Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 15, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through January 15, 2008 « Previous Next »

Ashwini
Friday, January 11, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाणता राजावरून आठवलं. नीरजा म्हणते तसं बायकांच्या मेकपसाठी २ किंवा कधी कधी ३ लोक असायचे. एक जण, चंद्रगुप्त म्हणून होता तो मुख्य पात्रांना मेकप करायचा आणि दुसरा शशांक का शशिकांत म्हणून होता तो उरलेल्या सगळ्यांना. सगळ्या मुली त्याच्यासमोर रांगा लावून उभ्या असायच्या आणि तो इतक्या फटाफट हात मारायचा. मला तो अजिबात आवडायचा नाही. त्याला पण ते माहित होते. शक्यतो मला त्याच्याकडून मेकप करायची वेळ यायची नाही. कारण माझी entry (सोयराबाई) उशीरा असल्याने चंद्रगुप्त मला थोडं उशीरा सुरू करायचा आणि नीट वेळ घेऊन सुरेख मेकप करायचा. चुकून त्या दुसर्‍याकडून करावा लागला तर मात्र माझ्या फार जीवावर यायचे. तो चंद्रगुप्त माझा मेकप करत असताना हा त्याच्या मेकपच्या वस्तू मागून घ्यायचा आणि वर हिची entry उशीरा आहेना मग काय घाई आहे, हे वरती. मला खरच त्याचा खूप राग यायचा.
आता मराठी चित्रपटात काम करतो तो अशोक शिंदे त्यावेळी जाणता राजामध्ये आमचा मेकपमन होता. बहुतेक वेळी तो पुरूषांचा मेकप करायचा पण कधी कधी आमच्याकडेही यायचा. त्याने मेकप केलेलं मात्र मला चालायचं.
:-)

Ajjuka
Friday, January 11, 2008 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशोकचे वडील बाबा शिंदे हे विक्रम चे गुरू. फार जुन्या काळातले नाटकांचे मेकपमन. शिंदे ड्रेपरीवाले म्हणजे तेच. तेव्हा जाणता राजाचं ड्रेपरी आणि मेकपचं कॉन्ट्रॅक्ट शिंद्यांकडे होतं.
अशोक आमच्या शाळेत पण यायचा तेव्हा गॅदरींगच्या मेकपला. तेव्हा तो नट बनायचा होता.
जाणता राजा आणि महाराजा प्रतिष्ठान यांच्याबद्दल इतकं काय काय विचित्र ऐकतेय आता. खुद्द बाबासाहेबांनाच दूर करायचे प्लॅन्स होतायत प्रतिष्ठान मधे म्हणे. खूप वाईट वाटलं ऐकून.


Ashwini
Friday, January 11, 2008 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>खुद्द बाबासाहेबांनाच दूर करायचे प्लॅन्स होतायत प्रतिष्ठान मधे म्हणे
शक्य आहे. तत्वांना मुरड घालणं बाबासाहेबांना केवळ अशक्य आहे आणि ते सहन न होणारी अनेक मंडळी तिथे आहेत. आजकाल तर बाबासाहेब प्रतिष्ठानच्या कामात लक्ष पण घालत नाहीत. अमृतच पाहातो सगळं आता.

Prajaktad
Friday, January 11, 2008 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिफ़ोराचा विषय निघालाच आहे म्हणुन!.. सिफ़ोराला किंवा macy's मधे ते make-up सेक्शनला जे tester ठेवलेले असतात ते काही बायका अगदी घरचा असल्यासारख चोपडत बसलेल्या असतात.. म्हणजे काहितर अगदी पुर्ण मेकपच करुन घेतात.. by the way तिथे काहिजण मेकप करुन वैगरे देतात ते चकटफ़ु कि चार्जेस लावतात त्याचे??
सिफ़ोरा बाकी छान आहेच..पण indian स्किन टोन साठी काय घ्यावे ते जरा confujing च आहे .. डिजे किंवा अज्जुका सांगु शकेल का याबाबतीत .. मॉड सॉरी विषयांतर झालेय..


Divya
Friday, January 11, 2008 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, मला विचारल नाहीस पण तरी सांगते. अगदीच गप्प बसवेना...
तिथे पुर्ण make-up करुन देतात का ते मला माहीत नाही. पण ते tester तुम्हाला काय shade सुट होते ते try करुन बघायलाच ठेवलेले असतात. जर तरीही नाही समजले तर तिथले assistant मदत करतील perfect shade शोधायला.
bare escentuals, bare minerals products छानेत.
मलापण आवडत नाही ते चोपडा चोपडी प्रकरण, तिथल्या सगळ्या testers ची वाट लावतात. ते use करायलापण नको वाटतात. पण तुम्हाला तुमची shade माहीत झाली कि tester कशाला लागतोय म्हणा...


Shonoo
Friday, January 11, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Macy किंवा तसल्या दुकानात जेंव्हा तिथल्या बायका make up करून देतात तेंव्हा आपण त्यांनी सुचवलेले प्रॉडक्टस घ्यावेत अशी अपेक्षा असते. अर्थात अनेक देशी बायकामुली सर्रास पार्टीच्या आधी, लग्न समारंभाच्या आधी तिथे जाऊन सर्व मेकप करून घेतात अन मग काहीही न घेता सटकतात. गर्दीच्या वेळा टाळून गेलं तर त्या बायका फार छान माहिती देतात. अन खरोखर काही प्रकार विकत घेतले तर samples पण देतात.


Prajaktad
Friday, January 11, 2008 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या , शोनू धन्स... ते देशी बायका मेकप करुन घेतात हे अगदी खर..तसच इथल्या आज्जी वैगरेही अगदी आवर्जुन मेकप करुन घेतात.
दिव्या ! वरती अज्जुका आणी डिजे ची मेकप कसा करायचा यावर बरिच चर्चा चालली होति म्हणुन त्यांना विचारले..
" विषयाला धरुन बोला " अशी पाटी काही मिनिटात लागेल इथे..तेव्हा योग्य बीबी वर पुढची चर्चा करु..


Anupama
Friday, January 11, 2008 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bare Escentuals खरच छान आहे. मी त्यातली mdium tan shade वापरते.

Ajjuka
Saturday, January 12, 2008 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेकपचा वेगळा बीबी काढू. तिथे काही टिप्स मी देईन. डिजे पण देईल. पण मी सिफोरा शी अजिबात acquianted नाहीये त्यामुळे तिथल्या products बद्दल सांगू शकणार नाही.
हा स्वतःचा स्किनटोन मॅच कसा करून बघायचा इत्यादींसाठी काही बेसिक गोष्टी आहेत ते सांगीन.. पण हे काही 'बोचणारे' नाही तेव्हा आपण दुसरीकडे जाऊया. काय! :-)


Deepanjali
Sunday, January 13, 2008 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१० जणांच्या मेकपसाठी २०० - ३०० रूपये नाईट मिळते बिचार्‍याला. काय काय expect करायचं त्याच्याकडून?
<<< Hmm.. हा खरच मोठा फ़रक आहे !!
US मधे skin safety चा इतका विचार करणारे face painters/air brush artist जेंव्हा commercial events करतात तेंव्हा कमीत कमी 200 $ per hr charges घेतात .
Rs. 200 per night मिळत असेल तर त्य artist ला बिचार्याला अशी use n throw products जरी market मधे आली तरी वापरणं झेपायला पाहिजे !
बाकी US मधे इतर sephora सारख्या ठिकाणी किंवा Macy's मधे clinique, Lancome M.A.C. मधे guide केलं जातं पण पूर्ण face make up साठी trial make up निदान M.A.C. मधे तरी फ़ुकटात करताना नाही पाहिलं कधी .

असो , Cosmetics चा नवीन BB काढल्यावर च बोलु खूप विषयांतर होईल इथे .
:-)

Manuswini
Sunday, January 13, 2008 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय हे! शेवटी काय बायका त्या बायकाच. गाडी कुठल्या रूळावरून कुठे कशी जाईल व गेली(च) हे वर दाखवलेच की

just kidding हं!


Upas
Sunday, January 13, 2008 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol.. अगदी अगदी, नको नको म्हणत ह्या बीबीवर ही चर्चा म्हणजे बोचणारा किस्साच की.. :-O ~D

Deepanjali
Sunday, January 13, 2008 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको नको म्हणत ह्या बीबीवर ही चर्चा म्हणजे बोचणारा किस्साच की..
<<<

Savyasachi
Sunday, January 13, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol upas lol upas lol upas lol upas .... hushh zale 4 shabda

Manuswini
Sunday, January 13, 2008 - 7:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
LOL

सव्या,
हो ना ते चार शब्दांचे बंधन का ते कळत नाही काहीतरी कर बघु त्याचे...


Zakki
Monday, January 14, 2008 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना. बातमीफलकाचा विषय सोडून इतर चर्चा (भांडणे) तिथेच करणे हा सुद्धा एक बोचणारा मुद्दा असू शकतो का?

Abhijeet25
Tuesday, January 15, 2008 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसंग क्र. १
माझा एक जिवलग मित्र नाव सहस्त्रबुद्धे. आम्हि भरपुर वेळा डेक्कन ला भेटायचो एकत्र चहा, सिगारेट, कट्ट्या वर तास तास गप्प मारणे वगैरे, अगदि चांगले संबंध. एके दिवशी या महाशयांचे लग्न ठरले. मुलगी वगैरे बघुन आल्यावर मी विचारले कुठलि मुलगी, किती शिकली आहे वगैरे. सगळे सांगुन झाल्यावर आडनाव विचारले तर लेले.
मी सहज गमतीने म्हणालो " कोकणस्थ वाटते" हा अगदी तोर्‍यात उत्तरला " मग काय, आम्हि एवढ्या वरच्या जातितले, मुलगी पण तशीच पाहिजे ना. का म्हणुन खालच्या जातितली मुलगी करु?"
हा किस्सा सात वर्षा पुर्वीचा, पण आज हि खटकतो आठवला की


Aashu29
Tuesday, January 15, 2008 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जेव्हा कोणि नातेवाईक फ़ारशी ओळखही नसलेले असे विचारतात, काय ग नवरा कसा आहे, पटतं ना? तेहि नवे लग्न झालेले नसतानाही, तर बोचल्यासारखे वाटते, आणि असला जरि काहि प्रोब्लेम तर तो तुम्हाला कशाला सांगायला येइन मी, कमाल आहे?
त्यापेक्षा कसं चाललय, तब्येती कशा आहेत असं विचारावं नं!

Ninawi
Tuesday, January 15, 2008 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Recalled from Abhijeet's story. I had a friend, say AA, also Brahmin, don't know what type. My family is flagged under OBC but we got to know after my 12th result so I could not benefit that stuff (as you need to have caste certificate verified which used to take 6 months and I didn't even have a caste certificate) Both of us used to be at par in academics. Unfortunately, he scored a bit less in 12th. First merit list appeared everywhere and of course, he ranked lower than me. I visited him once after this list and his father jokes, "why don't you both exchange your marks, AA is originally Brahmin and you are Sarkari Brahmin. Thus, both of you will get colleges of your choice !!!"

This hurt me a lot and I burnt the bridge since then. Is it my fault that I am OBC? and I am equally competant which that *Brahmin supremacist* man failed to understand.


Savyasachi
Wednesday, January 16, 2008 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

it is not ur fault that u r obc. and it will be a debatable issue whether reservation is needed or not, but the fault is there, if any.

what dad probably meant was,
see, you know that my son and you are equally competent. but unfortunately he got less marks and so may not get admission. ur marks are capable of acquiring a seat in open quota, and his marks are enough for obc seat then why not exchange. (though we know its not practically possible to exchange. but its a joke, right?)
this way, both the at par students will get seats.
for me, I really think there is no such grave comment here, and that too made by his dad, that you should punish your friend and rob him off the friendship.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators