Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through January 29, 2008 « Previous Next »

Arch
Monday, January 28, 2008 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक BB वर एकदा तरी ही गोष्ट कुणीतरी दुसर्‍याला दाखवून द्यायचा प्रयत्न करत असतो. किंवा विषय काहीही असो पण गाडी समानतेवर घसरतेच. तर वाटल की सगळीकडे मतं मांडण्यापेक्षा एका जागी ह्याबद्दल बोलाव.

मुलगा अणि मुली मध्ये माझे विचार असे आहेत.

१. शिक्षणात मला समानता हवी.
२. नोकरीमध्ये आणि त्यानुसार पगारामध्ये मला समानता हवी.
३. सामाजीक स्थानात मला समानता हवी
४. मुलं दारू पितात किंवा सिगरेट ओढतात म्हणून मुलीने का ओढू नये? हा मला तद्दन मूर्खपणा वाटतो. चांगल्या गोष्टीत अनुकरण करण किंवा समानता मागणं हा शहाणपणा वाटतो.
५. मुलं च्यायला किंवा साला म्हणतात म्हणून ते शब्द वापरणं मला समानतेच लक्षण वाटत नाही.
६. मला मुलाने जर विचारल, " की तुला स्वयंपाक करता येतो का " तर राग येत नाही. कारण स्वयंपाक करता येण्यात मला अभिमान वाटतो. (त्याला जर करता येत नसेल तर मला त्याच्यापेक्षा एक गोष्ट जास्त येते ह्याचा जास्त आनंदच होईल आणि नवर्‍याने स्वयंपाक करता यावा ही अपेक्षा असेल तर तुझ्या जोडिने करायला जास्त आवडेल अस उत्तर त्याला देईन.)
७. पुरुषांबरोबर कपड्याच्या बाबतीत समानता मी मागणार नाही कारण माझ्या कपड्यांनी मला माझी femininity जपायला आवडते.

हे माझे काही विचार आणि पुढे राहिलेले आणि येत जाणारे विचार लिहीन.


Maanus
Monday, January 28, 2008 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Friends: Season One, Episode 3, last scene at central park.

Rani_2007
Monday, January 28, 2008 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Friends: Season One, Episode 3, last scene at central park.

माणूस, please जरा सांगशिल का की ह्या episode चा इथे सदर्भ देण्यामागचा उद्देश?

काय कि episode आठवत नाही..म्हणून विचारले?


Farend
Monday, January 28, 2008 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maanus Friends चे एपिसोड्स सहसा "The one where..." अशा नावाने ओळखले जातात. कोणता म्हणतोयस तू?

या साईटवर एपिसोड्स च्या स्क्रिप्ट्स मिळतील.

Maanus
Monday, January 28, 2008 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

post deleted, dont think its appropriate in beginning of this thread.

Dineshvs
Tuesday, January 29, 2008 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, पहिले तीन मुद्दे अगदी योग्यच आहेत. आणि त्याचे मी जोरदार समर्थन करतो.

आपल्याकडचे समाजसुधारक याच मुद्द्यासाठी जनजागृति करत आलेत.

बाकिचे मुद्दे हे वैयतिक आवडीनिवडी बाबत आहेत. त्याचा समानतेशी काहि संबंधच नाही असे मला वाटते.

पेहराव, भाषा, व्यसनं, आवडीनिवडी याचा स्त्रीपुरुषांसाठी वेगवेगळा विचार करायची गरजच नाही.

पण आज याच बाबींचा जास्त विचार होतोय, आणि जर मायबोलीचे सभासद जर समाजाचा एक सुशिक्षित घटक मानला ( माझे नेहमीचे विचार ) तर असा विचार करणार्‍यांचे प्रमाण, भयावह आहे.

अगदी साधे उदाहरण, इथे एखादी मुलीने डॉक्टरेट मिळवली तर तिचे कौतुक होतेच, पण जर त्या मुलीने मी बिंधास्त आहे असे लिहिले ( प्रत्यक्षात ती असो वा नसो ) तर त्याची जास्त दखल घेतली आते.
म्हणजे असे, कि बघा बाबा मुलगी असून एवढे शिकली या पेक्षा, मुलगी असून एवढी बिंधास्त लिहिते वा वागते, याची जास्त दखल घेतली जाते. विचित्र वाटते हे मला.


Marhatmoli
Tuesday, January 29, 2008 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मुलं च्यायला किंवा साला म्हणतात म्हणून ते शब्द वापरणं मला समानतेच लक्षण वाटत नाही."

१००% पटल. शिव्या देण्यात कसला आधुनिकपणा देणार्यांना वाटतो (ह्यात मुले आणि मुलि दोघेहि आलेत) हे मला अजुनहि कळले नाहि. तिच गोष्ट व्यसनांचि. 'मला जाणत्या वयातहि स्वत:चे भलेबुरे कळत नाहि किंवा सार्वजनिक ठिकाणि हिंसा (शाब्दिक) करायला आवडते' यात अभिमान वाटण्यासारखे काय आहे?

"नोकरीमध्ये आणि त्यानुसार पगारामध्ये मला समानता हवी. "

हा मुद्दा आहे अस आधि वाटायचच नाहि (कारण हे असच असणार हे ग्रुहित धरल होत) पण उसगावातहि असा भेदभाव केला जातो हे कळल तेंव्हा प्रचन्ड धक्का बसला होता.

समानतेच म्हणाल तर नवरा-बायको च्या नात्यात कुणिहि कुणावरहि कसलिहि मत न लादणे म्हणजे समानता अस मला वाटत. मला चांगला स्वयंपाक येतो म्हणुन मी तो करणार पण मग तु घर आवरण, भांडि धुणि इत्यादि करावस (कारण घरातिल कामाचि जबाब्दारि माझि एकटिचि नसुन आपल्या दोघांचि आहे.) अस mutual understanding हव.

सार्वजनिक ठिकाणि (म्हणजे देशातिल बसेस etc ) "महिला अपंग आणि लहान मुलांसाठि राखिव" अशि जि सुचना असते त्यातुन महिलांना अर्धचंद्र मिळावा अस फ़ार प्रकर्षाने वाटत. तिच गोष्ट शिक्षणातिल राखिव जागांचि. स्त्री म्हणुन माझ्यामध्ये एका पुरुषापेक्षा कमि क्षमता नाहि म्हणुन या गोष्टि offer केल्या ज़ाण हा मला स्त्रीत्वाचा अपमान वाटतो.

शेवटचि गोष्ट, राजकारणात मात्र स्त्रीयांना ३३% ऐवजि ५०% राखिव जागा असाव्यात कारण equal representation हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे. आपल्या राज्य घटनेत anglo-Indian लोकान्चे प्रतिनिधि निवडुन न आल्यास (लोक्सभेत त्यांना representation मिळाव म्हनुन) राष्ट्रपतिंतर्फ़े त्यांच्यासाठि २ प्रतिनिधिंचि नेमणुक करण्याचि तरतुद आहे. अशी मार्गदर्शक तत्वे घटनेत असुनहि स्त्रीयांसाठि ३३% जागा राखिव करता करता सगळ्याच राजकिय पक्षांचि दमछाक होतेय याला काय म्हणाव?


Anaghavn
Tuesday, January 29, 2008 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, तुझ म्हणन तु मुद्देसुदपणे आणि clearly लिहील आहेस. मला तुझे मुद्दे पटले.
मराठमोळी चा मुद्दा--"कोणीही कुणावरही कसलही मत न लादणे" हा मुद्द तर एकदम पटला.
आणि हे फक्त नवरा--बायको च्याच नाही तर सगळ्याच नात्यात लागु होतं.
मुलं हे करत नाही म्हणुन मीही करणार नाही, अस सरसकट म्हणण हे म्हणजे बालीश पणा वाटतो. हा, त्याच्यामागे तुमचा एखाद मुद्दा असेल(लोकांच्या द्रुष्टिने चुकीचा का होइना), तुमचा एखादा द्रुष्टिकोण असेल आणि तुम्ही त्याचे परीणाम्--चांगलेवाईट्-- भोगण्या इतके सुज्ञ आणि mature असाल तर जरूर बोला. थोडक्यात मला असं म्हणायच आहे, की तुम्ही काय बोलत आहात ते तुमचं तुम्हाला माहीत असू द्या.
पुढचं बोलणं नन्तर.
अनघा


Deshi
Tuesday, January 29, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा नवरा बायको चे ऐकमेकावर मत न लादने हा मुद्दा बायकांनी मान्य केला? मुंग्यांनी मेरु पर्वत तर गिळला नाही ना? आतापर्यंत असेच पाहीले की.
१. लग्न झाल्यावर बायका पुरुषांना सर्वच गोष्टीत ऐकायला भाग पाडतात.
२.लग्नानंतर मुलाचा आई वडिलांचा त्यावा जिवनात असलेला हक्क संपायलाच पाहीजे. त्याचा घरी पैसे, मदत वा ईतर काही देन्यापेक्षा त्याने मुलीचा आई वडिलांना ते सर्व दिले तर चालते.
३. मुलीचे आई वडिल म्हणजे देव, मुलाचे म्हणजे कर्दन्काळ वा राक्षस.

मुलांआही काही बाबतीत समानता हवीच.


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल्या ३ मुद्द्यांबद्दल सहमत.
पुढचे तीन मुद्दे अंशतः सहमत.

|४. मुलं दारू पितात किंवा सिगरेट ओढतात म्हणून मुलीने का ओढू नये? हा मला तद्दन मूर्खपणा वाटतो. चांगल्या गोष्टीत अनुकरण करण किंवा समानता मागणं हा शहाणपणा वाटतो. |
इथे अनुकरण किंवा समानता त्या गोष्टी करण्यातली नाहीये. त्यावर समाजात होणार्‍या प्रतिक्रियेची आहे. मुलाने सिगरेट ओढलेली खटकत नाही पण मुलीने ओढलेली खटकते. यावर आक्षेप आहे. आणि यात मला तरी काही चुकीचं वाटत नाही. गोष्ट वाईट असो वा चांगली ती करावी की न करावी हा मुद्दा स्त्री-पुरूष असण्याशी निगडीत असणं संपूर्ण अयोग्य.

|५. मुलं च्यायला किंवा साला म्हणतात म्हणून ते शब्द वापरणं मला समानतेच लक्षण वाटत नाही. |
उत्तर परत वरच्यासारखंच आहे. मुलाने म्हणल्यावर ते कानाला खटकत नाही पण मुलीने म्हणल्यावर पेलत नाही तर याला फक्त double standerds एवढेच कारण असू शकते.

|६. मला मुलाने जर विचारल, " की तुला स्वयंपाक करता येतो का " तर राग येत नाही. कारण स्वयंपाक करता येण्यात मला अभिमान वाटतो. |
स्वयंपाक करता येण्यात अभिमान वाटणं न वाटणं हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. प्रत्येकाला वाटेलच असे नाही. तसं रोजच्या स्वयंपाकात अवघड काही नसतं त्यामुळे प्रचंड वेगळा अभिमान बाळगावा असंही काही नसतं. पण तरी तो ज्याचा त्याचा प्रश्न. पण तो करता येत नाही यासाठी एखाद्या व्यक्तीला मुलगी आहे म्हणून कमीपणा दिला जात असेल तर ते चूक आहे. आणि बर्‍याचदा ह्या प्रश्नाचं subtext "तुझं करीअर, शिक्षण ठीक आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे" तुला स्वयंपाक असं असतं. राग येतो तो या गोष्टीचा.
स्वयंपाक करता न येण्यात कमीपणा वाटायला हवा असेल तर तो दोघांना वाटायला हवा. पण कधीच कुठल्याच पुरूषाला(कर्तुत्ववान असो की खर्डेघाशी करणारा) हा कमीपणा वाटताना दिसत नाही. उलट आमच्या बाब्याला कसं काही येत नाही याचं कौतुकच केलेलं आढळतं. आणि एखाद्या टॉप करीअरच्या मुलीला पुरणपोळी येत नाही म्हणून कमी लेखणं हे पण ओघानेच. अर्थात आम्ही हे सगळं उडवून द्यायला शिकलोत. रोजचं करता येतं. बाकी अवघड गोष्टी अगदी घरच्यासारख्या विकत मिळतात तर त्यात वेळ घालवणं आवडत नाही. म्हणजे करण्याची सक्ती असता कामा नये. आणि ते येत नाही म्हणून शून्य कमीपणा वाटतो. एखाद्याला गाता येत नाही, एखाद्याला खेळता येत नाही, एखाद्याला लिहिता येत नाही तसंच एखाद्याला स्वयंपाकातल्या gormet गोष्टी येत नाहीत.

|७. पुरुषांबरोबर कपड्याच्या बाबतीत समानता मी मागणार नाही कारण माझ्या कपड्यांनी मला माझी फ़ेमिनिनित्य
हे फारच वैयक्तिक आहे. प्रत्येकाच्या feminity जपण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. feminity जपलीच पाहीजे अशी गरज सगळ्यांनाच वाटते असंही नाही. जपलीच पाहिजे असंही नाही. तसं म्हणायला गेलं तर dressup च्या मुद्यावरून पुरूषांनीच स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे. कारण आपले social norms पुरूषालाच खूप कमी veriety देतात कपड्याच्या बाबतीत.
आणि हो समानतेचा म्हणून नाही पण केवळ एखाद्या स्त्रीने revealing कपडे घातलेत म्हणून तिच्याशी कसंही वागायची मुभा आहे असं समजणं ह्याला शुद्ध गाढवपणा म्हणता येईल.

बाकी कपडे आणि त्यामागच्या समजुती, norms , संकेत, खुणा हे सगळं खूप वेगळं आणि मोठं शास्त्र आहे. जे इथे लिहिता येणार नाही.


Nandini2911
Tuesday, January 29, 2008 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. एकंदरीत माझ्यावरून इथे चर्चा चालू झाली आहे का?
हरकत नाही. माझेही मुद्दे मांडते.
मला शिक्षण, नोकरी आणि पगार यामधे समानता हवी. सामाजिक स्थानामधे समानता हवीच त्याहूनही जास्त मुलीकडे जे se* object म्हणून पाहिलं जातं ते मला नकोय. एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून यापेक्षाही "एक व्यक्ती" म्हणून मला ओळख हवी आहे.

कपडे मी तेच घालते जे मला आवडतात. त्यातून काही समानता साध्य होते असं मला वाटत नाही. जरी मी जीन्स घातली तरी जेंट्स जीन्स आणि लेडीज जीन्स मधे फ़रक हा असतोच ना :-)

स्वयंपाक करायला मला आवडतं पण ती "फ़क्त माझीच जबाबदारी" असं म्हटल्यास मला आवडत नाही. कामाची अशी सरळसोट विभागणी मला आवडत नाही. आणि यामधे मोठेपणा किंवा अभिमान काय आहे ते मला कळत नाही. मला स्वयंपाक मस्त जमतो. पण "किती झालं तरी मुलीच्या जातीला हे जमलंच पाहिजे" या उद्गाराचा मला राग येतो. एका वरमायेने तर लग्नानंतर मुलं सांभाळता येतील का? हे सुद्धा विचारलं होतं... जणू काही हेच्या बखोटी मारून मग मी नोकरीला जाणार होते. अजून एकीने "आमच्या घराण्यामधे मुली फ़ार आहेत. मलाच एकटीला मुलगा आहे. तरी तुमच्या मुलीला मुलगाच व्हायला हवा. तसा पत्रिकेत योग असेल तरच आपण पुढचे बोलू..." आता बोला!!!!

दुसरा मुद्दा, माझ्या शिव्याचा..
मी चिकार शिव्या वापरते पण कुठे वापरते हेही महत्वाचे आहे. च्यायला साला याना मी शिवी मानत नाही. MC, BC या शिव्या असतात.. असे मला वाटते. ]
यामधे मला कुठेही "तो करतो म्हणून मी करते" हे म्हणायचे नाही. ती माझी भाषा आहे आणि मी तशीच वापरते. यापाठीमागे कदाचित मी ज्या वातावरणात वाढले (घरातले नव्हे!! आजूबाजूचे) कारणीभूत असावे. अर्थात गरज पडल्यास मी अत्यंत सोज्वळ मराठी
बोलू शकते. :-)

स्मोकिंग ड्रिंकिंग मुलाने अथवा मुलीने दोघानीही करणं वाईट आहे. पण मुलीनी शक्यतो करू नये असं मला वाटतं कारण याचा परिणाम होणार्‍या बाळावर होतो असं मी वर्याच ठिकाणी वाचलय. अर्थात हा प्रत्येक व्यक्तीचा स्वत्:चा निर्णय आहे.

राहता राहिला प्रश्न बिनधास्तपणाचा... बहुतेकाच्या मते मी बिनधास्त आहे. माझ्यामते मी जशी आहे तशीच आहे. लोकासाठी मी स्वत्:ला बदलू नाही शकत...

(वरची सर्व मते माझ्या विअयक्तिक आहेत. एक ताक सूचना) :-)


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडं अवांतर...
मी एक आर्टिकल सिरीज लिहितेय एका नवीन मासिकासाठी. Fashion as a concept relating to life, relating to art असं काहीसं. पहिला लेख आलाय छापून. (लिंक माझ्या वेबपेजवर आहे.)
पुढचा लेख आता हा समानतेचा मुद्दा धरूनच लिहिन म्हणते. धन्स आर्च!


Deepanjali
Tuesday, January 29, 2008 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

४. मुलं दारू पितात किंवा सिगरेट ओढतात म्हणून मुलीने का ओढू नये? हा मला तद्दन मूर्खपणा वाटतो. चांगल्या गोष्टीत अनुकरण करण किंवा समानता मागणं हा शहाणपणा वाटतो. |
इथे अनुकरण किंवा समानता त्या गोष्टी करण्यातली नाहीये. त्यावर समाजात होणार्‍या प्रतिक्रियेची आहे. मुलाने सिगरेट ओढलेली खटकत नाही पण मुलीने ओढलेली खटकते. यावर आक्षेप आहे. आणि यात मला तरी काही चुकीचं वाटत नाही. गोष्ट वाईट असो वा चांगली ती करावी की न करावी हा मुद्दा स्त्री-पुरूष असण्याशी निगडीत असणं संपूर्ण अयोग्य.

<<<<<<अगदी अगदी !!
अज्जुकाच्या 12:27 च्या संपूर्ण पोस्ट ला अनुमोदन !!


Slarti
Tuesday, January 29, 2008 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुले दारू पितात म्हणून मुलींनीही दारू प्यावी ही समानता नाही. पण जर मुलगी दारू पित असेल तर 'मुलगी (असून) दारु पिते' यामुळे भुवया उंचावतात, 'ते प्रकृतीला धोकादायक आहे' म्हणून नव्हे हे सत्य आहे. तीच गोष्ट शिव्यांची, कपड्यांची. आक्षेप आहे तो अशा ठिकाणी लिंगाधिष्ठीत दृष्टीकोन बाळगण्याला.
स्वयंपाकाचा प्रश्न विचारणे यात मूलतः काही गैर आहे असे मला वाटत नाही. किंबहुना, स्वयंपाक करता येणारी, घरी बसायची तयारी असलेली वगैरे मुलगी लग्नासाठी बघणे यात मलातरी काहीच चूक वाटत नाही. ती तुमची निवड आहे. (शेवटी तसे करणारी मुलगी घरात करिअर करते, तीसुद्धा 'सहभागी उत्पादक' असतेच. असो.) माझा आक्षेप आहे तो घराबाहेर करिअर करत असता घरातही करिअर करण्याची अपेक्षा ठेवण्याला. स्वयंपाक येणे हा मुलीच्या जातीला आवश्यक असा गुण नसून जगण्यास उपयोगी गुण आहे हे स्त्रीपुरूष दोहांनाही कळायला पाहिजे. घर चालवण्याची जबाबदारी कोणा एकाचीच नाही हे मान्य केल्यावर मग स्वयंपाक करायला आवडणे / न आवडणे हा मुद्दा येईल.
शेवटी, समानता 'मागणे' यात काही गैर वाटत नाही काय ? स्त्री समान आहेच, तिला समानता 'देणारा' पुरूष कोण ? मला हवे आहे या समानतेची जाणीव समाजात खोलवर रुजणे हे. मग प्रश्न आहे तो आपण आपल्या मुलांवर नक्की काय व कसे संस्कार करत आहोत याचा... कारण स्त्रीपुरूष समानतेची जाणीव एका रात्रीत होत नाही, एका रात्रीत होते ती तडजोड जी दूरगामी क्वचितच असते.


Slarti
Tuesday, January 29, 2008 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह, मी वरचे बडवत असताना अज्जुकाचे पोस्ट आलेले दिसते. तिचे मुद्दे माझ्याकडून परत मांडले गेले आहेत असे आता दिसेल. तरी ego म्हणून माझे पोस्ट राहू देतो...

Slarti
Tuesday, January 29, 2008 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> तसं म्हणायला गेलं तर dressup च्या मुद्यावरून पुरूषांनीच स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे. कारण आपले social norms पुरूषालाच खूप कमी veriety देतात कपड्याच्या बाबतीत.

अगदी मनापासून धन्यवाद !!! पोनीटेल बांधणे, कानात डूल घालणे इ. गोष्टी आम्ही केल्या की जोरदार 'फैसलेबाजी' (judgment-passing) होते हा स्वानुभव आहे.

revealing कपड्यांचा मुद्दा.... नुसताच गाढवपणा नाही तर घातक गाढवपणा आहे. revealing clothes = slutty हे समीकरण स्त्रीकडे केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून बघण्यातून येते.


Manuswini
Tuesday, January 29, 2008 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फक्त सगळ्यात पहीले तीन मुद्दे पटले. बाकी मुद्दे 'ह्या' गटात मोडत नाहीत. ते उगीच mix/confused केलेत असे मला वाटते. बहुधा लोकांची समानतेची वाख्या वेगळी असेल.

आणि हे पुर्ण माझे मत आहे तेव्हा उगीच वादाचा विषय नको. आणखी हे माझे मत general double standard observation मुळेच आहे.

जसे दिनेश म्हणतात तसे शेवटचे मुद्दे हे totally unrelated and incomparable वाटतात.
कदाचेत काही मुली किंवा लोकांचा असा समज असेलही की सिगरेट ओढणे,शिव्या देणे, pant घालणे म्हणजे मुलाच्या level वर येणे की ती जागा मिळवणे पण तो काही ह्या subject खाली येवु शकत नाही. हे उगीच लोकांनी create केलेय.

कोणी काय बोलावे,कसे रहावे हा पुर्णपणे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार प्रश्ण आहे. ते जर 'समानता' दाखवण्यसाठी वापरणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे. जसे काही लोक आम्ही modern आहोत पण त्यांच्या भाषेत modern ची वाख्या फक्त कपडे किंवा एखादी नवीन गाडी किंवा ज्यास्तीत ज्यास्त बायकोला नोकरी करायला देतो एवढीच मर्यादीत असते.

मी स्वत कुठलीही गोष्ट विशेषतः ( for instance साला,च्यायला शब्द गमतीनेच वापरते) काही मुले देतात मी का नको ह्याच्यासाठी बिलकूल वापरत नाही किंवा काहीही prove करयला वापरत नाही ( by writing this I am NOT clarifying or regreting for what I do but wanted to make clear that if somebody uses it then not necesarily uses to prove that if boys can then why not girls .

lastly दिनेश म्हणतात तसे कीतीही काही झाले तरे मुलीने आपली मत अगदी प्रमाणील पणे लिहिली किंव so called बिंदास पणे लिहिले तर भुवया अजून वर जातातच मग ती शिकलेली असो वा मागासलेली माणसे असो जी अतीशय तुcच्छ नजरेने त्या मुलीकडे पहाणार किंवा एक चर्चेचा विषय बनवणार, पहा ती मुलगी चार चौघात कशी वरतोंड करून बोलते,फटकळ आहे वगैरे वगैरे.

अर्थात काही शब्द कुठे वापरावे ह्याची काळजी ज्याने त्याने घ्यावी. त्यात मुलगे वा मुलगा ह्याचा प्रश्ण येतोच कुठे. मी तरी माझ्या आजीसमोर असे शब्द वापरत नाही. कारण हेच की तीला आवडणार नाही. मी मुलगी म्हणून तीला आवडणार नाही असे नाही वा माझा भाऊ वापरु शकतो असे तर बिलकूल नाही. पण मी खुप कमी वापरते so i dont regret it .
ह्या कारणामुळे मुलीवर oversmart नाहीतर वरचढ चा शिक्का बसतोच. ही थोडीफर भावना unfortunately मला ही इथे दिसून आलीय. ( not pointing any fingers but writing what I felt, if I hurt anybody then heartfelt sorry ).
दिनेशदा, तुमचा शेवटचा point पटला.

please people dont take this personal.


Manuswini
Tuesday, January 29, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरे आणखी (ही वरची पोस्ट आता वाचली म्हणून)

काही वाक्ये अगदी माझ्या तोंडची आहेत जी अज्जुकेने नी नंदीनी उचलली आहेत.

तु मुलगी असून तुला स्वंयपाक येत नाही म्हटले की डोक्यात सणक जाते. कारण ही comment अगदी सुक्षीशित लोकांकडून माझ्या cousin ला लग्न ठरवताना एकायला लागलीत. न्हवती तीला आवड त्यात काय एवढे मोठे.
त्यात तीचे शिक्षणाचा उद्धार केलाय, एवढी डॉक्टर असून जेवण नाही येत?
एकदा वैतागून तीने बघायला आलेल्या वरमायला हो नाही येत कारण hospital मध्ये cooking class न्हवते भरत.

बरे मला स्वतला स्वंयपाक येतो म्हणजे अभिमान वगैरे काहीऽऽ वाटत नाही. I just love cooking ,it is my personal choice .
काय असते काय जेवण बनवणे म्हणजे, चार पाच वेळा kitchen मध्ये घूसून एक दोनदा पदार्थ केले आवडीने किंवा शिकले तर सगळे येतेच, त्यात मुलगी काय मुलगा काय. डोके तर आहे ना देवाने दीलेले. आणि समजा एखादा पदार्थ चुकलाच तर नवीन dish म्हणून करा ना serve
दिवे घ्या.
दुसरे म्हणजे मी देवळात मुद्दमहून भांडून वगैरे काहीतरी prove करायचे म्हणून jeans नाही घालून जाणार. because I love dressing up. घालणार तरी कधी मग ते traditional कपडे इथे. हे झाले माझे विचार. it is 'PERSONAL CHOICE' when it comes to these things. I dont understand why people mix it up with 'equality'.


Tanyabedekar
Tuesday, January 29, 2008 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, नंदिनी, स्लार्टी अनुमोदन.. विशेशत्: अज्जुका फॉर डायसेक्टींग द इश्यु..

स्लार्टी, एखाद्या मुलाची बायकोने घर सांभाळावे, स्वयंपाक करावा इत्यादी अपेक्षा असु शकते. (ती पूर्ण होते हे ह्या समाजाचे दुर्दैव आहे हा भाग वेगळा कारण ही अपेक्षा पूर्ण करणार्‍या मुली, त्यांचे पालक अस्तित्वात आहेत.) पण मग अशी मुलगी जे घरकाम करते त्याला किती जण बरोबरीचा दर्जा देतात. अश्या केसेस मध्ये, मुलगा हा कर्ता, कमवता म्हणुन त्याला वरचा दर्जा आणि मुलगी काय तर घरच बघते, म्हणुन तिला खालचा दर्जा असे चित्र सर्रास दिसते. मुळात अशी मुलगी हवी असण्याचे कारण हे बहुतांशी ती कह्यात रहावी हेच असते. अर्थात ह्याला अपवाद देखील असतील.


Manjud
Tuesday, January 29, 2008 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न ठरवताना स्वयंपाकाचा मुद्दा आता कालबाह्य व्हायला हवा. त्यासाठी बाई किंवा महाराजा आहे की. घरच्याच बाईने / पुरुषाने स्वयंपाक करावा हा अट्टाहास कशासाठी? स्वयंपाक करणे ही ज्याची त्याची आवड झाली. मुलगी / मुलगा करीअर करूनही उत्तम स्वयंपाक, तेही रोजच्या रोज करणारे असतील तर हा बोनस ठरेल. पण ह्या काळात तशी अट घालणं फारसं पटत नाही.

हल्लीच्या आया, आज्या - निदान माझ्या ओळखीच्या तरी - आपला मुलगा असला तरी त्याला स्वयंपाकाचे धडे देतात, कारण,
१. शिक्षणाच्या / नोकरीच्या निमित्ताने एकट्याला रहावे लागले तर पोटाचे हाल होऊ नयेत
२. सून घरात आल्यावर मला जाब विचारेल, ह्याला काहीच वळण नाही लावलंत का म्हणून.

टण्या, तुला अनुमोदन. 'मुलगी घरीच तर असते' हे वाक्य ऐकायला अगदी साधं वाटलं तरी त्यात बर्‍याचदा हेटाळणिचा सूर असतो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators