|
Dakshina
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:15 am: |
| 
|
जर समाजात समानता यावी असं वाटत असेल तर मूळामध्ये प्रत्येक माणसाचा दृष्टीकोन बदलायला हवा. जन्माला येणारी व्यक्ती ही स्वतंत्र आहे, आणि तिला स्वतःची अशी मतं आहेत. अपल्या स्वातंत्र्याचा, मतांचा आदर व्हावा असं जेव्हा वाटतं तेव्हा आपणही तो इतरांना देतो का याचा विचार केला तर काही प्रमाणात समानता येऊ शकेल. निदान समोरची व्यक्ती स्वतंत्र आहे, केलेल्या सर्वं गोष्टींची जबाबदारी आणि परिणाम भोगण्यास ती समर्थ आहे असा विश्वास असला तरी बास. त्याने सुद्धा दोन्ही जेंडर्सना समाजात मोकळा श्वास घेता येईल.
|
Slarti
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:21 am: |
| 
|
माणसा, तुला किती येतं अन् मला किती अशी स्पर्धा नसून स्त्रीला किती येतं हे पुरूष ठरवू पाहत असल्याने चर्चा आहे. स्त्रीकडे केवळ एक उपभोग्य वस्तु म्हणून बघणे म्हणजे "तू कितीही 'पुढे' गेलीस तरी तुझी खरी जागा हीच" असे पुरूषांनी सांगण्यासारखे आहे.
|
Slarti
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:35 am: |
| 
|
स्त्रियांसाठी राखीव जागा, आडनाव बदलणे / न बदलणे इ. बाबी महत्वाच्या आहेत कारण त्याला एकाच वेळी व्यवहार व नैतिकता यांचे अधिष्ठान आहे. तरीसुद्धा, या गोष्टी symptomatic relief देणार्या आहेत, therapeutic नव्हे असे वाटते. जर पुरूष समाजाची भिती म्हणून किंवा कायद्याचा धाक म्हणून किंवा इतर काही तरणोपाय नाही म्हणून स्त्रीला समान मानणार असतील तर समस्येचे निराकरण कसे होइल ? जोपर्यंत पुरूषांना स्त्रीची समानता आतूनच पटत नाही तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार, त्याचे दृष्य रूप बदलेल एवढेच. स्त्री-पुरूष समानता पटण्यासाठी मुले-मुली लहान असल्यापासूनच प्रयत्न व्हायला हवेत. हे बाळकडू प्रत्येक घरातून मिळेलच याची सध्या तरी दुर्दैवाने खात्री देता येत नाही, त्यामुळे शालेय शिक्षणातून ते दिले गेले पाहिजे. ते प्रभावी करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत.
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:38 am: |
| 
|
वा स्लार्टी... मस्त मांडलास मुद्दा. हीच गोष्ट स्त्री स्वातंत्र्याबद्दल म्हणता येईल... काही जण म्हणतात ना 'एवढं दिलंय ना स्वातंत्र्य स्त्रियांना..!' etc etc अरे पण तुम्ही कोण देणारे? स्वतंत्र आमचं आम्ही होऊ. तुमचे उपकार काय त्यात?
|
Slarti
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:41 am: |
| 
|
अज्जुका, हेच मी वरही एकदा मांडले होते. स्त्रीला स्वातंत्र्य वा समानता 'देणारे' पुरूष कोण ? ती स्वतंत्र, समान आहेच, गरज आहे ती ही जाणीव निर्माण करण्याची. उदा. "आमच्या घरी आम्ही मुलींना सर्व स्वातंत्र्य दिले आहे" किंवा "आमच्याकडे मुलगासुद्धा सर्व कामे करतो" या 'कौतुकयुक्त' विधानातून आपण नकळत काय सुचवत आहोत याचा विचार व्हायलाच पाहिजे.
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:48 am: |
| 
|
बर आता माझा इगो सुखावते..
|
Slarti
| |
| Wednesday, January 30, 2008 - 6:50 am: |
| 
|
ठिक आहे, २ - १. ... ... ...
|
Maanus
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:16 am: |
| 
|
लडको को आझादी मिली नही, और हम बात करते है नारी मुक्ती की http://www.youtube.com/watch?v=C_QuHZJD9eM good nite.
|
Arc
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:18 am: |
| 
|
लोकसत्ताच्या चतुरन्ग पुरवणीत front page वर एक चान्गला लेख आला आहे. कोणी लिन्क देइल का?ह्या विशयाशीच related आहे.
|
Anaghavn
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:19 am: |
| 
|
बर्याच वेळाने मी पुन्हा तोच मुद्द काढते आहे. (मी तो आता वाचला म्हणुन) बसलोकल अशा सार्वजनीक transport मधून बायकांची नजरेनेस्पर्शाने विटंबना करणारे असातातच. तेव्हा त्या बाबतीत जर समानता आणायची असेल, तर ते काम पुरुषंनाच करावे लागेल. कारण त्यांचा द्रुष्टिकोण बदलायचा आहे. परवाची घटना--स्थळ्--गणेश कला क्रिडा केंद्र--(एक व्याख्याना नन्तर्--अध्यात्मिक विषयावर व्याख्यान होते). व्याख्यान संपल्यावर, मी एका पुस्तकांच्या stol वर पुस्तक तत्सम काहितरी बघात होते. मागे एक्--५५६० वर्षाचा माणुस (अशा वयात असे चाळे करणार्यांना माणुस म्हणायच की जनावर?) मला हात लावतोय आणि अस दाखवतोय की चुकुनच लागतोय. जोरात अंगावर धाऊन गेले त्याच्या. आणि मोठ्या आवाजात म्हणले की "पुन्हा अस झाल तर कानाखाली आवाज कधेल म्हणुन." नन्तर पुन्हा त्याच्या मागे गेले थांबवल आणि म्हणाले,"तुम्ही जर वयाप्रमाणे वागला नाहीत तर मलाही तुम्हाला वयाचा मान देता येणार नाही." माझा मोठा आवाज ऐकुन आधीच तो घाबरला होता " sorry चुकुन झालं" इतकच म्हणु शकला आणि सटकला. पुन्हा जर अस वागताना दिसला तर अतिशय वाईट विचार येतोय मनात...देव भलं करो त्याच अणि पुन्हा अस करताना माझ्यासमोर न येवो तो.
|
Arc
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:21 am: |
| 
|
मानुस क्रुपया हे सम्भाशन इतक्या lightly घेउ नये. तुमच्या सारख्या शिकल्या सवरल्या लोकान्ची ही भुमिक रहनार असेल तर समानतेचा प्रश्न आनखीनच बिकट होइल
|
Dress code च्या मुद्द्या वरून एक आठवले,. डेरवण च्या शिव सृष्टीच्या आत जो मठ आहे तिथे बायकांनी साडी नेसून येण्याची सक्ति आहे . आणि लहान मुलींना बहुदा फ़्रॉक ! पण पुरुषांनी मात्र जीन्स ,t shirt अगदी shorts सुध्दा घातली तरी चालते . वर खास पुणेरी पाट्या style पाटीही आहे कि यावरून कोणी कर्मचार्यांशी वाद घालु नये ! नेमक्या कोकणात ट्रिप ला आलेल्या बायका ज्या एरवी साडी नेसतात त्यांनी सलवार कमीझ घातलेला असतो ! बायकांना तरी साडीच का हे लॉजिक समजलं नाही . फ़क्त बायकांनी ड्रेस कोड पाळायचा आणि साडी सारखा revealing dress चालतो पण अंगभर असलेले इतर भारतीय ड्रेस चालत नाहीत याची गंमत वाटली !
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:45 am: |
| 
|
साडीच्या आग्रहावरून आठवलं.. आमच्या ओळखीचे कोल्हापुरातले एक जण आहेत. साधारण ६५ च्या आसपास वय असेल. घरामधे परंपरेने रोज देवीला नैवेद्य जाणं इत्यादी आहे. हे स्वतः सिनेमाच्य धंद्यात पडलेले. दारू, सिगारेट, मटण काहीच निषिद्ध नाही. मस्त टाइट होऊन त्यांनी माझ्याशी वादपण घातलेला आहे. पण हे सगळं घराबाहेर. ३ मुलगे. मोठे २ पत्रकारीता, चित्रपट इत्यादी व्यवसायांशी निगडीत. आता पुण्यामुंबईकडे असतात. आणि धाकटा मात्र घरातली परंपरा चालवतो. देवीचं करणं, पुजारीपण, भिक्षुकी इत्यादी. आता हे जे काका आहेत ते एकदा या धाकट्याबद्दल कौतुकाने सांगत होते की तो बाहेर जेवत नाही कारण कुठलेही कपडे घालून स्वैपाक करतात लोक. अगदी भावाकडे गेल्यावरही भावांनी केलेलं खात नाही. स्वैपाकीण बाईने केलेलं खात नाही आणि दोन्ही वहिन्यांनी साडी नेसून स्वैपाक नाही केला तर तेही खात नाही. वहिन्यांनीच आणि साडी नेसूनच स्वैपाक केला पाहिजे. नाहीतर सोवळं ओवळं काहीतरी होतं म्हणे. मला एकतर concept चं हसू आलं. अंघोळ न करता घाणेरड्या हाताने साडी नेसून स्वैपाक चालेल पण स्वच्छतेने पंजाबी ड्रेस घालून केलेला स्वैपाक चालत नाही. सख्ख्या भावांनी स्वैपाक केला तर चालत नाही. या सगळ्याने याचं व्रत बित तुटतं. बर त्या दोन्ही वहिन्या आपापल्या करीअर मधे भरपूर पुढे गेलेल्या आहेत. त्यांना सकाळच्या वेळा गाठायच्या असतात. त्यात स्वैपाकाच्या बाईला सुट्टी देऊन, साडी नेसून स्वैपाक करायचा कितीही कामाचं प्रेशर असलं तरी. हा काय त्रास आहे? बर सांगणार्या काकंनी हे कौतुकाने का सांगावं.
|
Anaghavn
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:55 am: |
| 
|
अज्जुका, हेच ते. कुठल्याही गोष्टीचं कौतुक करायचं--म्हणजे ते स्वत: बाहेर कसेही वागोत, पण मुलाच अशा गोष्टीं वरुन कौतुक करताना स्वत:च वागण आठवत नाही यांना. comman sence हवा असतो तो अशा गोष्टिंसाठी. बरं आता हे काका आहेत, पण अशा फालतू गोष्टींच कौतुक करण्यात बायका ही आघाडीवर असतात. अणि एक्जण सुरु झाली की दुसरीतिसरी----- सुरुच.
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 30, 2008 - 8:15 am: |
| 
|
कामामुळे चर्चेत भाग घेता येत नाही, तरी काहि मुद्दे वाचुन लिहितो. अज्जुकाने ने केलेला प्रतिकार योग्य होता, दुमत नाहीच. आता समजा त्या पुरुषाच्या जागी स्त्री असती आणि तिने असा त्रास दिला असता तर ? आणि अज्जुकाच्या जागी मी असतो तर ? अश्या स्त्रिया प्रवासात भेटतच नाहीत का ? मग मी कसा प्रतिकार करायचा ? म्हणजे हा प्रकार होता सहप्रवाश्याला मुद्दाम त्रास देण्याच्या किंवा त्रास होतोय हे कळुनही, तिकडे काणाडोळा करण्याचा. त्रास सहन न करणे आणि त्याचा प्रतिकार करणे हे महत्वाचे, प्रतिकार करणे शक्य नसेल त्याने काय करायचे ? तर असे प्रसंग टाळायचे, किंवा प्रतिकार न करता दुर्लक्ष करायचे. असे दुर्लक्ष करावेच लागले तर त्या कारणाचाही विचार करायचा नाही. आणखी काय उपाय आहे ? पुढचा मुद्दा होता, स्त्रीला उपभोग्य वस्तु करण्याचा. यासाठी मी प्रसारमाध्यमाना जबाबदार धरले. या विचाराची सुरवात कशी झाली, तेही मी लिहिले होतेच. आणि अजुनही तो विचार कसा खोलवर रुजला आहे ते आपण बघतोच, पण या विचाराला खतपाणी घालण्याचे काम मात्र प्रसारमाध्यमे, करत आहेत, याबद्दल दुमत आहे का ? ग्रीक शोकांतिका केल्याच कि आपण, अगदी एकच प्याला पासुन केल्या, त्याबद्दल मला काहि म्हणायचेच नाही ? मग आपण दक्षिण अमेरिकेतील लोकनृत्ये करणार आहोत ता ? अशी नृत्ये सतत सादर होत राहिली तर त्याचे काय परिणाम होणार ? ते ग्रीक आहे का लॅटिन आहे याचा विचार प्रेक्षक करेल कि समोर जे दिसतय त्यातला थेट अर्थ शोधेल ? दक्षिण अमेरिकेत, आफ़्रिकेत किंवा अगदी आपल्याकडच्या ग्रामीण भागातही, असे नाच लोकनृत्य म्हणुन सादर होतात. त्यातली शारिरीक जवळीक, त्या त्या समाजात, समाजमान्य आहेच, पण आपल्याला जर फ़क्त ती कलाच घ्यायची पण त्यामागची सामाजिकता लक्षात घ्यायची नाही, असे करता येईल का ? जर सतत बीडी जलाईलेच सादर होत राहिले, त्याला मिळणारा प्रतिसाद दिसत राहिला, आणि मुलानी त्याचे अंधानुकरण केल्यावर स्वतः पालकच त्याला प्रोत्साहन देत राहिले, तर मग दोष कुणाचा ? म्हणजे मग शेवटी, समानता म्हणजे नेमके काय, हे आर्चने लिहावे. आणि ते साध्य होण्यात काय अडचणी येताहेत ते बघु. राखीव जागा महत्वाच्या कि आत्मसन्मान ? आडनाव महत्वाचे कि नाव निवडण्याचा अधिकार ? जसा माहेरचे नाव कायम ठेवण्यात काहिच गैर नाही तसेच नवर्याचे आडनाव लावणारी स्त्री बावळटही ठरत नाही. तिचे कर्तऊत्व महत्वाचे ? निलम प्रभु ची करुणा देव झाली, आणि बकुल पंडीत ची अलकनंदा वाडेकर झाली म्हणुन त्यांच्या कलेत काहिच फरक पडला नाही.
|
Bee
| |
| Wednesday, January 30, 2008 - 8:43 am: |
| 
|
दिनेश, पुरुषांसोबत असे प्रकार घडत नाहीत. मी तरी अजून ऐकले नाही, वाचले नाही, अनुभवले तर नाहीच नाही
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 30, 2008 - 8:55 am: |
| 
|
बी, मी स्वतः अनुभवले आहे. जरा सरुन बस म्हणाल्यावर, बाई म्हंटल्यावर कुणीही adjust करतं असे ऐकावे लागले होते.
|
Bee
| |
| Wednesday, January 30, 2008 - 9:49 am: |
| 
|
खरच विनोदाची गोष्ट म्हणजे किती पुरुष अशा घटनांचा प्रतिकार करू इच्छितील.
|
Manjud
| |
| Wednesday, January 30, 2008 - 10:52 am: |
| 
|
डीजे, एक गंमत म्हणून सांगते. डेरवणला आमचं बरेचदा जाणं येणं होतं. डेरवण अगदी नविन नविन असताना आम्ही बघायला गेलो होतो. तेव्हा मी पॅंट, टी - शर्ट तर माझ्या ३ मावश्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावेळी तर असा पोषाख असलेल्याना त्या मुख्य हॉलमध्येही प्रवेश नव्हता. मग आईने मला त्या पॅंट, टी - शर्टवर फ्रॉक घातला आणि माझ्या मावश्यांनी पंजाबी ड्रेसवरच साडी नेसली आणि चक्क आम्हाला प्रवेश मिळाला. आता परदेशी नागरीकांच्या भेटीचं प्रमाण वाढल्याने ही पोषाख प्रवेश बंदी समर्थांच्या मठापुरती मर्यादीत केली आहे.
|
मंजु, तो मठ समर्थाचा नाहिये. आणि हल्ली तिथल्या मूर्तीची नीट देखभाल होत नाही त्यामुळे बघण्यासारखे काही नाही राहिले. राहता प्रश्न ड्रेस कोडचा. साडी मधे असं काय सोज्वळ आहे जे पंजाबी ड्रेस मधे नाही ते मला तरी अजून समजलेलं नाही. साडी कुठच्याही बाईला छान दिसते पण साडीच नेसावी (बायकोने) हा हट्ट असलेले कित्येक जण पाहिले आहेत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|