|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 9:58 am: |
| 
|
करेक्ट टाण्या (कि तान्या?) स्लार्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे घर, संसार आणि मुले सांभाळणे हे एक करीअर आहे हे मान्य. आणि तसं करणारी व्यक्ती ही सहभागी उत्पादक असते हे पण १००% योग्य पण तसं घडताना दिसत नाही. बाहेर जाऊन पैसा कमावणारा श्रेष्ठ आणि घर संसार बघणारा घटक कनिष्ठ मानला जातो. किंवा पैसा कमावणार्या माणसाची luxury . वाईट ते आहे. असो. असो समानतेच्या बाबतीत मला अनेकदा जाणवलेला मुद्दा मी पूर्वीही इथे एकदा बोलले होते. स्त्री करीअर करते, यशस्वी होते तेव्हा तिच्याबद्दल बोलताना तिला घरच्यांची (म्हणजे सासूसासर्यांची) परवानगी आणि पतिराजांची (आजही हा मूर्ख शब्द वापरतात!) साथ आहे याचं नको इतकं उदात्तीकरण असतं. याउलट पुरूष यशस्वी होतो तेव्हा बायकोने(पत्नी असं म्हणतात पत्नीराणी नाही ही ही ही!) साथ देणं हे गृहीत असतं. आणि परवानगी हा मुद्दाच नसतो. एखाद्या यशस्वी पुरूषाच्या बायकोने स्वतःही यशस्वी होऊ पाह्यलं किंवा झालीही तरी समाजाची अपेक्षा तिने नवर्याच्या सावलीबाहेर जाऊ नये अशीच असते. त्या यशस्वी नवर्याला काही प्रॉब्लेम नसेल पण त्याच्या बायकोला काही वेगळी ओळख मिळायला लागली की समाजातल्या अनेकांना त्रास होऊ लागतो.
|
टाण्या पण नाही आणि तान्या पण नाही. टण्या. गावात मला सगळे जण टण्या म्हणायचे. का ते माहिती नाही.
|
Supermom
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:25 am: |
| 
|
'एखाद्या टॉप करीयरच्या मुलीला पुरणपोळी येत नाही म्हणून कमी लेखणं.....' एकदम सहमत अज्जुका. मी तर म्हणेन अगदी मुलगी टॉप करीयरची असो की नसो केवळ पुरणपोळी येत नाही हा मुद्दा तिला कमीपणा आणणारा कसा काय असू शकतो? एक व्यक्ती म्हणून बाकी गुण तिच्यात असतील ते कदाचित इतरांमधे नसतील. मला इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो तो म्हणजे समानतेचा हा विषय बायकांनी दुसर्या एका angle नं पण लक्षात घेण्याची फ़ार गरज आहे. बरेचदा मुलगा सुनेला स्वैपाकात मदत करतो हे सासूलाच आवडत नाही. सासू स्त्रीच असते ना? मी तर म्हणेन ते दोघं काय करतात हा त्यांचा प्रश्न. उद्या माझा मुलगा सुनेबरोबर पोळ्या लाटो नाहीतर दोघं लाटणी झारे घेऊन स्वैपाकघरात नाचोत. दोघांचं छान चाललंय ना? पटतंय ना? मग मला लुडबुडीची काय गरज? (अन पटतही नसलं तरी जोवर मला येऊन ते सल्ला मागत नाहीत तोवर मी का interfere करावं?... असो.. तो एक वेगळा वादाचा विषय होईल.) म्हणण्याचा अर्थ असा की पुरुषांकडून समानता वगैरे मागणं ठीक, पण आधी आपण बायकांनी एकमेकींचे पाय या मुद्द्यावर ओढणं बंद करावं. रागावू नका, पण आपल्यातल्या किती जणी अशा आहेत की ज्यांना लग्नाचा भाऊ आहे... अन त्याचं लग्न झाल्यावर तो स्वैपाक म्हणा, वा एखादा पदार्थ म्हणा आपल्या सहमतीनं, आवडीनं करतोय स्वैपाकघरात अन नवी वहिनी बाहेर टी. व्ही. बघतेय.... किती जणी हे दृश्य बघून आपल्या आईच्या कानाशी लागून कुचकुच करणार नाहीत? खरंखरं सांगा..
|
शिंचे जगात कोणत्या गोष्टीची कमी असेल तर ती म्हणजे " तारतम्य " . प्रत्येक बाबतीत बायका पुरुषाची बरोबरी करणार आहेत काय?... केवा उलट सुलट (व्हाईस वर्सा)... स्त्रीची आणि पुरुषाची बरोबरी का करता? पुरुष च्यायला म्हणतात... मग स्त्रीया नाही का का ग सटवे, ईश्श वगैरे म्हणत?... मग पुरुषानी कधी ते शब्द उचललेत का? स्त्री ने स्वताच्या स्वभावानुसार वागावे पुरुषाने स्वताच्या. पुरुषाने स्वयंपाक करायला लाजु नये.. पण म्हणुन स्त्री ने ही दारु पिले तर काय होते पाहु थोडीशी पिवुन असे म्हणणे चुकीचे आहे... याचा अर्थ पुरुषाने दारु प्यावी असा होत नाही... पुरुष लढाईवर जातात. बरोबरी दाखवण्यासाठी स्त्री ने लढाई करु नये.. धर्माचे रक्षण करणाअरी दुर्गा आम्ही पुरुष पुजतोच की... शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते... हा आदर भारतात स्त्री ला मिळालाय की नाही?... पुर्वी गार्गी वगैरे मैत्रीयी त्याचप्रमाणे कीत्येक कर्तबगार स्त्रीया होत्याच की नाही?... पुरुषाला निर्माण करणारीच मुळात स्त्री असते... भलते हट्ट स्त्रीयांनी ठेवले तर काहीही होवु शकते... स्त्रीयांनी चांगली आई व्हावे आणि पुरुषानी चांगला बाप. असे बनुन धर्माचरण करावे... धर्माचरण म्हणजे काय ते आपापल्या मनाला विचारावे. शंभरातल्या ९९ लोकांना काय चांगले आणि काय वाईट हे त्यांचे मन तिथेच सांगुन टाकत असते.
|
Maudee
| |
| Tuesday, January 29, 2008 - 10:33 am: |
| 
|
एखाद्या मुलाची बायकोने घर सांभाळावे, स्वयंपाक करावा इत्यादी अपेक्षा असु शकते. वर कोणीतरी अस म्हणालय.... पण ख़र सांगू का अशी अपेक्षा तिने career केलं तरी असतेच.... deleted the portion of the post कारण धोंडोपंतानी खाली म्हणन्याप्रमाणे सासू v/s सून च्या वळणावर चालली होती.
|
लक्षात ठेवा " सीता " आणि " राम " यांचा आदर्श तोडाल तर निसर्गच याचा हीशेब मांडेल आणि भारताबाबतीत तसेच झाले आहे. भारताची एकमेव जमेची बाजु म्हणजे भारतातील लोकांना " चारीत्र्य " म्हणजे काय याची शिकवण देणारी अनेक व्यक्तीम्त्वे भारतात झाली आहेत. राम, सीता यांचा आदर्श म्हणजे काय हे आपण जाणतो.. ब्रह्मचर्य म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे... योग (योगा!) म्हणजे केवळ " Yoga mat ($45)" वर कसरत करणे नव्हे हे ही आपण जाणतो. सीतेचा आदर्श आणि रामाची मर्यादा यांचा आपण का विचार करत नाही? हींदी सिनेमे कोण निर्माण करते आणि लीहीते?... स्त्री पुरुषांना प्रेमाशिवाय बाकी कर्तव्य नसतात काय?... की " बालम, सजना, प्यार शराब, दुशमनी " ई. ई. शिवाय काहीच नसते? आपण अर्थपुर्ण असे काही कधी जगणार आहोत.?
|
सासु व्हर्सेस सुन असा काही या बीबीचा विषय होवु पाहतोय... सासवानो आणि सुनानो.. या ईथे.. आपापले मुद्दे आणि गुद्दे घेवुन. नवर्यांना... आपल आईच्या मुलांना तेव्हढीच जरा विश्रांती.
|
कमाल आहे.. सत्तेवर तर सर्वत्र स्त्रीया आहेत. problem काय आहे आता?..
|
ज्या वृत्तीचा मला राग येतो तेच मत धोंडोपंत यानी मांडलेले आहे. पुरुष लढाईवर जातात. बरोबरी दाखवण्यासाठी स्त्री ने लढाई करु नये.. पुरुष लढाईवर जातात. बरोबरी दाखवण्यासाठी स्त्री ने लढाई करु नये.. >>> आम्ही दुर्गा पूजतो, तुम्ही दुर्गा बनायची गरज नाही असं तुम्हाला यातून म्हणायचे आहे की हे पूर्ण पोस्ट उपरोधाने लिहिलेय?? वरचा कुठलाही हट्ट मला "भलता" वाटत नाही. एक चांगली आई बहीण किंवा बायको या पलिकडे एक व्यक्ती म्हणून ओळख निर्माण व्हावीशी वाटते.... किती पुरुष लग्नानंतर आपले नाव आणि आडनाव बदलतात??? आणि जेव्हा मी हे नाव बदलणार नाही.. बापाचंच आडनाव लावेन म्हणून सांगते तेव्ही मी आगाऊ का ठरते? माऊडी, सर्वजण लग्नानंतरचं बोलत आहेत.. आमच्या घरी माझा भाऊ भांडी घासत असलेला आणि मी टीव्ही बघत असलेलं पाहून आईची एक मैत्रीण सर्वाना आळवून आळवून सांगत असते.. वर त्यानेच चहा करून दिला तरी "ही पोरगी सोफ़्यावर तशीच बसून.. रीतच नाही मुलीला. लग्नाचं वय उलटून गेलं तरी घरात आईवडीलाच्या जीवावर बसलेली"
|
आम्हाला तसे म्हणायचे नाही. प्रत्येक गोष्ट तारतम्याने घेतली पाहीजे एव्हढेच मला म्हणायचे आहे. क्षमस्व पण तुमचे मत पुरवग्रहदुशित आहे...
|
Supermom
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:14 am: |
| 
|
माफ़ करा धोंडोपन्त, पण तारतम्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकत नाही का?
|
मी बर्यापैकी स्वयंपाक करतो. फक्त चपात्या जमत नाहीत. बायकोला मदत करण्यात काही गैर आहे असे वाटत नाही. शक्य तिथे करतोच... स्त्रीयांना सर्व बाबतीत समान लेखलेच पाहीजे पण त्या स्त्री आहेत हे त्यांनी ही समजुन घेतले पाहीजे... पण स्त्रीयांनी दारु कींवा सिगारेट वगैरे प्यावे ईतका उदारमतवादे मी नाही...
|
रागावू नका, पण आपल्यातल्या किती जणी अशा आहेत की ज्यांना लग्नाचा भाऊ आहे... अन त्याचं लग्न झाल्यावर तो स्वैपाक म्हणा, वा एखादा पदार्थ म्हणा आपल्या सहमतीनं, आवडीनं करतोय स्वैपाकघरात अन नवी वहिनी बाहेर टी. व्ही. बघतेय.... किती जणी हे दृश्य बघून आपल्या आईच्या कानाशी लागून कुचकुच करणार नाहीत? खरंखरं सांगा.. <<<<<< माझा भाउ आणि बरेच cousin brothers बायको पेक्षा जास्त चांगला आणि बायको पेक्षा जास्त frequently स्वयंपाक करतात आणि कोणीही ते पाहून कोणाला tonts मारत नाही . आणि केवळ भाउ ( मुलगा ) स्वयंपाक करत आहे म्हणून मुद्दाम कौतुक पण कोणी करत नाही , स्वयंपाक हा चांगला किंवा वाईट असा feedback देउ पण , बघा मुलगा असून छान स्वयंपाक करतो असे फ़ाजिल remarks पण कोणी करत नाही . Btw, इथे कोणी मुलांनी नाही लिहिलं का अजुन त्यांच्या sides. मुलांनाही समजाच्या काही norms चे टोमणे बसतातच . त्यातला common म्हणजे एखादा मुलगा घरी जॉब सोडून बसला तर सगळे लोक त्याला टोमणे मारतात पण मुलीने career सोडले तर तिला कोणी नावं ठेवत नाही . बायको पेक्षा कमी पगार किंवा educational qualification कमी असलेल्या नवर्यांना पण समाज लगेच नावं ठेवतो . अर्थात इथे indirectly समाज बायको कडून inferior qualifications ची अपेक्षा करतो हा मुद्दा वेगळाच !
|
Slarti
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:19 am: |
| 
|
कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत स्त्री व पुरूष यांना समान स्थान आहे हे लक्षात घेणे महत्वाचे... मग ती स्त्री पूर्ण वेळ नोकरी करणारी असो वा पूर्णवेळ घर सांभाळणारी. गृहिणी असलेल्या स्त्रीचे घरातील व पर्यायाने समाजातील योगदान दुर्लक्षिले जाते ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. सुमॉ, तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. स्त्री - पुरूष समानतेची जाणीव निर्माण होणे हे आईपासून सुरू होते असे माझे मत आहे.
|
ते माणसाच्या I.Q. , experiences, his brought up,... ee. ee. वर अवलंबुन आहे... पुन्हा स्त्री की पुरुष हे सुद्धा लक्षात घेतले पाहीजे.
|
Supermom
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:22 am: |
| 
|
दीपांजली, बरं वाटलं ऐकून. काही वर्षांनी तुझ्या family चे details पाठवशील ग... माझी सुकन्या लग्नाची झाल्यावर...
|
दीपांजली म्याड म, ते यु. एस. मदल येगळ.. देशातल येगळ.. हीत देशातल्या गोश्टी चाल्ल्याती वाटतय.
|
Manjud
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:25 am: |
| 
|
प्रत्येक गोष्ट तारतम्याने घेतली पाहिजे हे कबूल. पण ते तारतम्य फक्त स्त्रीनेच दाखवायचं का? चं. गो. च्या चारोळ्यांमध्ये 'घर दोघांचं असतं, एकानं पसरलं तर दुसर्यानं आवरायचं असतं' अश्या काहिश्या अर्थाची चारोळी होती. ती वाचताना आम्ही नेहमी म्हणायचो की ह्यात स्त्री आणि पुरुष हे शब्द silent आहेत.
|
Maudee
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:26 am: |
| 
|
रागावू नका, पण आपल्यातल्या किती जणी अशा आहेत की ज्यांना लग्नाचा भाऊ आहे... अन त्याचं लग्न झाल्यावर तो स्वैपाक म्हणा, वा एखादा पदार्थ म्हणा आपल्या सहमतीनं, आवडीनं करतोय स्वैपाकघरात अन नवी वहिनी बाहेर टी. व्ही. बघतेय.... किती जणी हे दृश्य बघून आपल्या आईच्या कानाशी लागून कुचकुच करणार नाहीत? खरंखरं सांगा.. मी पाहीलय हे माझ्या डोळ्यानी... माझ्या अत्याकडे माझी वहीनी दादाबरोबर फ़क्त बोलत होती... ५-१० मिन.... माझी आते बहीन आत्याच्या कानाला लागली आणि ते भांडण इतक विकोपाला गेल की दादा वहीनी व्गळे रहायला लागले
|
Ajjuka
| |
| Tuesday, January 29, 2008 - 11:29 am: |
| 
|
बरोबर सुमॉ पण तिथे मुद्दा सत्तांतराचा होऊन बसतो ना! मला माझ्या सासूने १००० युनिटस एवढं छळलं मी निदान ५०० तरी छळीन म्हणते.. हेही आलंच मुळात चिकटवलेलं नातं रोजच्यासाठी मानेवर बसलेलं असलं की कर्तव्यभावना, रोजचच असल्याने अंगवळणी पडणं यापलिकडे त्यात सहसा काही असत नाही. अपवादात्मक उदाहरणांचे अभिनंदन. असो बर मला कुणीतरी सीतेचा आदर्श म्हणजे नक्की काय ते सांगू शकाल का? मला जाणवणार्या गोष्टी १. स्वतःपेक्षा वरचढ नवरा निवडणे (शिवधनुष्य तोडणे आठवा!) - वरचढच नवरा हवा हा आदर्श कुठल्या बाजूने झाला? २. नवरा वनवासाला म्हणून त्याच्याबरोबर आपणही वनवासाला. - नवीन लग्न झाल्यावर क्वचितच कुणी असेल की जी नवर्याबरोबर रहाण्यापेक्षा सासरी रहाणं पसंत करेल सासरच्या सुखसोयींसाठी. पण सीतेला स्वतःचं करीअर नव्हतं. इथे स्वतःचं यशस्वी करीअर असलेल्या मुलीने नवर्याच्या बदलीनंतर सगळं सोडून त्याच्यापाठोपाठ जावं का? ३. येणार्याजाणार्याला भिक्षा वाढणे. इथपर्यंत ठिक आहे. सुबत्ता असेल तर दान करावं. नसेल तरी करावसं वाटत असेल तर करावं. आमचं काय जातंय. पण भोळेपणाने साधूवर विश्वास ठेवणे. - हा मूर्खपणा झाला. खुद्द सीतेलाही मिळाली की शिक्षा त्याची. आमची काय कथा मग! ४. कुंजवनात दुःख करत बसणे. आणि रावणाला नकार देणे कुणीही स्त्री जर नवर्यावर प्रेम असेल तर इतरांना नकार देईलच कितीही प्रलोभनं दाखवली तरी. त्यात काय मोठं. आणि सीता तर केवढी नशिबाची. रावण तिला विचारत राह्यला. ती नाही म्हणत त्याची निर्भत्सना करत राह्यली. नाही म्हणायची तरी संधी मिळते का असं पळवलं गेल्यावर? विचारलं तरी जातं का? आणि एकदा कार्यभाग उरकल्यानंतर त्या रावणाला तरी काय फरक पडतो सीतेने त्याच्याशी लग्न केलं नाही केलं तरी? ५. नवर्याला शंका आली म्हणून अग्निपरीक्षा मग रामाने का बरं नाही दिली अग्निपरीक्षा? इतर बायकांचा विचर केला नाही हे सिद्ध करण्यासाठी? आपण एकनिष्ठ आहोत हे नवर्यासमोर सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिल्यावरच नवर्याला पटणार असेल तर मग प्रेम आणि विश्वास हे शब्द काय तेल लावत गेले का? सहजीवनातला, नात्यातला विश्वास संपला की संपलं सगळं मग व्यक्ती खरोखर एकनिष्ठ आहे की नाही याने काहीच फरक पडत नाही. ६. अग्निपरीक्षेनंतरही लोक काय बोलतील असा विचार करून नवर्याने टाकून दिल्यावर ते मान्य करणे. नवर्याचा निर्णय शिरोधार्य मानणे हा आदर्श आहे? ७. एकदा टाकून दिल्यावर मुलं भेतली म्हणून नवर्याने परत जवळ केलं तर त्याला एकदा संपलं ते संपलं असं ठणकावून सांगणे बास ही एकच गोष्ट जिथे तिचा आत्मसन्मान नावाची गोष्ट शिल्लक होती असं दिसतं. अविश्वास दाखवणार्या जोडीदाराला मीच नाकारेन, आयुष्यात मीच बाजूला करेन. हे मात्र नक्की डोक्यात ठेवा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|