|
Supermom
| |
| Tuesday, January 29, 2008 - 1:45 pm: |
| 
|
मला अचानक माझ्या मैत्रिणीच्या कॉलेजमधे झालेला परिसंवाद आठवला. स्त्री श्रेष्ठ की पुरुष या सर्वांच्या आवडीच्या, जिव्हाळ्याच्या तरीही स्फ़ोटक विषयावर चर्चा चालली होती. दोन्ही बाजूंनी खूप मुद्दे मांडून झाले. शेवटी एक मुलगा उभा राहून म्हणाला, 'तुम्ही नोकर्या करत असाल, डॉक्टर, सर्जन, सारंकाही आमच्या बरोबरीने करत असाल, पण रात्री बेरात्री कामासाठी बाहेर जायची वेळ आली की जाऊ शकता का? नाही ना?' यावर विरुद्ध बाजूची एक मुलगी उभी राहून ताडकन म्हणाली, 'हो, नाही जाऊ शकत आम्ही. पण का? तुम्ही पुरुष या जगात आहात म्हणून. तुम्ही नसतातच तर नक्कीच जाऊ शकलो असतो.' tanyabedekar यांचे पोस्ट नक्कीच विचार करण्यासारखे आहे.
|
Divya
| |
| Tuesday, January 29, 2008 - 2:11 pm: |
| 
|
Well said Ajjuka, तुझ्या सगळ्याच पोस्ट खुप छान आणि मुद्देसुद आहेत. खरच पटल्या. my 2 cents माझ्या एका मैत्रीणीचा अनुभव लिहीते. मला वाटत मी हा अनुभव इथे पण लिहीलाय आधी. तिला चांगला जॉब होता. आणि माझी तिची अशीच एकदा भारतभेटीत गाठ पडली तेंव्हा कळल कि तीने जॉब सोडला. I was shocked. ती खुप करीयर ओरीयन्टेड आहे हे मला माहीत होत. मग तीने मला सांगीतल कि तीला स्वताला त्या दोन तीन महिन्याच्या बाळाला घरी टाकुन कामा वर जायला आवडेना म्हणुन. पण तिचा नवरा तिला ठरावीक रक्कम स्वताच्या पगारातुन कट करुन तिच्या अकाउंट मधे भरतो. जस कि जॉब करत नाही या गोष्टीच तिला कुठला न्युनगंड येउ नये म्हणुन. अरे आदर्श पणा याला म्हणतात. तिने मला हे ही सांगीतले कि तो पैसा मी कुठेही काहीही खर्च करायला invest करायला मोकळी आहे. आणि तो मी देतो वैगरे अस तो चुकुन सुद्धा मला बोलुन दुखवत नाही. काय हरकत आहे, ज्या बायका घरी बसतात त्यांना अशा प्रकारे त्यांच्या नवर्यांनी financial stability दिली तर मला तरी फ़ारच आवडल हे. नाही म्हणल तर घरी बसणार्या बाई मुळे डे केअर चा खरच वाचतो. बाकीपण बारीकसारीक खर्च ही आहेत. व्यवस्तित खाणपिण बनवता येत त्याला काहीच मोल नाही का. इथुन पुढे पुर्णवेळ गृहीणींना नवर्यानेच पगार द्यावा, त्या काय मोलकरीण नाहीत. हो जरी संसार दोघांचा असला तरी त्यात एकाला जर अस फ़िलींग येत असेल तर ते ही बरोबर नाहीच. जर अस नवरा करणार असेल तर घरी बसुन मुलांचे संगोपन करायला कितीतरी जणी खुशीने तयार होतील. आणि शेवटच मला स्वैपाक येत नाही हे खरच पुरुष कौतुकाने सांगतात, त्यात कसली आलीये मर्दानगी. मला स्वैपाक येतो पण रोज रोज सकाळ संध्याकाळ करायचा जाम कंटाळा येतो. भारतातल बरय दोन चार नोकर हाताखाली असले कि पटपट स्वैपाक होतो, नवीन नवीन करायचा उत्साह रहातो. इथे म्हणजे काय बोंबच आहे. माझ्या घरी सगळ्या स्वैपाकाला बाई होती त्यामुळे इथे स्वैपाक प्रकरण मला फ़ार जड जात. बाकी एवढी माधुरी दिक्षीत पण तिला देखील इथे स्वैपाक करावा लागतो अस तीने एका interview मधे सांगीतले... नेनेंना किती येतो स्वैपाक विचारायला पाहीजे.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 29, 2008 - 3:40 pm: |
| 
|
या संदर्भात थोडे मागे जाऊन बघु या. मानव ज्यावेळी उत्क्रांत झाला, त्या वेळी, स्त्री आणि पुरुषात, स्त्री हिच श्रेश्ठ मानली जात असे. तिच्याकडे सृजनाची शक्ति असल्यामुळे आणि त्याकाळात, समुहाची संख्या हेच बळ असल्याने, जास्त मानव निर्माण होणे गरजेचे होते. आणि या तिच्या अद्भुत शक्तीम्ळे तिला श्रेष्ठत्व दिले गेले होते. ( त्या काळात पुनरुत्पादनातला पुरुषाचा सहभाग, मानवाला ज्ञात नव्हता. ) योनिपुजा, हि त्या काळातच केली जात असे. स्त्रीच्या या शक्तीची तुलना, केवळ जमिनीशीच होवु शकत होती. ( हा मानवाला शेतीचा शोध लागल्यानंतरचा विचार. ) या पुर्वी स्त्रीया शिकारीत पुरुषांच्या बरोबरीने भाग घेत असत. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पडल्यामूळे, त्या शिकारीवर न जाता निवार्यापाशी म्हणजे गुहेत वगैरे राहु लागल्या. याचवेळी जी वृद्ध माणसे शिकारीसाठी जाऊ शकत नव्हती, त्यांची जबाबदारी या स्त्रीयांवर पडली. हि जबाबदारी संरक्षणाचीदेखील होती. तसेच लहान मुलांच्या आरोग्याची जबाबदारी पण त्यांच्यावर पडली. त्या काळातील रोगराईचे प्रमाण लक्षात घेता, मुले रोगांपासून वाचवणे पण त्यांचीच जबाबदारी होती. या रोगांवर औषधोपचार शोधण्यात या स्त्रीयांचा मोठा सहभाग होता. या स्त्रीया आपल्याच समुहातील नव्हे तर आजुबाजुच्या समुहातील लहान मुलांचीदेखील काळजी घेत, त्यांच्यावर उपचार करीत. या सेवेच्या मोबदल्यात त्याना धान्य वगैरे मिळत असे. याच स्त्री.यांची प्रतिके पुढे ग्रामदेवतांच्या रुपात पुजली गेली. आजही लहान बाळाना गोवर येऊन गेल्यानंतर माहीमच्या शितलादेवीला दहिभात वाहण्याची प्रथा आहे. मागे राहिल्याने आजुबाजुच्या जंगलातुन फ़ळे आणि कंदमुळेही त्या गोळा करत, याच प्रयोगातुन कधीतरी त्याना शेतीचा शोध लागला. पुढे शेतीतून मिळणारे उत्पन्न जास्त सकस, कमी कष्टाचे आणि शिकारीपेक्षा जास्त भरोश्याचे म्हणुन पुरुषमाणसेही शेतीत लक्ष घालु लागली. जर जमीन खणुन वगैरे काढली तर आणखी जास्त पिक येऊ शकेल हे कळल्यावर कष्टाच्या कामासाठी पुरुषांची आणि मग पुढे बैलांची नेमणुक झाली. म्हणजे स्त्रीची शक्ती मुलाना जन्म देण्यातच खर्ची पडू लागली. इथेच कधीतरी शेतजमीनीवरच्या मालकि हक्काची भावना निर्माण झाली. आपणहि कसलेतरी उत्पादन करु शकतो हे पुरुषाच्या लक्षात आले. ( मृदा वरुन पुढे म्हातारी आणि मग माता असे शब्द जन्माला आले. ग्रामीण भागात बायकोसाठी अजुनही म्हातारी असा शब्द वापरतात, म्हातारा या शब्दाला मात्र व्युत्पत्ती नाही. ) ज्यावेळी दोन टोळ्यातील स्त्रीयांची देवाणघेवाण वाढली, त्यावेळी भिन्न वंशाचा संकर होवुन वेगळ्या वर्णाची आणि चणीची मुले जन्माला आल्यावर, कधीतरी या कामात, पुरुषांच्या सहभागाचे ज्ञान झाले. आणि तिथुनच पुढची पिढी माझ्यासारखी असावी अशी भावना पुरुषांच्या मनात यायला लागली. तिथुन पुढे स्त्रीवर मालकी हक्क दाखवणे सुरु झाले, आणि इथुनच समाजातील स्त्रीचे स्थान गौण ठरले. स्त्रीच्या रक्तस्त्रावाचा तिच्या कपाळावर तिलक लावुन, ती स्त्री कुणाच्यातरी मालकीची आहे, याचे प्रदर्शन होवु लागले. योनिपूजा मागे पडून लिंगपुजा आणि तिथुन पुढे उभी मुर्ती, अशी सुरवात झाली.
|
Zakasrao
| |
| Tuesday, January 29, 2008 - 3:53 pm: |
| 
|
मी मोठ्ठ्या अभिमानानी त्याना सांगते I am homemaker >>>>>>>>>. आता डोमेस्टिक इंजिनिअर म्हणायच
|
प्रतीकांची केली जाणारी पुजा किंवा लिंगपुजा त्याचप्रमाणे भ्रुमध्यात लावले जाणारे कुंकु यांचा यौगिक आणि तांत्रिक गोष्टींशी संबंध आहे असे मला वाटते. टीळा केवळ स्त्री नाही तर पुरुष ही लावतात. भारतीय वैदीक, योगविज्ञन, शरीरविज्ञान ई. ई. या सर्वांचा उहापोह केल्याशिवाय मालकी हक्क दाखवण्यासाठी स्त्रीयाना तिलक लावला जात असे हे म्हणणे पटत नाही. भारतात.. ईतक्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे ईसवीसनापुर्वी... की त्या काळचे कींवा पुर्वीचे लोक केवळ या गोष्टीसाठी वरील गोष्टी करत असावेत आणि याची कारणे ईतकी सरळ असावीत असे आम्हास वाटत नाही.
|
पंत, सीतेकडे (व रामाकडे) अशा दृष्टीनेही बघता येते हे सांगायचे होते म्हणून तसा उल्लेख केला एवढेच. १०० वर्षांपूर्वी हा विचार कोणी केला नसता>>>>>>> स्लार्टी, धोंडोपंत व अज्जुका एक महत्वाचा मुद्दा तुम्ही विसरताय. जुन्या काळाचा रेफ देताना तो काळ लक्षात घ्यावा लागतो. १०० वर्ष्यापुर्वी अमेरिकेसहीत भारतापर्यंत गुलामगिरी मान्य होती वा त्यात भुषन होते पण आज लोकांना मान्य आहे का? आज जे स्त्री स्वातंत्र्य वैगरे म्हणत आहेत त्या पुढारलेल्या देशात १४० वर्षापुर्वी एका स्त्री ला तिने पुरुषा सारखे वागता यावे ही मोहीम छेडल्यामुळे फ्रांन्स मध्ये कुर्हाडीने तिचे डोके कापन्यात आले. मग तेव्हाचा युरोप बरोबर की आजचा. म्हणुन काळाला फार महत्व. त्या गोष्टी फक्त त्या काळातच असतात. रामाचा वा सितेचा संदर्भ देन्यात काही हशील नाही. किती पुरुष रामा सारखे आहेत? मग स्त्रीया तरी राहातील का? आणि सिते ने जे केले तेव्हा स्त्री चे करीयर हे पुरुषाच्या करीअर शी बांधील होते त्यामुळे मला नाही वाटत तिने वेगळे काही केले. तिथे आमची ही असती तरी तिने त्या काळात तेच केले असते. भारतात स्त्री गेल्या २५ वर्षात जास्त घराबाहेर पडु लागली आहे त्यामुळे आपल्यासाठी हा स्त्री पुरुष संघर्ष नवा तो अजुन काही काळ चालनारच. (मायबोलीवर लिहीले वा लिहीले नाही तरी). आपल नशीब (भारताचे) जोरावर आहे म्हणुन स्त्री ला समान माननारे लाखो पुरुष आज भारतात आहेत. फक्त अजुनही आपल्याल्या स्त्री ला बिकीनी मध्ये पाहन्याची वा दारु पिताना बघन्याची सवय नाही त्यामुळे आपली शिकवन (जी आता जुनी झाली असेल कदाचित) असे सांगते की स्त्री ने हे करु नये ते करु नये. हे बदलायला निदान आणखी २५ वर्षे लागतील. भ्रुमध्यात लावले जाणारे कुंकु यांचा यौगिक आणि तांत्रिक गोष्टींशी संबंध आहे असे मला वाटते> सहमत. दिनेश तुमची वरची थेअरी पुर्ण पटली नाही. कुंकु लावल्यामुळे आपली उर्जे ही त्या जागी केंद्रीत होते, अष्ट्चक्रांपैकी ती एक जागा आहे यात रक्ताचा काही सबंध नसावा. कुंकातील रासायनीक गुणधर्म हे ती उर्ज़ा कंट्रोल करु शकतात असे योगशास्त्र सांगते.
|
Manuswini
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:24 pm: |
| 
|
ह्म्म्म.. चांगले चाललेय. एका रात्रीत इतक्या पोस्ट्स. आहेत खर्या काही विचार करायला लावणार्या. :-)
|
Arch
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:41 pm: |
| 
|
अरे वा! बरीच चर्चा झाली की. माझा ४था मुद्दा - मी भारतात असताना, मुलिंनी दारू किंवा सिगरेट पिण्याच प्रमाण खूपच कमी होत किंवा नव्हतच म्हटल तरी चालेल. मग आता हे प्रमाण इतक का वाढल आहे? मुलांच्या बरोबर सगळ्या fields मध्ये उतरल्यामुळे इथेही आपण कमी नाही किंवा का करू नये म्हणून? हा माझ्या मनात आलेला एक विचार. त्यावर इतरांची मतं कळावीत हा हेतू. तसच मुद्दा ५ बद्दल. आम्ही लहान असताना असे काही शब्द कोणाच्या तोंडातून निघाले की मोठ्ठ्यांकडून म्हटल जायच " हेच शिकलात का? " पण हल्ली सर्रास वापरले जातात आणि अभिमानाने सांगतातपण की " हो मी वापरते " आता ह्यात कौतुक काय आहे ते कळल नाही. कपड्याच्या बाबतीत, मुलीने काही कपडे घतले तर ती tomboy होते पण मुलगा बायल्या होतो. अज्जुका, तू costume designer आहेस म्हणून विचारते. हल्ली हिंदी सिनेमात पुरुषांना इतके घट्ट कपडे का घालतात? माझ्या इथल्या अमेरिकन मैत्रीणी हिंदी सिनेमा enjoy करतात पण इतके आनंदी कपडे का? ह्याच उत्तर मला देता येत नाही. बर्याच वर्षांपूर्वी मी रामायणावर एका लिखिकेचा लेख वाचला होता. त्यात तिने रामायणाच निरुपण केल होतं सीता रामाला म्हणते, " दुसर्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेऊन मला अग्निपरेक्षेला उतरवून तू माझा त्याग करणारा कोण? मीच तुझा त्याग करते " आणि ती भूमीत निघून गेली. मला हेच निरुपण पटल.
|
Manuswini
| |
| Tuesday, January 29, 2008 - 6:22 pm: |
| 
|
आर्च, चांगले केलेस विषय मांडलास. पण मला खरोखर एक मनात प्रश्ण येतो( pls sarcastically नाही विचारत आहे) की, ह्या सर्व discussion चा फायदा आहे का? आहे तर नक्की कोणाला? कारण माझ्या मते इथे येणारी लिहिणारी बहुतेक जणे balanced आहेत असे वाटते / दिसते. मग भरभरून आपली मते मांडल्यावर नक्की फायदा कोणाला होतो. माझे म्हणशील तर आंनद वाटतो की काही जुनाट मते बदलली आहेत. काही गोष्टी Accept केल्या जात आहेत. हेच मला कळले.काही स्वतच्या गोष्टी कळतात.(काही बाबतीत विचांराचा दृष्टीकोण वगैरे). पण नक्की कुठल्या maas ला फायदा होतो हे कळले नाही. इथे सुप्तपणे अजूनही स्त्री / पुरुष दुय्यम / उच्च ह्या विचारांची लोक आहेत का? काही कळायला मार्ग नाही. (हसु नकां ह्या वरील प्रश्णावर). btw वरील सितेचे निरूपण(नक्की अर्थ काय?) चांगले केले. रामाला हा हक्क कोणी दीला सितेची परेक्षा घ्यायला? कारण तो पती होता ही विचारधारणा. मग पतीला हा हक्क by default आहे मग त्याची परीक्षा कोण घेणार.
|
Antara
| |
| Tuesday, January 29, 2008 - 6:59 pm: |
| 
|
कुंकु लावल्यामुळे आपली उर्जे ही त्या जागी केंद्रीत होते, अष्ट्चक्रांपैकी ती एक जागा आहे यात रक्ताचा काही सबंध नसावा. कुंकातील रासायनीक गुणधर्म हे ती उर्ज़ा कंट्रोल करु शकतात असे योगशास्त्र सांगते.>>>>>>>>कुठल्याही घटनेमागचे सर्वात सोपे जे explaination असते तेच बहुतेक वेळा खरे असते. कुंकवाबद्दल हे वरचे विधान far streteched वाटते. मालकी हक्क हे सर्वात सोप्पे कारण कुणीतरी दिलेय ते खरे असावे. सबब,आता ही पद्धत सोयीप्रमाणे फ़्याशन प्रमाणे चालू ठेवा किंवा बन्द केली तरी हरकत नाही 
|
Tulip
| |
| Tuesday, January 29, 2008 - 7:11 pm: |
| 
|
अज्जुका well said . छानच चाललीय चर्चा. सगळे घसीटलेलेच मुद्दे आहेत पण पुन्हा पुन्हा ते अजूनही मांडावे लागताहेत यावरुनच कळतय ते किती अजूनही महत्वाचे आणि दुर्लक्षित आहेत. बर्याच वरती tanyabedekar ने मांडलेला भारतात स्त्रियांना बस मधे वेगळी जागा का ठेवावी लागतेचा मुद्दा आता सध्या मी दिल्लीमधे आहे तर इतका प्रचंड पटतोय. डेल्ही हाट मधे जाऊन आल्यापासून तर मला भारतात स्त्रियांसाठी वेगळा रस्ता सुद्धा ठेवावा असं वाटायला लागलय. समानता माय्फ़ूट. माफ़ कर डिजे पण all punjabis are b*****s in this matter . आमच्या मुंबईत रात्री दोन वाजता सुद्धा एकटीने टॅक्सीने यायचे दिवस पाहीलेत मी ती खरी समानता. जेन्डरबायस्ड ऍटीट्युड आणि स्त्री म्हणजे स्त्रीचे शरीर हा ऍटीट्युड ज्या समाजतून अजून जात नाही तो समाज मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो (कुठेही नसावा बहुतेक पण दिल्लीमधे तर नाहीच नाही. ) समानता ह्या विषयावर बोलायला पण नालायक आहे. बाकी तुमचे स्वयंपाक आणि घरकाम, लग्नानंतर नावे बदलणे, कुंकू लावणे आणि दारु सिग्रेटींचे मुद्दे एकोणीसाव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत पुढे चालू ... हे पाहून चर्चा करण्याच्या पेशन्सची पण कमाल वाटतेय.
|
Sashal
| |
| Tuesday, January 29, 2008 - 7:36 pm: |
| 
|
सगळे मुद्दे वाचायचेत अजून, पण वरचं ट्युलिप चं post वाचलं आत्ता तर त्यावर एक comment .. लग्नानंतर अगदी first name पासून नाव बदलणे, आणि ते ही फ़क्त मुलीने हे मलाही पटत नाही पण त्याबद्दल माझ्या मनात एक confusion आहे .. समजा एका मुलीने लग्न करून संसार थाटला, नाव न बदलता .. यथावकाश त्यांना मुलं झाली आणि सध्याच्या रुढ परंपरेप्रमाणे ती मुलं वडीलांचं last name लावणार .. म्हणजे घरात आई सोडली तर बाकी सगळ्यांच्या नावांमध्ये uniformity असेल पण आई मात्र odd (wo)man out होईल .. तर एक family म्हणून ही inconsistency मला थोडी खटकते .. ह्यावर 'जाणकारांचं' काय मत?
|
Arch
| |
| Tuesday, January 29, 2008 - 8:01 pm: |
| 
|
सशल मलापण तुला पडणारा प्रश्ण पडतो. कारण लग्नानंतर नाव बदलल नाही तरी मुलगी वडिलांच नावच ठेवते मग तिच्या आईच्या नावाच काय? म्हणजे शेवटी पुरुषप्रधाना society वर बोलणारी मुलगी वेगळं असं काय दाखवते?
|
Tiu
| |
| Tuesday, January 29, 2008 - 8:10 pm: |
| 
|
बरेच मुद्दे मांडुन झालेत. अजुन एक समानतेचा मुद्दा... लग्नानंतर मुलाचं नाव / आडनाव बदलत नाही तर मुलीचं का बदलावं? आपण सगळे इथे हिरिरीने मुद्दे मांडतोय. पण प्रत्यक्षात आपल्याला करण्यासारखी एखादी गोष्ट असेल तर ती आपण करतो का? उदाहरणार्थ, लग्न झाल्यावर आडनाव बदलणार नाही किंवा माहेरचं आडनाव सुद्धा लावेल असा आग्रह किती मुली मांडतात? किंवा असा आग्रह केल्यावर इथले किती पुरुष तयार होतील? याबद्दल चर्चेत भाग घेणार्या (लग्न झालेल्या) ताई, मावशी, काकुंची मतं ऐकायला आवडतील!
|
Tiu
| |
| Tuesday, January 29, 2008 - 8:21 pm: |
| 
|
ड्राफ्ट केलं आणि पोस्टणार तेवढ्यात meeting reminder आली म्हणुन तसाच मिटिंगला पळालो. आल्यावर पोस्ट केली आणि बघितलं तर वरच्या दोन पोस्ट्स... सेहवाग झाला माझा... Bad timing! :-( neways, आता डिलिट करत नाही!
|
वरील प्रश्न भारताच्याच काही भागात सोडवला गेला आहे. तिथे आडनाव वडिलांचे लावत नाहीत तर गावाचे नाव आडनाव म्हणुन वापरतात. ( केरळात अजुनही बर्याच जागी मातृसत्ताक पध्दत आहे). म्हणजे त्या काळीही तेथील लोकांना प्रश्न पडला व तो सोडवला देखील गेला. आता थोडे लाईट मग समानतेच्या नावी आता बायका गावाचे नाव लावु शकतात. जसे प्रज्ञा आता जोशी लावायाचा ऐवजी तिला खालील पर्याय आहेत. १. नांदेड २. पुणे ३. शिकागो. काय सही आहे ना प्रज्ञा शिकागो. तिला सांगतोच फोन करुन. दक्षिनेत गावाचे नाव दोघेही वापरतात पण त्यात परत एक फंडा आहे. मुलीचे स्वतचे आडनाव ( पक्षी गावाचे नाव) लग्न झाल्यावर परत बदलते व तिला मुलाचे गावाचे नाव काही भागात मिळते. मग ह्यावर परत काही तोडगा दिसत नाहीये. टियु ने म्हणल्या प्रमाने ह्या प्रश्नावर समस्त मायबोलीकरनीचे मत ऐकायला आवडेल. स्त्रि मुक्ती असनार्या अमेरिकेत वा वेस्ट मध्ये सुध्दा लग्नानंतर अनेक मुलींना मी त्यांचे आडनाव बदलुन नवर्याचे आडनाव लावलेले पाहीले आहे. रादर हीच ईथली रुढ पध्दत आहे. समानता असल्यावर सुध्दा.
|
Arch
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:11 pm: |
| 
|
केदार, Venezuela मध्ये मुलगी आईच आडनाव लावते आणि मुलगा वडिलांच. छान आहे न प्रथा? म्हणजे आईवडिलांची आडनाव अगदी समांतर जातात
|
Maanus
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:16 pm: |
| 
|
काश फुलेंच्या मनात स्त्री शिक्षणाचा विचार आला नसता तर...
|
Asami
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:47 pm: |
| 
|
बाकी तुमचे स्वयंपाक आणि घरकाम, लग्नानंतर नावे बदलणे, कुंकू लावणे आणि दारु सिग्रेटींचे मुद्दे एकोणीसाव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत पुढे चालू ... हे पाहून चर्चा करण्याच्या पेशन्सची पण कमाल वाटतेय. >> ह्याला म्हणतात सो सोनार कि और एक लोहार की
|
थोड कन्फ्युजन झालेल दिसतय. मी कुंकू लावा अस कधीही म्हणालो नाही फक्त दिनेश व पंतांनी जे लिहीलय त्यावर मत व्यक्त केले आहे. कुंकू लावा नाहीतर नको त्यानी रिलेशन मध्ये काहीही फरक पडत नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|