|
तुझे वडील निदान सगळं शांतपणे ऐकून घ्यायला तयार झाले- ह्यात मला आशेची तिरीप दिसतेय. सहसा पालकांपैकी एक कुणीतरी मुलांच्या कलाने घेतं. आता भावनिक न होता, चिडचिड न करता त्यांना समजावणं, हे तुला करायचंय. स्वानुभवाने सांगतो, फार नाजुक टप्पा आहे हा. तू डायरी लिहत असलीस तर घरच्या कुणा एकाला शक्यतो वडलांना दाखव. तुझ्या मनात काय चाललंय, त्याचा सर्वात प्रांजळ दस्तएवज आहे तो. तुझ्या प्रांजळपणाने समोरच्यांच्यी मनं नक्की विरघळतील. "मी माझ्याशी तरी खोटं का लिहू?" हा तर्क ते नक्की मान्य करतील, आणि तुझ्या बाजूने विचार करायला त्यांच्या नकळत वश होतील. एकीकडे तुझ्या प्रियकरालाही जरा 'खणून' पहा. Worst case scenario मध्ये तो कितपत खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहील हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे (नाहीतर देव न करो- पण 'तेल गेलं, तूप गेलं, हाती मात्र धुपाटणं राहिलं'- सारखी परिस्थिती व्हायची) परिस्थिती फारच हाताबाहेर गेली, तर प्रेम आणि घर दोघांना on hold ठेवून घराबाहेर पड. दूर कुठेतरी निघून जा. आॅफ़िसमध्ये तसली पोस्टिंग मिळत असेल तर पहा- घरच्यांना सांग- "तुमच्यापासून दूर जात असले, तरी 'तुम्हाला नकोशा' माणसांपासूनही दूर जातेय. We all need a break. " ह्या काळात एकमेकांना माणसं बर्यापैकी निर्लेपपणे evaluate करतात. बोलणं मात्र कुणाशी टाकू नकोस- फक्त भौगोलिक दुरावा थोडा वाढू दे. 'आपलं माणुस आपल्या जवळ नाही' ह्या भावनेने प्रत्येक पक्षाची जवळीक एकतर वाढते तरी, किंवा emotional dependance कमी तरी होतो. Either ways, it works towards freeing the mental baggage. कारकीर्दीतल्या आयुष्यात ह्या थारेपालटाचा चांगला परिणामही होऊ शकतो- शिवाय तुम्ही वादळातून स्वल्पविराम घेतल्याने करिअरकडे नीट पाहता, आणि ह्या तुमच्या भूमिकेमुळे तुमच्या शब्दालाही वजन येतं.... मी कदाचित खूप वाहवत जाऊन बोलतोय, पण मला ह्या तोडग्याने निदान नुकसान तरी झालं नाहीय्- फायदा नक्कीच होतोय!!
|
Itgirl
| |
| Monday, January 14, 2008 - 2:47 pm: |
| 
|
योगेश, नंदू, मस्तच लिहीलत
|
ताजा कलम: "धाकटी भावंडं अनुकरण करतील" ही भीति अगदी अनाठायी आहे. तसं असतं तर एकाच पित्याच्या पोटी नारायण आणि नाग निपजले नसते. तुझ्या बहिणी जर प्रसंगाचं गांभीर्य ओळखण्याइतक्या जाणत्या असतील, तर त्यांना विश्वासात घे, त्यांची भूमिका काका-काकूंना कळव- त्यांना बोलतं कर. तुमच्या भावंडाचं मत खूप matter करतं- तुमच्याच पिढीचे- त्यांच्या मताने-दाखल्याने आईवडलांची मतं चांगल्यापैकी shape होतात. शेवटी स्वानुभवावरून अजून तीन गोष्टी सांगतो- १) तुमचा पक्ष खरंच योग्य असेल, तर आईवडलांना आज-न-उद्या उपरती नक्की होण्याची आशा आहे. २) जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ३) You never know what's in store. 'करायला गेलो गणपती- झाला मारुती' चा दाखला उलट्या व सुखद अर्थानेही पहायला मिळतो. All the best, Yogita!!
|
Maanus
| |
| Monday, January 14, 2008 - 3:10 pm: |
| 
|
काहीही सल्ले देता का रे तुम्ही. मी सगळे नीट नाही वाचले, पण miss योगीता जरा नीट practical विचार कर, तु diploma holder तो १२ वी पास. काय चाललेय.
|
Apurv
| |
| Monday, January 14, 2008 - 3:28 pm: |
| 
|
मुलाला चांगली नोकरी, धंधा आहे का? पुढे सुखी संसार होईल का? अत्ताचा नाही पण पुढील १० वर्षांनंतर काय? १५ वर्षांनंतर काय? असाही विचार कर. तुम्ही दोघांनी मिळून पुढील आयुष्याचा विचार केला आहे का? ह्याची उत्तरे तुझ्याकडे असतील तर आइ वडीलांचे समाधान होऊ शकेल. त्यांना अशा प्रकारे धीर देऊ शकशील.
|
Zakasrao
| |
| Monday, January 14, 2008 - 5:17 pm: |
| 
|
योगेश आणि नंदिनी ह्यानी खुप छान लिहिल आहे. इथे मला एक बेसिक प्रशन्च विचारयचा आहे तोच तु स्वाताला विचार. जस योगेशने लिहिलय की प्रियकराला "खणुन" घे तसच आधी स्वताला "खणुन" बघ. (मी स्वतला २ महिने "खणत" होतो ) एकदा तुझ तुलाच पटल सगळ की मग पुढे फ़ार कमी प्रश्न असतात. (स्वानुभव आहे हा) राहिली गोष्ट घरच्यान्ची तर त्यांच्यापासुन काहिही न लपवता जे काही आहे ते सगळ नीट सांगणे महत्वाचे आहे. आईच काळजी करण स्वाभाविकच असतं. त्यातुन तुम्ही मुलगी आहात म्हणून जास्तच. राहिली गोष्ट बाकीचे लोक नातेवाइक आणि समाजतील. आपले घरचे जर आपल्या सोबत असतील तर बाकीचे कोणी काही करु शकत नाही. कोणी आपल्याला भाकरी खाउ घालायला येतही नसत त्यामुळे त्यांचा विचार करण चुकीचे आहे. आधी स्वताला "खणा" मग त्याला "खणा" मगच घरच्यांसोबत बोला जे काही असेल ते. घरचे नीट समजुन घेतीलच. नाहीच तर त्या परिस्थितीत काय करायचे ह्याचा विचार नंतर करा. शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत माझ्या.
|
Manuswini
| |
| Monday, January 14, 2008 - 11:23 pm: |
| 
|
सगळ्यांनी लिहिलेच आहे पण एक गोष्ट म्हणजे काही practical गोष्टी लक्षात घेणे जरूरि असते भावनेबरोबर सुद्धा. No offense पण तू स्वत आर्थीक दृष्ट्या कीती खंबीर आहेस हे सुद्धा पडताळून पहा हा निर्णाय घेताना त्याचबरोबर हा मुलगा सुद्धा कीती जबाबदारी घेवु शकतो लग्नानंतर? एकच गोष्ट imp, girl has to be very strong and independant emotionally and economically as well to go through all at any given time . it may sound harsh to write this पण नंतर 'प्रेमात भाकर जळाली' असे होवु नये.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 15, 2008 - 2:59 am: |
| 
|
माणुस, मी सहमत. योगिता सध्या २२ वर्षांची. तिचे गेली ७ वर्षे या मुलावर प्रेम. म्हणजे ओळख झाली त्यावेळीच तो बारावी झाला असेल. मग गेल्या सात वर्षात तो पुढे का नाही शिकला ? जॉब व्यवस्थित आहे म्हणजे काय आहे ? नेमके कुठल्या कारणासाठी त्याने शिक्षण सोडले ? कुवत नाही कि ऐपत नाही ? या वयातल्या नवथर प्रेमाला, खरेच सत्य मानायचे का ? येऊ दे कि त्यालाहि मायबोलीवर, विचारुया त्यालाच.
|
दिनेशदा, अगदी हेच मला म्हणायचे होते. पण ते फ़ार आगाऊपणाचे वाटले असते म्हणून मी बोलले नाही. मुलगा फ़क्त बारावी शिकलाय आणि नोकरी कशा पद्धातीची आहे हे योगिताने सांगितलं नाही. कदाचित तिच्या आईचा विरोध यासाठी असू शकतो. योगेश, तू लिहिलेला भौगोलिक दुराव्याचा मुद्दा मला बरोअब्र पटला. आपण घरातून बाहेर पडल्यावर सर्वच बाबीकडे as a third party बघू शकतो. आणि माझ्याही बाबतीत मला हाच उपाय लागू पडलाय मला असं वाटतं की योगिता अजून mature नाहिये. तिने स्वत्:ला त्या मुलाला आणी त्याच्या नात्याला थोडा वेळ द्यावा. वाटल्यास त्याला ही मायबोलीवर घेऊन ये.
|
तुम्ही सगळे म्हणताय ते पटतय मला.मलाही खरच ह्या नात्याला वेळ द्यायचा होता पण हे सगळ अचानक कळल त्यामुळे काहिच बोलता येत नाहिय मला..दिनेश त्या मुलाची त्यावेळी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण आता तो well settled आहे. त्याचा job पण permanant आहे. आणि मला ह्या आधी अस वाटल नव्हत की मी इतकी involve होईन किंवा लग्न करायचा निर्णय घेईन.मी तुम्ही सगळे म्हणताय त्याप्रमाणे त्याला आणि मला पण "खणुन" बघितलय.त्यामुळेच तर मी माझ्या निर्णयावर अजुन ठाम आहे. आता बाबा येईपर्यंत वाट बघायची आहे.. आणि योगेश तुम्ही सांगितलय त्याप्रमाणे मी कालच घरी सांगितलय की मी posting मागतेय बाहेर कुठेतरी म्हणुन. त्यामुळे जरा वादळ शांत झालय.
|
Akshra
| |
| Tuesday, January 15, 2008 - 5:53 am: |
| 
|
तुम्हा सर्वाना सन्क्रान्तीच्या खुप खुप शुभेच्छा.
|
Dakshina
| |
| Tuesday, January 15, 2008 - 6:30 am: |
| 
|
योगिता, सर्वांनी तुला पुरेसं मार्गदर्शन केलं आहे. पण एक दोन गोष्टी तू तरीही पडताळून पहाव्यास असं मला वाटतंय. * मुलगा higher cast चा आहे म्हणालीस. त्यामूळे त्याच्या घरात तू निट adjust होशिल का? नाही म्हणलं तरी घराघरातली दैनंदिन आयूष्य जगण्याची रीत ही वेगवेगळी असते. आणि दररोज त्याच गोष्टींशी आपल्याला जास्त deal करावं लागतं म्हणून सांगतेय. कधी कधी या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होतात आणि वादात रुपांतरीत होतात. (तसं अजिबात होऊ नये ही सदिच्छा.) * दुसरी गोष्टं म्हणजे, शिक्षण. खरंतर शिक्षणाने फ़ार काही फ़रक पडतो असं मला वाटत नाही. उलट माणसाला Exposer किती आहे ते पडताळून पाहीलं पाहीजे. समजा उद्या तुमचं लग्नं झाल्यावर, नविन नविन अनुभवातून तू मोठी मोठी होत गेलीस तर तो ही तुझ्याबरोबरीने वाढू शकेल का? किंवा त्याची ती कुवत आहे का हे पहील्यांदाच पाहीलं पाहीजे. अर्थात the other way round हे तुलाही लागू पडतं. (जरी तुझं शिक्षण त्याच्यापेक्षा जास्त असलं तरिही.)
|
दक्ष्स पटतय मला तुझं. आणि ह्या विषयावर माझ आणि त्याचं बोलण पण झालय.
|
Akshra
| |
| Tuesday, January 15, 2008 - 7:06 am: |
| 
|
योगिता, तुज़्ह्या आई,बाबान्चा विरोध असायला कारण काय आहे?कि केवळ विरोधासाठि विरोध आहे.
|
अक्षरा अग तो माझ्या caste चा नाहिय in fact माझ्यापेक्षा higher caste चा आहे. पण तरी ही हे लोक तयार नाहियत.स्वत्:च्या मोठेपणासाठी माझ आयुष्य पणाला लावतायत आणि काही नाही...
|
Akshra
| |
| Tuesday, January 15, 2008 - 8:29 am: |
| 
|
योगिता पण त्याना काय प्रोब्लेम आहे ते तु नीट विचरुन घे म्हनजे त्याना नक्कि त्याच्यातलि कोणती गोश्ट पट्त नाहि,आवड्त नाहि,कारण ते त्यला भेटले पन नहित आनि एखाद्याला न भेट्ताच आपण त्याच्याबद्दल मते कशी बनवु शकतो.
|
मला ही तेच कळत नाहीय ग.. आणि भेटा सांगितल तरीही ऐकत नाहियत.मला खरच काहीच कळत नाहिय.
|
Akshra
| |
| Tuesday, January 15, 2008 - 9:14 am: |
| 
|
तु म्हणतेस तु त्याला ७ वर्श ओळखतेस,मग या ७ वर्शात तुझ्या घरी कहिच माहित नाहि म्हनजे तुझा एक मित्र म्हणुन पन माहित नव्हत का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 15, 2008 - 9:18 am: |
| 
|
योगिता, प्रेमाबद्दल नेमकि काय कल्पना आहे तुम्हा दोघांची ? या वयात असा निर्णय घ्Yआयची क्षमता आहे तुम्हा दोघात ? अजुन किती वर्षे एकमेंसाठी थांबायची तयारी आहे ? त्या काळात काय करणार आहात ? अजुन चार पाच वर्षे, विवाह केला नाहीत तर काहि फारसे नुकसान व्हायचे नाही. आताच एखादे वैयक्तिक लक्ष्य ठरवलेत, तर ते या काळात गाठता येईल. प्रेम खरे असेल तर टिकेलच, निव्वळ आकर्षण असेल तर, ते कमी होईल. निव्वळ प्रेम या शब्दाने, हुरळुन जाण्याचे माझे वय नाही. त्यामुळे मी पुर्ण्पणे वास्तवात राहुन मत देऊ शकतो. बारावी पास या शिक्षणामुळे पुढे किती मर्यादा पडतील याची कल्पना आहे ? या काळात पदवीधराना सुद्धा, नोकर्या मिळवणे कठिण झाले आहे. आणि शिक्षणाला पैसा लागतोच, हेही तितकेसे खरे नाही. जातपात नष्ट झालीय हे बोलायला ठिक असले तरी दक्षिणा म्हणतेय त्याप्रमाणे, पदोपदि घरात, जात आडवी येतेच. आर्थिक बाबींचा काय विछार केलाय. ? दोघांच्या मिळकतीत तफ़ावत असली तर त्याबद्दल काय म्हणणे आहे ? वैवाहिक जीवन आणि या वयातील प्रेम यात फ़ार तफ़ावत असते. प्रत्येक आकर्षणाला प्रेम म्हणणे आणि अश्या प्रत्येक किंवा इतर कुठल्याही प्रेमाची विवाहात परिणीती होणे, आवश्यक नसते. वैवाहिक जीवनात खुपच जबाबदार्या असतात. त्यासाठी वेगळ्या शारिरिक, आर्थिक आणि मानसिक क्षमता जरुरी असतात. निव्वळ प्रेमाने आयुष्य जगता येत नाही, असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण त्यासाठी निव्वळ एकमेकाच्या आधारे, इतर कुणाच्याही कसल्याही मदतीची अपेक्षा न धरता, एकमेकांवरच्या गाढ विस्वासाने आयुष्य नक्कीच आनंदात घालवता येते. पण त्यासाठी माअन्सिक ठेवण वेगळी असावी लागते. ( माझ्या अनेक मित्रमैत्रीणीने हे करुन दाखवले आहे, हे सत्य आहेच, आणि मला ते जमले नाही, हेही सत्य आहे. ) जर तुमचा निर्णय ठाम असता, तर त्याच्या वा तुझ्या घरच्या विरोधाची तुम्ही दखल घेतली नसती वा तो तुम्हा दोघाना विचलित करु शकला नसता. जर तुम्हाला तुमच्या प्रेमाची इतकी खात्री आहे, आणि तुम्ही सर्व गोष्टींचा विचार केला आहे, तर हि बाब कुटुंबियाना पटवणे अशक्य नाही. जर त्याना हे पटत नसेल, तर त्याना हे न पटवता, स्वतंत्र मार्गाने आवश्य जा. शुभेच्छा आहेतच.
|
दिनेश मला ह्या सगळ्या गोष्टींची पुर्ण कल्पना आहे आणि माझी मानसिक तयारी पण आहे. निव्वळ प्रेम असत तर नसत टिकल ना इतके वर्ष. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मिळकतीत अज्जिबात तफ़ावत नाहीय in fact तो माझ्यापेक्षा जास्त salary घेतोय.इतरांच्या मदतीची अपेक्षा तर मी आधीपासुनच ठेवली नाही even माझ्या बहीणीचीही नाही कारण उद्या सगळे ज्यांच्यावर मी विश्वास ठेवेन मदत करतील म्हणुन तेच फिरले तर अपेक्षाभंगाच दुख्: झाल असत. एकमेकांवर विश्वास आहे त्यामुळेच तर इथवर पोचु शकलो. आणि विरोधाची दखल म्हणताय तर रोज घरी गेल्यावर प्रत्येक वेळी बोलणी ऐकवी लागतात.पण मी अजुनही माझ्या मतावर ठाम आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे स्वतंत्र मार्गाने जायचा विचार अजुन तरी केलेला नाहिय.कारण त्यात कोणाचाच फायदा नाहिय आणि ह्या गोष्टीत मुलीलाच बोल लावला जातो..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|