|
Ladtushar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:38 pm: |
| 
|
Namasakr !! KaramBhumi office !! jithe apan aplya auushyatale sagalyat jast shan ghalavato...almost 50% or may be more for night outs and over time to earn more money and acchive sucess... pan kadhi kadhi hi karambhumi....nakoshi hote..agadi asahaya houn pan apan kahi karu shakat nasto....ani shevati eak divas kantalun paper takato manjech "rajinama" ...office madhlya sagalya problem che he eakch solution ahe ka ??? kitek chote chote problem apan ugach mothe karun basato...nahi ka?? Tumhala kay vatate ??
|
Ladtushar
| |
| Tuesday, September 11, 2007 - 5:43 pm: |
| 
|
Babdgul...(useless charachters) Off madhe nehami pretek team madhe eak tari asa namuna asto ki jo ekdum nirrThak asto...ani tychya vatanichi kame aplyala anga var padat astat ani to mast majja mart asto...!!! tar mag ashya veli kay karayche ?? koni sangu shakel ka ?? Thankx,
|
Dakshina
| |
| Thursday, November 01, 2007 - 1:44 pm: |
| 
|
तूषार, ऑफ़िसमधे असे हजारो problems असतात. ज्याला काही उपाय नसतो. तू म्हणतोस तसं, सहन करणं मुश्किल झालं की लोक पेपर टाकतात. अर्थात पेपर टाकणं म्हणजे, नविन ठिकाणचे Problems अंगिकारणासाठी केलेली मनाची तयारी. कारण जगाच्या पाठीवर कुठेही जा, ऑफ़िस ही 'चिज' कधीच बदलत नाही. येन केन प्रकारेण सर्वं ऑफ़िसमधले वातावरण सेम च असते. राजकारण, favorism ह्या तर चिड आणणार्या मूळ गोष्टी आहेत. पण त्याल ख़ोणीच काःई करू शकत नाही. जर आपण खूप काम करतो, आणि आपलं क्रेडिट कोणितरी दुसरा लाटतोय असं वाटलं तर, त्यावर चिडण्यापेक्षा आपणही त्यासारखे निर्लज्ज होणे भाग असते कधी कधी. कारण Corporate World मधे हेच चालते.
|
Ladtushar
| |
| Friday, November 09, 2007 - 5:43 pm: |
| 
|
Dhanywad, Agadi barobar corporate world he asech aste...aaj kal tar kahi thodyashya paishya sathi khup lok job change kartat....ani mang kadhi kadhi aple adhi khup changale chale hote ase kalvatat...mag adhichya companitalya mitra maitreenina weekend la bhetane mail ff karane ani sms karane chau rahate... shevati maitreeche dhage jethe julatat thethech man ramate....ani hi maitree off madhe sgalyashi hotech ase nahi !! mag apale avadate mitra, maitreeni, dusarya project madhe kiva onsite jatat mag navin team madhe punhha adjust hone suru houn jate ani punna junya mitranchya athavani ujala detat...tyanche dialogs ani reactions itake path houn jatat ki tynchya pachaat kanat virun jatat... Shevati mantat na Shukache Shan He ShanBahar...
|
Dakshina
| |
| Monday, December 03, 2007 - 7:43 am: |
| 
|
तूषार, तुम्ही म्हणताय ते काही अंशी बरोबर आहे, Office मध्ये मित्र - मैत्रिणी होतात, आणि त्यांना सोडवत नाही म्हणून जुना जॉब सोडणे थोडे असमर्थन करणारे वाटते. नविन नोकरी शोधताना कंपनीचे प्रोफ़ाईल, अपले जॉब प्रोफ़ाईल, शिवाय योग्य मोबदला हे सर्व पाहीलं पाहीजे. मित्र काय तिथे होते, ते बाहेरही भेटतीलच. जरूरी नाही की त्यांच्या बरोबर कामच केले पाहीजे. आजकाल मार्केटमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे की, Resources Pull करून मूहमाँगी किंमत मिळते, आणि लोक अक्षरश महीन्यात नोकरी बदलतात. आणि जास्त पैसे मिळवण्याच्या नादात स्वतःचे मनस्वास्थ्य हरवून बसतात.
|
Ladtushar
| |
| Monday, December 03, 2007 - 1:10 pm: |
| 
|
दक्षिणा, अगदी बरोबर कामच हे केले पाहीजेच, त्या पासून सुटका होत नाहीच पं जर कम करताना आपले सहकारी जर अपलेच सखे सोबती असतील तर कामात एक वेगालाच आनंद मिळतो...अणि कही शुल्लक गोष्तींन साथी जॉब सोडता ना याचा ही विचार करावा ! नुसते छोट्या छोट्या करणा साठी हातातली जबाबदारी सोडून जाऊ नए ! थोडी तदजोड़ करूँ पहावी ...
|
Maanus
| |
| Monday, December 03, 2007 - 5:51 pm: |
| 
|
I think ऑफीस मधल्या लोकांशी जास्त जवळीक करु नये. पहीले काही दिवस बरे वाटते, पण मग उगाचच आपन त्या व्यक्तीला किंवा ती व्यक्ती आपल्याला granted समजतो, आणि मग professional relations बिघडतात. उगाच तुला किती पगार, मला किती असले प्रश्न. दोघांचा पगार सेम असेल तरी मी बघ कसा रहातो, तु बघ. मला अती complex येतो कुणी मला असले प्रश्न विचारले की. एक तर खोटे बोलता येत नाही, आणि खरे सांगायला मला आवडत नाही. एखाद्या वेळेस मला नाही जमले तुमच्या बरोबर जेवायला यायला तर मी लगेच "तुम्ही काय बिझी बिझी लोक", "काम कुठे पळून जातेय" " blah blah " त्यापेक्षा नुसते हाय हॅलो ठिक असते. क्वचीत एखादा जोक. life rule no. 1: Never do money transactions with friends, relatives.
|
Zakki
| |
| Monday, December 03, 2007 - 10:58 pm: |
| 
|
मला असे अनेकदा लोक भेटले आहेत, की ज्यांना बेधडक सर्व लोकांसमोर शिव्या घालाव्या! पण सभ्यता आडवी येते. उदा.: सार्वजनिक ठिकाणी कॉफी. आता, जर तुम्ही शेवटचा कप घेतला तर तुम्ही नवीन कॉफी करावी असा एक अलिखित नियम आहे. प्रथम एक दोनदा मी तो सभ्यपणे पाळला. पण नंतर एका मॅनेजरने त्याच्या हाताखालील लोकांना सांगितले की कॉफी करणे हे 'माझे' नेमून दिलेले काम आहे, तेंव्हा तुम्ही कॉफी करण्यात वेळ न घालवता मला सांगा. नि त्यानंतर एकजण आला नि माझ्यावर खेकसून म्हणाला, अरे, इतका वेळ झाला, अजून नवीन कॉफी का केली नाहीस?!! या प्रकरणाचा छडा लावायला मी त्याच्या मॅनेजरकडे गेलो, तेंव्हा तो मला म्हणतो, 'ह्या: ह्या:, मी ते गमतीत म्हंटले होते!'
|
Manuswini
| |
| Monday, December 03, 2007 - 11:28 pm: |
| 
|
माणूस, अगदी अगदी, ऑफ़ीसच्या लोकांना दूर ठेवावेच. उगाच मानसीक त्रास होतो त्यांच्याशी दोस्ती करून(हे परत तुम्ही स्वभावात कीती पक्के आहात. कीती उगाच चुगलखोरी जमु शकते वगैरे वगैरे, जर नसेल येत तर आपण बरे नी काम बरे(स्वानुभव).) मी तर म्हणेन देसी माणुस ऑफ़ीसमध्ये असेल तर नक्कीच चार हात दूर ठेवा, ते वरते माणसाने लिहिल्याप्रमाणे फलतु प्रश्ण नी dialogue like तुम्ही मोठी माणसे, हे काय ते काय. गोरे तरी एक वेळ विचार करतील तुला कीती रेट मिळतो असे प्रश्ण विचारण्याच्या आधी पण देसी एकदम डोक्याला ताप देतात.थोडासा attitude च ठेवावा. त्याच ऑफ़ीसमध्ये friend असतील तर आणखी ताप.
|
Dakshina
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:42 am: |
| 
|
मला पण असंच वाटतं की ऑफ़िसातले लोक आपल्यापासून जरा दूर असलेलेच बरे. शेवटी प्रत्येक माणसाचे काही ना काही वीक पॉईंटस असतातच. भावनेच्या भरात आपण एखाद्याला बोलून गेलो, तर आपलाच प्रॉब्लेम व्हायचा. आणि काही लोकांना अशी आग लावण्यात मोठा आनंद मिळतो. आणि ते खास या कामासाठीच तुमच्याशी मैत्री करतात. wave-length वगैरे त्यांना काही matter करत नाही. याचा अर्थ सगळेच असे असतात असं नाही. काही लोक चांगले पण असतात. शक्यतो आयटी मधे दुसर्या डिपार्ट्मेंट मधल्या माणसाशी मैत्री झाली तर एकवेळ चालू शकेल. कारण ती कदाचित निर्व्याज असेल.
|
Hkumar
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:50 am: |
| 
|
चहाला जायचे झाल्यास बरोबर आपल्या विभागातला माणूस नकोच! त्याच त्या विभागीय रटाळ गप्पा. त्यापेक्षा इतर माणसे केव्हाही बरी.
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 04, 2007 - 11:07 am: |
| 
|
अगदी बरोबर चहाला जायचे झाल्यास बरोबर आपल्या विभागातला माणूस नकोच.....कारण मग बॉस किवा सहकारी खडूस असेल तर त्याच्या बद्दल च्या गप्पा कोनाबरोबर मारणार पण या गप्पा मारायला तरी एक जोडीदार हवा ना ?
|
Ajjuka
| |
| Wednesday, December 05, 2007 - 4:45 am: |
| 
|
|एखाद्या वेळेस मला नाही जमले तुमच्या बरोबर जेवायला यायला तर मी लगेच "तुम्ही काय बिझी बिझी लोक", "काम कुठे पळून जातेय" " ब्ला ब्ला "| माणसा हे मात्र अगदी पटले. आणि हे ऑफिसमधेच असं नाही कुठेही होत असते. थोडीफार ओळख झाल्यावर असे गळ्यात पडायला येणारे/ र्या बरेच असतात.
|
Ladtushar
| |
| Wednesday, December 05, 2007 - 9:46 am: |
| 
|
खरे मित्र हे कधीच अशी अपेक्ष्या ठेवत नाहीत पण अश्या अपेक्ष्या ठेवणारे बरेच असतात ! त्याना त्यांच्या मैत्रीची सीमा दाखवणे योग्य ! असे अनुभव खुप असतात पण अपलाच एखादा चांगला मित्र असले गैरसमज करून घेतो तेव्हा मात्र आपल्या हातात काहीच नसते...
|
Supermom
| |
| Wednesday, December 05, 2007 - 1:49 pm: |
| 
|
अजून एक वैताग आणणारा प्रकार म्हणजे रोज तुमच्या लंचबॉक्स चे ऑडिट करून कॉमेंट्स पास करणारे लोक. 'पोळीला तूप नको लावत जाऊस... वजन वाढेल...' (बये, माझ्या डब्यातली पोळी खाऊन तुझं तर नाही ना वाढणार? मग जेवू दे की निवांत मला...) किंवा 'बरा बाई वेळ मिळतो इतकं करायला सकाळी सकाळी..' अन त्याहूनही कहर म्हणजे.. 'तुम्हारा हसबंड आयटी मे है ना? फ़िर नौकरी की क्या जरूरत है?...'
|
Ladtushar
| |
| Thursday, December 06, 2007 - 2:35 pm: |
| 
|
>'तुम्हारा हसबंड आयटी मे है ना? फ़िर नौकरी की क्या जरूरत है?...' सूपर मॉम , अगदी बरोबर हे असले लोक निवांत कुणालाच जगू देत नाहीत... 'आत्ता काय ओन् साइट ला असता मग तुम्हाला काय कमी ' हे पण अश्याच लोकांचे वाक्य ! 'रात्र भर काम करून दमला अशिल ना रे किवा खूप कष्ट करता ना रे तुम्ही आलायस तर दोन घास खाऊन जा' कोण तरी असे बोलणारे भेटले की बरे वाटते ...
|
Dakshina
| |
| Monday, December 10, 2007 - 7:27 am: |
| 
|
आम्हाला पण येता जाता लोक बोलत असतात.. admin म्हणजे नक्की करता काय? की नुसताच पगार घेता...
|
Ladtushar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 12:28 pm: |
| 
|
खरे मन्हातात ना की पुरुषाला पगार अणि बायकांना वय विचारू नये, पण हे सर्व संसकार कोण पाळते ? दुसरयाची अमुक एक गोष्ट मनाला खुपली की अश्या बोच्र्या कमेंट्स पास करतात हे लोक !
|
Dakshina
| |
| Monday, January 14, 2008 - 6:12 am: |
| 
|
खरंतर अशाच काय? बर्याच गोष्टींचे संस्कार लोक पाळत नाहीत. भल्या भल्या सिनियर लोकांनी पण आपली पातळी सोडलेली मी पाहीलेली आहे. मला पण एकाचा अनुभव आला होता, उगिचच स्वतःच्या केबिनमध्ये बोलवणे, कॉफ़ी ऑफ़र करणे, विनाकरण पर्सनल गोष्टींबद्दल विचारणा करणे, उदा. लग्नं नाही करणार? कसला नवरा हवा? "बाकी काय काय आवडतं?" असा सूचक प्रश्नं ही क्वचित विचारला जातो. परदेशी गेलं की मुद्दम चॉकलेटचा बॉक्स आणणे, तो देण्याच्या बहण्याने लंच ला येतेस का विचारणे.... एक ना अनेक. शिवाय काही इर्रिटेटींग गोष्टी म्हणजे, आपण कुणाला काही विचारायला गेलं की... लगेच तोंड वाकडं करून म्हणणार... 'मुझे बहूत काम है, यार... थोडी देर बाद आओ ना...' जणू काही अम्ही बिन कामचे बसलेले असतो...
|
Dakshina
| |
| Monday, January 14, 2008 - 6:27 am: |
| 
|
बोचर्या कॉमेंटस बरोबर ऑफ़िसातल्या किश्श्यांबद्दल लिहायला, एक वेगळा बी.बी. च उघडावा लागेल. परवा एक मुलगी आली माझ्याकडे, संध्याकाळी (नेहमीप्रमाणे संध्याकाळचे स्नॅक्स घेऊन येणारा कॅटरर गेल्यावर जागी झालेली) भूक लागली. एकतर मी इतकी कामत बुडालेली... ही माझ्यामागे, म्हणे मी वरच्या ऑफ़िसच्या कँटीन मधून घेतलं तर मला ओरडतील का? मग तुझा ओळखीचं तिथे कूणी आहे का? मला तिथली परचेस मधली एक मुलगी माहीत होती, तिचा नं हिला दिला, आणि सांगितलं की परवानगी घे, ती काही नाही म्हणायची नाही. ह्या पठ्ठीने माझ्याच डेस्कवरून फोन केला आणि, चक्क तिला ऑर्डर केली, सँडविच आणि काय तरी ज्यूस खाली पाठव म्हणून.. मला आश्चर्य आअणि राग दोन्ही आवरता आलं नाही. मी फोन काढून घेतला आणि तिला म्हणलं की मी तुला परवानगी घ्यायला नं दिलाय. ऑर्डर द्यायला नाही. तर माझ्यावरंच जाम भडकली आणि दाणदाण पाय आपटत निघून गेली. माझा मूड गेला तो वेगळा, शिवाय मला माझं काम सोडून आधी त्या वरच्या मुलीला फोन करून माफ़ी मागवी लागली... तिने माझ्याबद्दल काय विचार केला असेल कोणजाणे, कारण मी तिचा मोबाईल नं दिला होता... ऑफ़िसचं असं ऑफ़िशिअल काम सोडून सुद्धा, लोकांची खूप उपसाभर करावी लागते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|