Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस » Archive through January 16, 2008 « Previous Next »

Farend
Tuesday, January 08, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, आधीपासून का कुप्रसिद्ध?

Sherpa
Tuesday, January 08, 2008 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Limbutimbu
तुम्ही कुठे रहायचात? आम्ही पण रतन cycle मधुन भाड्याने cycle आणयचो. मी शेवडे बोळा मधे bank of India च्या बाजुच्या वाड्यात रहायचो.


Psg
Tuesday, January 08, 2008 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड, म्हणजे बाजीरावाच्या काळातच जर तिथे रक्तपात झाला होता आणि तेव्हापासूनच त्याचे नाव 'खुन्या' होते, तर नंतर द्रविड बंधूंच्या खुनाच्या वेळी मुद्दामच ती 'खूनी' जागा निवडली असेल का? - असं माझ्या मनात आले..

Limbutimbu
Tuesday, January 08, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेर्पा, मी उमरदण्ड सायकलमार्टच्या शेजारच्या चाळीत रहायचो!
(मला शेवडे बोळ का बर लक्षात येत नाहीये! अक्षरष मेन्दू ब्लॅन्क झाला हे! खर तर या बोळातून कित्येक वेळेस गेलो हे, पण आत्ता नजरेसमोर काहीच उभ रहात नाहीये :-()


Mrdmahesh
Tuesday, January 08, 2008 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू,
नांदेड, परभणीला कुठे रहात होता.. विषेशत: परभणीला.. दोन्ही ठिकाणी शाळा कोणत्या होत्या?


Zakki
Wednesday, January 09, 2008 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नांदेड ऐकले आहे. परभणी? हे गाव आहे? की गंमत करतोय् लिंबू?

Mrdmahesh
Wednesday, January 09, 2008 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ झक्की,
तुम्ही तुमच्या नागपूरला जाऊन विचारा कोणीही सांगेल परभणी काय आहे अन् कुठे आहे ते.. संत नामदेव, जनाबाई आठवतात का? (ते इथलेच..) गेलाबाजार इथे टिचकी मारा..
परभणी जिल्हा (अर्थात गरज वाटलीतर..) अमेरिकेत राहून महाराष्ट्राला इतकं विसराल असं वाटलं नव्हतं.. असो..

Anilbhai
Wednesday, January 09, 2008 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे प्रभावतीनगर म्हंटल असत तर कळलं असत त्यांना. तुम्ही लोक पण ना. काही काही कळत नाही. :-)

Athak
Wednesday, January 09, 2008 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले ते दिन गेले म्हणजे 'जुने दिवस' किती आठवण ठेवणार , उज्वल भवितव्याकडे वाटचाल असली की हे विसरणे आलेच , चालायच , त्यात बिचार्‍या 'परभणी'चा काय दोष :-)

Anaghavn
Thursday, January 10, 2008 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"बनी तो बनी नही तो परभनी" ही म्हण माहीत नाही वाटतं..... असो.

Dakshina
Monday, January 14, 2008 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालंच घर आवरता आवरता, जुने फोटो सापडले. बसले होते पहात. आणि एकेक गोष्टी उलगडायला लागल्या... खरंतर आत्ताच्या प्रमाणात पूर्वी फोटो काढण्याचं इतकं फ़ॅड नव्हतं. आमच्या घरी तर कॅमेराच नव्हता. मला तर माझ्या आठवणीप्रमाणे तीनदाच फोटो काढल्याचं आठवतंय. ते ही स्टूडियो मध्ये जाऊन. माझ्या आत्याच्या मिस्टरांनी एकदा सुभाष कलर लॅब मधे फोटो काढला होता, तो त्यांचा धूसर फोटो मला फ़ार आवडला होता. आणि आपला पण तस्साच एक फोटो असावा असं ही मला खूप वाटायचं. पण दहावीच्या परिक्षेच्या आधी रिसिटला लावायला एकदा पासपोर्ट साईज आणि नंतर आठवण म्हणून शाळेतल्या मैत्रिणिंबरोबर ग्रूप फोटो. बस्स. इतकंच.

पूण्यात आल्यावर मात्रं त्यामानाने बर्‍यापैकी फोटो काढले. आम्ही मुली - मुलं मिळून टू व्हीलर ब्रिज वर जाऊन बसायचो, तिथे काढलेले, भूशी डॅम, खडकवासला... घर... किती ठिकाणी....

तर मूळ मुद्दा हा होता की... फोटो... खरं सांगू का? जुने फोटो पाहीलं की आता खूप त्रास होतो. आपण कित्ती बारिक होतो याची सर्वात आधी जाणिव होते. आता हवे ते ड्रेस घालण्याची आपलयाला मुभा नाही याचं दुःख होतं. केसही लांब होते, आणि मुख्य म्हणजे दाट होते.
फोटो काढताना झालेल्या गमती जमती... कॅमेर्‍याचा फ़्लॅश पडणार इतक्यात फ़ुसकन आलेलं हसू... हे सगळं आठवलं एकदम. एक दोन साडीतले फोटो ही सापडले, आणि मीच मला उंच भासले. आता वजनामूळे, साडी कशी दिसेल, याची शंका तर वाटते त्यामूळे साडी नेसण्याची हिंमत करत नाही.


Anaghavn
Monday, January 14, 2008 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय ग दक्षिणा खरतर आपण आता पेक्षा आधी कसे जास्त बारिक होतो, आपले केस कसे छान होते, याचाच त्रास होतो. आणि मुख्या तेच जे तु सांगितलयस्--सगळे dresses घालण्याची मुभा कमी होते--
जाडी वाढल्यामुळे.
असो, आज जे घालता येतयं ते घालुयात नाहीतर उद्या पुन्हा त्याचं वाईट वाटायचं.
अनघा


Manishalimaye
Monday, January 14, 2008 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>जुने फोटो पाहीलं की आता खूप त्रास होतो. आपण कित्ती बारिक होतो याची सर्वात आधी जाणिव होते.<<<

अगदी अगदी दक्षिणा!!!
मलाही हाच त्रास होतो...



Manjud
Monday, January 14, 2008 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुने फोटो पाहीलं की आता खूप त्रास होतो. आपण कित्ती बारिक होतो याची सर्वात आधी जाणिव होते.

दक्षिणा, lol . कसं अगदी मनातलं बोललीस.....


Zakki
Monday, January 14, 2008 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुने फोटो पाहीलं की आता खूप त्रास होतो.

मला पण. म्हणून मी घर कधी आवरतच नाही. कुणाला उत्साह असल्यास माझ्या घरी येऊन कराल का?

Athak
Monday, January 14, 2008 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'जुने' ते रम्य दिवस बारीक असण दिसण यात आनंद घ्यावा उगीच का त्रास करुन घ्यावा :-)
आताचे दिवस आहेतच त्रास द्यायला :-)


Dakshina
Tuesday, January 15, 2008 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, मी येऊ का तुमचं घर "साफ़" करायला?
अगदी छान साफ़ करीन काही ठेवणार नाही.


Zakki
Tuesday, January 15, 2008 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालेल. माझ्या मुलीचे तेच म्हणणे आहे. एकदा अंगावरल्या कपड्याखेरीज नि भिंतींना बांधून ठेवलेल्या वस्तूंखेरीज सगळे बाहेर फेकून द्या. मग अगदी जे आवश्यकच आहे तेव्हढे घ्या. नि दरवर्षी जुने कपडे फेकून नवीन घेत जा.

Athak
Tuesday, January 15, 2008 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नि दरवर्षी जुने कपडे फेकून नवीन घेत जा.
तसेही साईझवाढीमुळे होत नाहीतच :-)

Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना अथक! अगदी खरं बोललात... हे सगळं विचार करताना एक प्रकारचा ताण येतो? आणि असं वाटतं की ते जुने दिवस आपल्याला फ़िरून परत मिळाले तर काय बहार येईल.... पण ते निव्वळ अशक्य..

अगदी ताण या शब्दाचा विचार करायचा म्हणलं तरी, आजचा आणि त्यावेळी येणारा ताण यातही खूप फ़रक जाणवतोय. मुख्य म्हणजे "वेळ" ही गोष्टं आपल्याकडे मूळी नाहीच अशी वेळ मला अजिबात आठवत नाही. नाहीतर आता.... कोणीही काही विचारलं की एकंच उत्तर... 'वेळ नाही" साधा फोन करायला वेळ नाही. तेव्हा तर आम्ही पार लोकांना सहज म्हणून उठून भेटायला जायचो. आणि जर भेटले नाहीत तर कधीही frustrate व्हायचो नाही. आणि फोन न करता गेलो असलो तरिही लोक हमखास भेटायचे, गप्पा, अगदी जेवणं पण व्हायची. आणि आता अगदी निघण्यापुर्वी ५ मिनिटं सुधा reconfirm करावं लागतं 'बाई आहेस ना घरी... मी निघालेय..

काय करणार आजकाल आपलं आयूष्यं झालयंच इतक फ़ाष्ट. काल संध्याकाळी खेळून परत आल्यावर मला एकदम आठवण आली, शाळेत आम्ही प्रचंड खेळायचो. मैदानी खेळ, व्हॉलीबॉल, दोरीच्या उड्या, आणि लेझिम तर वेड्यासारखी. तेव्हा शाळेत एक तास उशिरापर्यंत थांबून सुद्धा कधी आपल्याला फ़ार उशिर झालाय असं feeling आलं नाही.
नाहीतर आता, सकाळी उठल्यापासून करावी लागते फ़क्त मॅनेजमेंट. हे राहीलं, ते राहीलं.... किंवा ऑफ़िसला निघताना चक्क कधी हातातलं काम टाकूनही जावं लागतं. माझा विश्वास बसत नाही. मी १२ वी ला असताना, सुद्धा इतक्याच लवकर उठून, घर आवरून (फ़क्त माझी खोली) कपडे धूऊन, आणि फ़रशी सुद्धा पूसून, नाश्ता करून. तयार... आणि वर मला ७ वाजायला वाट पहावी लागायची. मगंच मी घरून निघायची... कॉलेजातून निवांत घरी. तरीही वेळ उलटून गेल्याचं मला आठवत नाही. तेव्हाची शांतता आणि स्थिरता खरोखरी कुठेतरी हरवली आहे.

आज या घडीला अगदी नोकरी सोडून घरी बसायचं म्हणलं तरिही इतरांची चाललेली धावपळ पाहूनच अर्धा जीव दडपतो...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators