Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 22, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » KarmBhumi » Archive through January 22, 2008 « Previous Next »

Ladtushar
Monday, January 14, 2008 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपसाभर !
खरे आहे घरून आणलेला डबा शेयर करताना पण काही असे अनुभव येतात, आमचा लंच ग्रुप खूपच छान आहे खुप मज्जा येते लंच ला, कधी एक दिवस टाइम चुकला तर एकट्याला बोअर होते. तरीही एक नमूना असा आहे की तो स्वताचा डबा झाकून दुसरयाताचे मस्त हाणत असतो कधी तरी ठीक आहे पण नेहमीच! एकदा पार्टी ला गेलो असताना जन्माचा भुकेला अश्या प्रमाने खात होता खादाडट की कधी भेटलेच नाही....नुसते आर्डर वर आर्डर....
अणि कोणी जर का काही स्पेशल करूँ आणले असले की पटापट संपवलेच समजयाचे :D

Dakshina
Tuesday, January 15, 2008 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचा ही लंच ग्रूप चांगला आहे. मलाही पुर्वी तुझ्यासारखे नमुने भेटले आहेत, त्यामूळे या नविन ग्रूप बरोबर मी जरा जपूनच वागते. म्हणजे पहील्यांदा मी मला हवी तितकी भाजी वगैरे कढून घेते आणि मग जे काही उरेल ते टेबलवर ठेवते. शिवाय मुद्दम कोणाच्याही ताटात हात घालण्या आधी परवानगी विचारते. मग ते म्हणतात, अगं विचारतेस काय? घालायचा सरळ. पण मी म्हणते की, मला चालत नाही त्यामूळे, मी परवानगी घेते. अशा प्रकारे आपल्याला कोणी ताटात हात घातलेला चालत नाही हा मेसेज आपोआप पसरतो.

आणि लोकं तर सॅलड वगैरे आणत नाहीत, पण आपल्या डब्यात मात्र हक्काने हात घालतात. मी निक्षून सांगते की मला आवडत नाही... आणि कुणी ही प्रमाणपेक्षा जास्त घेऊ नका...


Nandini2911
Tuesday, January 15, 2008 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑफ़िसमधले अनेक किस्से सांगण्यालायक आहेत. मी नुकताच जॉब बदलल्याने मला सुरुवातीला बदल सहन करणं जरा कठीण गेलं.
या आधी corporate असल्यामुळे वागण्या बोलण्यामधे एक मर्यादा होती. एजन्सीमधे बघयलाच नको. हाय हॅलो म्हणत सरळ गळ्यात पडणे.
मला एक तर अंगाला हात लावलेला बिल्कुल आवडत नाही. माझा पर्सनल स्पेस तसा खूपच मोठा आहे. :-)
पण इथे मात्र सुरुवातीला थोडं कठीण गेलं त्यानंतर मी सांगितलं Touch Me Not .
त्यानंतर मी शिष्ट आहे गावंढळ आहे वगैरे बरेच प्रवाद निघाले.
माझ्या ऑफ़िसमधे बंगाली मुली जास्त आहेत. रोज डब्यातून नॉन व्हेज आणतात. मला त्याचं काही वावडं नाही पण रोज माझ्या डब्याकडे बघून "रोज ये घासफ़ूस कैसे खाती हो?"

त्याहुन कहर म्हणजे काहीही बोलणे. प्रत्येक गोष्टीला डबल मिनिंग काढुन खिदळणे. आणि माझ्या कुठल्याही मित्राचा फोन आल्यावर "ओह, हा.. ह्म्म" असले काहीतरी बोलुन डोळे मिचकावणे. लफ़ड्याशिवाय दुसरी काही नाती नसतातच का? आणि मग मला "फिर तुम्हारे सिर्फ़ लडके ही क्यु दोस्त है?" असलं माझ्या बॉससमोर विचारणं.
यातली एक मुलगी माझ्या एका ज्युनिअरवर लाईन मारते. सरळ समजेल असा पद्धतीने. याच मुलीला अशुन मधून फोन आले की लगेच ती बाहेर जाणार
"यार मेरी फ़्रेंड का फोन था. फ़ीमेल फ़्रेंड." जसं काही मला समजतच नाही. :-)
आणि माझा ज्युनिअर काम सोडून काही टाईमपास करायला लागला किंवा माझ्याशी गप्पा मारायला लागला की लगेच "रोशन यहा आओ."
जणू काही तो आणि मी मिळून पळूनच चाललोय. बिचारीला रोशन रॉंग नंबर असलेलं अजून माहीत नाही त्यामुळे मी आणि तो सध्या तिच्या नाटकीपणावर जाम हसत असतो. :-)
मी मराठी असल्याचे समजून दुसरी एक माझ्यावर हल्ला चढवत होती. मी शांतपणे तिला सांगितलं "मी कानडी आहे." :-) अजून पण ती मला तू इतकं चांगलं मराठी का बोलतेस असं आडून आडून विचारतेच.
एकंदरीत नवीन ऑफ़िसमधे मला एंजॉय कर्ण्यालायक वातावरण आहे. मस्त धमाल आहे. :-)


Aashu29
Tuesday, January 15, 2008 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गोष्ट म्हणजे एखाद्याला मैत्रिचा दर्जा द्यावा तर official कामातही तो अधिकारच गाजवायला पाहतो. माझी एक मैत्रिण उगाच कामाशिवाय तिला फ़्री असताना डिपार्टमेन्ट ल येणार, अनेक फ़ोन करणार, का तर तिच्या डीप. ला नजरेत येइल ना, कामाच्या ओर्डर सोड्णार वगेरे

Tiu
Tuesday, January 15, 2008 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<admin> म्हणजे नक्की करता काय?
की नुसताच पगार घेता...
>>>
श्या! लोकं काहीही विचारत असतात!
पण खरंच... admin म्हणजे नक्की काय करता तुम्ही? ;-)


Tiu
Tuesday, January 15, 2008 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरची कमेंट ही गमतीत केली आहे! दिवे घेणे! :-)
मी पण पुर्वी सपोर्ट ग्रुप मधे काम केलं आहे. आणि मला माहीतिये सपोर्ट ग्रुप मधल्या लोकांना किती कामं असतात.
मी नुकताच जॉईन झालो होतो. माझ्या आधिचा जो माणुस होता त्याने तिथल्या लोकांना फ़ार वाईट सवयी लावुन ठेवल्या होत्या. लोक फोन करुन कामं सांगायचे आणि हा लगेच करायचा. कधी लेट झाला तर लोकं issue escalate करायचे की काम वेळेवर करत नाही वगैरे.
Habits die hard! शेवटी वैतागुन त्याने नोकरी सोडली...

मी आलो आणि असले फोन वगैरे आल्यावर मी सरळ helpdesk url द्यायचो आणि सांगायचो की कॉल लॉग करा.३ दिवसांचा SLA आहे. emergency असेल तर तुमच्या manager चं अप्रुव्हल पाठवा. बर्याच वेळा फुटकळ कामं असायचे त्यामुळे कसलं manager approval आणि कसलं काय!

पण या सगळ्यामुळे झालं काय की मी फार शिश्ठ आणि कामचुकार आहे असं लोक समजायला लागले. आणि मी दिसलो की मला ऐकु जाइल अश्या आवाजात बोलायचे की 'तो आधीचा संतोष किती चांगला होता, नाही?'

आणि हा प्रकार एका सिएमएम लेव्हल ५ कंपनी मधला!!!



Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिऊ, मला पण खूप वेळेला वाटतं की आपण ही काही कडक आणि काटेकोर नियम घालून द्यावेत लोकांना. ( being in support group ) कारण दिवसाच्या शेवटी इतकं काम करून सुद्धा, आपण नक्की काय केलं याचा आढवा घेताना चक्क हाताच्या बोटावर मोजण्याइतकं कामही झालेलं नसतं. घरून काही प्लॅनिंग करून या... हे लोक पाणी घालणारच त्यावर. एक तर फोन वर रिक्वेस्ट करणार, आणि अजुनी दहा फोन करणार फ़ॉलो अपसाठी. दिवसातला निम्मा वेळ तर डेस्कवर वाजणारा फोन उचलण्यातच जातो. आणि घरी मोबाईल वर. भिक नको पण कुत्रं आवर अशी आवस्था होते कधी कधी. वर लोकांना वाटतं की admin म्हणजे नक्की करतं काय?

Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता तर हाईटच झाली, एका सिनियर ने मला फोन केला, आणि म्हणाला की त्याच्या केबिन मधल्या व्हाईट बोर्ड वर त्याने काहीतरी लिहीले होते, आणि वर असे ही लिहीले होते की do not rub तरी आगावूपणा करून कुणितरी ते रब केले... मला म्हणतो... can you find out, who did that? या कामाचा पगार मिळतो का आम्हाला..?

Ajjuka
Wednesday, January 16, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला विचारायचं की तुझ्या घरी काही वस्तू हरवल्यात का? त्या पण शोधून देते.

Farend
Wednesday, January 16, 2008 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा २-४ पोलिसांना पैसे देऊन कुत्री वगैरे घेऊन त्याच्या घरी पाठवून दे आणि सांगा म्हणावं की त्या बोर्ड पुसण्याच्या investigations साठी आलो आहोत आणि घराची झडती घ्यायची आहे :-)

नाहीतर दोन तीन कलीग्स मिळून इतरच काहीतरी लिहून ठेवा त्या बोर्डवर आणि वर पुन्हा do not erase लिहून ठेवा


Kedarjoshi
Wednesday, January 16, 2008 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... can you find out, who did that?>>>
त्याला म्हणाव केस CBI कडे दिलीये.


Savyasachi
Wednesday, January 16, 2008 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tell him in all seriousness, to raise a ticket. (whatever proper channel). and then we will investigate it :-)
pan kharach height zali :-)


Shendenaxatra
Thursday, January 17, 2008 - 1:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक उपाय म्हणजे भक्कम पैसे मागा की श्वेतफलकाभोवती सिक्युरिटी क्यामेरे बसवून घेऊ म्हणजे "खोड"कर व्यक्ती रंगे हात पकडली जाईल.

Dakshina
Monday, January 21, 2008 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, absolutely तुम्ही दिलेला सल्लाच मला आणखी खूप जणांनी दिला... आम्हाला तर आमच्या हापिसात असले नमुने रोजच भेटतात. पण आम्हीच किस्से लक्षात ठेवत नाहीत.
असो, वरचे प्रकरण दुसर्‍या दिवशी वाढले, कारण या माणसाला मी काही उत्तर दिले नाही म्हणल्यावर याने मझ्या बॉसला सी सी मार्क करून मेल टाकली... मग बॉसने मल.. please ensure... this doesn't happen, pls find out वगैरे... लिहिले.. मी पण ठणकावून सांगितलं की एकतर याला केबिन द्या... म्हणजे (तो बसतो खरंतर दुसरीकडे) इकडे पाहूणा म्हणून येतो, वर हे? आणि ती केबिन सगळ्या प्रोजेक्ट्स चे लोक वापरतात. आता उगिचच शह द्यायचा म्हणून तो म्हणाला... कुणितरी ऑफ़िस बॉय ने पुसला असेल. अता उगिच तक्रार करायची म्हणून.. लगेच माझा बॉस.. please find out अरे काय चाललंय काय? मी सरळ बॉस ला फोन करून सांगितलं आणि भांडले पण. आणि उत्तर दिलं की ही असली तक्रार माझ्या इथल्या आयुष्यात मी प्रथमच ऐकते आहे, आणि आमच्या ऑफ़िसबॉईजना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की कोणतेही फ़ळे पुसायचे नाहेत.
बरं, समजा एखाद्या ऑफ़िसबॉयने फ़ळा पुसला असता, तरी तो त्यावर काय लिहीलं होतं ते परत लिहून देऊ शकणार होता का? जिथे लिहीणार्‍यालाच काही आठवत नाहीए, तिथे पुसणार्‍याच्या काय लक्षात रहाणार आहे? आणि पुसणार्‍याच्या लक्षात राहीलं असतं तर तोच नसता का याच्याऐवजी साहेब झाला?
काहीच्या काही.... कामं नसली ना की, लोकांना हे असले उद्योग सुचतात.


Farend
Monday, January 21, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मला वाटते हे प्रकरण इगो लेव्हल ला गेले आहे, म्हणजे यात काही करता येईल का पेक्षा admin ने मला उत्तर दिले नाही याचा राग तो escalation करून दाखवत आहे. त्याला फक्त एक 'सर्व संबंधितांस सूचना दिलेल्या आहेत...' छाप सर्कारी उत्तर दे :-) तुझ्या बॉस नेच आधी कसे नाही झाडले मला आश्चर्य वाटले.

Farend
Monday, January 21, 2008 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर बर्‍याच वेळा इतरच कलीग्स पुसतात, कारण इतकी गिचमिड असते की ते do not erase दिसतच नाही अर्धा अधिक फळा पुसल्याशिवाय, आणि बर्‍याच वेळा त्याच वाक्यावरून बोळा फिरवताना दिसते :-)

पण तू Scott Adam कडे पाठवून दे, कारण ही अस्सल Dilbert स्टोरी आहे.

असेही नग असतात की असे लिहून ठेवतात आणि मग वर्षानुवर्षे पुन्हा फिरकत नाहीत त्या रूम मधे. त्यामुळे मधे आमच्या कडे टूम आली होती की do not erase until लिहून तारीख लिहायची.


Naatyaa
Monday, January 21, 2008 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे काही लोक जुने matter digital camera नी फोटो काढुन save करुन ठेवतात board पुसण्याआधी!!

Maanus
Monday, January 21, 2008 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका बोर्ड वर permeant marker ने Do Not Erase - July 4, 2099 लीहुन ठेवले आहे.

आणि दुसरीकडे कोणी do not erase लिहीले असेल तर, त्यातला not word erase करुन टाकतो. :-)


Arch
Monday, January 21, 2008 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि दुसरीकडे कोणी do not erase लिहीले असेल तर, त्यातला not word erase करुन टाकतो.>>
माणसा, आता कोणाच्या कानाखाली आवाज कढला जाण्याची शक्यता आहे?

Abhijeet25
Tuesday, January 22, 2008 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीहि पगार विचारल्यावर माझे एक छापिल उत्तर असते " बस मिळतात पोटापुरते!" किंवा " बस खाना पिना निकल जाता है"

लोक समजुन घेतात कि याला सांगायचे नाहि. तरिहि कोणी अजुन निर्लज्जपणा करुन विचरले तर सरळ म्हणायचे कि " तुला सन्गितले तर तु वाढवुन देणार आहेस का?"
किंवा मग पुरुषाला पगार आणि स्त्रीला वय विचारु नये असे डोळे मिचकावत सांगायचे.

समोरचा परत कधी विचारत नाहि.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators