Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 28, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Malaa vinodi vaTlele » Archive through January 28, 2008 « Previous Next »

Ravisha
Sunday, August 26, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरु,विशी
माझ्या एका मित्राची आई नुकतीच दुचाकी चालवायला शिकली होती.एकदा तिला खूप हुरुप आला आणि काढली तिने तिची मोपेड बाहेर.. नवशिकी असल्यामुळे घरातल्या कोणाचीही टाप होत न्हवती मागे बसायची,एकटीच निघाली... त्यांच्या घरासमोरच एक लॉंड्री होती,ह्या काकूंची मोपेड निघाली ती थेट लॉंड्रीत... क्षणभर कोणालाच काही कळेना.जरा सावरल्यावर लॉंड्रीवाला म्हणाला "अहो बाई,आम्ही कपडे धुतो;गाड्या नाही" :-(


Dakshina
Tuesday, November 13, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविशा... तुझा किस्सा वाचून जाम हसले...

Tukaram
Wednesday, November 14, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा एका मित्राच्या घरी २-३ जण गेलो होतो. काहितरी आणायचे म्हणून बाकि सगळे बाहेर गेले १० मि. साठी. जाताना एक मित्र घरात आणि कुत्रा बाहेर अशी परिस्थिती होती. आल्यावर, मित्र बाहेर आणि कुत्रा आत!!!! तो कुत्रा आत आल्यामुळे मित्र घाबरुन बाहेर आला आणि त्यानी बाहेरुन कडी लावली होती. खुप चिडवले त्याला, कुत्र्याची राखण करतो म्हणून.....

Lopamudraa
Wednesday, November 14, 2007 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ravishaa great kissaa..!!
tukaaram as well.

Divya
Wednesday, November 14, 2007 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणि माझी मैत्रिण नेहमीप्रमाणे shopping करुन झाल्यावर ठरलेल्या hotel मधे पावभाजी खायला गेलो होतो आणि bill देताना लक्षात आल कि तेवढ bill भरण्याईतके पण पैसे दोघींकडेही नाहीयेत. घरी जाउन आणावेत तर दोघींची घर लांब होती. जेवढे होते तेवढे त्याला दिले तरी वीस बावीस रु तरी कमीच पडत होते. आम्हाला फ़ारच हसु येत होते आपण असे कसे काय न बघता खाल्ले म्हणुन आणि तो मालक एवढा खडुसना पैशे दिल्याशिवाय जाउ देणार नाही,खायच्या आधी पर्स बघता येत नव्हती का वैगरे जोरजोरात बडबड करायला लागला, वर प्रत्येक table वर जाउन तुमच्या कडे आहेत ना पैसे तरच खा म्हणुन प्रत्येकाला विचारायला लागला. आमची हसुन हसुन वाईट अवस्था झाली. काय निर्लज्ज पोरी आहेत, वर हसतायेत, बापरे त्याला आमच्या हसण्याचाच राग येत होत. मित्र आल्यावरच सुटका झाली नाहीतर भांडीच विसळायला लावली असती. तेव्हांपासुन hotel मधे जायच्या आधीच पैसे आहेत ना विचारायची सवय लागली, आता क्रेडिट कार्ड असत तरी सुद्धा.

Maanus
Thursday, November 15, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) सेम असेच एकदा मी १० वीत का ११ वीत असताना झाले.

अरोरा टॉवर्सचे खुप नाव ऐकले होते. five start hotel , २५ रुपायचा चहा म्हणजे नक्की काय ते बघायला मी आणि माझा मित्र मिळुन गेलो अरोरा मधे.

एकतर आत गेल्यावर काही कळत नव्हते, reception ला विचारले चहा कुठे मिळतो. त्याने पहील्या मजल्यावर जायला सांगीतले.

table पकडले, प्रत्येक टेबलावर कागदी मेनु, जो guest गेल्यावर बदलला जातो.

चहा २५ रु.
लस्सी २५ रु.

माझ्या मित्राकडे फक्त ५० रु होते. आणि माझ्याकडे काही चिल्लर.

दोन लस्सी मागवल्या.
पिवुन झाल्यावर बिल आले. ५९.००

९.०० रु कसले, तर tax हा काहीतरी विचीत्रच प्रकार होता. पहीले कधी लस्सी साठी tax न दिल्यामुळे काही कळत नव्हते.

मी कशीतरी ह्या त्या खिशातुन चिल्लर गोळा केली आणि ९ रु जमवले.

तिथे पैसे ठेवुन बाहेर निघालो तर वेटर मागे मागे आला.

sir your bill is 59.50, you have given only 59.00

झाले, तिथे reception मधे कंपास वैगेरे उघडुन त्यात .50 पैसे शोधत बसलो :-)


Sush
Monday, December 17, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल परवाचिच गोष्टं.
मी शनिवारवाड्याच्या stop ला बसमधे बसले. हा पहिलाच stop आहे. बस सुटायला थोडा उशिर होता. बस तशी भरली होती. म्हणजे सगळे seats भरले होते आणि साधारण १०-१२ लोक उभे होते. पुण्यातल्या लोकांचि वाईट सवय म्हणजे लोक दारात गर्दि करतात. तसच या बस्मधेहि जि काहि लोकं होती ति सगळि दारात. बाकी बस रिकामी.
conductor आला पुढच्य दाराने चढला, बसची पाटि उलटी केलि. आणि खालि उतरला, मागच्या दाराने चढला. जे लोक पहात होते त्याना कळेना हा काय प्रकार? मोकळी बस असताना हा उतरुन मागच्या दाराने का चढला? त्याच्या लक्शात आणुन दिल्यावर म्हणाला बस्मधे खुप गर्दि असते, त्यामुळे येवढि सवय लागलिये की पुर्ण बस मोकळि असलि तरि मी असाच करतो.
नन्तर एक बाइ पुढच्या दारापासुन पहिल्याच seat वर बसली होती ति उठली खाली उतरली. तिथे उभ्या असलेल्या दोन बायकांचि वादावादि सुरु झालि मी बसणार, मी पहिली आले होते, नाही मी बसणार मीइथे seat च्या जवळच उभि आहे कधिची. इ.इ.
मग तिच्या शेजारची बाइ म्हणालि अहो भांडु नका त्या परत येणार आहेत.
मनात म्हणलं या दोघिंमधे भांडन लावुन कुठे गेली हि बाई?
उत्तर लगेचच मिळालं. ति बाइ conductor सारखी पुढिल दाराने ऊतरुन मागच्या दाराने चढली आणि
conductor ला विचारले बस *** ला जाते काहो?
अपेक्शित उत्तर मिळाल्यावर परत मागच्या दाराने उतरुन पुढच्या दाराने चढलि. आणि आपल्या जागेवर बसलि.
तिचा हाप्रकार पाहुन आम्हि लोक एव्हडे हसत होतो कि बास.


Zakasrao
Monday, December 17, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक नावामुळे वाटलेला किस्सा आहे.
समजा एखाद्या मुलाला सगळ्यानी साहेब साहेब म्हणाव म्हणुन त्याच्या आई वडिलानी नाव ठेवल "साहेब" आणि नुसतेच कस साहेब म्हणुन त्याला जर साहेबराव म्हणत असतील तर काय धमाल येइल ना. (खरोखर ह्या नावाचे काही लोक आहेत बरं)
उदा. समजा त्या लहानग्याने चड्डीत सु केली तर म्हणायचे "साहेबराव चड्डीत मुतले"


Tanyabedekar
Monday, December 17, 2007 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे झकास साहेबराव फार कॉमन नाव आहे.

आमच्या शेजार्‍यांना एक मतिमंद मुलगा होता. तो तसा वयाने मोठा होता. त्यांचा ड्रायव्हर त्या मुलाला घेवून फिरायला जायचा. कधी कधी तो मुलगा गाडीत घाण करायचा. ड्रायव्हर गॅरेजमध्येच गाडी लावून काकुंना जोरात ओरडून सांगायचा, "मॅडम, धाकट्या साहेबांनी गाडीत शी केलीये."


Monakshi
Wednesday, December 19, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही एकदा शिर्डीवरुन नाशिक ला परत येत होतो. तेव्हा एका ठिकाणी बस थांबवली. बस थांबली म्हटल्यावर आतले एक गृहस्थ आपल्या दोन मुलांना घेऊन खाली उतरले. कदाचित एखादी शंका वगैरे आली असेल त्यांना काय माहित? ते उतरल्यानंतर बस परत फिरुन एका व्यवस्थित जागी पार्क होऊन थांबली. आता बसने जागा बदलल्यावर त्या गृहस्थांच्या सौ. ला (त्या आतच बसून होत्या) काय झालं कोण जाणे, एकदम तरातरा उठल्या आणि डायरेक्ट बसच्या बाहेर. थोड्यावेळाने ते गृहस्थ आणि दोन पोरं आत आली. जागेवर जाउन बसली मग लक्षात आलं बायको गायब. हे महाशय परत खाली उतरले बायकोला शोधायला. इकडे आमच्यात खसखस पिकायला सुरुवात झालेली. डायवर, कंडक्टर पण आपापलं काम उरकून आत आले. नंतर मग बायको कुठुनतरी उगवली. पण आत फक्त पोरं बघून परत खाली गेली नवर्‍याला शोधायला. इकडे आम्ही हसून हसून वेडे व्हायच्या बेतात. नंतर ती जाते तोच नवरा आला कुठुनसा. तोही बायको अजून आलेली नाही म्हणून परत उतरण्याच्या बेतात. इतक्यात डायवरने त्याला थांबवले. त्याला ती महान पतिव्रता दिसली कुठे तरी. तो खच्चून ओरडला," ए अंबाबाई, तुझा नवरा आलाय आत, ये आता इकडे." आम्ही हसून ठार.

Divya
Wednesday, December 19, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनाक्षी, फ़ार हसले, जबरी किस्सा आहे.

Panna
Wednesday, December 19, 2007 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए अंबाबाई, तुझा नवरा आलाय आत, ये आता इकडे." आम्ही हसून ठार.
आम्ही वाचून ठार!!!
जबरी किस्सा!!

Zakasrao
Wednesday, December 19, 2007 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना जबरी किस्सा.
मग त्या अंबाबाईने कडकलक्ष्मी रुप दाखवल का त्याला?? :-)
वाचुन मला लगेच बॉ.म्बे टु गोवा मधला सीन आठवला.
बसच्या भोवती गोल गोल फ़िरणारा राजेश आणि खन्ना :-)


Manjud
Thursday, December 20, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना,

अंबाबाई आणि कडकलक्ष्मीवरून एक किस्सा आठवला. एकदा नीरजाने babysitting मधे असताना कडकलक्ष्मी बघितली. तिला कडकलक्ष्मी म्हणता येईना किंवा लक्ष्मी असून हा मुलगा कसा हा प्रश्न तिला पडला असावा त्यामूळेच की काय ती त्याला कडकलक्ष्मी म्हणायला तयार होईना. म्हणून काकूनी तिला 'अंबाबाई' म्हणायला शिकवले. रात्री तिला झोपताना अचानक आठवलं की आज अंबाबाई बघितली हे आपण आई बाबाला सांगितलं नाहीये. एकदम ताडकन उठून ती सांगायला लगली 'तो अंबाबाईला मारत होता.' सुरुवातीला आम्हाला कळेना की ही काय बोलत्ये. पण एकूण हावभावावरून कळले की हिने आज कडकलक्ष्मी बघितली असणार. पण तिची 'तो अंबाबाईला मारत होता' ही रेकॉर्ड थांबायला तयार नाही. सासरे म्हणायला लागले तिच्या तोंडून कोणीतरी पूर्वज बोलत आहेत हो. अंबाबाईचा जप करताहेत..... आम्ही दोघेही हसून लोटपोट. शेवटी तिला दामटवून झोपवायला लागली. १ वाजवला झोपायला गधडीने त्या सगळ्या नाटकात.


Sonalisl
Saturday, December 29, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा माझ्या बहिणीच्या वर्गात (इ. ६ वी त असताना) एका मुलाच्या उत्तरपत्रिकेतलं एक उत्तर मडमनी मोठ्याने वाचुन दाखवले होते. प्रश्न असा होता कि पाण्याची टाकी घरावर्/ बिल्डींगच्या वर का बांधतात?
उत्तर होतं . . .. 'टाकी गच्चीत बांधली जाते कारण ती खाली बांधली तर रस्त्यावरचे भिकारी येऊन त्यातील पाणी काढुन ते वापरतात.' :-)
तिने घरी आल्यावर जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा खुप हसलो होतो आम्ही.


Lopamudraa
Saturday, December 29, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सासरे म्हणायला लागले तिच्या तोंडून कोणीतरी पूर्वज बोलत आहेत हो.>>>>..:-) :-)
'टाकी गच्चीत बांधली जाते कारण ती खाली बांधली तर रस्त्यावरचे भिकारी येऊन त्यातील पाणी काढुन ते वापरतात.>>>>>:-) :-)


Maanus
Friday, January 18, 2008 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छोटा मेंदु मोठ्या मेंदु वर आपटतो आणि मग त्यातुन स्पंदने तयार होतात.

Zakasrao
Saturday, January 19, 2008 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय माणसा तुझ्याकडे "दामु आला" काय??? :-)


Uchapatee
Monday, January 28, 2008 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषा मराठी असुनही कधीकधी वेग़ळ्या उच्चारणामुळे निट समजत नाही व त्यातुन गंमत होते. ही मी कॉलेजला असतांनाची गोष्ट. आम्ही नुकतेच पश्चिम महाराष्ट्रातुन खानदेश मधिल एका छोट्या गावात रहायला आलो होतो. मी कॉलेजला तर लहान बहिण व भाउ शाळेत जात होतो. घरासमोर रस्त्यापलिकडे एक अस्सल खानदेशी कुटुंब – आई वडिल, एक मुलगी व दोन लहान मुले - रहात होते. मुलगी व एक मुलगा माझ्या बहीणीच्या आणी भावाच्याच वर्गात होते तर एक सर्वात लहान मुलगा 3-4 थी मधे होता. सहाजिकच त्यांचे घरी येणे जाणे सुरु झाले. मी कॉलेज ला असल्याने व जाण्या येण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने माझी त्यामुलांशी फारशी ओळख नव्हती. मी नुसता चेहेर्‍याने त्यांना ओळखत होतो. ते ही मला जरा बुजुनच असत. एकदा शाळा कॉलेजेसना कसली तरी सुट्टी होती. त्यामुळे मी व माझी भावंडे घरीच होतो. मी दुपारचे जेवण झाल्यावर बाहेरच्या खोलीत पडलो होतो. बाकिचे आतल्या खोलीत काहीतरी करत होते. मस्त पेंग येत होती. तेवढ्यात दार वाजले. मी बाहेरच्या खोलीत असल्याने दार उघड्य़ाची जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली. मी दार उघडले. समोरचा सर्वात लहान मुलगा दाताने बोटाचे नख चावत उभा होता. मला पाहील्या बरोबर तो म्हणाला
”ये म्हंते SSSSS”
मी उडालोच. वाटले कि झोपेमुळे काहीतरी भलतेच ऐकु येतेय. माझा गोंधळ माझ्या चेहेर्‍यावर दिसला असावा. मी काही म्हणायच्या आतच तो मुलगा पुन्हा जरा जोराने म्हणाला
”ये म्हंते SSSSSSS”
“काय़?”. मी ओरडलोच. म्हणजे मी मगाशी बरोबर ऐकले होते म्हणायचे. पण कानावर अजुनही विश्वास बसत नव्हता. भारतातल्या एका छोट्या गावात असले भलते आमंत्रण? तेही अगदी राजरोसपणे घरी येउन? काहीतरी गफलत नक्किच होती. तो मुलगाही बर्‍यापैकी गोंधळला. “आयला! काय बहिरं बिहिरं आहे कि काय?” हा भाव त्याच्या तोंडावर उमटलेला मी वाचला. तो पुन्हा आणखी जरा जोराने म्हणाला
”ये म्हंते SSSSSSSSS”
मी अजुन गोंधळातुन बाहेर पडलो नव्हतो. आता त्याला “कोण?”, “कुठे?”, ”कशाला?”
यापैकी नक्की काय विचारावे या विचारात असतांना माझ्या मागुन “नाही” असा बहीणीचा आवाज आला. आणी काय आश्चर्य़? तो “बरं!” म्हणुन निघुन गेला. माझा आ वासलेलाच होता.
काय रे? काय बहिरा बिहिरा झालास कि काय? पटकन सांगायला काय झाले होते? बहिणीने माझ्यावर सरबत्ती सोडली.
मी म्हट्ले पहिल्यांदा तो काय विचारत होता व तु काय उत्तर दिले ते सांग म्हणजे मी तुला मी काय ऐकले ते सांगतो. तो “हेमंत (त्याचा मोठा भाउ) आहे?” असे विचारत होता. तु काय ऐकले? तिने विचारले. मी काय ऐकले ते सांगीतल्यावर सर्वजण बराच वेळ हसत होते.


Uchapatee
Monday, January 28, 2008 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रसंग आयटी बुमच्या वेळचा आहे. त्यावेळी अक्षरशः मिळेल तिथुन नोकरीसाठी मुले उचलली जायची. मी अंधेरी स्टेशन व सिप्झच्या बाहेर प्लायकार्ड्स घेउन (ओरॅकल डीबीए, व्हिजुअल बेसिक, पॉवर बिल्डर पाहीजेत ई. ई.) उभी असलेली जत्रा पाहीलिय. या सर्व मुलांचे डेस्टीनेशन अर्थातच उसगाव. त्यामुळे नोकरी मिळाली की परदेशगमनाचे वेध. 3-4 महिन्यात ऑनसाईट पाठवले नाही तर दुसरी नोकरी. कंपन्याही शेकड्यानी/हजारांनी मुले ऑनसाईट पाठवत होत्या. कंपनीत साधारणपणे असा सिन असायचा. बॉस सकाळची मिटींग संपवुन 12-1 च्या सुमारास बाहेर आला कि टीम जमा करायचा व भाग्यवान लोकांची नावे वाचुन दाखवायचा. नावे असलेली मुले एकदम खूश व्हायची तर नावे नसलेली मुले “मेरा नंबर कब आयेगा” अशा चेहेर्‍याने नावे ऐकायची. मग बॉस भाग्य़वंत लोकांना सुचना द्यायचा. “तुमको XXXX दिन फ्लाय करना है. (नॉर्मली जेमतेम 3-4 दिवसाची मुदत असायची), अभि जाके एचाआरसे मेडिकलका फॉर्म लेलो. कल मेडिकल कर लेना, शाम को शॉपींग कर लेना. एक दिन फॉरेक्स, इंटरनल फॉरमॅलिटीज पुरी करनेके लिये लग़ेगा. और अभी हाथ मे जो असाईनमेंट है, वो कम्प्लीट करके AAAA को सब समझा देना.” हाती असलेले 3-4 दिवस या सर्व गोष्टी करता खरेतर फारच अपुरे असायचे त्यामुळे त्या 3-4 दिवसात अक्षरशः कुत्रे मागे लागल्या सारखी पळापळ करावी लागायची व मुले ती उसगावच्या आकर्षणामुळे करायची. जवळ जवळ सर्वच कंपन्यांमधे परदेशवारी पुर्व मेडिकल कंपल्सरी होती/आहे. कंपन्यांचा पॅथॉलॉजीकल लॅब बरोबर करार असायचा व मेडिकल तेथेच करावी लागायची. ही सर्व मुले मग एचआर मधे 2-3 वाजता जमायची. आधीच रिक्रुटमेंट्चे हेवी काम त्यात हे आणखीन. त्यामुळे “हे मेडिकल साठी लेटर! हे बरोबर घेउन जा त्या शिवाय मेडिकल होणार नाही”. “ह्या मेडिकल साठी किट! यात सर्व सुचना दिलेल्या आहेत् त्याप्रमाणे करा” एवढ्याच दोन सुचनात एचआर मधिल काम संपायचे.
एका अशाच लॅब मधिल दृश्य़.
एक मुलगा घाईघाईने 10-10:30 च्या सुमारास लॅब मधे येतो व रिसेप्शनपाशी जातो.
“मी ZZZZZZ मधुन आलो आहे. मला मेडिकल करुन घ्यायला सांगितली आहे” – तो.
”लेटर आणले आहे? युरीन, स्टुलची सॅम्पल्स आणली आहेत?” रिसेप्शनिस्ट.
”हे लेटर! सॅम्पल्स ?” गोंधळलेला मुलगा.
“हे एचआर पण ना! तुम्हाला सांगितले नव्हते युरीन, स्टुलची सॅम्पल्स घेउन जा म्हणुन?” रिसेप्शनिस्ट.
”नाही” मुलाने सोईस्कर रितिने एचआर वर चुक ढकलली. “आता काय?”
”हे कंटेनर्स!, टॉयलेट तिकडे आहे. पटकन घेउन या. तुम्हाला आधीच उशीर झालेला आहे! - रिसेप्शनिस्ट.
” युरीन ठीक आहे, पण स्टुलच सॅम्पल म्हणजे काय?” मुलगा

रिसेप्शनिस्टने स्टुलचे सॅम्पल म्हणजे काय हे समजाउन सांगीतल्यावर मुलाचा चेहेरा आणखीनच पडला.
“युरीन आणतो पण स्टुलचे अवघड आहे. मला दोन-दोन वेळेला होत नाही आणी त्यातुन काल रात्री टेस्टींग पुर्ण करता करता 11 वाजले. मी रात्री जेवलो सुध्दा नाही हो”
रिसेप्शनिस्टच्या चेहेर्‍यावर “मी काय करू?” असे भाव.
”तुम्ही उरलेल्या सर्व टेस्ट्स करुन टाका व रिपोर्ट द्या” – मुलगा
”आम्ही आमच्या अखत्यारित असे करू शकत नाही. तुम्ही उद्या सॅम्पल्स घेउन या. आपण उद्या मेडिकल करू” – रिसेप्शनिस्ट
“अहो परवा फ्लाईट आहे. जर फ्लाईटला मी गेलो नाही तर बॉस दुसरा कोणीतरी पाठवील. वर मला सहा महिने लटकवत ठेवेल ते वेगळे. दुसरे पुन्हा मेडिकलला यायचे तर बॉस ऑफिशीयल रजा देणार नाही व एक दिवसाची रजा फुकट जाईल. बघा ना कही करता येण्यासारखे असेल “ भांबावलेला व वैतागलेला मुलगा.
“अहो मी काय करणार? तुम्ही दोनच गोष्टी करु शकता. एक – तुमचे एचआर आमच्या ऑफिसला सांगु दे कि स्टुल सॅम्पलशिवाय मेडिकल करा किंवा तुम्ही “प्रयत्न करा” व सॅम्पल आणुन द्या”
“हं, तुमचे काय आहे? सॅम्पल्स आणलीत?” रिसेप्शनिस्टने पुढचा नंबर घेतला.
मुलग़ा कंटेनर्स उचलुन बाजुला गेला. त्याचा पडलेला चेहेरा बघुन एक दोघांनी सहानुभुती दाखवली तर त्याच्या जवळ आपले दुखः मोकळे करायला लागला.
”साला, काल दुपारी बॉसने 3 वाजता “परवा तुला उडायचे” म्हणुन सांगीतले. एचआर ने कागद दिले व वाचुन जा म्हणुन सांगीतले. वाचायला वेळ कुठ्ला? साला रात्री 11 वाजे पर्य़ंत टेस्टींग पुरे केले, नसते केले तर बॉस तिकडुन ही बोंबलला असता. बरोबरच्या एकादोघांना विचारले तर साले म्हणाले “काही नाही यार! तु टेंशन घेउ नको लॅबमधे ते सर्व सांगतात.” एकही जण सॅम्पल्सबद्द्ल बोलला नाही. घरी जायला रत्रीचे दोन वाजले. सकाळी सहावाजता उठलो व आवरुन सरळ ईथे आलो. वाचायला वेळ होताच कुठे?”
श्रोत्यांनी सहानभुतीने मान हलवली. मुलगा बॉसला कॉंटॅक्ट करण्याच्या मागे लागला.
तितक्यात आणखी एक मुलगा रिसेप्शनपाशी आला. ”मी XXXX ला असतो.
मेडिकल करायची आहे” – मुलगा
”लेटर आणले आहे? युरीन, स्टुलची सॅम्पल्स आणली आहेत?” रिसेप्शनिस्ट
“हे लेटर!” मुलाने लेटर काढुन दिले.
”आणी सॅम्पल्स?”
”आणले आहेत नं!” असे म्हणत त्यामुलाने जवळील कॅरीबॅग मधुन एक बाटली व एक किलोचा मोठा बोर्नव्हिटाचा डबा बाहेर काढुन रिसेप्शन काउंटरवर ठेवला.
रिसेप्शनिस्ट बेशुध्द पडायची बाकी राहीली होती!
”हे काय आहे? तुम्हाला सॅम्पल्स आणायला सांगीतली होती, हे काय आणले? हे असले नाही घेणार ईथे! तुम्हाला कंटेनर्स दिली नाहीत का कंपनीत?” बोलता बोलता तिने कंटेनर्स काढली व त्याला देउन म्हणाली - ” सॅम्पल्स फक्त याच्यातच ऍक्सेप्ट होतील”
“पण आता सॅम्पल्स यात ट्रांस्फर कशी करु” – मुलगा.
”That is your problem! हे आधी ईथुन उचला” - रिसेप्शनिस्ट.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators