|
Manya2804
| |
| Saturday, December 15, 2007 - 7:39 am: |
| 
|
भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे : रोखले नयनात आसूं, मी शब्द ओठी रोखले बघितले नाही तिला मी, नजरेस माझ्या रोखले सांगूच का या संयमाला मी असा का सोसला? होती अम्हा जाणीव आम्हा इन्कार नसता सोसला
|
Preetib
| |
| Saturday, December 15, 2007 - 3:14 pm: |
| 
|
Manu tu ekdam perfect lihila aahes. Still I would like to add some points: 1. If somebody is saying NO to someone, try to explain it in a correct way. Means kahipan ugach karana deu naye. 2. Any problem in world can be solved with discussion and proper communication. Just pour all thoughts and points in front of each other and then try to see the situation in different way. Every such situation is nothing but learning point in life.
|
Aashu29
| |
| Saturday, December 15, 2007 - 8:58 pm: |
| 
|
मी तर किती नकार पचवले आहेत यांची गणतिच नाहि, नोकरिच्या शोधातले ते पहिले ६ महिने!! क्लेशकारक आठवणी!
|
Tiu
| |
| Saturday, December 15, 2007 - 10:55 pm: |
| 
|
मी तर किती नकार पचवले आहेत यांची गणतिच नाहि, >> ते नकार वेगळे, हे वेगळे! :-)
|
त्रिश असे अनुभव येततच. माला पण असा अनुभव अलाय. पण मी एवढं चांगल लिहु शकलो नसतो. क्शणिक आणि उदय च म्हणणं पण बरोबर आहे. नकाराला पण आदर देता यायला हवा. नकार द्यायला पण काहि कारणं आणि परिस्थिती असते. अर्थात ती प्रत्येक मुलीच्या बाबतित वेगवेगळी असतील. आपल्या पण काहि चुका होत असतिल. पण जर मैत्री असेल तर आपणहि नकाराला सामोरे जाऊन मैत्रि निभावावि. मी पण नकार पचवलेत आणि आणि एखाद-दुसरा दिलाय पण....
|
Trish
| |
| Monday, December 17, 2007 - 10:32 am: |
| 
|
नमस्कार मंडळी, प्रथम सर्वांचे आभार, माझ्या भावना समजून घेताल्याबद्दल. (भा. पो.) मनस्विनी, प्रीति, समीर, क्षणिक, उदय तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत. मनस्विनी, 'अहंकार' हा थोड़ा फार दुखावाला जातोच, (मी एवढे करून पण कदर नाहि!) या 'अहंकार' ला पण ठीक करायचा अस्सल उपाऊ मंजे, " 'अहंकार' अणि मला ?? असा प्रश्न विचारायचा की मग तो बरोबर नाहीसा होतो " अणि खरे मंजे हे दुख ही काही वेळाने जाणवत ही नाहि, आपली मैत्रीण सुखी आहे याचे दुख खर्या मित्राला कधीही होत नाहि, पण शेवटी दुख नसले तरी खंत राहते, कसली कुणास ठाउक...
|
Dakshina
| |
| Monday, December 17, 2007 - 12:38 pm: |
| 
|
त्रिश, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे, ही खंत म्हणजे नक्की काय ते, शब्दात कुणालाच, कधीच सांगता येणार नाही. ही खंत नावाची वेदना ही ज्याने त्यानेच अनुभवायची असते. तुझ्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या, प्रत्येकाच्याच आयुष्यात असे क्षण येतात, 'होकाराचे' आणि 'नकाराचे' ही... आणि प्रत्येकजण ते आपापल्या परीने पचवत असतो. असो, तुझी लेखनशैली अतिशय छान आहे, तुला काय म्हणायचं आहे ते, थेट पोहोचतय.
|
आले कीती गेले कीती सम्पले भरारा.... विश्वाच्या एव्हढ्या मोठ्या फाफटपसार्यात आपण आपले आपल्यालाच कीती कुरवाळत बसायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे... समजुन घ्या.. तुमच्या भावनांचा आदर करुनच सांगतोय... कीतीतरी लोकांच्या मुळे आज आपण आहोत तसे बनलेलो असतो... तुमच्या आईबाबांनी जन्म दीला... काया कष्टवली त्या माउलीने. ..आजी आजोबांनी कोडकवतिक केले.. .. शेजार्अच्या कुणी कुणी तुम्हाला मदत केली... तुम्हाला जाणीव दीली. .. मित्राने प्रेम दीले... ... कीती सैनिकांनी श्रम केले... तुम्हाला आम्हाला रक्षावयाला... आणी ईकडे पहावे तर आपण देवदास बनायचे?.... हो! प्रेमभंग होउ शकतो पण त्याला आपल्या आयुष्यात कीती महत्व द्यायचे ते आपण ठरवायचे... मग लग्नाच्या नवर्यावर किंवा बायकोवर तुम्ही तेVहढेच प्रेम नाही का करणार?... जर ते असेल तर खंत का राहते? अरे हत..!! काय घेवुन बसलाय?... लक्ष लक्ष लोकांचे उपकार घेवुन आपल्या सगळ्यांचे जीवीत असते... त्यांना प्रेम द्या... दुभंगुन कशाला जाता? अभंग व्हा... विश्व स्वधर्म सुर्ये पाहो! .. अपेक्षा प्रेमात ठेवुन चालतच नाही... नहीतर ते प्रेम राहात नाही. तरीही अपेक्षा असतातच पण त्याही वर आपल्या मनाशीच संवाद साधणे महत्वाचे...
|
Anaghavn
| |
| Monday, December 24, 2007 - 5:07 am: |
| 
|
मलाही नकार मिळालाय्--खुपच वेगळ्या गोष्टीसाठी--थेट देवाकडून!!! माझ्या cancer झालेल्या आईला बरं कर म्हणून खुप प्रार्थना केली मी.पण नकार मिळाला. तक्रार नाहीच आहे माझी. कारण त्याचं काहीतरी planning असावं.पण आई ची किंमत्-- ती असेपर्यंत कळण्याची थोडी तरी समज---अक्कल द्यायला पाहीजे होती त्याने मला--तेव्हढ काही जड नव्हतं त्याला.
|
Anaghavn
| |
| Monday, December 24, 2007 - 5:12 am: |
| 
|
///दुभंगुन कशाला जाता? अभंग व्हा... //// धोंडोपंत,, सलाम तुम्हाला--आवडलं खुप्--एक प्रेरणाच मिळाली म्हणा ना! अनघा
|
क्या बात है धोंडोपंत. वाक्याची प्रिन्ट काढुन दरवाजावर लावुन ठेवावी का विचार करतोय
|
Yog
| |
| Monday, December 24, 2007 - 6:25 pm: |
| 
|
अरे वा! पन्त, बरेच दिवसानी.. जरा ते पायरेटेड cd/dvd वर उपाय सान्गा बघू त्या bb वर... तुम्ही पण पायरेटेड घेता काय..? 
|
योग वळख दाकवल्याबद्दल आभारी आहोत.. धन्यवाद अनघा, अभिजीत..
|
Meghdhara
| |
| Tuesday, December 25, 2007 - 10:38 am: |
| 
|
व्वा धोंडोपंत! काय म्हणालात. समीर.. नकाराचा आदर? मला वाटतं नकारावर आपली प्रतिक्रिया दर्षविणां आपण फारतर कन्ट्रोल करू शकतो. त्रिश अहंकार थोडाफार नाही फार दुखावला जातो. पण पंत म्हणतात त्याप्रमाणे, पुढे तर जायचेच असते. अनघा अनुभवावरुन एक गोष्ट पुन्हा पुन्हा कळली देवाकडे फक्त एकाच गोष्टीसाठी ठाम होकार मिळत नाही..आपल्या किंवा कुणाच्याही प्रिय व्यक्तीचं आयुष्य वाढवणं. आणि आईच नाही गं आपण सगळच ऍस्युम करतो. मेघा
|
तिने मला नकार दिला तेव्हां सुरुवातीला खूप दुखलं, पण आमची मैत्री इतकी छान आहे, की नकाराचं चौथं वर्षं लागलं तरी आम्ही ह्या दरम्यान दर आठवड्यात दोन्-तीनदा बोललो आहोत. मी तिला दर तीन महिन्यांनी, "रागावू नकोस पण..." च्या प्रस्तावनेने फिरूनफिरून मागणी घालतो, तीही हसून "रागवू नकोस पण..." च्या मुखड्याने नकार देते! तिला माहित आहे माझं तिच्यावर प्रेम आहे, आणि कुठेतरी एक नाजुक धागा तिलाही बांधतो. ती तिच्या बर्याच insecurities माझ्याशी शेअर करते, मीही तिला माझ्या आयुष्यातल्या मोठ्या बातम्या देतो. तिलाही पटतं, की अनोळखी नवरा पत्करण्यापेक्षा आपला हा खूप चांगला मित्रच काय वाईट आहे- तीही कुंपणावर आहे, पण आम्ही दोघांनी आमच्या वाटा वेगळ्या असल्याचं स्वीकारलंय. तरी एकमेकांना एकमेकांची इतकी सवय झालीय- थंडीत दोन puppies एकमेकांना गुरगुटून असतात, तसे आम्ही शेकडो मैलांवरून एकमेकांना गुरगुटलेलो आहोत. नकार जाणवण्यापलिकडे सवयीचा झाला असला तरी एक काळजी छळते- वाटा वेगळ्या झाल्यावर काय? एकीकडे दुसर्या झालेल्या प्रेमातही तितकाच जीव अडकतो, कारण तिथे ही मन झोकून प्रेम केलं होतं, पहिल्या प्रेमातले धडे अजून enhance करून. " Please keep both of them happy " इतकंच देवाकडे मागत असतो.
|
Itgirl
| |
| Tuesday, December 25, 2007 - 3:13 pm: |
| 
|
.. थंडीत दोन puppies एकमेकांना गुरगुटून असतात, तसे आम्ही शेकडो मैलांवरून एकमेकांना गुरगुटलेलो आहोत ....
सही.
|
Gobu
| |
| Tuesday, December 25, 2007 - 4:31 pm: |
| 
|
योगेश, काय छान लिहीलेस मित्रा! एकदम सही!! सुरेख!!!
|
Gsumit
| |
| Wednesday, December 26, 2007 - 3:22 am: |
| 
|
अनघा, cancer म्हणजे काय ते मी सुद्धा पुर्णपणे अनुभवलेय... फक्त माझ्या बाबतीत असे म्हणता येइन की देव अजुन तरी मेहेरबान आहे... माझ्या बहिणीची दोनदा successfull treatment झालिये... अजुन सुद्धा i am very insecure about whether she is completely out of it or not... घरि साहजिकच बोलु शकत नाही, सगळे सारे काही चांगले आहे असे दाखवत असले तरी, डोळ्यांमधली भिती दिसुन येतेच... मित्रांना तेवढे गांभिर्य नसते... म्हणुन इथे बोलावेसे वाटले... विषयाला सोडुन पोस्ट आहे... माफ करा मला...
|
Manjud
| |
| Wednesday, December 26, 2007 - 9:12 am: |
| 
|
अहो सुमित, काळजी नका करू, देवाची तुमच्यावर नेहमीच मेहेरबानी राहील.
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 26, 2007 - 10:41 am: |
| 
|
सुमित, मित्राना तेवढे गांभीर्य नसते, हे वाक्य खटकले. आणि काय आहे नं, नकार, दुःख आणि वेदनेलाहि देता येतो. मग काय बिशाद आहे, त्यांची आपल्याजाव्ळ यायची.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|