|
Uchapatee
| |
| Monday, January 28, 2008 - 1:29 pm: |
| 
|
मुलाने अतिउत्साहाच्या भरात सॅम्पल्स काउंटरवर ठेवल्यावर कॅरी बॅग डस्टबीन मधे टाकुन दिली होती. बीन मधली ईतर घाण बघता त्याला बॅग पुन्हा डस्टबीन मधुन काढवेना. त्यामुळे रिसेप्शनिस्ट ओरडल्यावर तो मुलगा एका हातात कंटेनर व दुसर्या हातात बोर्नव्हिटाचा डबा अशा अवतारात बाजुला झाला व काय करता येईल याचा विचार करत टॉयलेट कडे चालायला लागला. पहिला वीर तिकडेच घुटमळत होता. दोन समदुखीः भेटले व दु:ख्खाची देवाण घेवाण झाली. दुसर्याची अड्चण ऐकतांना पहिल्याचे डोळे लकाकले. त्याला मार्ग दिसला होता. ”मला तुझे सॅम्पल दे” पहिल्याने मागणी केली. दुसरा मागणी ऐकुन हबकलाच. त्याने अशी अपेक्षा केली नव्हती. ”हाड. काहीतरीच काय. माझे तुला कसे चालेल?” दुसरा ”कोणाला काय कळणार आहे?” त्यावरुन थोडे कळते कि कोणाचे आहे ते?” – पहिला ”पण रिपोर्टमधे काही गडबड निघाली तर? मला काही रोग असेल तर?” दुसर्याला अजुनही आयडियेची कल्पना झेपत नव्हती. ”काही निघाले तर माझे नुकसान होईल न? चल मी रिस्क घ्यायला तयार आहे!. तुला काही रोग वगैरे आहे का? नसेल! कारण तसे असते तर तु मेडिकलला आलाच नसतास. फेल होईल हे माहीत असेल तर क़ोण उगाच एवढा त्रास घेईल.” पहिल्याचा आग्रह विथ कारण मिमांसा.
|
Uchapatee
| |
| Monday, January 28, 2008 - 1:30 pm: |
| 
|
ईतके होईपर्यंत दुसर्याचे डोके पण काम करायला लागले होते. “ठीक आहे. पण सॅम्पल तु ट्रांस्फर करायचे. आणी हो, दोघांच्याही कंटेनर मधे” दुसरा तयार झाला. ते नाहीसे झाले व 10-15 मिनिटानंतर दोघेही आपाअपले कंटेनर्स घेउन मेडिकल साठी रांगेत उभे होते. बहुधा दोघेही ठरल्याप्रमाणे परदेशी गेले असावेत.
|
Sonalisl
| |
| Monday, January 28, 2008 - 6:41 pm: |
| 
|
अरे बापरे.... ह. ह. पु. वा.
|
Malavika
| |
| Monday, January 28, 2008 - 6:57 pm: |
| 
|
ह. ह. पु. वा.
|
Aashi
| |
| Monday, January 28, 2008 - 9:15 pm: |
| 
|
खरच... ह. ह. पु. वाट लागली
|
Farend
| |
| Tuesday, January 29, 2008 - 12:57 am: |
| 
|
खरंच, लोळलो हसून हसून ऑफिसमधे
|
Divya
| |
| Tuesday, January 29, 2008 - 3:29 am: |
| 
|
बापरे, अशक्य किस्सा आहे. हसुन हसुन पोट दुखायला लागले. 
|
Giriraj
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:15 am: |
| 
|
सॅम्पलच असतात एकेकजण! .. .. ..
|
Maudee
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:20 am: |
| 
|
.. .. .. भन्नाट.....
|
Monakshi
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:28 am: |
| 
|
आईशप्पथ, वाट लागली हसून हसून
|
Aashu29
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:33 am: |
| 
|
आई ग लिहायची इश्टाइल पण मस्त आहे तुझी. हसुन पडले.
|
यार यातला अर्धा किस्सा माझ्या मित्राच्या बाबतीत पण घडलाय. आम्ही दोघे अंधेरीला मेडिकल साठी गेलो. तर या दुसर्या पठ्याने स्यॉम्पल म्हणुन स्टिलचा मोठा डबा आणला होता. मी तिथेच ईतका जोरजोरात हासलो होतो की काय सांगता. वर ति जी रिसे होती ती जरा दिसायला चांगली होती. तिने त्या स्टिल च्या डब्याकडे पाहुन हळुच व्यॉक असा आवज काढलेला पण मी ऐकला. तो पठ्ठा मात्र जर कंजुश मध्ये मोडनारा होता. ईथुन वापस जाताना त्याने कुकर सहीत भांडी वापस नेली होती. मग काय झाले असेल बर त्या डब्याचे हा प्रश्न मला बरेचदा पडायचा.
|
Manjud
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:54 am: |
| 
|
जबरी किस्सा आहे हा. आयटीतल्या लोकाना काशीयात्रेसाठी काय काय करावं लागतं रे देवा.....
|
Psg
| |
| Tuesday, January 29, 2008 - 6:04 am: |
| 
|
मग काय झाले असेल बर त्या डब्याचे हा प्रश्न मला बरेचदा पडायचा. केदार, बापरे! उचापती, भन्नाट आहे
|
Farend
| |
| Tuesday, January 29, 2008 - 6:14 am: |
| 
|
केदार तो कंजूष फक्त एकाच बाबतीत सढळ होता का
|
Slarti
| |
| Tuesday, January 29, 2008 - 7:13 am: |
| 
|
उचापती,   केदार, फारेंड, ... ...
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:05 am: |
| 
|
काय भन्नाट आहे हे!! बापरे!! हसून मरायची वेळ आली. डब्याचे काय झाले असेल... खरंच बापरे. मधे त्या दुसर्या एका बीबी वर मी नाव सांगू नको असा सल्ला दिला होता. पण प्लीज आता नाव सांगूनच ठेव.. त्यांच्याशी ओळख झाली कधी तर घरी गेल्यावर अचानक धार्मिक होऊन म्हणता येईल "मी परान्न घेत नाही!" म्हणून.. ही ही ही ही ही ही ही ही ही ही
|
Zakasrao
| |
| Tuesday, January 29, 2008 - 1:44 pm: |
| 
|
भन्नाट आहे किस्सा. .. ..
|
उचापती    .. .. ..
|
अमोल लोल. अरे त्याला ते किटच मिळाले न्हवते. आम्ही दोघेही TCS वाले होतो तेव्हा. ऐअर ईंडीया बिल्डींग मध्ये इतका गोंधळ असतो की जर पहील्यावेळेस जात असाल तर जाम गोंधळात टाकतात. संध्याकाळी ५ वाजता त्याला प्रकाश पडला की त्याचाकडे किट नाही मग आमच्यातल्या ऐका उदय ने त्याला घरुन काहीतरी आण असा सल्ला दिला अन त्याने तो पाळला. मी त्याला मेडीकल दुकानात किट मिळते हे सांगुनही त्याने ते घेतले नाही. ( कदाचित ६० रु लागतील म्हणुन) त्यापेक्षा स्टील चा डबा बरा. तो मराठीच आहे, मायबोलीवर आला तर पंचाईत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|