Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 13, 2008

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » चटपटीत गॉसिप » Archive through January 13, 2008 « Previous Next »

Mahaguru
Friday, December 28, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karma/ India, 1964 directed by Abhay Chopra

Dineshvs
Friday, December 28, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़िजा, बहुतेक. खलीदने घेतलेल्या मुलाखतीतच त्याने सांगितले होते.

Ashusachin
Friday, December 28, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nandini tu Ranbir Kapoor baddal aamhala kay wicharte aahes? Tuch tar aamhala
sangnar uttare. Ranbir che Ajoba , wadil, Kaka he sagle adya purush hote. Tyanchya kartutatvachi nishane aaj anek warshe zali tari lokanchya athvanit aahet. Tu tya war kahitari lihi. Yachya Ajoban war tar ek weglach BB ughdava lagel. Aajhi cities madhe lok "Mandakini" he nav thevnyachya aadhi vichar karat aastil. Dimple aani Rishi yanche kahi hote ka? Mhanje aasnarch pan pudhe kay zale? Shammi ha "karun karun bhagle aani devpuje la lagle" aasa watto. Krishna Raj Kapoor la manle pahije. Bai madhe guts aahet. Ekhadi aasti tar wedi zali aasti. Jag circle madhe aaste te mhantat te barobar aahe, RK ne je kele tech Karishma/Kareena barobar zale aasave mhanje tyanna sharir pradarshan karave lagle. Mala Madhur che cineme awadtat. Page 3 best hota.Modelling madhe halli muli sodun mulananch ghabrave lagte:-)


Ashusachin
Friday, December 28, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dev Anand ha manus yevdhya sundar movies madhe kame karun geli kahi warshe
atyant achrat aase cineme ka kadhto aahe? Aani cinema madhe mich kayam center la pahije aasa yacha agraha ka? Ya mansache "Awwal Number", "Censor" aani "Prime Minister" aani "Love at Times Square" he cineme vinodi chitrapat
mhanun collection madhe thewayla pahijet. Ekach cinemat ha manus Cricket Team cha selector aani tyach weles atirekyanna pakadnara offcer kasa asu shakto? Yala "mhatarchal" lagla aahe ka?


Ashusachin
Friday, December 28, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राखी सावंत बद्दल मला पण प्रश्ण पडतो. एक गोष्ट कितीही कटू असली तरी सत्य आहे. तुमच्या कुवतीप्रमाणेच तुम्हाला काम आणि पैसा मिळणार.कुणी काही समाजसेवा म्हणून कुठलं काम करत नाही. पैसा आणि स्वानंद (job satisfaction) या दोन गोष्टीच प्रत्येक जण बघतो. मग उगीच रडण्यात काय अर्थ आहे?
तुम्ही ज्याला तुमची सेवा देता त्या client base ला तुमची सेवा किती गरजेची वाटते आणि तुमच्याकडूनच ते करून घेण्यासाठी ते जस्तीत जास्त किती पैसा खर्च करू शकतात त्यावर तुमचं मूल्य अवलंबून आहे. After all it all depends on how you sell yourself!


Aaishappath
Friday, December 28, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aajkal sansanati kahitari ghadala tarach publicity ani paise. Media is the king and the queen. People want it that way. It is LOKASHAHI.

The ongoing fiasco series of Rakhi Sawant has once again raised issues about the screen image of a celebrity influencing people’s perspectives.

Talking about Rakhi I’m not surprised this happened to her. The way you project yourself in front of people definitely says a lot about you. She has always been very hyperactive and aggressive with her image. But here, no one is sure of who is at fault. A situation like this would never arise in front of a much more sophisticated woman. In Rakhi’s case, she was definitely asking for trouble.There really is no difference between illusion and reality. But on the other hand Rakhi has guts to say and do things which are beyond normal persons behaviorial pattern. I admire Rakhi's guts.Rakhi's story seems to me like One woman fending for her ambitious family.She definitely doesn't need anybody's pity. She's got her priorities and fundas in life sorted out quite well.Rakhi also seems frank and clear in what she wants to do in the industry, I wish her all the best in her career.She is here to do item numbers and make money .. not be some great actress. She admits this which is refreshingly different from all our Miss India Worlds and Universes who want to be Mother Teresa one minute and are seen in a bikini and a violin after 2 years. Nothing wrong with that...but still. The bit about her father not liking what she does is ..well..don't know what to say. What is it with some men..they look at women till their eyes pop out and protest when a woman of the house is looked at?

All can say is Wish Her Best Of Luck..

In India, media is a very powerful medium, especially the Satellite Television Channels. It is one of the most important factors that play a significant role in shaping public opinions, beliefs and conveying correct information and knowledge with a huge responsibility on its shoulders. It has far reaching affects on societies, businesses, and governments.

Tanyabedekar
Saturday, December 29, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ, आशुसचिन लोकांनो मराठीत लिहा की.. आणि ह्या पोस्ट्स एव्हड्या बोल्ड फॉन्ट मध्ये का लिहिता..

Zakki
Saturday, December 29, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तान्याबेडेकर, राहू द्या हो.

जे लोक सुरुवातीपासून मायबोली चे सदस्य आहेत, जे मायबोलीच्या निर्मात्यांना नि चालकांना भेटले आहेत, फक्त त्यांनाच हे माहित आहे की मायबोली हे फक्त मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा या उद्देशाने चालू केलेले आहे. म्हणून लोकांनी एक पैसाहि न घेता मराठीत लिहायची सुविधा निर्माण केली. बरेच लोक मुद्दामहून शिकले मराठीत लिहायला.

पण काही लोकांना नसते त्याची किंमत. त्यांना त्यांचे विचार एव्हढे महत्वाचे वाटतात की मायबोली मराठी साठी आहे, स्वत:चा शहाणपणा दाखवण्यासाठी नाही, हे ते विसरतात. शिवाय बर्‍याच जणांची मेंदूची कुवतच थोडी असते. फक्त एकच भाषा जमते त्यांना. दोन दोन भाषा कशा येणार?

इथे मराठी विश्व च्या सिनेमाच्या कार्यक्रमाला सगळे लोक मराठीतून बोलत होते, पण भारतातून आलेल्या मुली मात्र आवर्जून इंग्रजीत बोलत होत्या. अपवाद वंदना गुप्ते. सलग पंधरा मिनिटे अस्खलित मराठीत त्यांनी भाषण केले!


Nandini2911
Sunday, December 30, 2007 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु सचिन, कृपया मराठीतुन लिहा, :-) बरोब्बर,, फ़िझा आरकेला ऑफ़र झाला होता.
कर्मा आरकेचा आणि अभयचा एकत्र कॉलेज प्रोजेक्ट होता, स्टुडंट ऑस्करपर्यंत पिक्चर पोचला होता. अभयमधे जबरदस्त पोटेन्शिअल आहे. he will be a good director .

आणी आशुसचिन मी स्वत्: राज कपूरची फ़ॅन आहे. तुम्ही आग आवारा आणी जगते रहो पाहिलाय का?
नक्की पहा...
मंदाकिनीचं खरं नाव यास्मिन आहे बरं का.,,,











Zakki
Sunday, December 30, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा वा. मला तसे सिनेमातले काऽहीहि कळत नाही. एकदाची गोष्ट काय ती समजली की झाले. आजकाल तेहि कळायला त्रास पडतो.

पण आवारा अनाडी या सिनेमातली गाणी ऐकण्यासाठी मी मित्रांबरोबर हे सिनेमे कितीकदा पाहिले.

परवा धिंगाणा (
www.dhingana.com ) वर जुनी हिंदी गाणी ऐकताना बरसात की रातची गाणी ऐकली. बहुधा ९० टक्के उर्दूत होती. अजिबात अर्थ कळला नाही, पण गाणी ऐकायला फार बरे वाटले. पण म्हणून मी ती गाणी इथे लिहीणार नाही, कारण ही जागा मराठीची आहे. तसे इंग्रजीत विनोद, चांगले लेखन असते, पण त्यासाठी इथे यायची गरज नाही.

वास्तविक, वंदना गुप्ते सुद्धा सिनेमा नाटक या विषयांवरच बोलल्या, पण त्यांना इंग्रजी भाषेतले शब्द वापरायची गरज पडली नाही. त्यांनी भान राखले की आपण अमेरिकेत असलो तरी मराठी विश्व संस्थेत बोलतो आहोत. माझे तेव्हढेच म्हणणे आहे की इथे मराठी बोला, मराठी भाषेतील नाटक, चित्रपटांबद्दल बोला. हिंदी, इंग्रजीसाठी शेकड्यानी इतर जागा असतील.

Dineshvs
Monday, December 31, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि, लाख बोललात.
कालच्या नाटकात, एक वाक्य होते.
मराठीला प्रॉब्लेम आहे तो मराठीचाच.

तूम्ही वंदना गुप्ते, मागे लोकप्रभा मधे लिहित असलेली मालिका वाचली होती का ? छान जमले होते, पण ते मग त्यानी अर्धवट सोडले.


Jo_s
Monday, December 31, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी श्री ४२० विसरलीसकी काय. बुट पॉलीशही त्यांचाच.

मंडळी, मराठीतला त्याच तोडिचा "जगाच्या पाठिवर" अवश्य पहा.


Runi
Thursday, January 03, 2008 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दिनेशदा, वंदना गुप्ते खुपच मस्त लिहायच्या लोकप्रभामध्ये त्यांच्या बालपणाविषयी, मला वाटते १०-१२ वर्षापुर्वी लिहायच्या ना त्या. त्यांनी बोक्या सातबंडेच्या आईचे केलेले कामपण एकदम सही होते.


Nandini2911
Tuesday, January 08, 2008 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा किस्सा तसा फ़ार जुना आहे. जवळ जवळ तीन वर्षापूर्वी आशुतोशने नवीन ऐतिहासिक फ़िल्मची घोषणा केली होती. स्टार कास्ट जबरदस्त होती. ह्रितिक आणि ऍश... त्यावेळेला धूम २ आलेला नव्हता. त्यामुळे अर्थात मीडीयामधे जाम कुतुहल होतं. आणी मला तर आशुचा exclusive quote मिळाल्याने मी जास्त खुश होते. ऑफ़िसमधे आल्या आल्या मी माझ्याकडे काय खास बातमी आहे हे सांगून टाकलं. बाकीचे कलीग्ज अर्थात लकी आहेस वगैरे म्हणायला लागले. बायलाईन शुअर होतीच. तीही फ़्रंटपेज.
मग चर्चा सुरू झाली. कसा असेल पिक्चर ह्रितिक कसा दिसेल. ऍश कशी वाटेल इत्यादि इत्यादि. तितक्यात माझा एक मित्र आला आणि त्याने मला जोरात पाठीत फ़टका मारला. "काय झालं?: मी कळवळून विचारलं.
"काहीही अश्लील बोलताना लाज वाटत नाही वाटत का?"

त्याने काय ऐकले असेल हे ऑफ़िसमधे फ़ार कमी लोकाना समजले.. :-)


Arc
Wednesday, January 09, 2008 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उस फ़िल्म का नाम जोधा-अकबर तो नही?

Nandini2911
Saturday, January 12, 2008 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्रितिक रोशनची बायको सुझान खान सध्या गरोदर आहे, त्याचा पहिला मुलगा दोन वर्षाचा आहे, (त्याचं नाव रेहान आहे, :-))
ऍशचा पिंक पॅंथर लवकरच रीलीज होतोय, त्यामधे तिचं काम खूपच जबरदस्त असल्याची चर्चा आहे, ऍशचा पी आर आधी पासुनच चांगला असल्याने तिच्या सर्व चर्चा या "जबरदस्त" असतात. त्यातून निष्पन्न काहि होत नाही. :-)

स्टार गोल्ड मधे रणबीरला बेस्ट न्युकमर मिळाल्यावर त्याने बिनधास्तपणे सांगितलं की मी आता "टावलिया" नावाचा पिक्चर करतोय. बिचारा तेच तेच जोक्स ऐकून वैतागलाय. दिपिकाला त्यमधे बेस्ट न्युकमर मिळाले.

ऍवॉर्डवाले आधी अमिताभ रेखा, संजय माधुरी, ऍश सलमान दाखवायचे, यावर्षीपासून करीना शाहिद सैफ़, रणबीर दिपिका सोनम दाखवतील. :-)

२००७ मधे सुद्धा मिमोह, सिकंदर खेर हरमन बवेजा याचं पदार्पण झालं नाही. हे लोक कोण आहेत हा प्रस्न जर पडला असेल तर २००४ पासुनचे promising newcomers म्हणून जे लोकाची नावं छापून येताहेत ती वाचा. सिकंदर खेर (याला लोक बर्‍याचदा अनुपम खेर्चा मुलगा म्हणतात, तो किरण खेर आणि तिच्या पहिल्या नवर्‍याचा आहे. :-))
तर बर्‍याचदा लफ़ड्यासाठीच प्रसिद्ध आहे, त्याची गर्लफ़्रेंड गुल पनाग फ़िल्म्स मधे येऊन जुनी पण झाली. अजून याचे पिक्चर चालूच होत नाही आहेत. :-)


Tulip
Sunday, January 13, 2008 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरमन बावेजा म्हणजे प्रियान्का चोप्राचा बॉयफ़्रेन्ड. ती पण आता जुनी (फ़िल्म मधे येऊन) झाली आणि हा अजून debut entry देतोय. बॉयफ़्रेन्ड ऐसें पिछे क्यूं लटकते रहते हैं

Savyasachi
Sunday, January 13, 2008 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉयफ्रेंडचा किती 'पाठिंबा' आहे म्हणजे ! :-)

Savyasachi
Sunday, January 13, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा कुठेतरी दिपिका आणि युवराजचे लवकरच साखरपुडा की लग्न होणार अशी तिच्या नातेवाईकांनी दिलेली बातमी वाचली.

Tulip
Sunday, January 13, 2008 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माही आणि रणबीर दोन बेस्टमेन का लग्नात दीपिका की तरफ़से? आणि युवीच्या करवल्यांची तर लॉन्ग लिस्ट. सहीये. ह्याला म्हणतात इन्टरेस्टींग आणि कलरफ़ुल रिश्ते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators