|
Sas
| |
| Thursday, December 27, 2007 - 10:54 pm: |
| 
|
मला USA, Work Permit मीळुन ३ महिने झाले पण अजुन नोकरी मिळत नाही, अनेक ठिकाणी Apply करुन झाल पण एकही Response नाही. वेगवेगळ्या Placement Agencies, Websites सारे try करतेय पण यश नाही. MBA ची Degree, Work Experience असुनही साधा Interview सुध्दा मिळत नाही . USA चा १ वर्षाचा Voluntary Work Experience सुध्दा आहे, but no use. Work Permit मिळण्यासठी बराच खर्च केलाय, पण आता खुप निराशा होत आहे.
|
Zakki
| |
| Friday, December 28, 2007 - 1:34 pm: |
| 
|
तुम्ही कुठल्या राज्यात रहाता? कुठल्या गावात? तिथे Unemployment Office मधे जाऊन चौकशी करा. निदान आमच्या न्यू जर्सीत तरी एक Professional Services Group म्हणून सवर्स्वी volunteer संस्था आहे तिथे सर्व professional पण नोकरी नसलेले लोक येतात. त्यांच्या तर्फे नोकरी मिळणे सोपे असते असा माझा अनुभव आहे. एकदा विचारून बघा.
|
Sas
| |
| Friday, December 28, 2007 - 7:46 pm: |
| 
|
Thanks Zakki Ji मी Fremont CA USA त रहाते (in Bay Area, Silicon Valley), मी जवळच्या Career Center मध्ये जावुन आले, Membership Card घेतल, तिथल्या लोकांनी Websites सुचविल्या व Websites वर job शोधण्यास सांगीतल. www.google.com वर मी Unemployment Office in Fremont शोधल पण काही महिती मीळाली नाही.
|
Simm
| |
| Thursday, January 03, 2008 - 12:58 am: |
| 
|
Kai he Sas--tujhya profile madhley tujhech favorite quotes ani tujhya posting madhley 'nairaashya' phaarach conflicting ahet--keep trying--all the best!
|
Uno
| |
| Thursday, January 03, 2008 - 9:49 pm: |
| 
|
Sas, me pan Bay areatch rahate. Me finance field medhe job shodhate aahe, no luck yet.
|
Sas
| |
| Thursday, January 03, 2008 - 11:44 pm: |
| 
|
Profile मध्ये लिहीलय तसे माझे प्रयत्न ही सुरु आहेत पण एका मर्यादे नंतर निराशा येते असा अनुभव येतोय. तस आत्ता पर्यंत मी जे काही मिळवलय ते प्रयत्न करुनच, मला ईतरांना सहज मिळणार्या गोष्टी ही कधिच सहजपणे मिळालेल्या नाहीत. So I know I hv to try too hard for getting job n I m trying too. ३ वर्षांपासुन माझ्या Work Permit साठी धडपड सुरु होती, आता मिळाल Work Permit तर job नाही. ३ महिने झाले, रोज एक नवी अशा घेवुन दिवस सुरु करते, job शोधते. काल एक interview दिला तर job काय Mon to Fri, Morning 7 to 8 Am, $10/hr, फ्क्त एक तासाचा job तोही घरापसुन ३० mile वर जिथे बस वै. public transportation नाही. 'हो' म्हणाव वाटल पण जाणार कस? आणी एकदा Job सुरु केला की May 2008 पर्यंत तरी कारावा लागणार, नुसत job experience मिळेल म्हणुन 'हो' म्हणण्याचा विचार होत होता, पण पटत नव्हता.अत्ताच 'Thank you for Opportunity but Sorry' मेल केली. सकाळ पासुन Net Browsing करतेय पण!!! ईथल्या दुकाणांही जावुन आले मागच्या महिन्यात, Target, Bed Bath n Beyond... पण त्यांना evening shift साठी माणस हवी आहेत. $6-$8/hr चा job तो ही cash counter वर उभ रहाण्याचा वा कपड्यांच्या घड्या, आवरा-आवर करण्याचा, तो करायची हरकत नाही पण, evening shift, 5 Pm to 9 Pm?? नवरा घरी येईल आणी आपण बाहेर (कुठलही काम हलक नसल तरी असल्या कामाचा दर्जा काही इतका Respective नाही की Evening Shift करा).....शिवाय Applications मध्ये मी MBA लिहिल, इथे Accounting Course केलाय तेही लिहिल, दुकानातले Manager Education पाहुन चकीत कारण, असल्या ठिकाणी काम करणारे manager ही कदाचितच Degree Holder असावेत, शिक्षणाने चांगली नोकरी मिळते अस सारे मानतात, मला चांगली काय पण लहानशी नोकरी ही मिळत नाही आहे. प्रयत्नांची परकाष्ठा झाल्यावर काय कराव???... स्व:ताच्या मनातली आशा मनालाच आता खोटी वाटते. 
|
Sas
| |
| Friday, January 04, 2008 - 12:06 am: |
| 
|
कमी शिकलेले, English ही निट बोलता न येणारे, Work Permit असलेले व नसलेले सुद्धा, पण नोकरी असलेले लोक आजुबाजुला कितितरी आहेत. मन रडत शीक्षण, Caliber असुन सुद्धा काही करता येत नाही, it is really too much frustrating. एका ओळखिच्या बाई जिथे job ला जातात काल तिथे apply केल, त्या बाई सारख्या म्हणत आहेत "हा job तुझ्या साठी नाही, तुझ्या कडे शीक्षण आहे, English चांगल आहे, तुला चांगला job मिळेल, ह्या job मध्ये नको पडु" Another color of life... A.P, India तली एक बाई तिला English , HIndi धड बोलता येत नाही, समजत नाही, तिच्या कडे Work Permit नाही पण ती USA त आल्यापसुन Job करतेय, (from last 2-3 years), and she is earnig about $1000 to $1500/month असे कितितरी लोक आहेत इथे. तुलना नाही करत आहे मी पण....घरात बसण आणी रोजच दिवस कसा आणी कधी संपेल म्हणत, किति वाजले बघत रहाण is now very difficult n fact is Job is my need, I dont want it just to pass time.
|
Sms
| |
| Friday, January 04, 2008 - 12:45 am: |
| 
|
SAS : Resume and cover letter makes a lot of difference. Try making resume from resume making tips on google or any professional. Indian startup IT firms madhe accounting cha job sathi problem yevu naye.Try in Indian startups.One of my friends is doing that. Dice, monster try kele aselach. Try calling them and follow up with them.Maybe your desperation is making you feel miserable.Have patience.A right apportunity will definately come your way.Best Luck!
|
Grihini
| |
| Friday, January 04, 2008 - 3:35 am: |
| 
|
सास तु तर एमबिए झालियेस. मी एमकॉम झालिये. बारा वर्षापुर्वी. प्रायवेट कम्पनी मधे पर्चेस डीपार्टमेन्ट मधे होते. नन्तर एल आय सी मधे होते. मुलीचि अबाळ होत होती म्हणुन नौकरी सोडली ती आतापर्यन्त. मी एच ४ वर आहे. आता मुली मोठ्या झाल्यात पन नव्याने काहितरि शिकावे लागेल. कुकिन्ग मधे इन्टरेस्ट आहे पन त्याचा काहि उपयोग नाही अर्थाजनासाठी. थोडे शिवण येते. थोडे गाणे येते. थोडे नाही बरेच बोलता येते. असे सगळे अर्धवट येते. मलाही मायबोलिकरान्चा सल्ला हवाच होता. छोटी मुलगी पुढच्या सप्टेम्बरात १ ग्रेड मधे जाइल. काहितरी करायचे आहे पन मार्ग सुचत नाहि. कुकिन्ग शिकवायला मला आवडेल पण ईथे कसे शक्य होइल. वर्क पर्मीट यायला अजुन बराच अवकाश आहे. काय करावे. माझ्यासारख्या परिस्थिती मधे असणार्या मायबोलिकरीणि काय करतायत. अर्थातच मायबोलिवर येण्या व्यतिरिक्त.
|
Maanus
| |
| Friday, January 04, 2008 - 3:53 am: |
| 
|
तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचा जॉब शोधताय? IT / Non-IT? now what i am going to say will sound unethical, but thats how job market works कोणताही जॉब शोधत असला तरी गेल्या तीन वर्षाचा फेक expriance टाकावा लागेल. to cover that gap in which you were not working आणि हा exp US चाच हवा. pickup any company from central america. as long as you are going to work as contingent employee (contractor), no one is going to call those central america companies to confirm if you were really working there.
|
Ajjuka
| |
| Friday, January 04, 2008 - 5:21 am: |
| 
|
तस आत्ता पर्यंत मी जे काही मिळवलय ते प्रयत्न करुनच, मला ईतरांना सहज मिळणार्या गोष्टी ही कधिच सहजपणे मिळालेल्या नाहीत. So I know I hv to try too hard for getting job n I m trying too. बाकी मला माहित नाही. पण हे वाक्य काही पटलं नाही. दिसताना अनेकदा काही गोष्टी सोप्प्या दिसल्या तरी त्यांना त्या तश्या मिळालेल्या नसतात. किंवा मिळाल्या तरी त्याची किंमत चुकवण्याची प्रक्रिया नंतर चालू होते. तुमच्या समस्येबद्दल संपूर्ण सहानुभूती आहे पण दुसर्यांना कसं सगळं सोप्पय आणि मलाच कसं सगळं खडतर आहे अश्या tracks वर विचार करणे योग्यही नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला होणार आहे.
|
Supermom
| |
| Friday, January 04, 2008 - 1:38 pm: |
| 
|
अज्जुकाचं म्हणणं एकदम पटलं मला. सास, लोकांना सगळ्या गोष्टी सहज मिळतात हा attitude आयुष्यात कधीही ठेवू नकोस. त्यानं फ़क्त त्रास आणि त्रासच होतो. रागावू नकोस प्लीज. पण लोकांच्या आयुष्यात काय घडत असतं हे बाहेरून पाहून कधीच कळत नाही. शिवाय आपला पेला अर्धा रिकामा आहे असं वाटलं की माणूस त्याच दिशेनं विचार करतो. मला तुझी पोस्ट वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. गैरसमज करून घेऊ नकोस. मी जरी नोकरी करत नसले तरी माझ्या अनेक मैत्रिणी, नवर्याचा प्रचंड मोठा मित्रसंग्रह या सर्वांच्या अनुभवातून कळलेल्या गोष्टी इथे लिहितेय. पहिली गोष्ट तू बस वगैरे transportation नाही असं लिहिलंयस. तुला गाडी येत नसेल तर ड्रायव्हिंग शिकणं अत्यंत जरुरी आहे.(अर्थात तुला येत असेल तर हे तुला लागू नाही) ही चूक मी केलेली आहे म्हणून सांगतेय. दुसरं म्हणजे नुसतं चांगलं इंग्लिश बोलणं नाही तर या लोकांना समजेल अशा accent मधे बोलणं फ़ार गरजेचं आहे. आपण भारतात अगदी सतत english medium मधे शिकलो असलो तरी इथलं इंग्लिश वेगळं पडतं. तेव्हा त्यावरही मेहनत घे. अन तुला नोकरी लवकर मिळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
|
Grihini
| |
| Friday, January 04, 2008 - 3:01 pm: |
| 
|
सास मझ्याकडूनही तुला ऑल दी बेस्ट. ग़ेले महिने मागच्या वर्षातले होते आता नविन वर्षात प्रयत्न कर तुला नक्कि यश मिळेल बघ.
|
Grihini
| |
| Friday, January 04, 2008 - 3:03 pm: |
| 
|
तुझ्या प्रोफ़ाइल मधले फ़ेवरेट कोट परत वाच.
|
Maitreyee
| |
| Friday, January 04, 2008 - 3:09 pm: |
| 
|
सास, माझे मत : आधी ठरवावे की आपल्याला कसल्या प्रकारचा जॉब आवडेल.आणि त्या फ़िल्ड बद्दल नीट रिसर्च करून, थोडे फ़ार लोकांचे feedbacks, internet search असे करून focussed efforts करावे.तसे केले नाही तर confusion , frustration वाढण्याचीच शक्यता जास्त. बाकी assuming that u have no US experience , मी काही सुचवेन ते म्हणजे बे एरियामधे भरपूर देशी कन्सल्टिन्ग कंपन्या आहेत. तिथे प्रयत्न करून पहा. चांगले english, graduation एवढ्या बेसिस वर तिथे बर्याच प्रकारचे जॉब्ज तिथे मिळू शकतात, जसे HR, admin, Marketing, sales, accounts, recruiting . अजून इतर प्रकार म्हणजे बॅंक टेलर, daycare /preschool teacher हे थोडे फ़ार training नन्तर मिळू शकतील असे जॉब्स. तसे थोडे ट्रेनिन्ग घेऊन जॉब शोधायचा तर Health care, pharmasy courses ,रियल्टर, ब्यूटी नेल्स स्पेशालिस्त, असे बरेच काही ऑप्शन्स आहेत. काय करायचे ते तुमच्या आवडीवर अवलंबून आहे. जॉब कोणताही असो, Driving,Good communication skills हे मात्र MUST आहे.
|
Upas
| |
| Friday, January 04, 2008 - 4:09 pm: |
| 
|
SAS, MBA केलयस म्हणतेयस.. What ur MBA class is doing now? Didn't u get chance to build up the professional network while in MBA.. it is key part of MBA.. try approaching more n more professionals of your field.. वरती सगळ्यांनी समजवलय तसं तुला काय करायचय आणि मुख्य म्हणजे काय करायचं नाही ते नक्की ठरव. अगदीच गरज वाटली तर professional career coach चा guidance घे! At each stage, postivie रहायचा प्रयत्न कर.. शुभं भवतु!
|
Amayach
| |
| Friday, January 04, 2008 - 5:02 pm: |
| 
|
सास, तुझ्य इथे एखादे कमुनिटी कॉलेज असेल तर तिथे एम्प्लॉय्मेंट ऑफ़िस देखिल असते. तिथे जाऊन विचार. त्याच्या त्तर्फ़े गेलिस तर लवकर चान्स मिळतो. कदाचित तुला कॉलेजमधे एकादा कोर्स घ्यावा लागेल. मला अस वाटत की प्रत्येका कॉलेज चे या बाबतचे नियम वेगवेगळे असतात.पण एवढे मात्र नक्की कि तुला काहितरी डिरेक्शन मिळेल.
|
तुझ्या मनात बहुतेक खुप सहज नोकरी मिळेल असे काही होते का? ख़ुप लोक इकदे येताना असे ठर्वुन येतात की सग्ले खुप सहज होइल.
|
Zakki
| |
| Saturday, January 05, 2008 - 12:26 am: |
| 
|
फेक expriance टाकावा लागेल. to cover that gap in which you were not working मनापासून सांगतो, असे करू नका! अर्थात् तुम्हाला अमेरिकेतून दोन तीन वर्षात पळून जायचे असेल तर कदाचित् चालेल. तरी सापडण्याची शक्यता आहे, नि मग तुम्ही त्या कंपनीचे नाव बायो डेटा मधे लिहीले तर ते आवर्जून लिहीतील की तुम्ही खोटेपणा केलात!! पण भारतीयांच्या कंपनीत, विशेषत: ओळखीने, नोकरी लागणे शक्य आहे. सध्या मी लोकांना नोकरी कशी मिळवायची हे शिकवतो. त्या संबंधी जी आकडेवारी न्यूजर्सी राज्याने गोळा केली त्याप्रमाणे ३८ टक्के नोकर्या networking अने मिळतात, नि internet, job fair इ. मधून जेमतेम १ ते २ टक्के नोकर्या मिळतात. तेंव्हा networking कसे करावे याची पुस्तके वाचा, किंवा मला इ-मेल पाठवा, मी थोडक्यात सारांश देईन.
|
Manuswini
| |
| Saturday, January 05, 2008 - 1:04 am: |
| 
|
एक गोष्ट मी मनापासून सांगतेय, वरती सगळ्यानी लिहिले आहेच नवीन काहि नाही. ignore other people and how tall their achievment when you are climbing that tall rock. you will fall on the ground. हे वरचे वाक्य मी कुठेतरी वाचले होते. खुपच उध्बोदक आहे.(हा शब्द कसा मराठीत लिहु??). असो, बाकींच्यांनी आणखी idea दील्याच आहेत पण fake exp सहसा टाकु नकोस. माझी एक मैत्रीण SAP चा fake exp टाकून join झाली मोठ्या कंपनीत मग दिवस रात्र tensed up . २ आठवड्यात got fired . आणखी moral down होतात. इथे performance बघितला जातो. समजा तुझ्या qualification वर तुला जी नोकरी मिळेल तिथे अपेक्षा ज्यास्त असतीलच नी ते काम नाही जमले तर आणखी frustration नी त्रास. मला माहीतीय बरेच जणे असे करतात पण ते असे आहे 'गाजराची पुंगी वाजली तर वाजते नाहीतर crude बंबय्या भाषेत 'वाट लागते / फाटते'. सहसा तेलगू भाई लोक असे करतात नी त्यांची भाई लोक त्यांना मदत करतात त्याच कंपनीत भेटले तर. आपल्याला नोकरीच्या ठीकाणी 'हरीच लाल' क्वचीत भेटतो.(मला तरी भेटला नाही अजून. स्वतची भाकर मीच हात भाजून खायला,बनवायला शिकली. पण fake exp टाकून नाही). 'जेणु काम तेनु ठाय और करे सो थेंगा पाय'. lastly, please ignore this post if it is harsh or not acceptable to you. I was not intending to be harsh or anything but being practical based on my own experiences. goodluck! आणखी एक, उगीच कोणी तेलगू असे करतात लिहिले, त्यांना का वाईट म्हटले असला फालतु वाद नका सुरु करा. जे खरोखर पाहीले आहे ते लिहिले specially in IT industry .
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|