|
Ajjuka
| |
| Wednesday, January 16, 2008 - 4:53 am: |
| 
|
aptly put Savya! mi shabd shodhat hote hech sangayala. reservation is right or wrong is a debatable issue. It seems to be right in parts and wrong in parts. With all due respect to your talent, your brains, your feelings, I seriously do not find a 'brahmin supremist' approach in this incidence as it is there in the example above.
|
Dakshina
| |
| Wednesday, January 16, 2008 - 5:52 am: |
| 
|
निनावी, तुमचा अनुभव वाचून वाईट वाटले. मला आलेला अनुभव म्हणजे, माझी एक मैत्रिण सतत ब्राम्हणांनी इतर जातीच्या लोकांवर कसा अन्याय केलाय याबद्दलच बोलत असते. कोणतीही गोष्टं नेली की जोडली जातियवादाला. माझी अजुन एक मैत्रिण डॉक्टर आहे, ती दिनानाथ मध्ये नोकरी शोधत होती. ती ही नॉन ब्राम्हण. आणि दुर्दैवाने त्यावेळी रिजेक्ट झाली. ही लगेच तिला, म्हणाली तुझी जात 'ब्राम्हण' असती तर तुझ्याकडे कोणतही स्किल नसताना तुझं सिलेक्शन झालं असतं.. स्वतःच सतत जातीबद्दल बोलायचं आणि ब्राम्हणांना शिव्या घालायच्या.. काही वेळा मी अगदी हतबुद्ध होते. पण अपण बोलणार्यांची तोंडं नाही ना धरू शकत. पुढची हाईट रिसेन्टली डॉक्टर मैत्रिणिला, चक्क दिनानाथ मध्ये नोकरी लागली. तर भाष्य असं होतं की म्हणे, कोणी बामण नसेल मिळालं म्हणून तुला घेतलं असेल... अशा लोकांची तर किव सुद्धा करता येत नाही.
|
Farend
| |
| Wednesday, January 16, 2008 - 6:11 am: |
| 
|
काही लोकांना काही लोकांचा वाईट अनुभव येतो आणि मग ते सरसकट कॉमेंट मारतात. येथे मायबोलीवरही पाहा: ब्राह्मण, कोब्रा, आणि पुणेकर तर नेहमीची गिर्हाईके, पण गेल्या काही दिवसांत मराठी माणसे, married people, desis , (आणि 'आवाज' वाचणारे ) या लोकांना वाइट दिवस आले आहेत, ते कोणाला बोचत नाही का? मग या सर्वच्या सर्व कॅटेगरीत मोडणार्यांचे तर काय हाल!
|
Dakshina
| |
| Wednesday, January 16, 2008 - 7:35 am: |
| 
|
फ़रेंड, तुम्ही "आवाज" वरची कॉमेंट माझ्या वक्तव्याला केली आहे असे धरून मनमोकळेपणाने सांगते की ती कॉमेंट मी निव्वळ गमतीने केली होती. तसा वाद हा प्रत्येक गोष्टीमध्ये होऊ शकतो / असतो. सरसकट कॉमेंट करणे हा मूळ मुद्दा नसून, तो 'बोचतो' म्हणून इथे लिहीला जातो, इतकंच.
|
Zakki
| |
| Wednesday, January 16, 2008 - 12:09 pm: |
| 
|
इथले काळे सुद्धा नेहेमी गोर्यांबद्दल ओरडा करत असतात. भारतीय, माझ्यासारखे, काही मिळाले नाही की वर्णविद्वेष म्हणून ओरडतात. पण कित्येक काळे जे यशस्वी झाले आहेत, जसे बिल कॉस्बी, ओबामा हे तसे मुळीच मानत नाहीत. नि आता तर काय कित्येक भारतीय अगदी उच्चपदस्थ झाले आहेत इथे. स्वत:पुरते बोलायचे तर 'माझे आयुष्य माझ्या हातात' हा साक्षात्कार मला थोडा उशीरा झाला. नंतर माझे स्वत:चे दुर्गुण शोधायला लागलो तर कित्येक वर्षे नवीन नवीन दिसून येतातच आहेत!
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 16, 2008 - 4:10 pm: |
| 
|
निनावी ! हा किस्सा माझ्या mba च्या admission चा. आमच्या आख्ख्या ग्रुपने अगदी कसुन तयारी केली होती..फ़क़्त २ उनाड आणी हुशार बाळ सोडुन,ही गुणी बाळ एरवी आभ्यास करायची नाहिच..या पठ्यांनी चक्क त्यांच्या कास्ट्ला किती रिझर्वेशन आहे किती मार्क्स लागतिल.ऽसा हिशोब करुन entrance दिलेली..जशी लिस्ट लागायला सुरवात झाली.. you can't believe ओपन पब्लिक(ब्राम्हण,मराठा) साठी आक्खि लिस्ट रिकामी कारण प्रत्येक कास्ट साठी भरपुर जागा राखिव..ऽशावेळी शेवटि रिकामया राहिलेल्या(थोडक्यात उरल्या सुरल्या)जागा ओपनसाठी राहातात मग,मेरिट्प्रमाणे त्यांचे वाटप होते.. आमच्या २ फ़्रेंड्स ला सिंबॉयसिस युनिव्हर्सटि ऑफ़ पुणे अशी टॉपची कॉलेज आणी आम्हा पब्लिक साठी दुर चिंचवड, हडपसर(आता हे विभाग अगदी सुधारलेत पण,२००० वैगरे मधे अगदी पुणे-ग्रामिण विभाग होते)..यांना चक्क admission च घ्यावीशी वाटेना.. " गिल्टी वाटतय " तुम्ही लोकांनी मेहनत करुन फ़ळ आम्हाला मिळतय अस वाटतय. आम्ही त्यांना समजावल तुम्ही तुमच्या सिट्स सोडल्या तरी आम्हाला थोडिच मिळणार आहे...तेव्हापासुन त्यांना " सरकारचे जावाई च " म्हणायचो.(तेही हसत खेळतच घ्यायचे). तेव्हा निनावी take it lightly हे वरचे पोस्ट ब्राम्हणांना डिफ़ेन्ड करण्यासाठी आहे का?? उत्तर " हो " . खुपदा दुसर्याच्या पायाखाली पण काही जळतय हे आपण लक्षात घेत नाही.
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 16, 2008 - 4:12 pm: |
| 
|
निनावी! वरच्या पोस्ट्चा उद्देश तुला (किंवा कुणाला)दुखवण्यासाठी नाही..
|
Ajjuka
| |
| Wednesday, January 16, 2008 - 4:21 pm: |
| 
|
|काही लोकांना काही लोकांचा वाईट अनुभव येतो आणि मग ते सरसकट कॉमेंट मारतात. येथे मायबोलीवरही पाहा: ब्राह्मण, कोब्रा, आणि पुणेकर तर नेहमीची गिर्हाईके,| अगदी अगदी फारेंडा.. तिन्हीचं कॉम्बो आम्ही.. घ्या ऐकून. असो.. हा किस्सा बोचणारा नाही पण हताश करणारा आहे. मी नुकतांच एक इव्हेंट केला. Multimedia Show . त्याची थीम आणि डिझायनिंग दोन्ही माझे होते. एक नवीन कन्या asst करत होती मला. कुठेतरी fashion designing चा ६ महिन्याचा कोर्स करून आली होती. एकुणात alertness किंवा समज या बाबतीत अंधार दिसत होता. पण कामाचा पसाराच एवढा होता की तिच्यावर काहीतरी जबाबदार्या येणं अपरीहार्य होतं. तर त्यातल्या त्यात सोपं म्हणजे footwear वाल्याशी coordinate करणे ते मी तिच्यावर टाकलं. ३४ ऐतिहासिक व्यक्तिरेखा. त्यांच्या हातात असलेल्या तपशीलाप्रमाणे जोडे बनवून किंवा आहेत त्यात थोडे फेरफार करून जमवून घेणे असा एकंदरीत मामला होता. footwear वालाही ठरलेला होता. त्याच्याकडे जाऊन मी सगळं सिलेक्ट करून देणार होते. तिने फक्त ऑर्डर उचलताना ते चेक करायचं होतं. एकेक व्यक्तिरेखेचा जोडा मी त्या चप्पलवाल्याला समजावून देत होते. त्याप्रमाणे तो त्याच्याकडच्या लिस्टवर नोंदी करत होता. हिला ते सगळं लिहून घ्यायला वेळ लागत होता म्हणून आम्ही थोडं स्लो कम केलं. आणि झाल्यावर परत एकदा तिच्यासाठी रिव्हिजन केली. दुसर्या दिवशी मी तिला विचारलं की अमुक एका व्यक्तिसाठी आपण काय सांगितलंय? बूट की कोल्हापुरी? आदल्या दिवशी यादी लिहून घेतल्यावर अनेक गोष्टी लक्षात असू शकतात पण नसतील तर स्वतःच केलेली यादी बघून उत्तर देणे हे काही अवघड नसते. पण ही कन्या भलतीच over confident निघाली. हिने पटकन एक उत्तर सांगितले आणि तेही चुकीचे. मी विचारले 'नक्की?' तर म्हणे हो! एव्हाना मला बरोबर उत्तर आठवलेले होते.. शेवटी मीच डीझाइन केले होते ना.. तर तिला म्हणलं 'वहीत बघ' . तर म्हणते कुठली लिस्ट? माझे डोळे चकणे! हीच कन्या वय वर्ष २३. इव्हेंटच्या आदल्या दिवशी पुण्यात पोचली. रात्री तिला घ्यायला कोणीतरी येणार होतं. त्यांना यायला वेळ होता तर तिला म्हणलं की 'आम्ही जेवतोय, तुही २ घास खाऊन घे. मुंबईहून प्रवास करून आलीयेस तर भूक लागलीच असेल. आले तेवढ्यात तुझे जे कोण आहेत ते तर ते थांबतील ५ मिनिटं.' आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं. १५ मिनिटांनी आमचं होत आलेलं असताना ही मला सांगते 'प्लीज मॅडम मला असं भरभर जेवता येत नाही. मी काय करू!' मी नुसतीच तिच्याकडे बघत राह्यले. बहुतेक मला हताश करणार्या assts च्या किश्श्यांचं पुस्तकच काढावं लागेल. इतके आहेत!
|
Ninawi
| |
| Wednesday, January 16, 2008 - 8:23 pm: |
| 
|
@Prajaktad, I am sure I would have taken it lightly but this story dates back to 1994 when reservations and stuff were not as worse as today (as far as my memory goes, all reservations would add upto max. quarter of seats) On the top of that, nobody till then pointed at my caste. Even if I was OBC, there was no chance that I was benefitting from that reservation due to lack of documentation. I was competing for the open seat exactly like him. I worked as hard as him and always scored at par with him. So there was no room for such comment, even if its made jokingly. I deserved the comment, if I would have opted for OBC seat. Hence, I took it offensive and sorry, I stand by it. Its so disgusting to hear such 'joke' from well-educated (?) individual..Don't even feel like recalling it but after reading abhijeet's comment, this back mind story just erupted. @Savyasachi, I really wished if it would have been that clean joke. Honestly, there are not many who have as clean slates as you mentioned. Anyways, its history and I don't want to turn the page back.
|
आणि 'आवाज' वाचणारे>>>> निनावी चे मला तरी बरोबर वाटते त्या काकांनी जात काढायाला अन ते ही सरकारी ब्राम्हन म्हनायला नको होते. जोक मध्ये असले तरी.
|
मी शाळेत असताना माझ्या दोन बेस्ट फ़्रेन्ड्स वेगळ्या जातीच्या होत्या. आम्हा तिघीना एकमेकीन्च्या घरी कसल्या ना कसल्या कारणावरुन जातियवादी "कमेन्ट्स" ऐकाव्या लागत(आज्या, आत्यान्कडुन). आम्ही "ज़नरेशन ग़ॅप" म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचो. आपणही ह्यात अडकलो तर हे प्रकरण मिटायचे कधी? :-)
|
Savyasachi
| |
| Wednesday, January 16, 2008 - 10:00 pm: |
| 
|
exactly pradya, u said it.
|
Tiu
| |
| Thursday, January 17, 2008 - 12:43 am: |
| 
|
निनावीचं मलाही पटलं! काही काही लोकांना सवय असते...विनोदाच्या नावाखाली अश्या कमेंट्स पास करायच्या... म्हणजे मनात तर प्रचंड राग साठलेला असतो...बोलुन पण दाखवायचं असतं! पण स्पष्ट बोलता येत नाही (कारण माहित असतं की आपण चुक आहोत) मग विनोदाच्या नावाखाली टोमणे मारले की समोरचा काही बोलु शकत नाही! डोक्यात जातात असले लोक! :-(
|
Farend
| |
| Thursday, January 17, 2008 - 2:06 am: |
| 
|
दक्षिणा सर्वच मी गमतीने लिहिले होते, 'आवाज' वाले तर जास्तच, कारण त्यात व इतर कॉमेंट्स मधे खूप फरक आहे. तेव्हा अशी वक्तव्ये बिन्धास्त कर!
|
रत्नागिरी टाईम्समधे काम करत असतानाचा किस्सा. माझ्या आडनावावरून बहुतेक लोक मला OBC समजतात. तर तिथल एक माणूस माझ्याशी व्यवस्थित बोलायचा. एकदा नॉन व्हेज खाण्यावरून त्याला माझी जात समजली. त्यानंतर तो माणून मुद्दाम माझ्या समोर बसून ब्राह्मणाना यथेच्छ शिव्या द्यायचा. त्याचा अनुभव माझ्यापेक्षा तीन वर्षानी जास्त होता आणि तरी मला पगार्जास्त होता याचं कारण तो द्यायचा की मी बामण ना.. मग मझंच राज्य चालणार. मी रटा सोडून पुढे निघून गेले. तो अजून जातपातीचे हिशोब करत बसलाय. अजून एक किस्सा. लाडकी उर्फ़ लीना. ती आणि मी अकरावेत असतानाची गोष्ट. दुसर्या दिवशी ईद होती. त्यामुळे आमच्या सर्व मुसलमान मैत्रीणी "उद्या घरी या" वगैरे सांगत होत्या. लीनपण म्हणे "उद्या माझ्या घरी ये" त्यावेळेला तिची आणि माझी विषेश ओळख नव्हती फ़क्त एका वर्गात होतो इतकंच. मी म्हटलं "कशाला?" लीना "ईद आहे माझ्याक्डे." "तुझं पण एखाद्या मुसलम्नाबरोबर लफ़डं आहे का?" माझ्या वर्गातल्याअ बहुतेक मुली मुसलमान व्हायच्या मार्गावर असताना असा प्रकार करायच्या. "नाही, मी मुसलमान आहे" तिने शांत्पणे सांगितलं. लीना मुकादम म्हण्जए मी ब्राह्मण समजत होते. खरंतर हा किस्सा तिने लिहायला हवा. प्ण तिच्या ऐवजी मीच लिहतेय.
|
Ajjuka
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:28 am: |
| 
|
मला एकदा वर्गातल्या एका मुलाने 'तू मुलगी असूनही माझ्यापुढे जातेस याचं कारण तू बामण आहेस म्हणून तुला सगळे झुकतं माप देतात.' असं सांगितलं होतंस आणि वर मारायलाही आला होता. मी चुकवला मार म्हणून वाचले नाहीतर तेव्हाच दोनतीन दात, नकटं नाक शहीद झालेले असते.
|
Zakasrao
| |
| Thursday, January 17, 2008 - 1:15 pm: |
| 
|
काय अज्जुके शाळेत असल्यापासुनच मारामारीची सवय काय?? BTW ज्यावेळी मी लहान होतो आणि भारताची टीम सारखी हरायची (आताही हरतेच म्हणा पण अधे मधे जिंकते देखिल) त्यावेळी मनात येत होत जर प्रतिस्पर्धी ऑसिज असतील तर त्यांनी एक फ़ोर रन मारली की एकच रन देणे, नुसत्या त्याच्या पॅड वर बॉल लागला तरी त्याला LBW देणे. आणि आपल्या बॅट्समनना ३ वेळा आउट केले त्याने की मगच त्याने पॅवेलियन मध्ये यायचे असे नियम हवेत. पण असे नियम नव्हते ह्याच मला वाइट वाटत होत.
|
Ajjuka
| |
| Thursday, January 17, 2008 - 1:24 pm: |
| 
|
माझी शाळा मुलींची होती. हा किस्सा शाळेतला नाहीये. एम ए ला असतानाचा आहे.
|
Supermom
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:03 pm: |
| 
|
मला या बी बी वर आज सकाळपासूनच यावंसं वाटतंय. काल माझ्या शेजार्याने अचानक बेल वाजवली. दार उघडल्यावर एकदम म्हणाला की तुझ्या बेबीचा खूप ओरडण्याचा आवाज येतो. मला डिस्टर्ब होतं इ. इ. आणि शेवटी म्हणाला की the way your baby screams is unbelievable...' आता त्याच्या कुत्र्याचं भुंकणं अगदी रात्री दीड वाजेपर्यंत ऐकू येतं पण आम्ही कधीच तक्रार करत नाही. अपार्टमेंटमधे रहायचं तर हे चालणारच. तसं मी नीट मुद्देसूद उत्तर देऊन लोकांना गप्प करणारी आहे. पण तो इतका अचानक आला की मला बोलायला सुचलं नाही. अन त्याहीपेक्षा माझी मुलं मागेच उभी होती. स्वतः चा उल्लेख ऐकून मुलगी इतकी घाबरली की मी अजून बोलणं वाढवणं टाळलं नि सॉरी म्हणून दार बंद केलं. पण कालपासून मुलगीपण कितीही समजावलं तरी जरा शांत शांत आहे. नि त्याला आपण नीट उत्तर का दिलं नाही यामुळे मी जास्त अस्वस्थ आहे. इथे येऊन बोलून टाकल्यामुळे मला जरा तरी हलकं वाटतंय.
|
Chinnu
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:22 pm: |
| 
|
नी अजूनही मारामारी करत्येस का? तुला भेटणार्यांना सावध करेन म्हणत्ये! सुमॉ, त्या शेजार्याच्या कुत्र्याचे भुंकणे परत ऐकायला आले आणि त्रास होत असेल तर भिंतीवर हलकीशी टकटक करून पहा. फारच त्रास होत असेल तर सरळ बेल वाजविणे. त्याही पलिकडे गेलच तर केअर टेकर ला सांगणे. आणि मुलीला सांग काही काळजी करू नकोस म्हणावं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|