Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लक्षात आलेले सामाजिक प्रश्न.. » Archive through January 24, 2008 « Previous Next »

Disha013
Wednesday, October 17, 2007 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोंबिवली फ़ास्ट बघितला. नि जाणवले, कृती केली की काय घडु शकेल.
अन लोकसंख्या एवढी की कोणाकोणाला सुधरवणार.
दिनेशदा,
या होर्डिंग्जची विटंबणा व्हायला हवी.


Farend
Wednesday, October 17, 2007 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात सारसबागेजवळ याचेच विडंबन करण्यासाठी कोणीतरी एका कुत्र्याचा फोटो असलेले होर्डिंग लावले होते ना?

Sush
Thursday, October 18, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक गंभिर प्रश्न म्हणजे रस्त्यावर भिक मागत फिरणार्या लहान मुलांचा. पुर्वी college मधे असताना पुणे स्टेशन ला बस साठी यावे लागे. मला फार दया यायचि या भिकारी पोरंची. मग मी कधी कधी त्याना पैसे द्यायचि. shortcut म्हणुन आम्हि रेलवे स्टेशन मधुन यायचो. पण एकदा कहर म्हणजे एक मुलगी माझा ड्रेसच ओढायला लागली, अस्सा राग आला. मग माझा एक मित्र म्हणाला त्यांचे आई बाप त्या मुलांनि आणलेल्या भिकेवर मजा करतात तु कशाला पैसे देतेस? पण हि मुल फारच मागे लागतात. यांचे भविष्य काय? असच कुठल्यातरि मुलिबरोबर लग्न करायचं मुलं जन्माला घालायचि आणि मग आरामात मजा करायचि. एखादा मुलगा जर प्रगति करु म्हणाला तर जास्तित जास्त काय तो चोर्या करु लागेल. अजुनच ताप. म्हणजे ती भिकारि आहेत भिकारिच राहुदेत अशि परिस्थिति. कधि यावर उपाय निघेल?

Dineshvs
Thursday, October 18, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिक मागणे हा गोवा राज्यात कायद्याने गुन्हा आहे. तिथे देवळाच्या बाहेरही भिकारी दिसत नाहीत.
शक्यतो शिख धर्मी भिकारीही कुठे दिसत नाही. त्यांच्या गुरुद्वारात कुणाचीही, दोन वेळच्या जेवणाची सोय होवु शकते.
असे देशभर व्हायला हवे. भिकार्‍यांपैकी अनेकजण अंगाने धडधाकट असतात. पोटापुरते कुणीही कमवु शकतो. ( मधे मिड डे ने भिकार्‍यांच्या मुंबईत किती प्रॉपर्टीज आहेत, त्याची यादी दिली होती. )


Lukkhi
Thursday, October 18, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजचोरी महाराष्ट्रात अजुनही सर्रास चालते(मी करत होतो त्यामुळे माहीतीय), का नाही गुजराथ govt सारखे आपन pre-paid cards काढु शकत.

>>माणसा,

तुझ्यासारख्या लोकांमुळेच आपल्या देशाची अशी अवस्था झाली आहे.

तुझ्यासारखे म्हणजे जे भ्रष्टाचार तर करतातच, शिवाय त्यांना तो केल्याची शरमही वाटत नाही.

आणि त्याला भर म्हणजे आमच्या सारखे असंख्य लोक ज्यांना भ्रष्टाचार कुणी केला तर त्याला तू चूक केलेस असे सांगावेसेही वाटत नाही...
तात्पर्य - जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखी माणसे या देशात आहेत, तोपर्यंत इथला भ्रष्टाचार संपणार नाही (उगीचच पुढार्‍यांना शिव्या देण्यात काय अर्थ?)


Sunidhee
Thursday, October 18, 2007 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेचसे प्रश्न शेवटी इथून तिथून एकाच मोठ्या प्रश्नाला येऊन मिळतात हो. ती म्हणजे लोकसंख्या. लोक हळुहळु जागे होउन १ या दो वर विचार-अंमल करु लागलेत. आपल्या पूर्वीच्या पिढ्यानी जवळ जवळ प्रत्येकाने ५ ते १२ (अंदाजे) मुले जन्माला घातली. मग भस्मासूर झाला. (घूसखोरी वगैरे बाकी काही कारणे सध्या धरली नाहियेत). तो आता कमी होण्यासाठी वेळ लागणारच. साधारण गणित केले तर आताची धरुन मागच्या ४-५ पिढ्या संपल्या की कदाचीत जरा काबूत येईल लोकसंख्या. त्याला ७०-८० वर्षे लागतील बहुतेक.




Maanus
Friday, October 19, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे जे आहे ते असेच चालु ठेवायचे का :-)

Zakki
Friday, October 19, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेच नाही चालू ठेवायचे, जास्त मुले जन्माला घालायची नाहीत. लुख्खी सारख्या लोकांना पाठिंबा देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवायचे, म्हणजे ते बरोबर काय नि चूक काय हे ठामपणे सांगू शकतील.

मुख्य म्हणजे शिक्षण! शिक्षण म्हणजे केवळ गणित, इंग्रजी नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन, जुन्या वाईट चालीरीति, जसे वर्णभेद, जातभेद इ. का चूक आहेत ते समजावून सांगणे.


Sunidhee
Friday, October 19, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे नाही रे बाबा माणसा.. चालु नाही ठेवायचे. वाईट गोष्टी बंद तर पाडायचा प्रयत्त्न करायचाच आहे पण हा longterm उपाय आहे जो सुरु ठेवायचा. हे किंवा ते असे नाही.
झक्की, शिक्षणात स्व-संरक्षण शिकवणे कंपलसरी समाजसेवा (फील्डवर्क का काय म्हणतात ते तसे) करुन घेणे वगैरे.. पण जिथे शक्य असेल तिथे सक्तीचे करावे.
मी तर दिसेल त्याला सांगत असते, तुमच्या मुलाना थोडी मोठी झाली की कराटे शिकवा.. केव्हा उपयोगी पडेल काही सांगता येत नाही.
बी बीबी चांगलाय रे.


Lukkhi
Friday, October 19, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराटे ने सामाजिक प्रश्न कसे सुटतील हे माहीत नाही. कसली सक्ती केल्यानेही फार फरक पडेल असे वाटत नाही,
पण प्रत्येकाने (म्हणजे ज्या कुणाला खरच कळकळ वाटते त्याने) स्वत: पासून सुरुवात करून (फक्त भाषणे न देता) शक्य तिथे प्रामाणिकपणे वागावे, कुणी चुकत असेल तर त्याला किमान सांगावे की माणसा, तु चुकतोयस, (आणि तो लगेच बदलेल अशी अपेक्षा ठेवू नये). तुम्ही १० माणसांना बोललात आणि त्यातील १ जरी थोडाफार सुधारला तरी परिस्थिती आहे त्यापेक्षा थोडी सुधारतेच.

पण दुर्दैवाने असे होण्या ऐवजी ज्यांची विचार करण्याची क्षमता आहे, जे कुणाला समजावू शकतात ते एकतर पूर्ण समाज सुधारण्याची स्वप्ने बघतात (आणि / किंवा) निराशावादाकदे झुकतात. नाहीतर मग government ने काय केले पाहिजे या आवडत्या विषयावर जिथे तिथे बोलत सुटतात (माझ्या घरातही अशी उदाहरणे आहेत). अरे जबाबदारी काय फक्त शासनाची आहे का? एक सुजाण नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य नाही का? की (बहुतांश) सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी आहेत म्हणून तुम्हीही तसे वागणार? दुसर्‍याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचे का?

नुसते प्रश्नांबद्दल बोलून प्रश्न सुटत नसतात. त्यांची उत्तरे तुमच्यापरीने शोधा आणि अमलात आणा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवात तुमच्या पासून करा, दुसरा कुणी करेल किंवा सरकार काही करेल याची वाट बघू नका.

अर्थात हे झाले माझे मत. आणि बरच लिहिलं, रहावलं नाही.



Sunidhee
Friday, October 19, 2007 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लुख्खी चांगले लिहिले आहेस.
मी लिहिले आहे कराटे स्वसंरक्षणासाठी शिकायचे. हल्लि गुन्हेगारी कशी आहे सगळीकडे ते मी लिहायला नको. तो ही एक सामाजिक प्रश्नच आहे माझ्यामते. फक्त लाच, चोर्‍या वगैरे नव्हे. अश्या वेळेस आपल्या परीने थोडे तरी तयार असावे म्हणुन हा प्रपंच. उपयोग झाला नाही तरी नुकसान नक्कीच होत नाही. तसे अनेक प्रकारे शिकु शकतो, मला हा थोडासा कष्ट करायला लागणारा तरीपण सोयीचा मार्ग वाटतो. बंदूक जवळ ठेवणे मला भिति वाटते.
माझी मुलगी लहान आहे, पण ५-६ ची झाली की मी तरी तिला क्लास ला घालेन. मला पण आवडेल पण ह्या वयात अवघड आहे. बघु.
बाकी आपण करत रहावे आणि लोकाना पण सांगत रहावे. नाही लक्ष दिले कोणी तरी दोन्ही करणे थांबु नये. मी काही समाजसेवक नाही पण जर कशात भाग घेतला तर जास्तीतजास्त लोकाना 'आम्ही हे करतोय' सांगते, म्हणजे त्यातल्या ज्याना त्यात इन्टरेस्ट वाटेल ते मदतीचा हात देतात.
दूसरे म्हणजे सक्ती, ज्याना सरळ सांगून समजत नाही त्याना सक्तीच करावी की.
पण इथे मी म्हणते ती सक्ती म्हणजे मारहाण करून कामाला लावणे ह्यातली नाही. इतिहास, भूगोल, सक्तीने शिकतो मग माणसाशी संबंधीत प्रश्न शिकणे का सक्तीचे करु नये. पूण्याहून जाताना एक बाई भेटल्या रेल्वेत, त्यानी मला आमंत्रण दिले त्याना मदत करायला जेव्हा मी भारतात जाईन तेव्हा, ते म्हणजे रस्त्यावरच्या, झोपडपट्टीतल्या मुलाना शिकवणे. त्या म्हणाल्या चांगल्या घरातल्या (इथे चांगले म्हणजे ज्यांच्याकडे शिकायला पैसा आहे हा आहे) मुलाना शिकवायला वाटेल तितक्या शाळा, लोक आहेत पण ह्याना कोण शिकवणार. तुमच्या मुलांचे आयुष्य अजुन सुरक्षित होउ शकते जर ह्या मुलाना शिकवले तर. मला ते पटले.




Maanus
Saturday, October 20, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यात जलद वाढणारे झाड कोणते आहे?

मला वाटतेय बांबु, पण अजुन कोणते आहे का?

If I was in India, I would go to all those places where people throw garbage, and throw few bamboo seeds, plants on those garbage hills.

हे झाड देखील लगेच वाढतेय असे दिसतेय.
http://en.wikipedia.org/wiki/Leucaena_leucocephala

Lukkhi
Saturday, October 20, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Leucaena leucocephala म्हणजे सुबाभूळ. हे झाड भारतात अनेक वर्षापासुन लावले जाते. सामाजिक वनीकरण खात्याकडून आणि शेतकर्‍यांकडून देखिल. सामाजिक वनीकरण खात्याने वृक्षारोपणाची पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात खूप चांगली कामे केली आहेत असे ऐकलेय. (याबद्दल काही तपशील कुणाला माहित असल्यास कृपया येथे देऊ शकाल का? म्हणजे सरकारी खाती काही चांगले कामही करू शकतात यावर विश्वास बसेल :-))

anyway , बाम्बू लावल्याने कचरा कसा कमी होईल ते समजले नाही. आणि हो, बाम्बू हे गवत आहे, झाड नाही


Vinaydesai
Sunday, October 21, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं तर सुबाभुळ ही वनीकरणासाठी लावली गेली, आणि ती वाढते देखील जोमाने.. पण त्यावर नंतर एक लेख वाचला की ती भरपूर पाणी शोषत असल्याने आजुबाजुला इतर झाडाना जगू देत नाही म्हणून.. पण पुढे त्यावर काही वाचनात आलं नाही...



Hkumar
Tuesday, October 23, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या mobile phone मुळे इतरांना होणारा कमालीचा त्रास हा सद्ध्याचा ज्वलंत ( की भयंकर? ) प्रश्न आहे. यावर लिहावे तेवढे थोडे! या फ़ोनच्या यंत्रणेला जॅमर बसवण्याऐवजी आपण स्वतःच्या मनाला तो बसवणार कधी हा खरा प्रश्न आहे.

Maanus
Tuesday, October 23, 2007 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बांबु ने कचरा कमी होणार नाही, पण थोडाफार हिरवा रंग वाढेल. (think positive)

जर सुबाभुळ पाणी शोषत असेल तर ती कचर्‍याच्या जागी टाकायला अजुन उत्तम.


Maanus
Tuesday, October 23, 2007 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i suggested bamboo, because it grows fast. there is no point in planting trees which grows after 5-10 yrs. also there is no point in growing trees which has fruits.

should be something which is tall, so that road side animals wont eat them.
should not take too much space, so that no one will cut them, as land is extreamly costly these days.
should not have fruits, so that there wont be many birds.
most imp. should be growing fast, so that people can see the diff immediately.

and so bamboo seems to be correct choice. just put it through out paud road, trust me it'll look good, it will reduce some of dust problem.


Maanus
Thursday, January 24, 2008 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपले का सामाजीक प्रश्न?

Upas
Thursday, January 24, 2008 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामाजिक प्रश्न संपलेले नाहीत तर ते लक्षात येणं संपलय.. :-(

Asami
Thursday, January 24, 2008 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा काय बाकी बोललायस राज

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators