Prady
| |
| Tuesday, December 11, 2007 - 2:12 pm: |
| 
|
माझी भाची( नणंदेची मुलगी) वय वर्ष ५. तिला दागिन्यांचा भरपूर सोस आहे. आजोळी आली की सगळ्या गोष्टींवर क्लेम लावणं सुरू असतं. सासूबाईंनी हौसेने एखादी नवीन वस्तू आणली आणी मॅडमला आवडली की लगेच प्रश्ण असतो "हे मी माझ्या चेंबूरच्या बॅगेत ठेवू?" एक दिवस सासूबाईंनी दागिने काढले होते काही समारंभाला जाण्यासाठी तेव्हा सगळा खजिनाच रिता झाला तिच्यासमोर. आणी मग क्लेम लावणं सुरू परत. " आजी हे आहे ना ते मी अत्ता माझ्या मम्मासाठी घेते आणी तो नेकलेस आहे ना तो तू मेल्यावर आम्ही चेंबूरला घेऊन जाऊ." सगळ्यांची ह. ह.पु.वा झाली.
|
Prajaktad
| |
| Saturday, December 15, 2007 - 12:26 pm: |
| 
|
माझ्या लेकिच्या प्रिस्कुल activity चा भाग म्हणुन एक टेडि बेअर आमच्याकडे गेस्ट म्हणुन आलाय..त्याच्या बरोबर आलेल्या एका बुकमधे ख्रिसमसच सचित्र वर्णन आहे...तो बेअर कसा ख्रिसमस सेलिब्रेट करतो..त्यात तो santa-clause ला लेटर लिहतो..मग, हवे ते गिफ़्ट त्याला मिळते..वैगेरे पार्ट एकुन कन्या खुश...लगेच दुसर्या दिवशीच आई आपण santa ला लेटर लिहु.. dear santa i want dora's kitchan दोनच मीनिटांनी शंका... आई santa ला माहित आहे का डोरा चे किचन कुठे मिळते ते?..त्याला लेटर मधे लिहायला पाहिजे कि डोरा चे किचन toyrus मधे मिळते..
|
Supermom
| |
| Thursday, December 20, 2007 - 7:02 pm: |
| 
|
माझ्या मुलांना रोज देवासमोर श्लोक म्हणायला लावते. मागच्या आठवड्यात 'अंबे तुझ्या मी....' शिकवले. सध्या मराठी शिकवणे पण चालू आहेच. परवा सारे श्लोक म्हणून झाले. फ़क्त अंबाबाईचा श्लोक राहिला होता. लेक काही उठायला तयार नाही. सारखी म्हणत होती, 'आई, there is one more ...' 'कोणता ग?' ' that mango one... ' आम्ही हसून वेडे झालो...
|
Shonoo
| |
| Thursday, December 20, 2007 - 7:51 pm: |
| 
|
माझ्या लेकीने परवा शाळेतून येताना फ़र्मान सोडले ' मम्मा, can we become Jewish?' मी गडबडलेच एकदम. तरी सवयी प्रमाणे प्रश्ना ला प्रतिप्रश्न केला ' का गं'. तर म्हणे शाळेत सांगितलंय की हानुका च्या दिवसात आठ दिवस गिफ़्ट्स मिळतात म्हणून! Santa वर्षातून फक्त एकच दिवशी येतो. स्वस्त मेनोरा कुठे मिळतील बरं?
|
Mukund
| |
| Wednesday, December 26, 2007 - 10:45 am: |
| 
|
प्राजक्ता,सुपरमॉम... आमच्या आदित्य(वय आता १५ महिने)बद्दलच्या २-३ गोष्टी... आम्ही रोज त्याला छोट्या छोट्या ३ मिनीटांच्या गोष्टी वाचुन दाखवतो. गेल्या आठवड्यात त्याला अलिबाबाची गोष्ट वाचुन दाखवायला सुरु केली.. त्याला समजेल अशा भाषेत.. ही बघ अलिबाबाची गुहा... हा बघ अलिबाबा.. अलि..बा...बा. असे २-३ वेळा म्हणुन चित्र दाखवत होतो. मांडीवर बसुन तो चित्र पाहत होता. त्याने मला २-३ वेळा हा अलि-बाबा असे म्हटलेले ऐकले. मग जरा विचार करुन व उं उं असे करत त्याने मला थांबवले व माझ्या छातीवर हात मारत बा...बा, बा... बा असे म्हणायला लागला... लगेच कळले नाही हा काय म्हणत आहे... पण लक्षात आले की तो म्हणत आहे की तो पुस्तकातला बाबा नाही...... तर मी बाबा आहे(तो मला बाबा म्हणतो.. ) दुसरी गोष्ट काही महीन्यांपुर्वीची आहे. मी टिव्हीवर टायगर वुडची गॉल्फ़ची फ़ायनल राउंड बघत होतो व हा माझ्या पायाशी लुडबुड करत होता. मी म्हटले अरे आदित्य मी टिव्हीवर टायगरला बघत आहे. बघ कसा मस्त खेळत आहे टायगर..... तर तो टिव्हीकडे वळुन वाघाचा आवाज खाकरुन खाकरुन काढायला लागला.. बिचार्याला वाटले मी त्याला जंगलातला टायगर कसा खेळत आहे हे बघायला सांगीतले... माझी हसुन हसुन मुरकुंडी वळाली... त्याला आम्ही साइन लॅन्ग्वेज थोडी थोडी शिकवत आहोत कारण जो पर्यंत तो पुर्ण वाक्य बोलत नाही तोपर्यंत काही काही गोष्टी कम्युनीकेट करायला त्याला सोप्प्या जाव्यात म्हणुन. उदा. जर त्याला अजुन एखादी खाण्याची गोष्ट अजुन हवी असेल तर आय वॉन्ट मोर यासाठी डाव्या हाताची ५ बोटे एकत्र करुन तसेच उजव्या हाताची पण ५ बोटे एकत्र करुन ती एकमेकांना जुळवुन आपटायची म्हणजे मोर असे.. मग गेल्या आठवड्यात त्याला नाचे रे मोरा ही मराठी गाण्यांची व्ही. सी. डी. दाखवत होतो. मग त्यातले नाच रे मोरा आंब्याच्या वनात हा नाच दाखवल्यावर त्याला विचारले आदित्य.. मोर कसा करतो? तर त्याने लगेच इंग्लिश शब्द मोर हे कसे दाखवायचे हे करुन दाखवले... आय वॉन्ट मोरची खुण करत.. मराठी मोर व इंग्लीश मोरची त्याने केलेली गल्लत पाहुन आम्हाला खुप हसायला आले..
|
Manuswini
| |
| Thursday, December 27, 2007 - 12:31 am: |
| 
|
प्राडी,सुमा ह पु वा. लहान मुलांना आपल्या 'मम्माच्या' वस्तुंवर लक्ष ज्यास्त असते किंवा ठेवतात. छोटीशी पीन, hairband असो मम्माचा वा काहीही.कोणत्या त्यांच्या मम्माच्या गोष्टी आहेत / नाहीत अगदी छान वॉचमनगीरी न सांगता करतात. माझी भाची ३ वर्षाची असताना, एकदा मी माझ्या बहिणीचा(भाचीच्या लाडक्या मम्माचा) dress घातला नी निघाले बाहेर. आता माझी ही मोठी बहिण माझ्यापेक्षा बारीकच. बाहेर निघताना अचानक खेळता खेळता हीचे ल्क्ष गेले नी लगेच प्रश्ण why did you wear my mom's dress? आणि मी उत्तर देण्याच्या आधीच, it does not look good on you (म्हणजे माझे moral down एकदम). अग मला आवडतो म्हणून घातला. मग हीचे लगेच तुझ्या घरचे कपडे का नाही आणत, तो आता फाटणार वगैरे ओरडाओरड. what if I wear your clothes वगैरे. चक्क रडून गोंधळ. शेवटी मी काढलाच बाई, आई म्हणाली उगाच रडवू नकोस तीला.
|
माझ्या बहिणीचे सव्वा वर्षाचे लेकरू घरी आलं होतं. बहीण जेवायला बसली होती. याला झोपवायचा प्रयत्न करून करून त्याचे बाबा आजोबा मामा सर्वजण झोपले. आणि याला कसला उत्साह आला होता कुणास ठाओक. घराच्या कोपयात ठेवलेला झाडू घ्यायचा आणि हॉलमधे यायचा. मी एकदा परत नेऊन ठेवला. दुसर्यादा परत नेऊन ठेवला. तिसर्यादा महाशय माझ्य पाठून आले. आई म्हणाली झाडू वर ठेवून दे त्याचा हात पोचणार नाही. मी झाडू त्याच्या हातून काढून वर ठेवला. त्याने खराटा उचलला. मी तो काढीन घेतला आणि वर ठेवला. त्याने सुपली घेतली. मी तीपण वर ठेवली. आणि मी वर ठेवेपर्यंत याने अख्खा कचर्याचा डस्टबिन स्वत्:च्या अंगावर पाडून घेतला. त्याच्या आईन येऊन धपाटा घातलाच शेवटी त्याला.
|
Sonalisl
| |
| Thursday, December 27, 2007 - 7:07 pm: |
| 
|
माझ्या बहिणीची मुलगी ३ वर्षांची आहे. एकदा रात्री झोपताना भाऊजींनी डोक दुखत होतं म्हणून बाम लावला अन बामची डबी बाजुला ठेवली. बर्याच वेळानंतर ते दोघेही झोपले होते तेव्हा ती ऊठली, अन तिने तो बाम कढुन स्वत्:च्या चेहर्यावर लावला. जेव्हा चेहर्याची जळजळ व्हायला लागली तेव्हा मात्र रडायला सुरुवात केली. दोघेही अगदी घाबरून उठले.
|
Prachee
| |
| Monday, December 31, 2007 - 9:37 am: |
| 
|
झी मराठीवर home minister बघत होतो मायलेकी.. तेव्हा झालेला संवाद "साडी किती छान आहे ना पिल्लु?" - मी "हं..छान आहे. आपण तुला घेऊ या?"- कन्यारत्न "हो, तुझ्या लग्नात घेऊ हं" "चालेल." मिनीटाभराने.... "आई, मला पण साडी घेऊ या?" - कन्यारत्न "होSSSS" - मी "तुझ्या लग्नात घेऊ हं " -कन्यारत्न
|
Kanak27
| |
| Monday, December 31, 2007 - 12:24 pm: |
| 
|
माझी मुलगि १३ महिन्याचि आहे. सध्या तिला बाहेर जाण्याचा खुप नाद लागला आहे. काल तीने मला माझी चप्पल आणुन दिलि नन्तर ओढनि आणुन दिली, आणि म्हणते बुर (बाहेर चल.) नक्कल करन्यात तर अगदि पटाईत आहे. चपाति करणे कुटणे सगळ Copy करते. I am enjoying a lot
|
Bee
| |
| Monday, January 21, 2008 - 4:01 am: |
| 
|
... सर्वच लहान मुले जरा बोलाचालायला लागलीत की मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यातूनच निर्माण झालेले दोन किस्से मला आठवतात. १) माझी बहिण बाथरूम मधे तिच्या मुलीला देखील घेऊन जाते जर तिला आंघोळ करायची असेल तर. कारण घरात कधी तिचा नवरा असतो कधी ते बाहेर गेलेले असतात. आई आतून कडी लावून घेते हे मुलीला एकदा माहिती झाल्यावर ती एकदा अशीच बाथरूम मधे गेली आणि कडी लावून घेतली. ती फ़क्त सव्वा वर्षाची होती तेंव्हा. आत गीझर सुरू होता. शेवटी आरीने दार खिडकी ऐवढे कापावे लागले. सर्व प्रकार संपेपर्यंत ताई पार घाबरून गेली होती. कारण आतमधे तिची मुलगी हू की चू देखील करत नव्हती. मी ताईला सल्ला दिला की अशावेळी आधी मेन स्विच बंद करून टाकायचा. एकूनच त्या इमारतीत भरपूर लोक असल्यामुळे वेळेवर अनेक लोकांनी मदत केली. २) एकदा आमच्याकडे पाहूणे आले होते. त्यांची लहान मुले आमचे मनोरंजन करत होती. ताईच्या मुलीला न जाणे काय हुक्की आली तिने आई कशी आंघोळ करते हे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यासाठी मोरीत जाऊन तिने साबन, अंग घासायचा स्क्रबर पण आणला. माझी बहिण एकदम लाजिवरवाणी झाली.
|
Dakshina
| |
| Tuesday, January 22, 2008 - 7:47 am: |
| 
|
बी... तुमचा पहिला किस्सा वाचून धक्काच बसला.... काय अवस्था झाली असेल तुमच्या बहीणीची.. कल्पना पण करवत नाही..
|
Bee
| |
| Tuesday, January 22, 2008 - 8:09 am: |
| 
|
दक्षिणा, मलाही हा किस्सा ऐकून धक्का बसला होता. ताई हल्ली सगळी दार वरतून बंद करून घेते. तिने सर्व दारांच्या खालच्या कड्या काढून आता फ़क्त वरती खटका ठेवला आहे. पण कधी कुणाकडे जर गेलीच तर सारखे तिला तिच्या पोरीवर पाळत ठेवावे लागते. जरा इकडे तिकडे नजर गेली की ताईला भास होतो तिच्या मुलीने दार लावून घेतले की काय. आणखी एक माझ्या भाचीचा किस्सा पण ही दुसरी हिच्यापेक्षा मोठी भाची. फ़क्त सहा वर्षांची. मी तिला डोळे उघडझाप करणारी एक बाहुली विकत घेऊन दिली. तिला छान स्कर्ट पोलके आणि पायात उंचे टाचेच्या चपला होत्या. हातात घड्याळ, वेणीला बो, कपाळावर चष्मा. ती बाहुली सुंदर दिसायची. माझ्या भाचीने एका दिवसातच तिची फ़ाडाफ़ाड केली. वर मला येऊन म्हणते की आम्ही तिचा रेप केला. माहिती नाही ही मुल हे सर्व कुठे शिकतात. रेप मागचा भले त्यांना अर्थ माहिती नसेल पण असे शब्द माहिती असणेही आपल्याला बरे वाटत नाही. हल्लीची माध्यमच ह्याला जबाबदार आहेत आणि पोरांचे सुपर डोके.
|
Monakshi
| |
| Tuesday, January 22, 2008 - 10:59 am: |
| 
|
बापरे बी, हे फारच भयंकर आहे
|
Prachee
| |
| Tuesday, January 22, 2008 - 11:37 am: |
| 
|
माझी लेकही (वय वर्षे ३ ) 'लिटिल चम्प्स' खेळते. ग़ाणे म्हणते, त्यावर टीकाही करते आणि शेवटी 'प्लीज प्लीज प्लीज मुझे वोट करो.' असेही म्हणते.
|
Prajaktad
| |
| Tuesday, January 22, 2008 - 10:05 pm: |
| 
|
माहिती नाही ही मुल हे सर्व कुठे शिकतात. रेप मागचा भले त्यांना अर्थ माहिती नसेल पण असे शब्द माहिती असणेही आपल्याला बरे वाटत नाही. हल्लीची माध्यमच ह्याला जबाबदार आहेत आणि पोरांचे सुपर डोके. माध्यम जबाबदार आहेतच...त्यापेक्षा कितितरी पटिने पालकांची पण जबाबदारी आहेच.. we have remote control .
|
Bee
| |
| Wednesday, January 23, 2008 - 5:08 am: |
| 
|
प्राजक्ता, पालक नेहमीच मुलांसोबत TV बघत नाहीत आणि दुसरे म्हणजे मुले इतरांच्या घरी जाऊन सोबत ग्रुपनी बसून पण TV बघतात. त्यांच्यामते रेप म्हणजे कपडे फ़ाडणे. मी ६वीला असताना मलाही तसेच वाटायचे
|
Dakshina
| |
| Wednesday, January 23, 2008 - 7:34 am: |
| 
|
प्राजक्ता, रिमोट कंट्रोल आपल्या हातात असला तरिही, कोणत्या चॅनल वर कधी काय आचरटपणा दाखवतील हे काही सांगता येत नाही. आणि सर्वंच पालक इतके जागरूक असतील असं मला नाही वाटत. स्वतच्या नाहीतर मित्राच्या... आणि हाईट म्हणजे पाळणाघर चालवणारे लोक काय म्हणून चॅनल लॉक करतील? नाही का? आणि नको ती माहीती मुलांना बरोब्बर कुठूनही मिळते. मी पण लहान मुलांचे आपसातले बरेच संवाद ऐकलेत जे आपल्याला गार करून टाकतील.
|
Supermom
| |
| Wednesday, January 23, 2008 - 1:03 pm: |
| 
|
अगदी खरं. भारतातली आत्ताची परिस्थिती माहीत नाही पण इकडे तर PG च्या नावाखाली बरेचदा जे आपण भारतात लहान मुलांना दाखवणार नाही तेही बघायला मिळतं. कालच जेवायच्या टेबलवर लेकानं प्रश्न केला, 'आई, did daddy ask you "will you marry me?"
|
Amruta
| |
| Wednesday, January 23, 2008 - 2:41 pm: |
| 
|
अगदी ग सुमॉ, कालच माझी लेक मला मैत्रीणीकडे जाउ का खेळायला अस विचारत होती. तिथे जाउन वेगवेगळ शिकुन येते(असो ते एक वेगळ पोस्ट होइल) म्हणुन म्हंटल नको तर म्हणते " आई please I will go, I know you want to be alone with baba " काय बोलायच? आणि तेव्हा तर बाबा पण घरी नव्हता.
|