्यासाठि? backlog भरण्यासाठि कदाचित कठपुतळ्या निर्माण होतिलहि पण तेंव्हाचि परिस्थिति आतापेक्षा काय वेगळि असेल? आणि या कठपुतळ्याना नाकारण्याचा पर्याय जनतेकडे असेलच ना? यातुन servival of the fittest या उक्तिप्रमाणे निवडुन येण्यासाठि उमेदवाराला (मग ती स्त्री असो अथवा पुरुष) performance दाखवावा लागतो हे सिध्ध होइल. मग प्रयोग करुन बघायला काय हरकत आहे? कदाचित तो यशस्वि होइल किंवा होणार नाहि पण अयशस्वि होवु शकेल म्हणुन प्रयोगच करायचा नाहि असा नकारत्मक दृष्टिकोन का? शक्यता अशि आहे कि या प्रयोगातुन ७०% कठपुतळ्या निर्माण होतिल पण ३०% नेत्या निर्माण होतिल. या ३०% नेत्या grassroot level वर आपलि लोकशाहि प्रगल्भ व्हायला मदत करतिल.
|
Peshawa
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:13 pm: |
| 
|
म्हणजे मग शेवटी, समानता म्हणजे नेमके काय, हे आर्चने लिहावे. आणि ते साध्य होण्यात काय अडचणी येताहेत ते बघु.>>> माझ्या मते समानता म्हणजे कुठलेही भलेवाइट क्रुत्य करण्याचा सारखाच अधिकार ( आणि असेलच तर सारखिच शिक्शा ! ) पहिला रूल लिंगावरून माणसाना \ पदार्थाना संबोधणे थांबवा! त्याकरता नवे व्याकरणाचे नियम घाला. भाषेतुन लिंग गेले की ते वृत्तीतूनही जाइला जास्त मदत होइल असे वाटते... भाषेला इतके लिंगाधिष्टीत करण्याचे प्रयोजन काय?
|
Chandya
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:14 pm: |
| 
|
मध्यंतरी रामाचा उल्लेख ह्या चर्चेत आला होता त्या संदर्भातील एक लेख http://khattamitha.blogspot.com/2008/01/blog-post_04.html भारतात पुढील अनेक वर्षेतरी स्त्रीयांसाठी सार्वजनिक वाहतुक सेवेत आरक्षित आसने असणे (दुर्दैवाने) आवश्यकच राहिल. अनेकांनी लिहिल्याप्रमाणे समानतेची जाणिव आधी जाणत्या वयातील लोकांमध्ये रुजणे आवश्यक आहे मग ती पुढच्या पिढीकडे संक्रमीत करता येईल. सुदैवाने अशी जाणिव असणार्यांची संख्या वाढते आहे.
|
Supermom
| |
| Thursday, January 31, 2008 - 6:35 pm: |
| 
|
अज्जुका हे मी पण एका घरात बघितले आहे अगदी जवळच्या संबंधांमधे. म्हणून माझे असे मत आहे की ही सुरुवात निदान आपण आपल्या घरापासूनच करू शकतो ना? मी माझ्या मुलीला मुलाइतक्याच सर्व सन्धी देईन आणि दोघांना एकाच पद्धतीने वागवीन हे प्रत्येक आईने मनाशी ठरवून त्याप्रमाणे वागले तरी एक सुरेख पाऊल या दृष्टीने उचलले जाईलसे मला वाटते. मग ते छोटेसेच का असेना... आईवडील मुलांना कसे वागवतात त्यावरही बरेच अवलंबून असते. आम्ही चौघी बहिणीच. पण घरात कायम सगळ्या गोष्टींना उत्तेजन मिळाले. बाकी नातेवाईक कायम आईला, विशेषत बाबांना नाऊमेद करायचे. 'अहो, मुलीच मुली.. शिक्षणात इतका पैसा घालवू नका.. तुम्हाला काय फ़ायदा याचा...' वगैरे बरेच. पण बाबा नि आई यावर कधीच लक्ष देत नसत. मध्यमवर्गीय परिस्थितीतूनही त्या दोघांनी आम्हाला उत्तम शिक्षण दिले. त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सगळ्याजणी इंजिनियर, पी एच. डी, पोस्ट ग्रॅज्युएट झालोत. आज आमच्यावर मुलगी म्हणजे काही वेगळी, कमी, असे संस्कार नाहीत तेच आम्ही आमच्या मुलामुलींना द्यायचा प्रयत्न करतो त्याचे श्रेय आईबाबांचेच... माझी सर्वात लहान बहीण जन्मली तेव्हा आईच्या शेजारच्या बाईला दुसरी मुलगी झाली होती. काय तमाशा केला तिने... जेवत नव्हती... मुलीला जवळ घेत नव्हती. तिने आईला विचारले की तुम्हाला नाही का रडू येत हो? आई फ़क्त हसली नि म्हणाली.. 'अहो, देशावर कुणाचं राज्य आहे हे विसरलात का?' (त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या...)
|
Dineshvs
| |
| Friday, February 01, 2008 - 3:16 am: |
| 
|
मी नाव बदलण्याच्या बाजुने बोलत नाही कि न बदलण्याच्या. मी नाव निवडण्याच्या अधिकाराबद्दल आणि कामगिरीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याबद्दल लिहितोय. नाव निवडण्याच्या अधिकार स्त्रीला असावा, याबाबत मी आग्रही आहे, पण हा हक्क तिचा तिने बजावावा, समाजाने या किंवा त्या बाजुनेही बोलु नये. नावापेक्षा मी कामाला महत्व देतो. नावाबाबत एक झळाळते उदाहरण देऊन, माझ्यापुरता हा मुद्दा संपवतो. नाट्यक्षेत्रात बाई असे आदरानी संबोधले कि हमखास विजया मेहता, डोळ्यासमोर येतात. त्यानी मराठी रंगभुमि सोडुन अनेक वर्षे झाली तरिही आज जर त्या क्षेत्रात आल्या तर अनेक जेष्ठ रंगकर्मी त्यांच्या पायाशी बसुन अभिनयाचे धडे गिरवायला तयार होतील. असे अलिकडे झालेही होते. बाईनी स्वतःची ओळख स्वतःच्या नाटकातुन दिली, आणि काळानुसार बाईनी विजया जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता हि तिन्ही नावे वापरली. आता माझा मुद्दा लक्षात आलाच असेल, कि काम महत्वाचे, नाव नाही. नाव निवडण्याच्या अधिकार मह्त्वाचा, त्या बाबतीत समाजाचे वा रुढींचे बंधन नको. सुपरमॉम चा मुद्दा महत्वाचा आहे. फ़ार पुर्वी एका बॅंकेची जाहिरात आली होती. बचत कश्यासाठी तर मुलीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी, त्या जाहिरातीला प्रचंड विरोध होवुन ती बंद पाडण्यात आली होती, आणि आजकाल गोरेपणाच्या क्रीमबद्दल हजारो जाहिराती दिसताहेत. गोरेपणा स्वतःसाठी असावा कि, पण जाहिरातीत दिसते काय, तर गोरे व्हायचे ते उत्तम नवरा मिळवण्यासाठी किंवा उत्तम जॉब मिळवण्यासाठी. या जाहिराती चालवुन घेणार्यानी, वर्णद्वेषाला का विरोध करावा ? इंदिरा गांधींचे सर्व दोष लक्षात घेऊनही त्यांच्यासारखा कणखर नेता, भारताला परत मिळाला नाही, हे सत्य उरतेच. पण त्यानंतर राष्ट्रपातळीवर स्वकर्तृत्वावर पुढे आलेली एकहि महिला मला दिसत नाही. जयललिता, ममता, मायावति या भगिनीनी मे नेत्या मानत नाही.
|
Ajjuka
| |
| Friday, February 01, 2008 - 3:18 am: |
| 
|
अगं सुमॉ आम्ही आत्ता राहतो ते घर आइबाबांनी घेतलं ८७ साली. मी फक्त आठवीत होते तेव्हा. आधीचं घर 1BHK होतं. आता मुलगी मोठी होतेय तर तिला वेगळी खोली हवी आणि आपल्याला कर्ज काढून का होईना ते शक्य आहे या विचाराने हे घर घेतलं. तर आईच्या ओळखीतल्या एक बाई कुत्सितपणे म्हणाल्या होत्या. एकटीच तर मुलगी, करायचंय काय मोठं घर. जायचीच ना ती कधीतरी. आई म्हणाली, "अहो ती आता १३ ची होईल. अजून १० वर्ष तर काही ती घरातून बाहेर जात नाही. तोवर तरी तिला आपली आपली स्पेस मिळूदेत. जबाबदारीही कळेल स्वतःची खोली साफ ठेवण्याची." अर्थातच त्या दुसर्या बाईंनी नाक मुरडलं यावर. झालंही तसंच लग्न बरंच नंतर झालं पण २३ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच परदेशी शिक्षणाच्या निमित्ताने मी घरातून मुक्काम हलवला.
|
Dineshvs
| |
| Friday, February 01, 2008 - 3:22 am: |
| 
|
नेतेपणाच्या बाबतीतही माझा मुद्दा वेगळा आहे. नेतेपण म्हणजे राजकिय नेतेपदच असे नव्हे. अगदी हाऊसिंग सोसयटीचे नेतेपदही घेता येते. मला निवडुन द्या मग मी तुमच्यासाठी यंव करीन आणि त्यंव करीन असे सांगण्यापेक्षा, तुम्ही आमच्यासाठी इतके केले आता गावासाठी, शहरासाठी करा असे म्हणत, निवडणुकिला उभे राहण्याचा आग्रह झाला पाहिजे. परत महत्वाचा मुद्दा आहे तो संस्काराचा. आज माझ्याकडे जे अनुभावतुन आलेले, पाककलेतले शहाणपण आहे ते केवळ, माझ्या आईच्या संस्कारामूळेच. आम्हाला हे काम मुलाचे वा हे काम मुलीचे, असे कधीही सांगण्यात आले नाही. आणि या कलेमुळे मला अनेक मित्रमैत्रिणी तर जोडता आल्याच, शिवाय अनेक देशात एकट्याने राहण्यात कधीच अडचण आली नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|